एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्वा नाईकला बोलवा त्याची मैत्रीण म्हणून नाहीतर उर्मिला कानेटकर >>>>>>>>>> अरे ए बाबा......त्त्या मैत्रिणीचा फोटो दाखवलेला होता.........
..आता जर दुसरी दाखवली तर प्लस्टिक सर्जरी केलेली हवी....अपघातात चेहरा बिघडलेला म्हणुन..... Lol
.
त्यासाठी केकताला दिग्दर्शन करावे लागेल.......... Wink
,
,
नकोच मग पुढचे कथानक विचारायला

ओह्ह...... अरे बर्‍याच दिवसात सलग भाग बघितलेले नाहित फक्त इथे येऊन टायपतो Proud

आणि तो चेहरा प्रेक्षकांना दाखवलाय का??? फक्त राधाने बघितला असेल फोटो तर ती काय इकडची थूक तिकडे कधीपण करेल Proud

च्यायला असे स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करण्यांना अमेरिका डिजर्व असेल तर मग बाकीच्यांनी कुठे जायचे.
आणि कहर म्हणजे तीचे लग्न होऊन ती गेली लंडनना..याला जा म्हणली अमरिकेला...
याला ना शेंडा ना बुडखा...>>>>>>> Lol
कुहूबद्दल नीधपला अनुमोदन.

फार्फार फोकस्ड आहे तो >>> हो नां! म्हणुन तर अज्जुन जातोच्चे अमेरीकेला! Wink
इलाकाकूंना मात्र नातवंडाची चाहूल लागली असेल तर आवरा हां! >>> + १ कै च्या कैच अगदी. दुखी: आणि घाबरलेली/बावरलेली यातला फरक न कळण्यासारखा आहे? पण लोक्स त्यांचं बरोबरे. त्यांना सगळ्याच भावना एकाच सुरात बोलणारा नवरा मिळालाय त्यामुळे त्या बापड्या स्वतःला सोईस्कर अर्थ काढतायत.

मुक्ता आणि स्वजो खरचं मस्त करतायत पण पात्रांच्या वागण्याचा कार्यकारणभाव(शब्द बरोबर आहे का?) हरे कृष्णा! का ही ही.

श्रुती Lol

भुंग्या, अरे कालच्याच भागात परत सगळ्यांना दाखवला की अरे फोटो... तुझ्या कर्ली हेअर कमळाने अपडेट दिले नाहीत का? Proud

काल रडवल राधाने मला Sad
आनि घना काय मॅड आहे काय ????ही मुल म्हण्जे अशक्य गोष्ट असतात खरंच..माठ आहे घना.. त्याने स्वःताला प्रश्न विचारालयाच हवा होता...आता वेळ निघुन गेल्यावर विचार करेन ???????

>>च्यायला असे स्टँडबाय मोड मध्ये लॅपटॉप फॉर्मॅट करण्यांना अमेरिका डिजर्व असेल तर मग बाकीच्यांनी कुठे जायचे.
आणि कहर म्हणजे तीचे लग्न होऊन ती गेली लंडनना..याला जा म्हणली अमरिकेला...
याला ना शेंडा ना बुडखा.

अग्दी अगदी. Happy 'आय डिझर्व्ह अमेरिका' म्ह्टल्यावर प्रचंड हसले. बाबा रे, १०-१२ वर्षं ट्राय मारून तुला तिथे जाता आलं नाही ह्याचा अर्थ अमेरिकेला असं वाटत नाहिये. आता एकच मार्ग, मेक्सिकोला जाणे आणि तिथून पुढे बोटीच्या तळातून प्रवास.

काल भाटेकाकू राधाला म्हणतात 'अग राधा, इथे एकटी काय करते आहेस? आणि घना कुठे आहे?'. म्हणजे काय? त्यां दोघांनी सयामीज ट्वीन्ससारखं नेहमी एकत्र असलं पाहिजे का काय? Uhoh ह्या काकू घनाच्या बाबांसोबत दिसत नाहीत ते नेहमी. आणि काल त्यांनी खरोखर सुतावरून स्वर्ग गाठला.

Biggrin ,खरंय स्वप्ना.

काल आणि परवा मुक्ताचा अभिनय एकदम सुपर्ब. स्वप्निल सुद्धा आवडला मला. घना मठ्ठपणा करतोय हे पण मान्य Happy

ती मैत्रिण हुशार होती. ही पिडा आपल्यामागे लंडनला येऊ नये म्हणून त्याला अमेरिकेला जायला सांगितलंन तिने. 'यू डिझर्व्ह अमेरिका' म्हणायला स्वतःला काय जॉर्ज वॉशिंग्टन समजते का बेंजामिन फ्रॅन्कलिन? कैच्या कै.

