निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात सहकारनगर नं २ इथे स्वानंद सोसायटी गल्ली क्र १ च्या सुरुवातीस -opulence या बिल्डिंगच्या दारात शेव्हिंग ब्रश फुलला आहे -

warli 105.jpgwarli 107.jpgwarli 109.jpgwarli 111.jpg

<<<शेव्हिंग ब्रश फुलला आ<<<>>> शांकली फूल तर सुंदर आहेच पण नाव पण फार्च मजेशीर आहे. Wink

इतकी वर्षे पुण्यात येतोय, पण शांकलीच्या फोटोत दिसली ती झाडे प्रत्यक्ष बघितलीच नाहीत मी.
आता अंजली / शशांक सोबत भटकले पाहिजे.
गिरिकंद ती पांढरी , जांभळी फुले युरपची खासियत आहेत, अगदी कमी कालावधीमधे ती उमलतात.

राणाप्रताप बाग, बाजीराव रस्ता, पुणे- कॅशिया प्रकारातील एक फुलझाड (झाड म्हणता येणार नाही, जरा उंच झुडुप (बुश)).

warli 063.jpgwarli 064_0.jpgwarli 065.jpgwarli 075.jpgwarli 079.jpg

भेर्ली माड आपण नेहमीच बघतो - लांबून असा दिसतो तो -

warli 056.jpgwarli 042.jpg

त्याच्या फुलांचा घोस असा दिसतो -

warli 041_0.jpg

जरा जवळून बघायचाय ?

warli 040.jpgwarli 039_0.jpg

त्या घोसातले फुल पाह्यचंय -

warli 044.jpgwarli 037_0.jpg

इतक्या मधमाशा होत्या तिथे........ आणि जरा वारा आला तरी इतकी फुले टपा टपा पडत होती की काय वर्णन करावे.....

शांकली धन्स फ्ह्या फूलाचे एतक्या जवळून दर्शन घडवल्याबद्द्ल! आत्तपर्यत हे झाड लाबूनच पाहिले,
मस्त आहे फूल.

शांकली, मी विचारणारच होते, की मी पहिली-वहिली लिंक दिली ती कुणी पाहिलि नाही का ?
पण वर जाऊन जरा पाहिले , तु पाहिलीस, परत एकदा धन्स ! Happy

प्रज्ञा मी पण पाहिली ती लिंक. छान आहे.
शांकली, या माडाला अर्ध्या सुपारीसारखी फळे (बिया) लागतात. आणि त्या अर्ध्या आकारामूळे,
अर्धशिशीवर उपाय म्हणून ती उगाळून लावतात !!
---
आजोळी कधी रात्री अंगणात बसलो असताना, वरुन टिटवी ओरडत गेली, तर घरचे लोक ते अशुभ
मानायचे. त्यावेळी टिटवीबद्दल तेवढेच माहित होते. नंतर वाचल्यावर, तिची अंडी, पिल्ले याबद्दल
खुप कळले.
परवा जेवताना, माझ्या एका बिहारी मित्रांने एक मजेशीर किस्सा सांगितला. आपल्याकडे उंच सखल
भाग असल्याने टिटवी रात्री कुठे झोपते वगैरे दिसत नसेल. पण त्यांच्याकडे सर्वत्र सपाट भाग असल्याने, नदीकिनारी त्या झोपलेल्या दिसतात. एरवीही ती घरटे वगैरे बांधत नाहीच, त्यामूळे ती
झोपतानाही जमिनीवरच झोपते. पण ती बाकीच्या पक्ष्यांप्रमाणे पायावर न झोपता पाठीवर (पाय
वर करुन ) झोपते. तिथे पण तिचे ओरडणे अशुभच मानतात, पण अशा झोपण्याच्या स्टाईलवरुन,
असे समजतात. कि तिला असे वाटते, आपण झोपल्यावर आभाळ कोसळले तर ते आपण सहज आपल्या पायावर झेलू.

वा! शांकली मस्त फोटो! माझ्या स्वीमिंग पूलवरचा बॉटल ब्रशही अप्रतीम फुललाय! पण सध्या कॅमेर्‍याची तब्ब्येत बरी नाही. सेल टाकतो ते झाकण लागत नाहीये. नाहीतर अगदी फोटो काढण्यालायक दिसतोय!
तुझ्या (!) शेव्हिंग ब्रशवरून आठवलं!

