निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादा कल्पक वास्तुशिल्पकार तिथे झाडांना धक्का न लावता कॉटेजेस किंवा रिसॉर्ट
उभारू शकेल. प्राण्यांचे मात्र तिथे हालच होत आहेत. आता जिथे मगरी आहेत तिथे
पुर्वी बोटींगची सोय होती, पाणीही भरपूर आणि स्वच्छ होते.
काहिही झाले सामान्य लोकांना झाडे बघायची सोय हवी. एक जिवंत म्यूझियम आहे
ते झाडांचे.
माझ्या हयातीत, हाजी अलीच्या सुंदर राऊंड अबाऊटचा, वरळीच्या नेहरु प्लॅनेटोरियम
जवळच्या गुलाबाच्या बागेचा, युनिव्हर्सिटी च्या आवारातल्या उर्वशीचा, कालिनाच्या
दोन विशाल कदंबांचा, रुईयाच्या आवारातल्या शिरिष, मुचकुंद, वाकेरीचा खून
झालेला आहे.

शोभा, छान फूललाय बहावा. थोडा क्लोजप हवा होता.
या दिवसात दादरच्या पाच उद्यानाजवळ एक बहावा मस्त फुलतो. तिथेच एक ब्रम्हदंडाचे पण झाड आहे.

वरळीच्या नेहरु प्लॅनेटोरियम
जवळच्या गुलाबाच्या बागेचा

ओह्ह गॉड.. हे मला माहितच नव्हते. किती सुंदर होती ती बाग. Sad

माझ्या हयातीत, हाजी अलीच्या सुंदर राऊंड अबाऊटचा, वरळीच्या नेहरु प्लॅनेटोरियम
जवळच्या गुलाबाच्या बागेचा, युनिव्हर्सिटी च्या आवारातल्या उर्वशीचा, कालिनाच्या
दोन विशाल कदंबांचा, रुईयाच्या आवारातल्या शिरिष, मुचकुंद, वाकेरीचा खून
झालेला आहे.

>>> बरोबर बोललात.. हे खूनच आहेत.

प्रज्ञा१२३, काय सुरेख जास्वंद ! ते फुलाचं शेडिंग खुपच आवडलं मला Happy
ते मागचं उंच रोप कसलं आहे ? त्याची पानं सोनचाफ्या सारखी वाटली ...

ते पिवळे करमळ आणि स्टार फ्रुट ह्यात येवढा भिन्नपणा आहे हे दोन्हीचे एकच नाव मान्यच होत नाही. इथे सिंगापुरात तर हे पिवळ करमळ खूप खूप दिसतात. ह्याची पाने बदामाच्या झाडाच्या पानाप्रमाणे जाडजुड असतात. त्यावर इतक्या सुबक रेषा असतात की त्यामुळे ते पान उठून दिसतात. ह्या झाडाचा आकारची बदानाच्या झाडाप्रमाणे घेरदार असतो. फक्त एकच की बदामाची पाने पिकून झाड जेंव्हा लालमरुम होऊन सुंदर दिसायला लागत त्याप्रमाणे हे झाड फक्त आपली पिवळी पानेच गाळत. मला बदामाची ती पिकलेली जाड जाड पाने बघायला फार फार आवडतात.

उद्याला मी पिवळ्या करमळाचे फोटो घेऊन येईन.

बी नक्कीच फोटो टाक. त्याला मलाय भाषेत पण करंबोला म्हणतात का, त्याची पण खात्री करायची आहे.
-------------------------

माझ्या घरासमोर एक पांढर्‍या चाफ्याचे झाड आहे. त्यावर एक बोगनवेलीची एक वेल चढली आहे, (असा माझा समज होता.) पाने तर तशीच आहेत. गेल्या एक दोन वर्षात त्याला फुले आलेली दिसली नाहीत,
म्हणून आज भर पावसात जवळ जाऊन बघितले तर हे नवल.

बोगनवेलीत राणी, हळदी, पांढरा आणि या रंगाचीच अनेक मिश्रणे असेच रंग आजवर बघितले होते.
खरे तर ती पानेच. त्यातल्या बारीक पांढर्‍या फुलांना जरा उठाव यावा म्हणून पानेच तशी रंगलेली
असतात.

मला जरा खात्री करुन घ्यायची म्हणून परत तिथे गेलो. तर त्याच वेलीला जरा वर अशी फुलं होती.
चाफ्यामूळे या फुलांकडे आजवर लक्षच गेले नव्हते.

आता ती हिरवी "फुले" आणि हि पांढरी फुले, याचा संबंध काय, ते बघावे लागेल.

आमच्याकडे एकेका महिन्यात एकेका झाडाचा बहर असतो. सध्या सगळीकडे दिल्ली सावर अशी फुललेली आहे.

हे फुल थोडेसे जास्वंदीसारखे दिसते. पण खुपच सुंदर दिसते, दिल्लीत याची झाडे खुप आहेत. मुंबईत
माझ्या बघण्यात तरी नाही.

