एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग तसा टीपी च होता. पण राधाच कॅरॅक्टर अगदी matured दाखवलय. एवढी ऊलाढाल होऊनसुद्धा ती समजुतदारपणे घनाशी नॉर्मल वागायला सांगते आणि ते सांगताना ती घनाच्या डोळ्यात बघुन बोलायचा प्रयत्न करते. आणि हा ढेरपोट्या घना साध राधाच्या चेहरयाकडे बघायचसुद्धा धाडस करत नाही. biggest loser आहे घना. पण आता जाम स्लो झालीय मालीका. राजवाडेला या स्टेजवर राधा-घना मध्ये रोमँटीकपणा दाखवायला बराच स्कोप आहे. ते न दाखवता ईतर कॅरॅक्टरांचा बोरींगपणाच जास्त घुसडलाय "गाळलेल्या जागा भरा" सारखा. Happy

माई आज्जींच्या प्लॅन चे वाजलेत १२ , स्टोरी भरकटवलीये सध्या !
काय त्या फालतु कुहु-प्रभु ड्राम्यात वेळ वाया घालवतायेत :(.
ती कुहु साडी नेसल्यावर 'शाळा' मधल्या जोश्याच्या लाइन सारखी दिसत होती.
(ट्रेलर अम्धे दाखवलेल्या पुढच्या भागात लग्न मोडल्याने कुकुचा बदाबदा रडण्याचा अभिनय(!) काय महा भयंकर होता:अओ:)

वि.सू: : इथल्या लोकांनी परी-माउली-मानव-ज्ञाना सारख्या पकाउ लोकांची आठवण काढणं सोडा, ते लगेच दिसतात पुढच्या एपिसोड मधे :(.

नेटवर एपिसोड्स पाहिले की नको ते सीन्स FF करता येतात आणि हवे ते पुन्हा पुन्हा कितीही वेळा बघता येतात. बघ विचार करुन
<<< अगो +१ Happy

मला प्रचंड बोअर झाला आजचा भाग! :|
माईआज्जींचं बॉसगिरी करणं मला पहिल्यापासूनच डोक्यात जातं. वैताग झालीय सिरिअल!
Angry

वि.सू: : इथल्या लोकांनी परी-माउली-मानव-ज्ञाना सारख्या पकाउ लोकांची आठवण काढणं सोडा, ते लगेच दिसतात पुढच्या एपिसोड मधे .>>>>> Proud
मला वाटलेलं कि राधाला साडीत पाहून घना परत घसरेल, पण कसलं काय Sad आणि कुहु प्रभातवर आता अख्खा आठवडा घालवणार का? Sad श्या.....
मला माईआजी आवडते. कसली क्यूट आहे. अशी आजी मलापण असती तर धमाल आली असती.

ती कुहु साडी नेसल्यावर 'शाळा' मधल्या जोश्याच्या लाइन सारखी दिसत होती.>> हायला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१

मी मिसली कुहुला साडीत बघायला. Sad

भुन्ग्या खुशीत असेल नै. कुहुच्या बाबाच आणि प्रभातच्या बाबाच भांडण आहे म्हणल्यावर... Biggrin

उगाचच राहूल सोलापूरकरचं कॅरॅक्टर या स्टेज ला घुसडवण्याचं काय प्रयोजन कळलंच नाही काल? कदाचित, कुठल्याही अ‍ॅडव्हर्स परिस्थितीतही ठाम राहिलेलं कुहू-प्रभुटल्याचं प्रेम घनाला अक्कल आणण्यासाठी वापरायचं असेल राजवाड्यांना.

वल्लभकाकाचा इमोशनल अत्याचार अम्मळ अतीच वाटत होता काल वधूपिता म्हणून Sad

नेटवर एपिसोड्स पाहिले की नको ते सीन्स FF करता येतात आणि हवे ते पुन्हा पुन्हा कितीही वेळा बघता येतात. बघ विचार करुन>>>>>>>>>>>>
तसं आम्ही टिव्हीवर पण करतो आजकाल... टाटा स्काय प्लस वर अख्खी सिरियलच रेकॉर्डिंगला लावली आहे, रोजचा एपिसोड १० मिनिटं उशीरा बघायला सुरूवात करायची आणि मधले ब्रेक्स, भाटेकाकू, मानव वगैरे चे सीन धडाधड FF Happy

वल्लभकाकाचा इमोशनल अत्याचार अम्मळ अतीच वाटत होता काल वधूपिता म्हणून
>>>>>>>>>>मला वाटतं........त्यावल्लभकाकाचा राहूल सोला.शी काहीतरी व्यवहार असणार ...तो सट्टे बिट्टे काहीतरी उद्योग करतो ना!..(हेही जरा अतीच वाटतं मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात!)
तर त्याला आधीपासून माहिती असणार आज गाठ कुणाशी आहे ते! म्हणून तो बाहेर जायला कचरतोय. आनि प्रेक्षकांना वाटतम तो मुलीसाठी कातर झालाय. हा आपला अंदाज हो!

