(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
येस्स!!! जिप्सी मला ही ती
येस्स!!! जिप्सी मला ही ती सोनसावरच वाटत आहे.
जागू ,आम्ही त्या झाडांना आरसपाणीची झाड म्हणायचो.
लहानपणी आम्हा बहिणींमध्ये पैज लागयची कोण पहिले त्या पानाचा आरसा बनवतय ह्यावरून.
राणीबागेतली हि काही अनोळखी
राणीबागेतली हि काही अनोळखी झाडे (अर्थात आम्हाला (मी, साधना, उजु)
दिनेशदासहित सगळेच ओळखु शकतात, कारण मलाच नावे माहित नाही
प्रचि ०१/०२
प्रचि ०३
टेंभूर्णी (?)
प्रचि ०४
अर्जुन (?)
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७/०८
प्रचि ०९/१०
अजुन काहि: प्रचि
अजुन काहि:
प्रचि ११/१२
प्रचि १३/१४
प्रचि १५
प्रचि १६
जिप्सी ५ नं चा फोटो
जिप्सी ५ नं चा फोटो जॅक्वीनिया Jacquinia ruscifolia आहे.
१३/१४ कुड्यातला प्रकार आहे.
११/१२ कबार/कबर वाटतोय (कूळ तेच आहे).
६ नं ट्रंपेट फ्लॉवर (बिग्नोनिएसी फॅमिली) आहे.
टेंभुर्णी बरोबर.
पण बाकी नाही सांगता येत किंबहुना ही मंडळी पहिल्यादाच बघितली! त्यामुळे ऑल क्रेडीट गोज टू यू!!
खूप खूप धन्यवाद!
१/२ रातराणी सारखी वाटताहेत
१/२ रातराणी सारखी वाटताहेत फुलं! ती वेल होती का?
अर्जुन मंजिरी इतकी कोवळी असताना मी बघितली नाहीये; आणि पानांवरून नाही कळते काही
१/२ रातराणी सारखी वाटताहेत
१/२ रातराणी सारखी वाटताहेत फुलं! ती वेल होती का?<<<<<
शांकली अग ती वेलीवरती आलेली फूल नव्ह्ती गं. चांगल झाड होत त्याच.
जिप्सी, तो सफेद फूलांचा फोटो टाक ना. पाणकावळा बघितला आपण जिथे , तिथेच होत बघ ते झाड.तू म्हणालास ना की हेच झाड हिरानंदानीला पण आहे म्हणून.त्याच पण नाव नव्हत ना कळल आपल्याला.:(
जिप्सी, तो सफेद फूलांचा फोटो
जिप्सी, तो सफेद फूलांचा फोटो टाक ना>>>>अरे हो. विसरलोच होतो. हा फोटो (तितकासा क्लियर नाही आला)
प्रचि १७/१८
पुर्वी मे महिन्यात आम्ही
पुर्वी मे महिन्यात आम्ही शेतातली ठेप काढुन शेवंतीच्या आसपास पसरायचो. बटण शेवंती होती तेंव्हा आमच्याकडे. पाऊस पडला की ही ठेप मऊ पडायची आणि शेवंतीलाही बोके फुटायचे. मग हे बोके जरा तयार झाले की ते तोडून आम्हि त्या मऊ झालेल्या ठेपळांमध्ये रोवायचो. हे बोके तोडताना इतका सुगंध यायचा तो अजुन माझ्या मनात आहे.>>>>>>>>>>> जागू, हे ठेप आणि बोके म्हणजे काय गं?
बोके म्हणजे धुमारे किंवा कोंब का? आणि ठेप म्हणजे मातीची ढेकळं का?
१५ करमळ आहे ना? आता हे पण
१५ करमळ आहे ना?
आता हे पण ओळखा - म्हणजे सांगा. मला नाव नाही माहित. रा.बा.तलेच आहे हे पण फुल.
