एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घना खरा असता तर त्याने अमेरिकेला का जायचं आहे हे खूप आधी राधाला सांगितलं असतं. शी डिझर्व्हड इट! >> का? तिनेही काँट्रॅक्ट मॅरेजच केले होते ना? मग घनाच्या खाजगी गोष्टी जाणून घ्यायचा तिला अधिकारच नाही उरत.

गोड बातमी मागचे घनाच्या आईने दिलेले कारण पण पटले . म्हणजे मला वाटत होते नसे नुसते राधाच्या रडण्यावरून त्यांनी तसे अनुमान काढले नव्हते तर तिच्या मुड स्विंगवरून त्यांनी तसा अंदाज बांधला होता. काहीतरी वाईट घडल्यामुळे राधाचा मुड खराब झाला असेल असे न मानता त्यांनी बांधलेला अंदाज त्यांच्या वयाला आणि नात्याला साजेसाच होता.

कालच्या भागात काय झाले?
(भाटेकाकुंचे कळले कारण प्रिव्यु पाहिला होता.)

>>कालच्या भागात काय झाले?
घनाच्या आईने समज करुन घेतला की राधा गरोदर आहे आणि मग काही मिनीटे आधी घनाचे बाबा (हा माणूस अचाट आहे. सून गरोदर असल्याची शंका बायको व्यक्त करते आणि हा माणूस "तू चहा घे" असं बायकोला म्हणतो. काय प्रतिक्रिया आहे Proud ) मग घना आणि त्याच बरोबर प्रेक्षक यांना मनसोक्त पिळलं.

एक तर दिग्दर्शक तरी गंडलाय किंवा लेखिका तरी. angry_madbanginghead_2.gif

मंदार +२०
काल काय बोअर पण घनाचे (नविन) बाबा ....कायच्या काय प्रतिसाद होते त्यांचे Sad
काल ते दोघे त्यांचा संवाद आठवत होते...ते प्रसंग मस्त होते....(आपण पण कोणासोबत भांड्ल्यवर किंवा आपल काहीतरी बिनसल्यावर झोपताना सगळ डोक्यात येत असत ...अगदी तसच दाखवल आहे ) ...मला आवडल Happy

घना त्या श्रुतीवर प्रेम करत असतो, ती दुसर्‍याशी लग्न करून जाता जाता त्याला सांगते तू अमेरिकेला जा आणि मरते नंतर कधीतरी........ तर तिची शेवटची इच्छा म्हणून केवळ याला अमेरिकेला जायचंय? Uhoh म्हणजे तिने सांगितले नसते तर याच्या डोक्यात अमेरिका कुठेही नव्हती? Uhoh तो भारतात खुष होता? Uhoh ..... आपण प्रेम करतो त्या माणसाची शेवटची इच्छा हे एकमेव कारण असू शकतं एखाद्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यासाठी? Uhoh

लम्हे पिक्चर मधल्या अनिल कपूर सारखं होणारे घनाचं..... डोळे मिटल्यावर इतके दिवस त्या श्रुतीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता त्याच्या...... आता राधाचा येणारे....... असं काही नसतं की आयुष्यात फक्त एकदाच खरं प्रेम होतं वगैरे..

अमा, Lol

अरे हा! खरंच की लले, तसाही काय फरक पडतो Proud

रच्याक, त्या अबीरलाही प्रेमात थुत्तरफोड उत्तर मिळालं आहे आणि घनालाही Lol

रैना, काल घना-राधा पडल्यापडल्या परवाचाच भाग फ्लॅशबॅकमध्ये पहात होते. मानव्-अबीर यांनी राधाच्या स्वभावाबद्दल चर्चा केली.

तुझ्याविना हे गाणं भयानक बोर आहे. वैशाली सामंत तुझ्झ्याविना म्हणते.

अमेरिकेला जायचं खर कारण अगदी हास्यास्पद. शिवाय कुहुच्या त्या प्रभातड्याला समजावल्यानंतर तर फारच. तो कुहूचा लग्न मोडल्याचा प्रसंग खर तर आत्ता चालला असता. म्हणजे त्या प्रभातला समजावता समजावता घनाच्या स्वतःच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला असता. Happy

बाकी भाटेकाकू म्हणजे Uhoh

परवाच्या क्षणचित्रांमध्ये वाटलं त्यापेक्षा घनाच्या आईला सून प्रेग्नंट असल्याचं वाटणं हे खूपच convincingly दाखवलं आणि तिने मुलाला 'आम्ही स्वप्नं पाहणार नातवंडांची, तुम्ही ती खरी करुन दाखवायची.' असं म्हणणं हेही राधा-घनाचं लग्नाच्या वेळचं वाढलेलं वय पाहता अत्यंत स्वाभाविक वाटलं. आजही घराघरात तिशीनंतर मुलींनी प्लॅनिंग करु नये, वेळेवर मुलं जन्माला घालावीत असाच विचार दिसतो आणि पालक त्यावरुन प्रेशर आणतात.