मानुषी, सट्टे बिट्टे खेळणारा तो दिग्याकाका ग Happy

व.काका आणि रा.सो. ची जुनी मैत्री असणार म्हणून सुरूवातीला पाहिल्या पाहिल्या दोघांच्या चेहर्‍यावर हास्य पसरतं आणि नंतर काहीतरी खुन्नस झाली असणार त्यामुळे एकदम असहकार पुकारत असतील Lol

काल राधा मानवशी बरी वागली, वर त्याला तु कोणा मुलीच्या प्रेमात होतास हेही विचारले.

तिच्या लग्नात मानव घनाचा कान अंमळ जोरातच पिळतो तेव्हा ती घनाला 'तुझा बदला घेतला त्याने' म्हणालेली त्यामुळे मला वाटलेले की तिला माहित आहे मानव कोणाच्या प्रेमात आहे ते.

कालच्य भागातले राधा एकदम उदास, मलूल, त्राण नसल्यासारखी बेड वर पडून एकदम आधीच्या घटना आठवत रडताना दाखवलेली बघून एकदम टच झाले.(एकदम रिलेट झाले) Happy
खाली तो माठ (घना) ही तसाच होता पण राधाची देहबोली एकदम निराश दाखवून सरस अभिनय वाटला.

स्वजो च्या मुलाखतीत त्याने सांगितले की तो सुद्धा आळशी प्रकारातच मोडतो खर्‍या जीवनात... हे पात्र(घना) च्या तो एकदम जवळ आहे. बहुधा म्हणूनच त्याला असा अभिनय करायला त्रास पडत नसेल.

वैशाली सामंत उगाच तुज्झ्या विना केकाटते का एकदम .. कळत नाही. नाजूक, गोड आवाज चालला असता इथे दुसरीचा.
उगाच काय ते पाश्च्यात पद्धतीने तान काढणे जमत नाही.

कालच्या भागात नवर्‍याने चहा आणला तर आईडी इतकी बैचेन कशाला होते. Proud
कधीही रात्री अपरात्री चहा पिताना दाखवतात अगदी.. १० वाजता सुद्धा... Sad

तिच्या लग्नात मानव घनाचा कान अंमळ जोरातच पिळतो तेव्हा ती घनाला 'तुझा बदला घेतला त्याने' म्हणालेली त्यामुळे मला वाटलेले की तिला माहित आहे मानव कोणाच्या प्रेमात आहे ते. >> अगदी अगदी. नंतरही ती एकदा घनाला 'तुला नंतर सांगते' असें काहीसं म्हणाली होती मानवबद्दल.

कान भाउ पिळतो, त्यामुळे राधाने बदला वगैरे वाक्य वेगळ्या संदर्भात म्हटले असेल.
बायकोचा भाउ रागाने कान पिळतो.. वगैरे.. चान्स घेतो..

पण राधाच्या तेव्हाच्या एकुण आविर्भावावरुन मानवने लग्न पसंत नाहीय म्हणुन कान पिळलाय असेच सुचित केलेले. घनाला कळत नाही कसला बदला घेतोय मानव, तेव्हा ती तुला नंतर सांगते म्हणते. काल पहिल्यांदाच कळले तिला मानवबद्दल माहित नाही ते. आजवर तीचे वागणे माहित आहे आणि ते अजिबात आवडलेले नाहीय असेच होते.

मानुषी, सट्टे बिट्टे खेळणारा तो दिग्याकाका ग

>>>>>>>>> हं बरोबर मंजिरी!
मग असेल मग असं असेल....
राहूल सोल. आणो वल्लभकाका हे ५वीत कबड्डीतले रायव्हल असतील आणि दोघांनी एकमेकांना टांग मारून पाडलं असेल....तेव्हापासूनची शपथेवरची दुष्मनी! प्रभातची ६ वर्षाचा असतानाची ब्रम्हचर्याची शपथ, आणि श्रुतीने स्वता: यूकेला जाऊन घनाला यूएसेला जाण्याची घातलेली शपथ ....या चालीवर!

आजवर तीचे वागणे माहित आहे आणि ते अजिबात आवडलेले नाहीय असेच होते.>>>>>>> अगदी अगदी!............राधाला हे माहिती नाही हे मलाही कालच कळले.