आणि हे कमळाच्या तळ्याच्या बाजुला होते. पानावरून 'जिप्सीची कांचन' वाटतेय. पण खात्री करून घ्यायची आहे.
शांकली अगदी बरोबर. गावात असच
शांकली अगदी बरोबर. गावात असच म्हणतात ग.
जिप्स्या काय सुंदर आहेत फोटो.
शांकली मागे मी एक फोटो टाकला होता युसुफ मेहेरअली सेंटर येथील झाडाचा ते झाड टेंभुर्णीच असाव. परत शोधून टाकते फोटो.
शशांक पण आमच्याइथे आहे ती काटेसावर नाही. कारण त्याला मोहोर लागल्यासारखी फुले येतात. आता मोहोर गेला आणि फळे लागायला सुरुवात झाली आहे.
'जिप्सीची कांचन' >>>> माधव,
'जिप्सीची कांचन' >>>>:फिदी:
माधव, पहिल्या फुलाचे नाव माहित नाही (बहुतेक शोभेची (शोभा१२३ ची नव्हे) फुले आहेत), दुसरे फुल मात्र कांचनच आहे.
प्रचि १५, करमळ नक्कीच नाही.
जिप्स्या नक्की फिदिफिदी हसलास
जिप्स्या नक्की फिदिफिदी हसलास की गालातल्या गालात लाजलास ?
हि घ्या यादी, तिथल्या
हि घ्या यादी, तिथल्या झाडांची. आणि आता फोटोच्या आणि नावाच्या जोड्या लावा.
http://www.saveranibagh.org/botanicalWealth.html
सुप्रभात!!!! दिनेशदा, फोटो
सुप्रभात!!!!
दिनेशदा, फोटो कुठेय??
फोटोशिवाय जोड्या नाही जुळवता येणार (निदान मलातरी )
जिप्स्या, १५ व्याचे नाव मलाही
जिप्स्या, १५ व्याचे नाव मलाही हवे आहे.
त्या सदाफुलीसारख्या दिसणार्या फुलाचे नाव विसरलो. कृष्णवडाच्या वाटेने बाहेर आलो की समोरच होते ते.
तुझ्या १७/१८ व्या फुलाचे नाव Gustavia augusta ह्याची फळे अनेकदा जोडीने असतात आणि तबल्या डग्ग्यासारखी दिसतात. हिरानंदानीत पण आहे हे. मी त्याला 'तबला डग्गा' असेच म्हणतो काल रात्री जाम त्याचे बोटॅनीकल नाव आठवत नव्हते.
जिप्सी मस्त फोटो सगळीच नावं
जिप्सी मस्त फोटो
सगळीच नावं कळली तर बर पण १५व कोणतं आहे? असच झाड माझ्या घराजवळ आहे, त्याची फुलं पाहिली नाहीत पण पानं आणि फळं अशीच दिसताहेत.
जिप्सी मस्त फोटो...
जिप्सी मस्त फोटो...
तू दिलेल्या नावांपैकी
तू दिलेल्या नावांपैकी टेभुर्णी बरोबर आहे.
१३/१४ मी पण शोधतोय.
१५ चे फूल छोटे पण फूलासारखे (खरे तर मसाल्यातल्या चक्रीफूलासारखे) दिसणारे गुलाबी पांढरे फळच जास्त देखणे असते.
त्या नावावरुन शांकली शोध घेऊ शकेल. नेटवर पण सगळ्याच झाडांचे फोटो नाहीत रे.
माधवने विचारलेले ते गुलबट
माधवने विचारलेले ते गुलबट रंगाचे, पाच पाकळ्यांचे फुल - shrub vinca, Kopsia fruticosa, Apocynaceae
सुप्रभात.
सुप्रभात.
