निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, मी लिहितोय त्याला शास्त्रीय आधार नाही, पण तरी माझे विचार मांडतोच.

मेंदू म्हणजे डोक्याच्या कवटीतला एक अवयव. जिथे संवेदनांचे स्वीकारणे होते, निर्णय
घेतला जातो, क्रिया करण्याचे आदेश दिले जातात, अशी आपली एक ढोबळ कल्पना
असते. बहुतांशी प्राण्यांबाबत हि खरी देखील आहे. पण ज्यांना रुढ अर्थाने मेंदूच नाही,
असे प्राणी जगतातच कि.
उदा. जेलीफिश. हा देखणा मासा, जहाल विषारी ठरू शकतो. अन्नग्रहणापासून
पुनरुत्पादनापर्यंत सर्व क्रिया तो करतो. इतकेच नव्हे तर स्वतःच्या अंगात शैवाल वाढवून, अन्ननिर्मितीच्या बाबतीत स्वावलंबी पण बनू शकतो.

झाडे वेली यांच्या बाबतीत मेंदू असा अवयव नसतो. पण काहि "निर्णय" अगदी
नियमित रित्या ते घेतातच. म्हणजे संगीत ऐकून वाढ जोमाने करणे, किंवा कुणी शिव्या
शाप दिल्या कि झाडाने मान टाकणे असे थोडेसे संशयास्पद निर्णय सोडून देऊ, पण
वातावरणातल्या तपमानाची नोंद घेऊन, मोहोराची, कळ्यांची निर्मिती करणे. वेलींनी
आधार शोधत वरवर जाणे, असे निर्णय तर प्रत्येक झाड व वेल स्वतंत्रपणेच घेत
असते ना ? हा निर्णय घ्यायला परिस्थितील बदलाची नोंद, त्याचे विश्लेषण आणि
निर्णय.. हि प्रक्रिया असतेच. आता हि प्रक्रिया नेमक्या कुठल्या भागात होते,
ते मात्र माहित नाही !!!

----------

मी वरची लिस्ट दिलीय, ती एखाद्या वर्ड फाईलमधे साठवून ठेवा. जसा वेळ मिळेल
तसे बघाच. मी हे बहुतेक सर्व माहितीपट येताना घेऊन येणारच आहे !!

दिनेशदा तुमच्या वरच्या पोस्टीला अनुसरुन.

आपल्या शरिरात मेंदु निर्णय घेतो, विचार करतो. हे सगळं शेवटी शरिरातुन येणारे मेसेजेस आणि मेंदुकडुन जाणारे मेसेजेस यावर अवलंबुन असतं.. पण ज्यांना मेंदु हा अवयव नाहिये त्यांच्यातही निर्णय घेतले जातातच. म्हणजे शेवटी मेंदु महत्वाचा नसुन मेसेजेसची देवाण-घेवाण गरजेची आहे, हे जर महत्वाचं मानलं तर मेंदु नसलेल्या सजीवांचं वागणं, वाढणं यातलं गुढं थोडंसं समजायला मदत होईल... कदाचीत उत्क्रांतीमधे असे बदल झाले असावेत आणि काहींना मेंदु असा वेगळा अवयव डेव्हलप झाला असावा..

मला जास्त उत्सुकता मनाबाबत आहे..

काल मी एका चित्रपटात एक अनोखे दृष्य बघितले. त्याबद्दल शेवटी लिहितो, आधी
थोडी पूर्वपिठीका...

पृथ्वीवर तसे मुबलक पाणी आहे. पण ते मानवाला उपलब्ध नाही कारण त्यातले काही
आहे ध्रुवीय प्रदेशात तेही गोठलेल्या रुपात तर बाकिचे बहुतांशी आहे, खार्‍या समुद्रात.
तसे समुद्राच्या पाण्यात केवळ ३.३ % ते ३.५ % टक्के एवढेच मीठ असते. तरीही ते
पाणी आपण पिऊ शकत नाही. तहानेने व्याकूळ झाल्यावर जर ते पाणी आपण
प्यायलो तर ते प्राणघातक ठरू शकते.

समुद्राचे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते, दुबई म्हणजेच संयुक्त अरब अमराती सारख्या एखाद्या देशालाच ती परवडू शकते. (आपल्यासाठी सूर्यमहाराज पावसाच्या रुपाने ते काम विनामूल्य करतात.)

