निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.youtube.com/watch?v=yp8FISlHRdA

वरच्या लिंकवर हिमालयावर एक अप्रतिम माहितीपट आहे. एकंदर ५८ मिनिटांचा आहे, ४८ मिनिटानंतर
हिमालयातील फुलांवर एक भाग आहे.
चित्रीकरण अक्षरशः बघत बसावे असे आहे.

फळं पिकवणार्‍या गॅसबद्दल काही पोस्टी वाचल्या आधीच्या पानांवर. इथिलीन वायू वापरत असतील तर खूप घबारून जाण्यासारखं काही वाटत नाही त्यात. फळं पिकण्याच्या प्रक्रियेत निसर्गतःच या वायूचा सहभाग असतो. इथे वाचा.

दिनेशदा, फुलांच्या बारश्याची कल्पना भारीच... इथल्या यु ट्युबच्या लिंका बघायला घरीच नेट हवय.. ऑफिसात तसही यु ट्युब ब्लॉक आहे..

दिनेशदा, यू आर रेडी रेकनर फॉर ऑल धिस निग फॅमिली Happy
सगळी फिल्म मी नाही बघू शकले पण शेवटची १० मि.ची बघितली. R B G KEW वाले लोक्स म्हणजे धन्य आहेत!! त्यांची पद्धत आणि त्याची काटेकोरपणे केली जाणारी अंमलबजावणी... पण त्यामुळेच त्यांच्याकडे जगातल्या बहुतेक सर्व वनस्पतींची सीड बँक आहे!! मानलं त्यांना...पण खरंच ह्या गोष्टीसाठी शब्दच नाहीत!!

बी,ती फुलं बहुधा Tetramolopium filiforme ही असावीत. तुम्ही ह्या नावाने गूगलवर सर्च करू शकता. ह्या फुलांच्या जवळ्पास जाणारी तुम्ही दिलेली फुलं वाटली. पण ही आपली फुलं नसल्याने त्याला मराठी नाव नाही.... (अगदी झेंडू सुद्धा आपल्याकडचा नाही) त्यामुळे ह्याचं बारसं करायला पाहिजे! Happy

आता एवढ्यातच पुण्याच्या आसपास काढलेले फोटो - ओळखा पाहू - (दिनेशदा, साधना, जागू यांना माहिती असणारच -त्यामुळे त्यांनी उत्तर फोडू नये....)

phpffuq8ePM.jpgms1.jpgms2.jpg

चिमुरीच्या सफरचन्दाच्या माहितीत थोडी भर...
एका विशिष्ट केमिकलची फवारणी करुन सफरचन्द पेअर आणि काही फळे वर्षभर टिकवली जातात..अमेरिका औस्टृअ‍ॅलिया इथे हे सर्रास आहे.... Agrofresh च्या एका प्रोजेच्त वर मिळालेल्या माहितिवरुन....

बी, तूझ्या फोटोवरुनच बारश्याची कल्पना सूचली.
रंग, आकार, पाकळ्यांची संख्या याना साजेसे नाव ठरवायचे.
--
शांकली,
त्या बिया जमवण्यात हिमालयाचा हातभार मोठा आहे ! पहिला भाग पण निवांतपणे
बघण्यासारखा आहे. पण ज्या काळात प्रवासाची, संपर्काची साधने नव्हती, त्या काळात
केलेले हे संकलन त्यांच्या धाडशी स्वभावाची ग्वाही देते.

सुप्रभात.

बारसे झाले की पाळण्याखाली नाव लिहायला मी सज्ज आहे. फक्त बाळाच्या ऐवजी माझ्या कानात सांगा. Lol

मला दिनेश नी जागुएवढे ज्ञान नाहीय Sad

दिनेशनी त्यांच्या जुन्या रंगीबेरंगीवर वारसबद्दल लिहिलेले. शशांकने टाकलेले फुल तसेच वाटतेय. पण वारस जरा गुलबट असते आणि झुपक्यांनी येते. (मी पाहिलेले वारस निष्पर्ण वृक्षावर झुपक्यांनी आलेले)

जागु, मोगरा मस्तच.. इथवर थंड सुगंध आला.

हुश्श.. आले मी.... झालं वाचुन..
सगळ्या पोस्टी आणि सगळे फोटो मस्तं आहेत.. Happy

जागूतै... मोगरा मस्तंच Happy

दिनेशदा, फुलांच्या बारश्याची कल्पना भारीच... हो, हो.
असे ही आपण प्रत्येकजणच जेव्हा जेव्हा एखादे नवीन झाड बघतो, त्याचे नाव शोधायचा प्रयत्न करतो, पण नाव कळत नाही तेव्हा त्या झाडाला मनातल्या मनात त्या झाडाचे रुपडे बघून त्याला समर्पक नाव देउनच टाकतो ना! आता तीच नावे एकमेकांना सांगून प्रचलित करूया.
बायदवे, राणी बाग भेट मस्तच झाली.
स्वर्गातल्या अप्सरेपासून परदेशी कोकोने आपली फळे, फूले दाखवून आमची भेट सार्थकी लावली.
झुंबरची पालवी पहाताना निसर्ग किती मोठा कलाकार आहे त्याची प्रचिती आली.त्या पालवीत निसर्गाने इतकी सुंदर रंगांची सरमिसळ केली आहे की त्याचे शेडिंग बघतच बसावे, आणि त्याचा पोत. अहाहा!
झुंबरच्या झाडाला त्याची कोवळी पालवी ते हिरवीगार पाने, कळी ते अर्धवट उमललेले फूल ते पूर्ण उमललेले फूल सर्व एकावेळेसच बघायला मिळाले.
समूद्र अशोकाचे फूल तर एतके सुवासिक आणि सुंदर की विचारूच नका.
दिनेशदा रूद्राक्ष आणि रक्तचंदन काही सापडले नाहित आम्हाला,त्यासाठी तूम्हिच हवेत आमच्यासोबत.
झुंबरच्या पालवीचे फोटो बघण्यासाठी जिप्सीच्या मागे लागा आता. :p
जिप्सी, लेकीचे नाव ईशिका आहे रे, ईशिता नाही.

