एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्निल जोशीची ABP Majha वरची मुलाखत यूट्यूबवर पाहता येईल.

भाग १ - http://www.youtube.com/watch?v=cP-_gsl_0gw

भाग २ - http://www.youtube.com/watch?v=OkFQivM4Qlw&feature=relmfu

अतिशय प्रामाणिक उत्तरं Happy ईंग्रजीचा वापर जरा जास्त आहे पण एकूण मुलाखत तशी छोटी असल्याने चालून गेले.
ह्यातून मिळालेली माहिती अशी

१. येत्या काही दिवसात मालिका नवीन टर्न घेणार आहे.
२. येत्या १ १/२ ते २ महिन्यात मालिका संपेल.

येत्या काही दिवसात मालिका नवीन टर्न घेणार आहे.

म्हणजे घना काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहुन राधा अबीरला भाव द्यायला लागणार तर...........

येत्या १ १/२ ते २ महिन्यात मालिका संपेल.

१+१/२+२ = साडेतिन तर इथेच झाले.... नविन टर्न घेऊन लगेच संपवणार???

प्रभात कुहू शी लग्न करायला तयार झालाय. अब, तेरा क्या होगा भुंग्या? ?
>>>>>>>>>>>>>>>>>

लग्न करतोय ना... करू दे की त्याने काय फरक पडणार आहे Proud
तसेही काल घनाने सांगितलय ना, खरं खोटं योग्य अयोग्य असं काहीही नसतं.... खरं असतं ते फक्त प्रेम Rofl Wink

कुहूला तेवढं कळेल Proud

कालचा, प्रभातला समजावतानाचा सीन स्वजो ने इंटेन्सली साकारला.. गूड वन!
>>>>>>>>>>>

कालचा सीन तसा घनाची अ‍ॅक्टिंग बघायला छान असला तरी राधाची अजपर्यंतची ईमेज पार कोलमडून पडली त्याने. Sad
घनाच्या बोलण्यावर ज्या पध्दतीने राधा रिअ‍ॅक्ट होत होती...... ती टिपिकल मुलगी वाटत होती. म्हणजे एखाद्या मुलाचे प्रेमाचे उदात्तीकरण करणारे विचार ऐकून भारावून जाणार्‍या आणि नकळत त्या मुलाच्या विचार बिचार करणार्‍या (किंवा प्रेमात पडणार्‍या) टिपिकल मुलगी कॅटॅगरीतली वाटली काल राधा..... आजपर्यंत राधा जरा या सगळ्यापेक्षा "वेगळी" होती....... आता ती पण पुन्हा धोपट मार्गावर जाणार असेल तर......... काय बोलणार..!!!!

घनासारख्यांचं फावलंच म्हणायचं.... Proud एक दोन सेंटी पॅरॅग्राफ्स मारा तोंडावर, झाली पोरगी इंप्रेस..... प्रेमाचं उदात्तीकरण केलं की पोरगी घायाळ Lol Biggrin असं नसतं..... आय मिन नसावं... Happy

राधा अशी नव्हती...... Sad

स्वप्ना आणि राज दोघे मिळून आता यावर प्रकाश टाकतील ही अपेक्षा Wink Biggrin

मलाही आवडला नाही कालचा भाग. राधा अगदीच वाहात चाललीय. इतरांना प्रेमाची भाषा शिकवणारा स्वतः जाणुनबुजून त्यापासुन लांब राहतोय यावरुन तिने पुढचे ओळखावे.

म्हणजे घना काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहुन राधा अबीरला भाव द्यायला लागणार तर...........
<<<
हा नाही तर तो हवाच असं थोडीच आहे , तिने फक्त डिव्होर्स घेऊन नॉर्मल आयुष्य जगाव आणि घनोबाला जाउ दे अमेरिकेत !
अबिर तर नकोच नको , ते कॅ़रॅक्टर च बेकारे , त्याला गायब च करा आज्जीचा फॉर्म्युला वर्ल न झाल्याने!
शेवट लव्ह आज कल सारखा !

तिने फक्त डिव्होर्स घेऊन नॉर्मल आयुष्य जगाव आणि घनोबाला जाउ दे अमेरिकेत !