पिण्याजोगे पाणी कसे आणि कुठून मिळवायचे याच्या काही युक्त्या, बेअर ग्रिलने मॅन
व्हर्सेस वाईल्ड मधे दाखवल्या आहेत पण त्यातही समुद्राच्या पाण्याचा वापर कधी
केल्याचे आठवत नाही.

जगातल्या बहुतेक नद्या समुद्राला मिळतात. त्या ठिकाणीदेखील, इतकेच नव्हे तर
बर्‍याच आतपर्यंत पाणी खारेच झालेले असते. (अपवाद, अमेझॉन सारखी एखादीच
नदी. ती समुद्रालाच गोड करते) समुद्रकिनारी गोडे पाणी मिळवायचा एखादा स्त्रोत म्हणजे, एखाद्या उंच डोंगरावरुन समुद्रात कोसळणारा झरा किंवा धबधबा, जिथे समुद्राचे पाणी वर शिरून ते पाणी खारे करु शकत नाही असा.

आणि अर्थातच सिंधुदूर्ग किल्ल्यावर आहेत तसे नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे.
असे समुद्रकिनार्‍यावरचे गोड्या पाण्याचे दोन झरे माझ्या बघण्यात आहेत. एक आहे
गणपतिपूळे येथे. देवळाबाहेर, मूर्तीच्या उजव्या हाताला हा झरा आहे. तिथे सतत
पाणी झरत असते. (पण अलिकडे कुणी त्या जागेचा फोटो टाकल्याचे आठवत नाही.)
ते पाणी अर्थातच पिण्याजोगे आहे.
आणि दुसरा, गोव्याच्या काणकोण बीचवरचा छोटा धबधबा. इथे गोड्या पाण्याचे
एक ५ फुट खोल असे कुंड पण आहे. मी त्यात यथेच्छ डूंबलो आहे. कौतुक म्हणजे
अजून त्याचे तीर्थक्षेत्र झालेले नाही.

तर आता हे सगळे आठवायचे कारण म्हणजे ब्लॅक गोल्ड या गेल्यावर्षीच्या चित्रपटातले
एक दृष्य.
हा चित्रपट १९२० च्या दरम्यान कातार मधे सापडलेल्या खनिज तेलासंबंधी आहे.
त्या काळात तेलावरुन झालेली टोळीयुद्ध हा विषय. या चित्रपटात एक टोळी
उंटावरून, वाळवंटात भरकटते. पाणी संपलेले असते. उन्हाने ते सगळे जण त्रस्त
झालेले असतात. आणि अचानक त्यांना समोर समुद्र दिसतो.
सगळेजण त्या पाण्याकडे धाव घेतात. त्यांच्यासोबत असणारा एक डॉक्टर, त्या सर्वाना
ते पाणी पिऊ नका, असे बजावून सांगतो. त्याला न जूमानता जे लोक पाणी पितात,
त्यांना लगेचच उलट्या होऊ लागतात. समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,
अशी स्थिती.
परत त्या डॉक्टरला काहितरी वाटते आणि तो समुद्राच्या पाण्यात शिरतो. तिथे एका
ठिकाणी त्याला पाण्यातून वर उकळी आल्यासारखे दिसते. त्या ठिकाणी तो पाण्याच्या
तळाशी जाऊन बघतो, तो तिथे एक जिवंत झरा असतो. त्या पाण्याची तो चव घेऊन
बघतो तर पाणी गोड असते. अर्थात एकच जल्लोश होतो. सर्वजण पाणी पितातच पण
त्या झर्‍याचा जोर एवढा असतो कि, त्यावर पखाली उलट्या ठेवून, ते उंटांसाठी पाणी
भरूनही घेऊ शकतात. हे सर्व दृष्य अत्यंत सुंदररित्या चित्रीत केलेय.
हा काही काल्पनिक जादुई चित्रपट नाही, त्यामूळे असे झरे खरेच असावेत, असे
वाटतेय. (सेनापती...????)

=============

काही वर्षांपूर्वी मुंबईला माहीमला समुद्राचे पाणी अचानक गोड झाल्याची बातमी
वाचली असेलच. ते मात्र एका रसायनामूळे झाले होते. अर्थात मुंबईच्या "भाविकांनी"
ते बाटल्यात भरुन घेतलेच होते !!