माझ्यामते ह्या झाडांना नक्कीच नावे असतील. फक्त आपल्याला ती माहित नाही. मी हे फुलझाड लहानपणापासून बघत आलो आहे. देवळात जात असे तेंव्हा देवीला ह्याचा फुलांचा हार बाहेर विकत मिळायला.

इथे ह्या लिंक वर ह्या फुलझाडाविषयी लिहिलेले आहे.

http://www.medicinalplants-herbs.com/2010/11/gaillardia-pulchella.html

शशांकनी शिंगावर घेतलं वाटतं सगळ्यांना !!
माझा जरा संस्कृतचा अभ्यास कमीच, त्यामूळे नावं ठेवायची बाकिच्यांनी.
काहि दिवसांपुर्वी शांकलीने लिहिले होते कि टोकफळ हे नाव प्रा. घाणेकरांनी
ठेवले आहे. त्या झाडाचे रुप बघता, मला ते तितकेसे समर्पक नाही वाटले.
म्हणून आपणच नावे ठेवू.

उजू, पुर्वी रुद्राक्षाच्या झाडाखाली रुद्राक्षे मिळायची आणि लोकं तिथेच रेंगाळायची.
त्याकाळात झाडांवर नावे होती. पण मग डॉ. डहाणूकर लेख लिहायला लागल्यावर
लोकं झाडांच्या फांद्या, साली ओरबाडू लागली. म्हणून मग त्यांनीच विनंती केली
आणि त्या पाट्या काढून टाकल्या.
पाणघोड्याच्या पिंजर्‍यासमोरचा कळम (कदंब नाही) फुलला होता का ?
शांकलीने फोटो टाकलेले, निळे आयरीस पण होते पुर्वी तिथे.

माधव, हो. आणि ते फूल दिसतंही तसंच.
बी, मी पण लहानपणापासून हे फूल बघतोय. खास करुन हारात आणि फूलपुडीत
असायचेच. पण नाव नाही कधी ऐकले.

बी - तुम्ही ज्या फुलाचे फोटो व त्याच्या नावासंबंधी वरती जी लिंक दिली आहे - त्यासंबंधाने - हे फुल Asteraceae या कुळातले (फॅमिलीतले) आहे.
या फॅमिलीत प्रचंड (अक्षरशः प्रचंड) फुले आहेत - त्यातील नेमके फुल शोधायचे म्हणजे त्या फुलाचा फ्लोरल डायग्राम, पाने वगैरे अनेक तांत्रिक (वनस्पतीशास्त्रातील) गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे - त्यामुळे आपल्यासारख्या मंडळींना (वनस्पतींची आवड, सर्वसाधारण माहिती, नावे, थोडे उपयोग) कुळ कळले तरी खूप झाले असे माझे वैयक्तिक मत - कृपया राग मानू नये, आगावुपणा वाटत असल्यास क्षमा करणे.
इतर कोणत्याही शास्त्र शाखेप्रमाणेच वनस्पतीशास्त्र सागरासारखे अथांग आहे - त्यात सहजपणे विहार करणार्‍या डॉ साने मॅडम, घाणेकर सर, इ. मंडळींकडे पाहिले की माझ्यापुरते तरी मी "झाडांविषयी प्रेम असणे महत्वाचे" एवढेच धोरण ठेवले आहे.

छान फुले शोभा. या वर्गातली आमच्याकडची जी फुले आहेत, ती पाऊस पडल्यावर
लगेच जोम धरतात. पण त्यांना आधी फुलेच येतात. मग पाने.

फुलांची नावे शोधण्यासाठी मला फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री या पुस्तकातली पद्धत आवडते.
फुलांचा रंग, कुठल्या महिन्यात दिसले, कुठे दिसले आणि वेल / झाड / झुडूप / रोपटे . एवढे नोंदवले कि नाव शोधता येते. पण आता त्यातला महिना हा रकाना बाद
ठरतोय.

झुंबरच्या पालवीचे फोटो बघण्यासाठी जिप्सीच्या मागे लागा आता.>>>>हा घ्या ब्राउनिया/झुंबरच्या कोवळ्या पालवीचा फोटो. Happy

रच्याकने, शांकली पचिरा कुठे दिसला नाही. मुचुकुंदाचे फुल आम्हाला आधी पचिरा वाटलेली. Happy
दिनेशदा, कळमच्या झाडाकडे लक्ष नाही गेलं Sad

दिनेशदा, कळमच्या झाडाकडे लक्ष नाही गेलं

अरे आपण गेलोच नाही तिकडे...... Sad ऐशु नी इशिका जाउन आले पाणघोड्याकडे. आपण दुसरीकडे भटकत होतो. कळमाचा वृक्ष आहे तिथे आणि गेल्या वेळेला त्याला काळ्या कळ्या (??) आलेल्या. नंतर फुले बघायला येऊ असे आपण ठरवलेले.

Pages