..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, सह्हीच होतं कोडं. आणि चौंके बेस्ट!

पण ते पत्ते कही झडते असं आहे ना? खडते म्हणजे काय?

तनहाई= काळी बाई, हा नवा ठराव ह्या चित्रकोड्यांत संमत >>> +१

कोडं क्र. ०३/०४७
(जिप्सीची क्षमा मागून)
फोटोग्राफीच्या नादात जिप्सी एका दुर्गम जंगलात जातो, तिथल्या एका अदिवासी तरूणीच्या प्रेमात पडतो. तीही जिप्सीच्या प्रेमात पडते. तिने कॅमेरा ही वस्तु कधीच पाहिलेली नसते. मग जिप्सी तिला आणि तिच्या टोळीला त्याबद्दलची सगळी माहिती देतो. सगळे जिप्सीनं आधी काढलेले फोटोही बघतात. त्यात जिप्सीनं आधी एका जाहिरातीसाठी काढलेल्या मॉडेलचेही फोटो असतात. ते बघून त्या तरूणीच्या टोळीतले सगळे तिचं मन वळवायचा प्रयत्न करतात. मग ते ती जिप्सीला सांगते. कसं?

मी माझ्या कोड्याचे उत्तर सांगुन टाकतो. Happy

चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४४

उत्तर:
दिल का दिया जलाके गया ये कौन मेरी तनहाईमें
सोये नग्मे जाग उठे होठोंकी शहनाईमें

स्वप्ना, ती शहनाई आहे तलवार नाही. Happy

मामी, पत्ते 'खडते' नाही, 'खडके'... Happy

सही होतं स्वप्ना तुझं कोडं. हे गाणं नाही आलं डोक्यात.

अर्रर्र, नाही सुचलं हे गाणं स्वप्ना.

मामी कशाबद्दल मन वळवतात ते त्या मुलीचे? आणि हे कोडे सोडवायला जिप्सीच्या फोटोंवर पीएचडी केलेली असणे आवश्यक आहे का? का त्याने काढलेला तो हॉटेलमधल्या पेंटींगचा फोटो पुरे आहे?

स्वप्ना Proud Wink

बरोबर स्वप्ना Happy

चित्रकोडं क्र. ०३/०४८

ना तो कारवा कि तलाश है ना तो हमसफर की तलाश है

जिप्सी हे ही कोडं मस्त होतं.

माधव, ते त्या मुलीला सांगतात की याने आधीच कुण्या एकीचे फोटो काढले आहेत. Happy

कोडं क्र. ०३/०४७
(जिप्सीची क्षमा मागून)
फोटोग्राफीच्या नादात जिप्सी एका दुर्गम जंगलात जातो, तिथल्या एका अदिवासी तरूणीच्या प्रेमात पडतो. तीही जिप्सीच्या प्रेमात पडते. तिने कॅमेरा ही वस्तु कधीच पाहिलेली नसते. मग जिप्सी तिला आणि तिच्या टोळीला त्याबद्दलची सगळी माहिती देतो. सगळे जिप्सीनं आधी काढलेले फोटोही बघतात. त्यात जिप्सीनं आधी एका जाहिरातीसाठी काढलेल्या मॉडेलचेही फोटो असतात. ते बघून त्या तरूणीच्या टोळीतले सगळे तिचं मन वळवायचा प्रयत्न करतात. मग ते ती जिप्सीला सांगते. कसं?

क्ल्यु: १) टोळीवाल्यांना कॅमेरा म्हणजे काय ते नक्की माहित नसतं. त्यामुळे ते फोटो बघून काही वेगळच समजतात आणि तसंच त्या मुलीला सांगतात.
२) त्या मुलीली कॅमेरा शब्दाचा उच्चारही नीट करता येत नसतो.
३) विनोदी गाणं. Happy

येस्स, माधव बरोब्बर! Happy तुला जिप्सीतर्फे एक कमरा फुकट. कमरा नाही दिला तर कॅमेरा तरी देईलच. Proud

कोडं क्र. ०३/०४७
आपके कमरे मे कोई रेहता है हम नही कहते, जमाना कहता है

कोडं क्र. ०३/०५०

मामी तुमच्या कोड्याला जोडून माझं कोडं. जिप्सीला त्या आदिवासींची भाषा येत न्सते आणि त्यांना ह्याची. पण ती मुलगी रागावली आहे हे जिप्सीला कळतं. तो तिला समजावयाचा प्रयत्न करतो. पण भाषा येत नसल्याने त्याचा नाईलाज होतो. मग तो तिथून निघून जायची तयारी करतो. त्या मुलीला पश्चात्ताप होतो. पण पुन्हा भाषेचा प्रश्न. त्याला समजवायचं कसं? मग ती कॅमेराने जिप्सीचा फोटो काढायची अ‍ॅक्शन करते (जिप्सीने विरु बसंतीला बंदूक चालवायला शिकवतो तस्स तिला कॅमेरा शिकवलेला असतो बहुतेक!). मग स्वतःच्या डोळ्यांकडे बोट दाखवते आणि शेवटी हृदयाकडे नेते. हे कोडं जिप्सीला लगेच सुटतं (सुटणारच!). ती असं कोणतं गाणं सुचवते जे जिप्सीला थांबवतं? Wink

Pages