साधना , मस्त मस्त ! `फुले वेचिता बहरू कळियांसि आला ' वाटतय अगदी!
शांकली, चिमुरी, दिनेशदा > माणसापेक्षा जास्त समंजस , दूरदर्शी वागणारे घटक निसर्गात आहेत हे अगदी खरं. मीना प्रभूंच्या दक्षिण अमेरिकेवरील पुस्तकात गालापगोस ची माहिती दिली आहे. तिथे ज्यांची प्रजाती कमी होउ लागली आहे असे काहे पक्षी आता ५/६ अंडी घालू लागले आहेत (नेहेमी २ घालतात). काही झाडांनी शत्रूपासून आपला बचाव करण्यासाठी आपली उंची ६/७ फूटांनी वाढवली आहे. अद्भूत आहे हे सगळं खरच !

सेनापती, म्हणजे समुद्राखाली असे झरे खरेच असतात का ? त्याची खात्री करायची
होती.
बाकी हा चित्रपट मस्टच. वाळवंट इतके सुंदर कधीच दिसले नव्हते.

साधना, मस्त बहर आलाय. पाने खुडली होती का ?
(आज नलिनी माझ्या घरी आहे. ती फोन करेलच. माझा तिथला नंबर आज तिच्याकडे आहे.)

ओके... दा. पण बघा ना प्रत्येक बेटावर असे झरे असतातच. बहुदा ज्या वेळी जमिन विलग झाली तेंव्हापासुन असेल का असे?? करण एकदा खरे झालेले पाणी पुन्हा गोडे होणे शक्य नाही ना..

खारे पाणी नैसर्गिक रित्या गोडे व्हायची शक्यता नाहीच. पण राजापूरच्या गंगेसारखा,
एखादा यू ट्यूब तत्वावर चालणारा नैसर्गिक साठा असेल तरच.
आपल्या बहुतेक जलदूर्गांवर अशी सोय होतीच. पण मला वाटतं बहुतेक ठिकाणी
पावसाचे पाणी साठवत असत. जंजिर्‍यावर पण तसेच असणार. जंजिर्‍यावरचे पाणी
पिण्यालायक राहिले नाही म्हणून तीसेक वर्षांपुर्वी तिथली वस्ती हटली. सिंधुदूर्गावर
मात्र जिवंत झरे आहेत, म्हणून तिथे वस्ती आहे अजून.

गोड्यापाण्याशिवाय वस्ती करायची, तर फार मोठे कारण लागते. भावनगरजवळच्या अलंग भागात पण गोडे पाणी नाही, पण तिथला शिप ब्रेकिंगचा धंदा एवढा जोरात आहे कि तिथे गाव वसले.

अगदी कमी पाण्यात आपली गरज भागवणारे मानवसमूह कलाहारी सारख्या वाळवंटात
आहेत. एकंदरच वाळवंटात राहणार्‍या लोकांचे कमी पाण्यात भागते. आपल्याकडचेही
काही आदीवासी, नाचणी / उंबर यांच्या मदतीने अगदी कमी पाण्यात गुजराण करतात. पण समुद्राचे पाणी पिऊन राहणारा कुठलाच मानवसमूह मला माहीत नाही.

वनस्पतींनी मात्र हि किमया साधलीय. त्यासाठी त्यांनी आपल्यात बदल करून घेतलेत. तिवरांच्या (मॅनग्रोव्ह) अनेक जातीत, मूळे खोडाचे आणि मूळाचे असे दोन्ही
कार्य करतात. भरतीच्या वेळी ती मूळे आणि ओहोटीच्या वेळी खोडे होतात. पाण्यातील
मिठाचा पण ती झाडे यशस्वी सामना करतात.

तूमच्यापैकी काही जणांना, माचोळ हि भाजी माहित असेल. जागूला नक्कीच माहीत
असेल. साधारण सुरुच्या "पाना"सारखी पाने असतात. हि भाजी समुद्रकिनार्‍यावरच्या
अनेक भागात आवडीने खातात.
या भाजीची खासियत अशी, याला माश्यासारखाच वास येतो आणि दुसरे म्हणजे
या भाजीत एवढे मीठ असते, कि भाजीत वेगळे मीठ घालावे लागत नाही.

पद्मजा, साधना, मोगर्‍याचा गंध दरवळला.इथपर्यंत आला. स्मित>>>> अग्दी, अग्दी...