दिनेशदा, टिटवी ची ही माहिती खूपच रंजक आहे. त्याच प्रमाणे तिचे तिच्या अंड्यांच्या बाबतीत पण समुद्राला हरवले (किंवा नमवले असे म्हणूयात!) ही गोष्ट पण अशीच रंजक आहे.
मानुषी... Lol
जागू, मागे तू काही बियांचा फोटो दिला होतास. की ह्या बिया तुमच्या अंगणात पडलेल्या दिसतात. चॉकलेटी रंगाच्या त्या बिया कुठल्या झाडाच्या आहेत असं तू विचारलं होतंस; त्या बिया ह्या भेरली माडाच्या (फिश टेल पामच्या) आहेत. कारण तशाच बिया मी ह्या झाडाखाली पडलेल्या बघितल्या.

" त्याचप्रमाणे टँजेरीन जातीच्या माशांनी पुनरुत्पादनाचा एक अफाट पैलू उलगडून दाखवला. माझ्याकडे पिले दिलेल्या आठ माद्या मी एका टाकीत दीड वर्षे सांभाळल्या. त्यात नरच ठेवला नाही. पुनरुत्पादन थांबले. निसर्गचक्र बंदच पडणार आता असे वाटले, एवढ्यात एका मादीचा नर झाला आणि त्यापासून इतर माद्या फलित होऊन निसर्गचक्र पुन्हा सुरु झाले ! या नराची गुणसूत्रे xx अशीच होती. जन्माला येणारी सर्व पिले त्यामुळे अर्थातच माद्या ! कुणी सांगावे, त्यांना दुसरा कुठला नर भेटेल. नाहीतर त्यांच्यातीलच कुणीतरी असाच नर होईल.
हे कसे घडले ते मी लैंगिक संप्रेरकांच्या अणूरेणू पातळीवरील प्रक्रियांमधून समजून घेऊ शकतो. पण हे का घडले ? याची कारक शक्ती कोणती ? महाभारतात पूर्ण पुरुषाचा आलेला उल्लेख म्हणजे नक्की याच्याशी निगडित काहीतरी नव्हे ना? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न ! अनेक अनुत्तरित प्रश्न. एक सुटला की पुढचा सरसावून समोर येतोच कसा तो......"

- डॉ. अभय शेंड्ये - निसर्गपूर्ण, उर्जा प्रकाशन, पुणे ४. urjaprakashan@yahoo.co.in , www.urjaprakashan.com

.

शांकली अतिशय सुंदर फोटो दिलेस गं. मधमाशांना तर ५ स्टार मेजवानीच मिळालीअसेल त्या दिवसांत./

शशांक, हे असेच मी कोंबड्यांबद्दलही कुठेतरी वाचलेले.

शशांक,
दुबईमधे एका वॉटर पार्कमधल्या शार्क मादीने पण हा पराक्रम केलाय.
म्हणजे वंशसातत्य टिकवण्यासाठी वेळप्रसंगी स्त्रीबीज फलित करण्याची किमया प्राण्यात आहे म्हणायची !
जर अशी शक्ती मानवाकडे असती, तर कुंतीला ते करता आले असते, आणि मग महाभारतही घडले नसते... किंवा केवळ त्या मुद्द्यावर घडले असते !!

आपण शालेय पुस्तकात, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे उपनाम असल्याचे वाचलेय. पण नुकत्याच
वाचलेल्या श्री रंधवा यांच्या पुस्तकात, कल्पवृक्ष म्हणजे बाओबाब म्हणजेच गोरखचिंच असावा, असे मत व्यक्त केलेय. या झाडाची फळे व पानेही खातात. सावली तर असतेच. शिवाय बुंध्यात भरपूर पाणीही साठवलेले असते. इतकेच नव्हे तर सालीपासून उत्तम वाख निघतो आणि त्याचे वस्त्र विणता
येते.
फक्त मला शंका अशी कि ज्या काळात कल्पवृक्ष ही संज्ञा निर्माण झाली, त्या काळात हा वृक्ष आपल्याकडे होता का ? हा वृक्ष आफ्रिकेतून, पोर्तुगीजांनी आणला असे पण वाचले होते. सध्या मुंबईपुरते
बोलायचे तर ही झाडे, राणीची बाग आणि वसईचा किल्ला येथेच आहेत. दादरच्या पोर्तुगीज चर्चच्या
आवारात एक झाड होते असे आठवतेय, आता नाही.
आफ्रिकेत याचे खुप जूने वृक्ष दिसतात. त्याच्या गराला तिखट मीठ लावून केलेले गोळे सहज
बाजारात मिळतात. (माझा अत्यंत आवडता खाऊ !)
---