इण्डिगो, शोभा धन्स!
इण्डिगो, ते कुंडीत लावलेले आब्याचे रोप आहे. माझ्या लेकाला मधूनच निसर्गाचे प्रेम उफाळून येते. मग काहीतरी उद्योग करीत असतो. Happy जास्वंद पण त्यानेच लावली .

दिल्ली सावरीचा फोटो सुंदरच आहे; पण मला तो वरचा पांढर्‍या फुलांचा फोटो (तिन्ही फोटो) जास्त आवडले. सुंदर आणि मोहक आहेत ही फुलं! आपल्याकडे फ्राईड एग प्लांट (ऑन्कोबा) ची फुलं साधारणपणे अशी दिसतात. ह्या फुलांना सुगंध आहे का? फारच अप्रतिम फुलं आहेत. खूप आवडली.

शांकली, त्या वेलीचे एकदंर रुप (म्हणजे पाने आणि फांद्या ) बोगनवेलीसारख्याच.
त्या हिरव्या आहेत त्या "कळ्या" आणि पांढरी फुले.
इथे बहुतेक फुलांना सुगंध नसतोच, यानाही नाहीच. पण खुप मोहक आहेत एवढे
मात्र खरे. या रविवारी पाऊस नसला, तर परत झटापट करीन.
इथे पावसाळ्यात खुप कुंद वातावरण असते. भारतातील एखाद्या थंड हवेच्या ठिकाणासासरखेच.

दिनेशदा, ती पांढरी फुले मला पण जास्त आवडली - त्याच्या पानांचा पोत ओर्किड च्या पानांसारखा वाटतो - ते epiphyte आहे का ओर्किड सारखच ? परत गेलात तर बघाल का?

बी, पिवळ्या करमळाचे फोटो काढतांना खूपच रमला वाटतं - फोटो आणि बी, दोघांचाही अजून पत्ता नाही Happy

मी कुटूंबातील एका लग्नात बिझी होते त्यामुळे इतके दिवस आलेच नाही.

माझ्याकडे एम.टी.एन.एल चे नेट आहे. ऑफिसमध्ये कुठले आहे माहीत नाहि.

इन्डीगो धन्स.

इन्डिगो, ती वेलच आहे. चाफ्याच्या आधाराने वर गेलीय. परत एकदा नीट फोटो काढेन.
-----------------------------------------------

हे सगळे यू ट्यूबवरचे माहितीपट आहेत. याच नावाने तिथे सर्च करा

The Great Rift Africas Wild Heart 1 & 2 3
Limits of Perception
First life with David Attenborough
Eiger wall of death
Alien planet
Yellowstone summer 2011
Yellowstone National park in Autumn
North Americas National Park IMAX
NASA IMAX Film Blue Planet
How earth made us
IMAX HD Coral Reef
IRAN Journey to the end of Earth
After Life the strange science of decay
BBC Nature’s Weirdest Events
Wild Russia Siberia
Costa Rica
Our Labor of Love
For men of understanding
Time Trips
Beautiful Equations
God of the gaps
The Large Hadron
David Attenborough The Lost World ¼
The Eloquent Communicators
Kingdom of Plants
National Geographic worlds biggest caves
National Geographic Great wall of china
Playing God
Taxi to the Dark Side
Operation Gladio
Nietzsche Human all too Human
IMAX Kilimanjaro to the roof of Africa
Mount Pilatus
Lucerne, Switzerland
The Alps IMAX
My day in the Swiss Alps
Glacier Express St. Mortis to Zematt
Wild Russia The Secret Forest National Geographic
Tour of the Planets
BBC Wild Caribbean
White falcon white wolf
Journeys to the end of Earth Afganistan
Iran exposed real face of Iran
Byzantium the lost empire Building ¼
Brazil An inconvenient History

दिनेशदा, खरच तुम्हाला मनापासुन दंडवत... आता इतकं सगळं बघायचं म्हणजे घरीच नेटची तडजोड करावी लागणार लवकरात लवकर... Happy

आंब्याला जी चव, रंग आणि कच्ची कैरी असतानाही असणारा गंध, किंवा सुवासिक फुलांमधला सुगंध ही मातीची (जिला आपण गंधवती पृथ्वी म्हणतो) हिचीच देणगी असणार ना! पण काही ठिकाणी फुलं सुवासिक नसतात आणि काही ठिकाणी असतात; किंवा असंही म्हणता येईल की काही फुलांना सुगंध असतो तर काहींना नसतो हे 'कुणी' केलं असावं ना?
दिनेशदा, मागे तुम्ही म्हणाला होता की झाडं विचार करतात का? काहींचं म्हणणं असं असतं की त्यांना मेंदू नाही; मग ते विचार कसा करणार? पण अनेक अचंबित करणार्‍या गोष्टी बघितल्या की आपणच विचारात पडतो!! नाही का?

Pages