इथे पुण्याच्या आसपास रहाणारे माझे शेतकरी मित्र सांगत असतात - आताच अनेक गावांमधे पाण्याची रड आहे, अजून मे -जून जायचेत.... सध्या पाऊस जून अखेरीस येतो.... अजून सरकार गुरांसाठी चारा छावण्या सुरु करायचा नुसता विचारच करत आहे - कृती केव्हा करणार????? माण वगैरे दुष्काळी भागात जनावरे अगदी नगण्य किंमतीला विकणे सुरु झाले आहे...
सध्या उपलब्ध असलेल्या तलावातील गाळ जरी उपसला तरी पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता प्रचंड वाढते - सरकारी दिरंगाईपुढे कोणाचे काही चालत नाही......
आणि याउलट शहरात गाड्या धुणे, बागेसाठी, कपडे / भांडी धुणे, इ.साठी नाईलाजाने पिण्याचे पाणी वापरावे लागते आहे.....
पाण्याचे योग्य नियोजन नसेल तर पुढील काही वर्षांनी फार गंभीर परिस्थिती निर्माण होईल.....

शशांक, हे गाळ उपसण्याचे काम स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन नाही का करता
येणार ? फारतर रोजगार मिळणार नाही पण शेतात पसरायला सुपीक माती तर मिळेल. त्यालाही बहुतेक हरकत असेल, सरकारचीच !!
राजस्थानात बायकाच पुढाकार घेऊन, हे काम करत असल्याचे दृष्य, होम या लघुपटात घेतलेले आहे.

दिनेशदा,
एकुण समुद्राच्या पाण्याबद्दल,पिण्याच्या पाण्याबद्दल छान माहिती मिळाली..
तिवरा (खारफुटी) ची अजब झाडे/जंगले नेटवर खुप बघायला मिळाली

शशांकजी,
दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांना तर पाण्याची किंमत खुप असते
काहीं शेतकरी उन्हाळ्यात टैन्कर ने पाणी देऊन आपले पानमळे/द्राक्षबागा जगवतात..
काहींनी ४-४ बोअरवेलच पाणी एकत्र करुन आपली पिकं (आणि माणसं!) जगवली आहेत
पुर्वी २०० फुटांवर पाणी शक्यती लागायचं, पण आजकाल शिवारात असलेली पिकं जगवण्यासाठी ४००-४५० फुट खोल जाऊन देखील पाणी न लागण्याच प्रमाण वाढल्यांमुळे शेतकरी आणखी हताश होताना दिसतोय ..

शशांक, हे गाळ उपसण्याचे काम स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन नाही का करता येणार ? >>>>> सरकारकडून लिखित स्वरुपात परवानगी लागते (ऑर्डर निघावी लागते)- लालफितीमुळे हे लवकर होत नाही - तोपर्यंत पाऊस सुरु होतो - ये रे माझ्या मागल्या........
हा गाळ शेतीसाठी खूप चांगला म्हणून शेतकरी स्वखर्चाने उचलायला तयार असतात - पण सरकारी दिरंगाई काही करु देत नाही.......
माझा मित्र सांगत होता -त्याच्या गावाशेजारील छोट्या बंधार्‍यातील गाळ उपसताच त्या वर्षी दुप्पट-तिप्पट पाणी साठले त्यात - हे ग्रामपंचायतीच्या अखतारीत असल्याने जमले - याउलट सासवडला आताच दिवसाआड पाणी देणे सुरु केले आहे ......

शशांकजी,
सरकारने जर अशा अनेक कामामध्ये समंजसपणाची भुमिका घेतली तर शेतकरी कोणतही पैकेज न देता, कर्ज माफ न करता नक्कीच सुखी होईल (इथे गाळ काढल्यामुळे जोपर्यंत सरकारी लोकांना "लाभ" होणार नाही,तोपर्यंत 'गाळ' निघणार नाही..)
असो...

म्हणजे एवढ्या साध्या गोष्टीसाठी पण संघर्ष करायचा ? हे लायसन्स / परवाना खट्लं
पण ब्रिटीशांची देणगी म्हणायची !
साधा मुंबई - पुणे प्रवास पावसात केला तर किती मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं,
ते कळतं. पाण्याच्या बाबतीत ना ते आपल्याला निर्माण करता येत ना आयात करता
येत. वर्षाकाठी बहुतांशी नियमित पडणारा पाऊस हाच आपला त्राता. म्हणजे जे काही
करायचं ते पावसाच्या पाण्याचेच.