युगांडा मधल्या निंजा या गावी एक अनोखे झाड आढळते. फिग म्हणजेच अंजीराच्या कूळातले हे झाड,
बार्क क्लोथ ट्री या नावाने ओळखतात. हे झाड भराभर तर वाढतेच, पण वाढता वाढता त्याला नीट
आकारही देता येतो. त्या गावातले किरकोळ विक्रेते, या झाडापासून दुकान, बसायला खुर्ची, झोपायला
बाक असे तयार करतात. (एकाच झाडापासून) आणि तरीही ते झाड जिवंत तर असतेच पण वाढतही
असते. म्हणजे जितेजागते फर्निचरच की.

या नावाने गुगलून बघाच !!

शशांक, मस्तं परिच्छेद!

http://www.inquisitr.com/177678/hawkfish-can-change-gender-for-sake-of-t...
इथे हॉकफिशमधल्या अशाच बदलाबद्दल (अगदी त्रोटक) माहिती आहे.
The process works when the removal of a male fish triggers testosterone production in a female instead of oestrogen, as this process occurs germ cells are attacked, those cells are the precursor to reproductive cells.

Researchers also found that if the new male was challenged by a larger male it would revert back into a female rather than wasting energy on a losing battle. ( हे सही आहे!)

अटेंबरोंच्याच एखाद्या सिरीजमधे असणार ती. कॅनेडियन साप थंड रक्ताचे असतात. (सगळेच असतात)
शीतनिद्रेतून एका नराला उठायला उअशीर होतो. उन्हात अंग तापवून मिलन करण्याइतका वेळ
त्याच्याकडे नसतो. मग तो मादीचे हार्मोन्स सोडतो. मग बाकीचे नर त्याच्या अंगावर पडून, त्याचे
तपमान वाढवून देतात... असा प्रसंग आहे त्यात.
त्या माश्याचे तर मस्तच चित्रण आहे.

दिनेशदा - <<<<टिटवी रात्री कुठे झोपते वगैरे दिसत नसेल. पण त्यांच्याकडे सर्वत्र सपाट भाग असल्याने, नदीकिनारी त्या झोपलेल्या दिसतात. एरवीही ती घरटे वगैरे बांधत नाहीच, त्यामूळे ती झोपतानाही जमिनीवरच झोपते. पण ती बाकीच्या पक्ष्यांप्रमाणे पायावर न झोपता पाठीवर (पाय वर करुन ) झोपते.>>>> पाठीवर झोपते हा बहुतेक समज असावा, विकिपिडियाही याला 'समजूतच' म्हणतो - आणखी कुठे तरी बघायला पाहिजे - पक्षीतज्ञांना विचारुन किंवा तत्संबंधी पुस्तकात.
गोरखचिंच व कॅनेडियन साप यांची माहिती मस्तच.
मृण्मयी - हॉकफिशबद्दलची माहिती देखील मजेशीरच -

मगरी अंडी घालतात - त्या अंड्याचे इन्क्युबेशन तापमान हे त्याचे लिंग (जेंडर्/लिंग) ठरवते. गर्भ निर्माण होतो तेव्हा हे ठरत नाही.
अशा अनेक गमती जमती निसर्गात आहेत. यांचे कारण काय यामागे सर्व शास्त्रज्ञ हात धुवून मागे लागलेले असतात.

सुप्रभात.
रानफुले

वा शांकली शेव्हिंग ब्रश खुपच छान आहे. त्या भिया फिश टेलच्या आहेत होय. धन्स ग.

आजच्या "प्रहार" वृत्तपत्रात माझी "चैत्र चाहूल" Happy
(Thanks to Maaybolikar Girish Sawant) Happy

http://epaper.prahaar.in/#
(सिंधुदुर्ग पुरवणीत "सिंधुदुर्ग प्रहार" मधील पृष्ठक्रमांक १ वर)

Pages