एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स... कुहू बेस्ट आहे. वादच नाही !
एलदुगोचा मोठाच युएसपी आहे कुहू. किमान आमच्यासाठी तरी- हो की नै रे भुंग्या / झकास वगैरे वगैरे.. Happy

स्पृहा करते पण अत्यंत कन्व्हिन्सिंग. >> हो अगदी. पण तरी मला अग्निहोत्र मधला तिचा रोल तिच्या एकंदर व्यक्तीमत्वाला जास्त साजेसा होता असं वाटतं. तो रोल इतका डोक्यात फिट्ट बसलाय - खास करून तिचे कोर्टातले प्रसंग - की त्याच्या अगदी उलट असलेल्या कुहूच्या भूमिकेत स्पृहा १००% मानवत नाहीये अजून.

नीरजाला २००% अनुमोदन. कुहू गोड आहे. अतिशय नॅचरल वाटते. प्रभातही एकदम गोड. मस्त मुलगा आहे. कुहूच्या जोडीला असाच मुलगा हवा होता.

मला कालचा राधाचा भाग आवडला. हळूहळू प्रेमात पडत जाणं, ते जाणवणं आणि ते स्वीकारणं हे टप्पे सुरेख दाखवले. ह्याचा अर्थ तिच्यातली तडफ संपली असं नाही. तीही माणूसच आहे, प्रेमात पडली आहे इतकंच Happy खरी गोची होत आहे ती घनाची! काल राधाने 'मला तूही हवा आहेस (माझ्या आयुष्यात)' असं म्हटल्यावर त्याने चक्क डोळेच बंद केले (बहुतेक फ्रस्ट्रेशन येऊन). इतकी नॅचरल प्रतिक्रिया! फारच आवडली. दिग्दर्शकाला (बहुदा विनोद लव्हेकर) त्यासाठी १०० मार्क!
(रोजच्या भागाचा दिग्दर्शक निराळा असतो, राजवाडे संपूर्ण मालिकेचा हाकारू आहे)

येस पौर्णिमा, मलाही त्याची डोळे बंद करायची रिअ‍ॅक्शन खूप आवडली..
कुहू गेली जरा डोक्यात. पण ती तशीच वागली असती हे पण पटले. तसंही बाकी सगळीच पात्रं व त्यांच्याशी रिलेटेड प्रसंग -डायलॉग्ज हे केवळ घना-राधाला (इन्डायरेक्टली) प्रेमाची अनुभूती होण्यासाठीच आहेत.. त्यामुळे काही वाटत नाही. उदा: ज्ञानाचे अ‍ॅट्रॅक्शन-प्रेमचे कन्फ्युजन, कुहू-प्रभातचे लग्नाबद्दलचे तुटणे-जोडणे...

पण एक जरा ऑड वाटले. घना त्याच्या मित्राशी बोलताना इतका टेन्शन घेऊन बोलत असतो.. आणि मग घरी एकदम उड्या मारत येतो! Lol (भारतातून या कामासाठी मीच जाणार वगैरे तर मला केवळ स्वतःची फुटकळ समजूत काढतोय घना असे वाटले -कॉन्फिडन्स वाटला नाही.. Happy )

बस्के, अगं तो नुसताच आनंदी दाखवला. त्याच्या आनंदाचं कारण त्याचं सिलेक्शन झालं हेच असणार. ते आजच्या भागात दाखवतील बहुतेक.
मुक्ताचा कालच्या भागातला कुहुला समजावतानाचा आणि घनाला प्रेमाची कबुली देतानाचा अभिनय मस्त Happy
स्व. जो. न बोलता एक्प्रेशन्स छान देतो. पण बोलताना फार ओव्हर अ‍ॅक्टींग करतोय असं वाटतं. मुं.पु.मुं. मधेही असंच वाटलं होतं मला!