गूगल अर्थ वर मुद्दाम इजिप्त बघा. देशाची ९० टक्के जनता, एकमेव नदी नाईलच्या
आसपास राहते. तिच्या आजूबाजूचाच भाग तेवढा हिरवा दिसतो. बाकी सगळे ओसाड
वाळवंट !

ठाण्यामधे सेंट्रल बस स्टँड जवळ बोरिवली बिर्याणी सेंटर्(बी बी सी) नावाचे हॉटेल आहे.त्याच्या बरोबर दारातच एक झाड(खरतर वृक्ष) आहे.सध्या त्याला बहार आला आहे.फुलांचा वास अगदि मोगर्यासारखाच आहे.संध्याकाळी पुर्ण परिसरात मादक सुगंध दरवळत असतो.
या झाडाबद्दल कुणाला काहि माहिती आहे का?

फुले कशी आहेत ? पांढरी, निशीगंधासारखी का ? वर्णनावरुन तो आकाशनीम / बूच असावा असे वाटतेय.

जागा लक्ष्यात आली... पण झाड लक्ष्यात येत नाहीये.
हल्लीच फुलांचा वास येतोय का? मी ४ तारखेला पोचलो की बघू शकीन..

नाही आकाशनीम नक्किच नाही.फुले पांढरी ,कुंतीच्या फुलासारखी पण थोडि मांसल आहेत्.टपोरि कळी मोगर्यासारखीच दिसते पण थोडि पोकळ आहे ,बोटाने थोडे दाबले तर पटकन उमलली.
बहार साधारण गेल्या १० दिवसांपासुन आहे.

साधना, एवढ्याश्या कुंडीत किती फुलं आलियेत गं!! मस्त! काय केलंस तू इतकी फुलं यायला ते सांगशील? कारण माझाकडेही असाच कुंडीत लावलेला डबल मोगरा आहे पण त्याला जेमतेम ३/४ फुलं आली Sad खत,पाणी, सगळं काही व्यवस्थित आहे. पण फुलं मात्र कमी!

दिनेशदा, हेच मला म्हणायचंय की लौकिकार्थाने वनस्पतींना मेंदू नाही, पण त्यांची वर्तणूक मात्र विचारी माणसासारखी आहे. त्याही पुढे जाऊन एक वाटतं की मेंदू नसलेल्या वनस्पतींवाचून मेंदू असलेल्या माणसाचं मात्र सगळं अडतं; त्यांचं मात्र माणसाशिवाय काहीही अडणार नाही!

पद्मजा, तुझ्याकडचा मोगरापण मस्तच गं!

मीराधा, आता उत्सुकता फारच ताणलीय. कुंतीसारखे पण कुंती नाही.
ठाण्यातले बरेच जण आहेत इथे. फ़ोटो मिळाला तर चांगलेच.

शांकली,
या पृथ्वीवर पहिला प्राणी जन्मायच्या आधी वनस्पती किमान एक दिड
कोटी वर्षे होत्या. त्यांनी हि पृथ्वी आपल्याला राहण्यालायक बनवली.
खुपच जेष्ठ आहेत ती मंडळी आपल्याला. आणि आपल्याला आपल्या
बुद्धीचा गर्व आहे !

या पृथ्वीवर पहिला प्राणी जन्मायच्या आधी वनस्पती किमान एक दिड
कोटी वर्षे होत्या. त्यांनी हि पृथ्वी आपल्याला राहण्यालायक बनवली.
खुपच जेष्ठ आहेत ती मंडळी आपल्याला. आणि आपल्याला आपल्या
बुद्धीचा गर्व आहे !>>>>>>>>>>>>> अगदी अगदी..... १०००० टक्के अनुमोदन!!

अगं मी काही केले नाही, त्याचा तोच फुललाय.

गावी गेलेले तेव्हा मावशीने एक खत दिले. साबुदाण्याच्या गोळीसारखे आहे (युरीया नाही), मावशी म्हणाली की ते रासायनिक नाही. गावी सगळे तेच वापरतात. त्यामुळे झाडे बहरतात व्.व. मी ते टाकले दोनदा...

Pages