..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी... हेच गाणं पोस्ट कराय्ला आले होते....:(

मस्त होतं कोडं आणि माधव पर्फेक्ट उत्तर!

माधव बरोबर आहे तुझं. दुर्बिण = ढुंढे होतं काय? मी दूर असा अर्थ काढला होता.

रच्याकने, हा उपहार चित्रपट मस्त आहे. अगदी साधा सुधा. मध्यंतरी टिव्हीवर लागला होता तेव्हा पाहिला होता. तो नट स्वरूप दत्त आहे असं आताच गुगलाचार्यांनी सांगितलं. Happy

कोडं क्र. ०३/०३९
चंबळमधल्या डाकुंच्या टोळीत एक मराठी डाकू असतो - प्रेम. चंबळमध्ये राहून राहून तो हिंदी बोलायला शिकतो खरा पण कधी कधी त्याच्या बोलण्यात मराठी शब्दही येत असतात. एकदा त्याला एका कामगिरीवर पाठवतात. एका कुटुंबातल्या दोन पुरूषांना आणि दोन स्त्रियांना मारायची. तो जाऊन दोन्ही पुरूषांना जाळतो. मात्र दोन्ही बायका पळून जायचा प्रयत्न करतात. त्यातल्या फक्त एकीला तो बागेत पकडून मारतो. हे तो सरदाराला गाण्यातून कसं सांगेल?

सॉरी क्ल्यु परत देते.

क्ल्यु १) त्या स्त्रीला तो डाकू बागेतल्या मांडवात मारतो.
क्ल्यु २) आतापर्यंतची सगळ्यात प्रसिध्द नर्तकी आहे यात.
डिस्क्लेमर : गाण्याच्या एक छोट्याश्या शब्दाकरता मी जरा स्वातंत्र्य घेतलंय.

कोडं क्र. ०३/०३९
चंबळमधल्या डाकुंच्या टोळीत एक मराठी डाकू असतो - प्रेम. चंबळमध्ये राहून राहून तो हिंदी बोलायला शिकतो खरा पण कधी कधी त्याच्या बोलण्यात मराठी शब्दही येत असतात. एकदा त्याला एका कामगिरीवर पाठवतात. एका कुटुंबातल्या दोन पुरूषांना आणि दोन स्त्रियांना मारायची. तो जाऊन दोन्ही पुरूषांना जाळतो. मात्र दोन्ही बायका पळून जायचा प्रयत्न करतात. त्यातल्या फक्त एकीला तो बागेत पकडून मारतो. हे तो सरदाराला गाण्यातून कसं सांगेल?

उत्तर :
दो बदन ''प्यार''की आग में जल गये, एकच मेली (के) मंडवेतले.

मला माहित होतं क्ल्यु दिल्यावर लगेच्च येणार. पण तरीपण शाब्बास, जिप्सी आणि माधव! Happy

हायला, फुल टू सभा भरलेय मागच्या वर्षीसारखी. Proud जिप्सी, तुला __/\__ बाबा......मामी कोडं म हा न. आणि बाकी ओळखणार्‍या भिडूंना दंडवत

प्रेमबरोबर पाठवते >> चालेल. त्याची दोन पुरुषांना मारण्याची कामगिरी आधीच पार पडलेली आहे. त्यामुळे मला आणि जिप्सीला धोका नाही Happy

मामी सॉरी....नवं हापिस आहे. त्यामुळे पर्सनल मेल अ‍ॅक्सेस करत नाहिये इथून अजून. रोमात वाचत होते पण अगदीच रहावलं नाही म्हणून आले. Happy