येस्स्स.... काहीच ठरवता न येणा-या घनाच्या गळ्यात पडण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे...
पण मालिका भारतात दाखवली जात असल्याने शेवटी प्रेम्/संसार महत्वाचे इ.इ. पोपटपंची करत अपेक्षीत शेवट दाखवणार.... i am disliking all this thoroughly. आजवर राधा जशी दाखवलीय त्या चित्राशी पुर्णपणे विसंगत आहे हे. यापेक्षा घनाची आत्या बरी म्हणावी. तिच्या विचारांवर ती कायम ठाम राहिलीय.

>>>>>म्हणजे घना काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहुन राधा अबीरला भाव द्यायला लागणार तर..>>>>>
मालिका जर १-२ महिन्यात संपणार असेल...तर घनाला अमेरीकेचा जॉब मिळालाय अस दाखवतील. त्यांच काँट्रॅक्ट मॅरेज च प्रकरण ते उघड करतील सगळ्यां समोर, राधा आपल प्रेम उघडपणे घनाला सांगेल, घनाच्या आई-बाबांना, राधाच्या बाबांना हा जवरदस्त विश्वासघात सहन होणार नाही, अश्या सगळ्या प्रतिकुल परिस्थीतीत घनाला सुद्धा कुठेतरी त्याच्या राधावरच्या प्रेमाची जाणीव होईल, मग तो त्या "दिल चाहता है" मधल्या आमिर खान सारखा डोळे बंद करुन आवडत्या व्यक्तीबद्द्ल विचार आणेल आणि त्याला फक्त आणि फक्त राधाच दिसेल मग लास्ट बट नॉट द लीस्ट.....तो डिओर्स न घेता एकत्रच राहतील ते सुद्धा मुंबई तच........ Happy बाकी दुसरा काही शेवट शोच्या पॉप्युलॅरीटीमुळे सुट होणार नाही......पब्लीक डीमांडमुळे Happy

काल राधा प्रेम व्यक्त करते आणि घना तिला दूर लोटतो ते प्रोमो मध्ये पाहिले. पण शेवट अबीर राधा सीन नेच झाला. म्हणजे व्यक्त करणे आता मंगळवारवर गेले. क्या यार. इतना इंतजार?

रच्याकने त्याच्या आधी उंमा झो येते त्याच्या शेवटी खात्रीने लग्न जमवून देणार्‍या म्यारेज ब्यूरोची जाहिरात ?
व्हाट आयरनी? एकीकडे बाल-प्रौढ विवाह, मग राधा घना चा गोंधळ अ‍ॅट कन्सेप्ट लेव्हल असा विवाह आनी मध्ये
काय तर म्यारेज ब्युरो. हेहेहेहेहेहे.

<घनाच्या बोलण्यावर ज्या पध्दतीने राधा रिअ‍ॅक्ट होत होती...... ती टिपिकल मुलगी वाटत होती. म्हणजे एखाद्या मुलाचे प्रेमाचे उदात्तीकरण करणारे विचार ऐकून भारावून जाणार्‍या आणि नकळत त्या मुलाच्या विचार बिचार करणार्‍या (किंवा प्रेमात पडणार्‍या) टिपिकल मुलगी कॅटॅगरीतली वाटली काल राधा..... आजपर्यंत राधा जरा या सगळ्यापेक्षा "वेगळी" होती....... आता ती पण पुन्हा धोपट मार्गावर जाणार असेल तर......... काय बोलणार..!!!>
भुंगा, मधले भाग पाहिलेत का? राधाचे लग्न न करण्यामागचे एक कारण 'आपण डिफिकल्ट टु लिव्ह विथ पर्सन आहोत' , लग्न केल्यावर आपली आयडेंटीटी हरवेल असे तिचे समज असणे ही असावीत असे मानायला जागा आहे. काळ्यांच्या घरात आल्यावर इतक्या सगळ्या लोकांसोबत राहणे तिला आवडू लागले. घनासोबत तिला कोझी वाटू लागले (विशेषतः आईच्या वाढदिवसानंतर) . आपल्याला ज्या सवयी अजिबात आवडत नाहीत त्या व्यक्तीसोबत राहता येतेय की, हे जाणवले.
फक्त काही सेंटी डायलॉग्ज एकून तिचे हृदयपरिवर्तन झालेले नाही. (अनेक भागांत कथानक पुढे सरकले नाही असे म्हणण्यातला तोटा हा आहे.)