दिनेश, गोरखचिंचेच्या
दिनेश, गोरखचिंचेच्या प्रवेशद्वारातुन पुढे गेले की लगेच्च आहे ते झाड कोणते? त्यालाही फुले आलेली. पाने गुलमोहरासारखी संयुक्त असतात. फुले बहुतेक अगदी लहान गुलाबी होती. तुम्ही तुमच्या रंगीबेरंगीवर लिहिलेले बहुतेक. पण तिथे शोधायचे म्हणजे सगळेच उलगडुन बसावे लागते.
नविन मायबोली सुरू झाले तेव्हा ब-याच सदस्यांनी जुनेच बरे होते, नविन बेक्कार आहे असा सगळीकडे नेहमीच ऐकु येणारा सुर लावलेला. पण आता दोन्-तिन वर्षांत मला नविन मायबोली बरेच बरे, जुन्यात काही शोधणे महाकठीण असे वाटायला लागले. जुने मायबोलीतुन फक्त माहितगारच योग्य ती माहिती शोधुन काढू शकतात.
शशांक, धन्यवाद. आता ही ओळखा
शशांक, धन्यवाद. आता ही ओळखा कोणीतरी. रा.बा. मधलीच आहेत सगळी.
१.
२.
३.
साधना, क्लाईनहाविया का तो ?
साधना, क्लाईनहाविया का तो ? पाने पिंपळासारखी पण पातळ. फुले फिक्कट गुलाबी ?
आवळ्यासारखी पण पोकळ फळे ?
माटूंग्याला भाऊ दाजी रोडवर त्याची बरीच झाडे आहेत.
माधव, हि झाडे कुठे आहेत ते मी सांगू शकेन. पण नावे नाही माहित. ती केशरी फुलांची वेल, तिथल्या कमानीवर आहे.
आता मला वाटतं, एकवेळ राणीच्या बागेतले प्राणी दुसरीकडे हलवावेत पण झाडे
तिथेच रहावीत. मी ५/६ वर्षांपूर्वी तिथे जात असे त्यावेळी, बहुतेक उत्तर भारतीय लोक
आलेले असत आणि त्यांना प्राण्यातच रस असे. झाडांकडे कुणी बघतही नसे.
(कदाचित त्यांच्या उत्तर भारतातल्या गावी, अशी अनेक झाडे त्यांनी बघितली असावीत.)
माधव १ नंबर विषवल्ली आहे का ?
माधव १ नंबर विषवल्ली आहे का ?
सध्या आमच्या झाडावर असे
सध्या आमच्या झाडावर असे रायआवळे लगडले आहेत.
जागू र्स्ल$$$$$$$प! रायआवळे
जागू
र्स्ल$$$$$$$प! रायआवळे मला फा$$$र आवडतात.
पाठवून देना थोडे मला.
उजु त्यापेक्षा तु ये
उजु त्यापेक्षा तु ये माझ्याकडे खायला अगदी झाडावरून काढून.
जागू र्स्ल$$$$$$$प! रायआवळे
जागू
र्स्ल$$$$$$$प! रायआवळे मला फा$$$र आवडतात.
पाठवून देना थोडे मला. > +१ . मला पण ! त्यावर पाणी प्यायलं तर गोड लागतं !
रावी पाणी प्यायल्यावर गोड
रावी पाणी प्यायल्यावर गोड लागतात ते डोंगरी आवळे म्हणजे मोठे आवळे.
अहाहा ! जागू ! राय आवळे !!
अहाहा ! जागू ! राय आवळे !! (तोंडाला पाणी सुटलेली बाहुली)
इतक्या दिवसांनी फोटोत का होईना दिसले यातच आनंद मस्त काढला आहे फोटो !
रा. च्या बा. त ले सगळेच फोटू भारीयेत ! आणि ते स्वागत पानावरचं नवीन कोलाज फारच सुरेख !
दिनेशदा - मी पाहिला तो BBC चा माहिती पट - झकास आहे - हिमालया बद्द्ल बरीच नवीन माहिती मिळाली.
सद्ध्या आमच्याकडे चेरी फुललीये ! आणि सूर्य जरा डोकवायला लागला आहे ढगांबाहेर !
Pages