कोडं क्र. ०३/०४०

खरं तर शब्दांनी त्याला कधीच दगा दिला नव्हता. मग ते एखाद्या ऐतिहासिक सिरियलचे डायलॉग्ज असोत नाहीतर गाणी. पण आज त्याला काहीच सुचत नव्हतं. वैतागून तो बाहेर फिरायला निघाला तरी मनात विचारांचं चक्र चालूच. पायातले काटे दिसत नव्हते, दूर क्षितीजावर दाटून आलेले ढग दिसत नव्ह्ते, समुद्राची गाज ऐकू येत नव्हती की दाट वृक्षांनी माथ्यावर धरलेली सावली जाणवत नव्हती. शेवटी पाऊल पुढे टाकवेना झालं तशी त्याने बसकण मारली. 'आपल्या आयुष्याचंही असंच झालंय ना?' हताशपणे त्याला वाटलं. एव्हढ्यात शेजारी सायकलवरून एक गावकरी गेला. त्याच्या रेडियोवर एक गाणं वाजलं आणि विजेचा धक्का बसल्यासारखा तो उठला. सगळी मरगळ नाहीशी झाली. जणू ते गाणं गीतकाराने त्याच्यासाठीच लिहिलं होतं. ओळखा गाणं.

कोडं क्र. ०३/०४१

लग्न होऊन ती परदेशात आली खरी पण निसर्गाचं चक्रच अजब होतं. रात्रिचे बारा वाजले तरी आकाशात सूर्य आपला तळपतोय. त्यातून नवरा निशाचर. जाड पडदे ओढून हिने खोलीत अंधार केला तरी हा टेबललॅम्प लावून लॅपटॉपवर काम करत बसलेला. वर हिने काही म्हटलं की म्हणायचा 'अग, कसली रात्र? बाहेर बघितलंस का किती उजेड आहे ते?'. हिची झोप काही पूर्ण होईना. शेवटी एकदा वैतागून तिने तो टेबललॅम्प फोडला. तिचा रुद्रावतार बघून नवरा आधी अवाक झाला पण मग त्याने एक झक्कास गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि ती कधी हसायला लागली ते तिलाच कळेना. ओळखा बरं गाणं.

बाप्रे... ६०-६२ नवीन पोस्टी...

स्वप्ना, कोडी भारी आहेत. Happy

कोडं क्र. ०३/०४०
याला अनेक उत्तरं असू शकतील ना? कुठला विशिष्ट शब्द आहे का त्या नेमक्या गाण्याशी संबंधित.
मला..
१. रुक जाना नही तू कही हार के.
काटों पे चलके मिलेंगे साये बहार के
ओ राही ओ राही..
हे वाटतंय. पण बाकीही बरीच फिट बसतील.

श्रध्दा, बरोबर. राही मासूम रझा ह्यांनी महाभारताचे संवाद लिहिले होते.

कोडं क्र. ०३/०४०

खरं तर शब्दांनी त्याला कधीच दगा दिला नव्हता. मग ते एखाद्या ऐतिहासिक सिरियलचे डायलॉग्ज असोत नाहीतर गाणी. पण आज त्याला काहीच सुचत नव्हतं. वैतागून तो बाहेर फिरायला निघाला तरी मनात विचारांचं चक्र चालूच. पायातले काटे दिसत नव्हते, दूर क्षितीजावर दाटून आलेले ढग दिसत नव्ह्ते, समुद्राची गाज ऐकू येत नव्हती की दाट वृक्षांनी माथ्यावर धरलेली सावली जाणवत नव्हती. शेवटी पाऊल पुढे टाकवेना झालं तशी त्याने बसकण मारली. 'आपल्या आयुष्याचंही असंच झालंय ना?' हताशपणे त्याला वाटलं. एव्हढ्यात शेजारी सायकलवरून एक गावकरी गेला. त्याच्या रेडियोवर एक गाणं वाजलं आणि विजेचा धक्का बसल्यासारखा तो उठला. सगळी मरगळ नाहीशी झाली. जणू ते गाणं गीतकाराने त्याच्यासाठीच लिहिलं होतं. ओळखा गाणं.

उत्तरः

रुक जाना नही तू कही हार के.
काटों पे चलके मिलेंगे साये बहार के
राहीराही..

०३/४१ रात और दिन दिया जले मेरे मन में फिर भी अंधियारा रे
जाने कहां है वो साथी तू जो मिले जीवन उजियारा रे

???

Pages