घना राधाला फसवतोय हे म्हणणेही पटले नाही. आपण दोघांनी एकमेकांमध्ये गुंतायचे नाही असे त्यांचे ठरलेय ना? तो स्वतःही आपण राधामध्ये गुंतत नाही आहोत असे स्वतःलाच फसवतोय की.

राधासाठी अबीर हा पर्फेक्ट मॅच ? त्या दोघांचे लग्न झाले असते तर त्यांचे एकत्र आयुष्य किती बोअरिंग झाले असते!

कथेतला ट्विस्ट म्हणजे घनाला अमेरिकेतला जॉब मिळालाय.

कोणीतरी इथे सांगितले आहे, की या मालिकेचे भाग आपलीमराठी डॉट कॉम वर बघता येतात.

मला आपली मराठी डॉट कॉम वरची मराठी नाटके बघायची आहेत. त्या वेबपेजवर गेले, की नाटकांच्या लिंक्स दिसतात, पण त्या लिंकवर क्लिक केले, की नवीन खिडकीत "धिस पेज कॅन्नॉट बी फाऊंड" असा मेसेज दिसतो. नाटक किंवा चित्रपट त्या वेबसाईटवर ऑनलाईन पाहायचा असेल, तर तिथले सदस्यत्व घ्यावे लागते का? की नाटक / चित्रपट डाऊनलोड करावा लागतो? कृपया मार्गदर्शन करावे.

मयेकर आख्ख्या पोस्टला अनुमोदन. तरीही घना बधीर आहेच्च. प्रेमात/नं पूर्ण बदललेल्या मुली ही रिअ‍ॅलिटी आहे त्यामुळे राधाचं असं वाहवणं ओके वाटतय. टगी मुलं सुध्दा बाबा झाली की कितीतरी बदलतात.

भुंगा, मधले भाग पाहिलेत का?
>>>>>>>>>>>>>

नाही पाहिलेत बरेच भाग मधले हल्ली.

फक्त काही सेंटी डायलॉग्ज एकून तिचे हृदयपरिवर्तन झालेले नाही. (अनेक भागांत कथानक पुढे सरकले नाही असे म्हणण्यातला तोटा हा आहे.)
>>>>>>>>>>>>>

भरत, ते बरोबर आहे तुमचं. मला इतक्या पटकन परिवर्तन झालं असं नाहीच म्हणायचं होतं..... पण तिचं जे कॅरॅक्टर एस्टॅब्लिश झालय, त्यापेक्षा फारच वेगळी वाटतेय आता. आणि खरेच इतका अमूलाग्र बदल होईल का असा विचार येऊन मी मांडलं होतं....... Happy

राधा: मुझे कितना प्यार है तुमसे खुद अपने दिलसे पुछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिन्दगी तुम्हारी है

घना: इतना ना मुझसे तू प्यार बढा, के मै इक बादल आवारा, कैसे किसिका सहारा बनू के मै खुद बेघर बेचारा

राधा: परदेसियोंसे ना अखिया मिलाना, परदेसियो को है एक दिन जाना

घना: छोटीसी ये दुनिया पह्चाने रास्ते है, तुम कही तो मिलोगो, कभी तो मिलोगे, तो पुछेंगे हाल

अबिरः पुकारता चला हू मै गली गली बहारकी, बस एक छाव झुल्फ की बस एक निगाह प्यारकी

राधा: ये है रेशमी झुल्फोला अंधेरा न घबराईये, जहा तक महक है मेरे गेसुओंकी चले आईये

अबिरः तुम जो मिल गये हो तो ये लगता है, के जहा मिल गया, एक भटके हुए राहीको कारवा मिल गया