कुहू प्रभातचे लग्न मोडण्याचे नाटक घनाकडून प्रेमविषयक संवाद वदविण्यासाठीच होते.>>> मलाही असच वाटतय.
आता दुसर्‍याला समजाउन सांगण्यार्‍या आळशी लडदुला "अपने गिरेबान मे झांक के देखो" असला एक डायलॉग मारावासा वाटतओय.
च्यायला, स्वतः ती सुस्पष्टपणे सांगतेय की तिला तो हवाय. आणि हा...
तेल लावत गेली अमेरीकेतली नोकरी...

पौर्णिमेस प्लस वन.

बाय द वे, इथे इतके बारकाईने सिरीअल पाहणारे लोक आहेत, म्हणून विचारतो.
तुमच्यापैकी कोणालाच असे वाटले / जाणवले नाही का, की घना स्वतःदेखील राधेच्या प्रेमात आकंठ बुडालाय म्हणून? मी रोजच्यारोज एलदुगो पाहत नाही, पण एका भागात मला आठवते की ती त्याला तिची जन्मतारीख विचारते. तो चाचरत आठवत काहीतरी चुकीचे सांगतो. मग ती फुरंगटून निघून गेल्यावर जन्मतारीख, वेळ, स्थळ वगैरे सर्व कुंडलीच (स्वतःशी, पण कॅमेर्‍याकडे बघून ) सांगतो.
आणखीही असे काही प्रसंग आहेत, जेव्हा तो स्वतःशीच प्रेम कबूल करतो, पण व्यक्त करत नाही.

अमेरिकेची अनरिझनेबल ओढ आणि राधेला हेतूतः टाळणे- यामागे काहीतरी जेन्युईन कारण / सस्पेन्स आहे असे मला अनेकदा वाटते.

तुमच्यापैकी कोणालाच असे वाटले / जाणवले नाही का, की घना स्वतःदेखील राधेच्या प्रेमात आकंठ बुडालाय म्हणून

राधा त्याच्या प्रेमात पडायच्या आधीपासुनच तो तिच्या प्रेमात पडलाय. आधी तो स्वतःच्या भावनांबद्दल केअरलेस होता, बहुतेक राधा कधीच त्याला स्विकारणार नाही याची खात्री होती. पण जसजशी राधा विरघळू लागली तसतसा तो खचायला लागला. दिवसेदिवस त्याच्या तिला टाळण्याची तीव्रता वाढत चाललीय. आणि आता तर तो पारच कामातुन गेलाय. तोंडाने नाही म्हणतोय पण चेह-यावर १२ वाजलेले असतात आणि हो म्हणायला का काचकुच करतोय ते अजुन दाखवले नाही.

हो. ज्ञानेश. एकदा ज्ञानाला प्रेम व आकर्षण यातील फरक समजावून सांगतानाही त्याचे राधावर प्रेम आहे व ते अ‍ॅक्सेप्ट करायलाच त्याला जमत नाहीये हे लक्षात येते.

घनाने आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा त्या निधन पावलेल्या बालमैत्रिणीजवळ केली असेल Proud

भुंग्या रे, तुझ्यासाठी कॉलर ट्यून - कुहू कुहू बोले कोयलिया, कुंज कुंज मे भवरे डोले, गुनगुन बोले.

घना आणि राधासाठी ब्याकग्राऊन्ड म्युजिक - हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी, तेरी दो टकियोंकी नौकरी रे मेरा लाखोंका सावन जाये रे Happy

राजवाडेंनीही केला नसेल एवढा बारीक आणि सखोल विचार प्रसंग, कलाकार, कपडेपट, वेशभूषा, संवाद यावर माबोकर करतायत Wink
पण काय करणार सध्या ही एकच जरा बघणेबल सिरियल आहे Happy

राधा त्याच्या प्रेमात पडायच्या आधीपासुनच तो तिच्या प्रेमात पडलाय. >> अगदी अगदी. प्रत्येक पात्राच्या मनोव्यापारांमागचे लॉजीक हाकारूने बरेच चोख सांभाळले आहे. त्यामुळेच मलिका आवडते आहे.