प्रत्येक भागाचा दिग्दर्शक वेगळा असल्याने अशी डिसकंटिन्यूटी येत असेल. >> Lol
मग प्रेक्षकांना विचारायचे ना. आम्हाला तरी काय काम आहे. Wink

मी काल मधूनच एपिसोड पाहिला त्यामुळे कुहूच्या बाबांचा एकंदर अभिनय पाहून मला असं वाटलं की त्यांचं नाव प्रौढ साक्षरता वर्गात घातलंय, त्यांना साळंला जायचं नाहिये आणि कुहूची आई बाबापुता करून त्यांना शाळेत पाठवतेय Proud

कुहुच्या बाबांचं आणि प्रभातच्या बाबांचं काहीतरी फालतू कारणावरून बिनसलं असणार.

छन्न पकैय्या छन्न पकैय्या छन्न के उपर कढाई
क्या होगा कुहू और प्रभात का, बाजा बजेगा या शहनाई?

अगले एपिसोडमे देखते है......हम लोग...

कुहुच्या बाबांचं आणि प्रभातच्या बाबांचं काहीतरी फालतू कारणावरून बिनसलं असणार.

अर्थातच.. जसे प्रभात नी कुहू तसेच त्यांचे बाप..

मला वाटतं कुस्तीच्या डावात कुहूच्या वडिलानी कपटाने प्रभातच्या वडिलाना हरवलं असणार. किंवा दोघेही कॉलेजात एकाच मुलीवर प्रेम करत असणार....

कुहुच्या बाबांचं आणि प्रभातच्या बाबांचं काहीतरी फालतू कारणावरून बिनसलं असणार. >>>>>> टकलावरुन बोलले असेल......
." यांच्या डोक्यावर काहीच केस नाही आहे..."
"ओ बोलताय कुणाला..तुमच्या सुध्दा डोक्यावर केस नाही आहेत "
" निट बघा जरा ...हे हे बाजेचे जे आहेत त्याला केस म्हणतात"
"अस व्हय"
" तुम्ही केस कशी असतात हे सुध्दा विसरलेले दिसतात "
" मधे पडले आहे ना टक्कल ... आता १-२ वर्षात तुम्ही आमच्यातच येउन बसणार"

.
.
हे असले मुर्खासारखे बोलुन भांडण केले असेल.......... Angry
.
.
एका छान चांगल्या उत्तम मालिकेचा बट्ट्याबोळ कसा करावा.......यातुन शिकावे Lol

राजवाडेंना वाटलं असेल की राधा आणि घनश्याम ह्यांच्या नात्यातला तणाव फार दाखवला. आता थोडा कॉमिक रिलिफ देऊ. म्हणून हे कुहूच्या लग्नाची बोलणी वगैरे. आज तर ती कुहू काव्यात रडायला लागली की मी टीव्ही म्यूट करणार आहे. ती काय रडली ते सांगायला भुंगा आहेच Proud

कुहुच्या बाबांचं आणि प्रभातच्या बाबांचं काहीतरी फालतू कारणावरून बिनसलं असणार.
>>>>>>>>>>>

आता भुंग्याची एंट्री Wink

ती काय रडली ते सांगायला भुंगा आहेच
>>>>>>>>>>

ए स्वप्ना मी हल्ली बघतच नाही. धाग्यावरच मला वर्दी मिळते कुहुच्या कुशल मंगल आय मिन शुभमंगलाची Proud

आज तर ती कुहू काव्यात रडायला लागली की मी टीव्ही म्यूट करणार आहे. ती काय रडली ते सांगायला भुंगा आहेच >>>>>>>> चला ,म्यूट वगैरे करु शकते म्हणजे स्वप्ना स्वतःहून हि मालिका बघते तर Wink
मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढतच चालला आहे
@भुंगा , कुहुचा फॅनक्लब बराच मोठा आहे हं , काल माझा छोटा भाऊ तोंड फाटेस्तोवर स्तुती करत होता तिची. किती गोड आहे,वगैरे ......

@भुंगा , कुहुचा फॅनक्लब बराच मोठा आहे हं , काल माझा छोटा भाऊ तोंड फाटेस्तोवर स्तुती करत होता तिची. किती गोड आहे,वगैरे ......
>>>>>>>>>>>>>>>

भान मी वर कुठेतरी यावर लिहिलेय की, फॅन्स कितीही असू देत......... "हम जहां खडे होते है लाईन वहींस ए शुरू होती है" Proud सो फीकर नॉट...... मागे शेपूट कितीही वाढू दे........ माझा नंबर पहिला.

आणि स्पृहा व्यक्ती म्हणून मला आधीपासूनच आवडते....... कुहूचं कॅरॅक्टर ही आता आलेली मालिका आहे Wink Happy

Pages