राधा आणि अबिरः हम तुम,. युग युग से ते गीत मिलनके गाते रहे है गाते रहेंगे

घनाची आजी: ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यो हुआ, कब हुआ, छोडो ये ना पुछो

घना: ओ तुमसे दूर रहकर हमने जाना प्यार क्या है, दिलने माना यार क्या है

राधा: हम तेरे बिना भी नही जी सकते और तेरे बिना भी नही जी सकते, अरे होना किसी एक का है ये हम को पता है, मगर क्या करे, दिलसे मजबूर है

अबिर:तू प्यार है किसी औरका तुझे चाहता कोई और है

राधा (घनाला उद्देशून): तुमही मेरे मंदिर, तुमही मेरी पूजा, तुमही देवता हो

घना: हम तुम्हे चाहते है ऐसे सॉफ्टवेअरवाला कोई एच-१ बी चाहता हो जैसे

राधा आणि घना: चलो सजना जहा तक घटा चले, लगाके हमे गले

अबिर: ऐ मेरे दिल कही और चल, गमकी दुनिया से दिल भर गया, ढूंढ ले अब कोई घर नया

समस्त काळे आणि देसाई कुटुंबियः हम साथ साथ है

राजवाडे समस्त प्रेक्षकवर्गाला उद्देशून: सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए

समस्त प्रेक्षकवर्ग राजवाडेंना उद्देशूनः देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया.

स्वप्ना Rofl

मला आता तू प्रत्येक एलदुगोच्या भागाच्या आधी "मै समय हूं" अश्या महाभारत स्टाईलमध्ये यावंस असं वाटून गेलं...... Biggrin Rofl

भरत मयेकर, संपूर्ण पोस्टला अनुमोदन. फक्त अनेक प्रसंगांतून खुलत गेलेला राधातील बदल जितका नैसर्गिक वाटतोय तितकाच घनाचे वेड पांघरुन पेडगावला जाणे जास्तच ताणल्यासारखे वाटतेय. बाकी सिरियल्समधील काही काही सीन्स फार सुंदर उतरले आहेत. अर्थात मी बरेच सीन्स FF करुन बघते. ज्यांना तसे करता येत नाही त्यांना तर सिरियलमध्ये फारच पाणी घातल्यासारखे वाटत असेल आता.

अबीरने आपल्या एक्सची सांगितलेली कथा खरी असेल की कटाचा भाग? राधाची सहानुभूती मिळवण्यासाठीचे नाटक? त्याच्या गर्लफ्रेंडने सिंगल->मॅरिड यामधली 'एन्गेज्ड' ही स्टेप स्किप केली का?
कालही तो होम्योपाथीसाठी बीएएमस असेच म्हणाला. तसंच कालच्या भागात 'मला एकट्याला सोडून दे' (मुझे अकेला छोड दो) असा संवाद होता. हिंदीतही हे 'लीव्ह मी अलोन' यावरूनच आलं असावं. जरा कोणाला एकट्याने राहू देणं भारतीय मानसिकतेला झेपत नाही ही गोष्ट वेगळी.
सध्या विनय आपटे सुटीवर असावेत.

मयेकरांच्या ३० जून च्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन.

स्वप्ना, ' हम तेरे प्यारमें सारा आलम खो बैठे हैं, तुम कहते हो के इस प्यारको भूल जाओ, भूल जाओ ' हेपण एक राधा साठी चपखल बसणारं गाणं.

अबीर ची कॅरॅक्टर आवडली असली तरी त्याची नेमणूक एका विशीष्ट कामगिरीवर झाली असल्याकारणाने तो जे बोलतो , करतो ते सर्व खरे का नेमून दिलेले काम फत्ते करण्यासाठी या बाबत प्रेक्षक म्हणून मी अजून संभ्रमातच आहे.