फक्त घना, अमेरीका आणि त्याची आयटी मधली करीअर हे त्रैराशीक नीट सुटत नाही. पण 'दाल मे काला' चालून जाते. सगळी डाळच काळी नाहीये ना?

काल राधाने 'मला तूही हवा आहेस (माझ्या आयुष्यात)' असं म्हटल्यावर त्याने चक्क डोळेच बंद केले >>>> येस पौर्णिमा! मलाही ती रीअ‍ॅक्शन आवडली. स्वतःला प्रयत्नपूर्वक यापासुन दूर ठेवलय त्यानं. राधा मात्र गुंतलीय पूर्णपणे आणि हे त्यालाही माहीतीय. कधीतरी या सत्यपरिस्थितीला सामोरं जायचं आहे याचीही त्याला जाणिव होतीच. ती वेळ आल्यावर ही रिअ‍ॅक्शन परफेक्ट वाटली.

राधेचं वागणंही सुरेख! मी स्वतःशी का खोटं बोलु? म्हणुन आहे ते मान्य करणारी, मला हे सगळं आवडतय म्हणुन सरळ कबुल करतांना, तू मला माझ्या आयुष्यात हवा आहेस हे त्याला सांगतांना ती स्वतःशी प्रामाणिक आहे. कुठेही मेलोड्रामा न करता(अजुन तरी), चीप न होता तिनं असं करणं तिच्या मॅच्युरीटीला धरून आहे.

एक आणखी आवडलेली गोष्ट म्हणजे इजहार हा मुलानं आधी करायचा असा टीप्पीकलपणा केला नाहीये. उगा हिनं त्याच्याकडुन इजहार होण्याची डोळ्यात प्राण आणुन वाSSSSट पहाणं, डोळे गाळत त्याला दूSSSSSर वगैरे जातांना बघणं या गोष्टींना काट मारली हे जामच आवडलं.

राधा सरळ वाटते. आधी ठरवल्याप्रमाणे अलिप्त रहाता येत नाहीये; आपण प्रेमात पडलोय हे समजून कबूल करण्याइतकी प्रामाणिक वाटते. घना मात्र मठ्ठपणाचा कळस आहे अगदी.

मला तो कुहुच्या वडीलांचा सिन पहाताना खरोखरीच इमोशनल व्हायला झालं Proud
बाकी, मै भी कुहु फॅनक्लब मेंबर Happy कुहु रॉक्स.
सिरेल फक्त अन फक्त कुहु साठीच पाह्तो . Happy

त्या निधन पावलेल्या बालमैत्रिणीजवळ >>>>>>>>>????????????? पण फोटोत तर ती बरीच मोठी दिसत होती ना??? Uhoh

तिच्या कविता, तिचं येडपट वागणं आणि लाजणं सहनशक्तीचा अंत पहाणारं होतं. <<<
पण ते खोटं नाही वाटत. तो तिचा स्थायीभाव वाटतो. खरंच वाटतं ते. स्पृहा करते पण अत्यंत कन्व्हिन्सिंग.<<< +१०००००००००००००००००००००० मलाही या सिरीयलमध्ये कुणीच अती आहे वगैरे जाणवत नाही. उलट बाकीच्या फुटकळ सिरीयलींपेक्षा बरीच सह्य आहे ही सिरीयल आणि सगळे कलाकार काय नॅचरल अ‍ॅक्टिंग करतात सहीच

विनय आपटे & मुक्ता सोडता मला तरी ही सिरियल आवडत नाही विशेष. सुरुवातीला इला भाटे आवडायच्या पण आता त्यांचाही कंटाळा आला आहे.
नॅचरल अ‍ॅक्टिंग >>> विनय आपटे सोडता हे मला नाही पटत अजिबात. पण आपापलं मत. सो ज्यांना आवडते त्यांनी एंजॉय करा. मला तर हा धागाच जास्त आवडतो. Happy

मला पण हा धागा जास्ती आवडतो. राधा आणी कुहूचे युनिफॉर्म कधी बदलणार देवा...इला भाटेंचा पण युनिफॉर्मच आहे पण त्याबद्दल हू केअर्स!
त्या फुग्याच्या बाह्या मला अजिब्बात आवडत नाहीयेत. आणि कुहूचे मठ्ठ कपडे