स्वप्ना तुझा दादामुनी झालाय Rofl

>>आय डिझर्व्ह अमेरिका
हे ऐकून कानफडात ठेऊन द्यावीशी वाटते घनाला. भारतात काय वाईट आहे? इथेही संध्या आहेतच की Proud

मला तर घना अजिबात लुझर वाटत नाही...उलट मला तोच जास्त खरा वाटतो..भले अमेरीका स्वप्न असो किंवा त्याच वागण,,प्रेमभंग न पचवण असो किंवा राधाला नकार देण असो...
लोक अशीच अस्तात त्यांच्या खर्या आयुष्यात Happy

घना खरा असता तर त्याने अमेरिकेला का जायचं आहे हे खूप आधी राधाला सांगितलं असतं. शी डिझर्व्हड इट!

घना खरा असता तर त्याने अमेरिकेला का जायचं आहे हे खूप आधी राधाला सांगितलं असतं. शी डिझर्व्हड इट!
>>>>>>>> हे मात्र कैच्या कैच हं स्वप्ना Happy त्याच्या वैयक्तिक गोष्टी त्याने सांगणे,न सांगणे हा त्याचा प्रश्न आहे. मला पटलं त्याचं हे कारण. तो खरच मनापासून प्रेम करत असेल त्या मैत्रिणीवर. म्हणूनच तिने (कदाचित मजेत ) सांगितलेलं पण त्याला खरं करुन दाखवायचं असेल. जे त्याला अजून जमत नाहिये,पण त्याने हार नाहि मानलीय.

काल राधाला रडताना बघून मी पण खूप अस्वस्थ झालेले. प्रेम माणसाला काहिहि बनवू शकतं. Happy श्या... मी खूपच गुंतत चाललेय ह्या मालिकेत.

आज अगदी सुरुवातीपासुन शेवटापर्यंत सिरियल पाहिली.

सिआ, Lol पुर्ण ३० मिनिटं कावर्‍या बावर्‍या इला भाटेंना बघुन मला हेच वाटलं कि सिरियलच्या शेवटी यांच्याच गोड बातमीचा गौप्यस्फोट होतो कि काय. त्यांचंच लॉजिक होतं ना कि मुली अशावेळेस अगदी कावर्‍याबावर्‍या होतात आणि घनाच्या वेळेसही त्या तशाच झाल्या होत्या. Wink या तर सिरियल चालु झाल्यापासुन गेले ६ महिने बावरलेल्याच आहेत.

हा म्हणजे अगदी जुलुम झाला कि आईचं स्वप्न नातवंडं खेळवणं म्हणुन मुलगा-सुनेची इच्छा असु नसु दे, त्यांनी स्वप्न पुर्ण करायचंच. अगदी आतातायीपणा केला आज भाटेबाईंनी.

ईला भाटे ल काय झलय. ति पण सतत कावरी बावरी असते
>>
यात त्यांचा दोष नाही अजिबात. त्या ज्या नाट्यशिबिरात अभिनय शिकल्या तिथे असंच शिकवलं होतं की चेहर्‍यावर कावराबावरा भाव आला की अभिनय उत्तम जमला असं समजा.
गेल्या कित्येक मालिकांत त्या फक्त अश्या कावर्‍याबावर्‍या कॅरॅक्टर्सॅच करत आल्यात...... Proud Wink

चायला काल घनुटलिच्या आळशिने लईच बोर केल.
आणि अमानव - अबिर तर अजुन बासि.

हल्लि या मालिकेत ले संवाद बालनाट्य लिहिणारे लिहितात कि काय असे वाटते. किति तो बाळबोध पणा Sad

त्या सूत्रधार आजी कुठे गायब झाल्या? त्यांचा कट उधळायच्या बेतात नियती असल्याचं त्यांना कळलं की नाही? अबिरही हल्ली स्वत:चच दुःख कुरवाळण्यात गुंतलाय की काय?

परवा घना एवढा भयंकर खुश का झालं होता म्हणे? त्याची निवड झाली की काय त्या अमेरिकन कंपनीत? म्हणजे मालिकेच्या 'स्लॉग' ओवर्स चालू झालेल्या दिसतात.

Pages