मस्त जमले आहे स्वप्ना. तू मिसमालिनी सारखा एक टीव्ही वर आधारित ब्लॉग काढ. आम्ही वाचूच.
राधा चे ते ऑड लेंग्थ चे कुरते आणी लांबच लांब ओढणी परत आली. काल शॉपर्स स्टॉप मध्ये तिच्या बॅग सारखी एक बघितली तर न राहवून बरोबरच्यांना सांगितले अगं राधाची बॅग राधाची बॅग. तर तु. क. मिळाले. चालायचंच
कधी येणार विनय. आय मिस हिम. पोरकट पणा किती बघायचा बरें

घनाची कदाचित अमेरिकेत प्रेयसी असेल ...... why else he is so religiously sticking to the agenda of contract marriage? He is not even misleading Radha that he might be falling for her ........ घरातल्यान्ना माहित असणार त्याचे आधिचे प्रकरण, जुना प्रेमभन्ग may be? त्याला नक्की का तिथे जायचे आहे ते ...म्हणून ते घनाच्या अमेरिकेला जाणयाच्या एवढ्या विरोधात असतील...... त्याच्या पदरी परत निराशा येउ नये .......

जर खरोखर फक्त करियरसाठी असेल तर मला वाटत इथे अमेरिकेवर रूपक केलय ...... kind of reaching out for the stars ..... so details जरा गन्डलेत कारण ते महत्वाचे नाहीत ..... त्याचा ध्यास महत्वाचा ...... श्रेयस आणि प्रेयस मधला झगडा.....

>>>>राधासाठी अबीर हा पर्फेक्ट मॅच ? त्या दोघांचे लग्न झाले असते तर त्यांचे एकत्र आयुष्य किती बोअरिंग झाले असते!>>>> +१०००००००
अगदी...अबीर च कॅरॅक्टर एकदम यांत्रिक आहे. फॉर्मल सारख वाटणारया अबीरच्या कॅरॅक्टर पेक्षा कॅज्युअल वाटणार घनाच कॅरॅक्टर कधीही चांगल. आणि राधाला घनाच सुट होतो. राधाच अबीर बरोबर लग्न झाल असत तर तीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गरजच नसती....६ महिन्यांनी त्यांच लग्न आपोआपच तुटल असत Happy

>>>>कथेतला ट्विस्ट म्हणजे घनाला अमेरिकेतला जॉब मिळालाय.>>>
असच वाटतय पण तो एकदम H1B, L1, GC मिळाल्यासारखाच खुश दिसतोय Happy राजवाडेने अमेरीकेच्या जॉब बद्द्ल निदान थोड तरी Googleलायला पाहिजे होत....:(

राजवाडेने अमेरीकेच्या जॉब बद्द्ल निदान थोड तरी Googleलायला पाहिजे होत....

सुराला घनाला कसलीतरी जबरदस्त पॅशन आहे आणि लग्न त्याच्याआड येईल असे वाटते असे दाखवायचे होते. पण मालिका सुरू करायची वेळ आली तरी कसली पॅशन ते सुचेना, शेवटी घाईघाईत अमेरिकेची पॅशन हे दाखवुन मोकळा झाला. Happy

नमस्कार

कळविण्यास अत्यंत आणंद होत आहे कि एलदुगो या बाफचा दुसरा भागही विद्युतगतीने पुढे सरकतो आहे. या धाग्यावर आधारीत प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम ववि दरम्यान ठेवण्यात येणार आहे. विजेत्यास द ग्रेटेस्ट माबोकर या किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे. सत्कार समारंभ शनिवारवाडा,पुणे येथे करण्यात येईल. या समारंभास एलदुगोचं संपूर्ण युनिट हजर असेल.

कळावे आपला नम्र

राधेशामदादा कोकिळ

घनाची कदाचित अमेरिकेत प्रेयसी असेल ...... why else he is so religiously sticking to the agenda of contract marriage? He is not even misleading Radha that he might be falling for her ........ घरातल्यान्ना माहित असणार त्याचे आधिचे प्रकरण, जुना प्रेमभन्ग may be? त्याला नक्की का तिथे जायचे आहे ते ...म्हणून ते घनाच्या अमेरिकेला जाणयाच्या एवढ्या विरोधात असतील...... त्याच्या पदरी परत निराशा येउ नये .......
>>>

Rofl
काय एक एक डोकी चालतात इथे सगळ्यांची Lol
राजवाडेंनी एक भाग माबोकरांना लिहायला द्यायला हवा

Pages