वैशाली सामंतने पाट्या टाकल्यासारखं गायलंय 'तुझ्याविना'. खरं तर मुक्ताला वैशालीचा आणि स्वप्नीलला मंगेशचा आवाज अजिबात सूट होत नाही पण त्या सिच्युएशनला मंगेशचा आवाज छान वाटतो ऐकायला आणि तो गायलायही चांगलं Happy

भुंग्या शेवट करायचा म्हणजे सीरेलवाल्यांना(आपला राजवाड्या रे Proud ) कुहूचेही लग्न झालेले दाखवावे लागेल. Wink फिर तेरा क्या होगा कालिया????? Wink

घनाचे पूर्वा वर प्रेम होते आणि तिचे लग्न झाले ..म्हणजेच तिचे त्याच्यावर प्रेम न्हवते..मग तिच्या डोळ्यात या घना साठी स्वप्ने कशी काय असू शकतात जी पूर्ण करायला हा धडपडतोय ...अजिबात पटले नाही. ती जर जिवंत असती तर आताच्या घनाला बघून तिला आपली स्वप्ने किती बाळबोध होती हे नक्कीच पटले असते.
एखाद्या चांगल्या मित्राची प्रगती व्हावी हे स्वप्न असू शकते पण अमेरिकाला जावे हे स्वप्न जरा विचित्र वाटते. जर हे स्वप्न दोघांनी मिळून पहिले असेल तर एक वेळ ठीक आहे.
रजवाडे सिरीयल ची सुरवात चांगली करतात. actors चांगले घेतात . पण शेवटी गुंडाळून टाकतात. असंभव चा अनुभव पुन्हा देणार वाटते

घनाच्या बाबांना केवळ स्वतःकरून आणलेल्या चहाचीच पडली होती! Lol एकदा भाटेकाकूंनी मान डोलावली तेव्हा कुठे शांत!! मी जाम हसले! ( पण असतात की अशी लोकं)
मानवला गोळी घालणार अबीर!! ( नाहीतर मी तरी!) काय ते ' ओल्ला कचरा वेगळा, कोर्र्डा वेगळा, कळ्ळं' इत्यादी बोलणे! :/

एकुणात राधा प्रेमाची कबुली देतेय प्रत्येकवेळी आणि घना मनात असतानाही ती देत नाहिये हे किती दिवस बघायचय अजुन? असोच.
भाटेकाकु टिपिकल काकू कालच्या एपिसोडमधे. मला आजतागायत श्री व सौ काळे (सिनियर) यांच्यातिल संवादांचे प्रयोजन कळले नाही. उगाच वेळ खातात.

अगं ती त्याची फॉर्मर गर्लफ्रेंड असते जी त्याला खुन्नस देते. मग तो लगेच बदलतो.
तरीपण ती त्याला टांग मारुन लग्न करते. म्हणुन तो देवदास मोडात बसलेला असतो मग राधा त्याची समजूत काढते.

भाटेकाकु टिपिकल काकू कालच्या एपिसोडमधे. मला आजतागायत श्री व सौ काळे (सिनियर) यांच्यातिल संवादांचे प्रयोजन कळले नाही. उगाच वेळ खातात. >>>> आपण भाटे काकूंच्या तर्काला नावं ठेऊ नयेत, त्यांच्या तर्का मागची कारण आपल्याला कळावीत म्हणुन असेल. Happy

हा घना म्हणजे १ नंबर चा ठोंब्या, माठ आहे.
एकदाचा जा तरी बाबा अमेरीकेला. राधा तरी सुटेल बिचारी.

अमेरिकेला जाण्याचं कारण कसलंच चिप आहे Angry
कोणी मला असलं कारण दिलं असतं तर एक ठेवुन दिली असती आणि म्हणलं असतं बर झालं आपलं काँट्रक्ट मॅरेज झालयं नाही तर तुझ्यासारख्या माठाला कोण झेलेल आयुष्यभर..

Pages