दोघेही प्रेमात पडले आहेत.. पण
घन्श्यामला अमेरिकेत जायचे आहे. त्याच्या घरात ते कोणालाही नकोय. आई देव पाण्यात ठेवेल, बाबा अबोला धरतील, काका-काकू emotional blackmail करतील आणि आजी रडत बसेल. असे असुनही हा मुलगा सगळ्यांना शेंडी लावतोय. त्यांच्याच सांगण्यावरुन लग्न करायचे, मग अमेरिकेला जायचे आहे म्हणुन ते मोडायचे. त्यातुन राधाला सोडचीठ्ठी द्यायची असे ठरले आहे तर तिच्याच प्रेमात पडलाय. ती जरा रडली कि हा तिची अतिशय गोडपणे समजूत काढणार, 'राधा तु नेहमी हसत रहा' वगैरे वगैरे. जोपर्यंत अमेरिकेचे काही ठरत नाही तोपर्यंत फार गोड वागणार, गळ्यात पडणार.... अन ते जमत आले आहे असे वाटले कि तिला दुर ढकलणार. एवढे सगळे करुन हा अमेरिकेला गेला तर सुखाने कसा राहील? त्यापेक्षा ती आपल्यावर प्रेम करते अन आपल्यालाही ती आवडते तर प्रेमाची कबुली देऊन तिलाही अमेरिकेला यायला मनवावेना त्याने. म्हणावे, देवाच्या कृपेने चान्स मिळालाच आहे तर चल ना माझ्याबरोबर, राहू काही वर्ष अन येऊ परत. हाकानाका.

राधा, ती तर घन्श्यामच्याच नाही तर त्याच्या पुर्ण कुटुंबाच्याच प्रेमात पडली आहे. तिला अमेरिका काय भारत-मुंबई सोडून कुठेही जायचे नाही. कारण वडिलांपासून दूर जायचे नाही. तिच्यासारख्या हुशार मुलीने तर स्वत:चे सगळे ऐकेल असाच मुलगा शोधून त्याच्याशी लग्न करुन वडिल राहतात त्याच भागात घर घेऊन रहायला पहिजे होते (अशा हुशार मुली माझ्या बघण्यात आहेत Happy ) पण प्रेमात पडायला तिला घन्श्यामच मिळावा? नाहितर शिरियल कशी चालणार म्हणा! आता घन्श्याम ऐकणारच नसेल तर त्याने प्रभातला समजावले तसेच समजावून बघावे नाहीतर एकटाच जा म्हणावे. तिकडे एकटाच मन लावुन काम करुन त्याबरोबर घरकामही करुन वैतागुन परत येईलच तो.

आजचा भाग अतिशय छान. उत्तम काम मुक्ता व स्वप्नील दोघांचे. फक्त इलाआज्जी आज्जी होण्याचे स्वप्न बघू लागल्यात कि कॉय कुणाचे काय तर कुणाचे काय.
संवाद छान. जरा ही अतिशयोक्ती नाही.

मुक्ता आणि इला भाटे यांचा आजचा प्रसंग अगदी टचिंग होता. मुक्ता अप्रतिम !
त्या प्रसंगाची प्रकाशयोजना पण उत्तम !

नीरजाला २००% अनुमोदन. कुहू गोड आहे. अतिशय नॅचरल वाटते. प्रभातही एकदम गोड. मस्त मुलगा आहे. कुहूच्या जोडीला असाच मुलगा हवा होता.
>>>>>>>>>>>>

अरेरे!!! Sad
पौर्णिमा... तुम्ही अजून मला पाहिलेले दिसत नाही Wink Rofl Biggrin हलकेच घ्या हो. Proud

बाकी, कुहूच्या फॅनलिस्टीत भर पडत गेली तरी काही प्रॉब्लेम नाही...... कारण
"हम जहां खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है" Wink

बाकी चालू द्या मस्त Proud

Pages