निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उजू, सुंदर फोटो.
दिनेशदा, तुम्ही निळ्या जांभळ्या फुलांचे फोटो दिलेत ना; ते फूल आपल्याकडे रिंधा (Melastoma malabathricam) नावाचे जे फूल असते ना त्यासारखे दिसतेय. आपल्याकडे गुलाबी रंगाकडे झुकणारी छटा असते. पण हे फूल अगदी कॅची आहे!
चातक, एक फोटो डोळ्यांना सुखावणारा तर दुसरा क्षणात डोळ्यातून पाणी काढणारा....
ते शार्क आहेत का?

दिनेशदा, भन्नाट निरिक्षण... चिमण्यांचं रिपोर्टिंग, त्यांचं पेरु न खाणं इ..

उजु, मानुषी... Happy एव्हड्यात कोकणातले इतके फोटो पाहिलेत (त्यातल्या त्यात माश्यांचे जरा जास्तच चवीने पाहिलेत) की सगळीकडे मासेच दिसतायेत....

उजु, संध्याकाळचे फोटो मस्तच... पण त्यात हिरवा रंग पण दिसतो आहे का कोणाला? की फक्त मलाच दिसतोय..

तूम्हाला खरे वाट्णार नाही, पण माझे सहकारी त्यांच्याकडे तूच्छतेने बघतात, कारण काय तर म्हणे मारली तर एकावेळचे पोट पण भरणार नाही म्हणून. आपल्याला गाय बघून अगदी भक्तीभाव नाही तर करुणा वाटते. नायजेरियन माणूस
गायीला बघून, व्हेरी स्वीट म्हणतो. (त्यांच्या भाषेत स्वीट म्हणजे स्वादीष्ट.) >>>>>>>> कोणाला काय वाटेल त्याचा नेम नाही (मला नाही का फुलांत मासे दिसले) Sad

चातक, फुलांचा फोटो मस्तच... माश्यांचा नाही आवडला Sad म्हणजे तिथे रक्त दिसतय म्हणुन नाही आवडला... (मासे खाताना असले विचार मनात येत नाहीत)

दिनेशदा, फुलांचे फोटो मस्तच Happy

रच्याकने, मला राहावत नाही म्हणुन सांगते, अप्रिल्च्या दुसर्या रविवारी राणीबागेत जायचा प्लॅन शिजतोय>>>>कोण कोण जातंय?? Uhoh Wink

दिनेशदा कसल गोडूलं फूल आहे ते.
आणि त्या संध्याकाळ्च्या फोटोंत जे रंग आलेत ना त्याहून सूंदर नजारा दिसत होता प्रत्यक्ष बघताना,मला नीट रंगछ्टा नाही आली पकडता.
<<<<चातक, एक फोटो डोळ्यांना सुखावणारा तर दुसरा क्षणात डोळ्यातून पाणी काढणारा....>>>>>+१

फुल गोडूलं नी झाड फुलांनी भरलेलं.. आपल्याकडे असे भाग्य फक्त अनंताच्या (तगरीच्या) वाट्याला येतं. त्या झाडावर इतकी फुले असतात की लोकांनी कितीही तोडली तरी झाड कायम भरलेलं..

रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा लोक इतरांची फुले कशी गुपचुप तोडतात त्याचा नजारा पाहायला मिळतो. परवा नर्सरीच्या कुंपणाबाहेर आलेल्या फांद्यावरची फुले एक आजोबा स्पेशल काठी घेऊन तोडत होते आणि नर्सरीवाला आतुन डोळे वटारुन पाहात होता.

माझ्या कॉलनीत एकाने त्याच्या घराच्या बाहेर फुटपाथवर सोनचाफ्याचे झाड लावले होते. झाड बिचारे नीट वाढलेही नव्हते, जेमतेम ६ फुट आणि अगदी तुरळक फांद्या. झाड म्हणवणार नाही इतके लहान. त्या झाडावर सगळ्यांचे लक्ष असायचे (आता कशाला खोटे बोलू.. माझेही असायचे. एका दिवशी तर चक्क ८ फुले तोडली होती मी झाडावरची). दोन्-तिन महिन्यापुर्वी त्याला वरच्या शेंड्याला कळे पाहिलेले. नंतर पाहिले तर झाड वाकले होते, बहुतेक कोणीतरी फुलाच्या लालसेने शेंडा खाली खेचलेला. गेल्या महिन्यात आमच्या कॉलनीत नवी मुंबईतील सध्या फेमस असे खोदकाम सुरू झाले. रस्त्यावरची माती काढुन ती सगळी फुटपाथवर ओतली. हे बिचारे झाड जरा दुर होते पण तरी त्याला फटका बसला आणि आता पुर्ण वाळून गेले. खोदकामाच्या अगदी समोर असलेले एक प्राजक्त पण वाळले. त्याच्या मागे एकमेव असे तुतीचे झाड आहे, ते मात्र नशिबाने वाचले.

हल्ली अशी वाळलेली झाडे खुप दिसताहेत.

जिप्सी काल गेलो होतो अंजनी बघायला पण अजून बहरली नाहीये.>>>>हो ना. अजुन पूर्ण नाही बहरली. काहि दिवसातच फुलेल. Happy

"चैत्रबहर" पहायचा/अनुभवायचा असेल तर रविवार दिनांक ८ एप्रिल (इस्टर संडेच्या मुहुर्तावर :फिदी:) "चलो राणीबाग".

वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत (म्हणजे पूर्ण दिवस जाणार नाही.)
मी जातोय. अजुन कोण कोण येणार????

सारखे सारखे काय खणत असतात ? बरं एकदा खणल्यानंतर रस्त्या परत कधीच एका पातळीत येत नाही !

गुप्तधन....... Proud

मटेनिली, महानगर गॅस, प्रायवेट मटेनिली, पाणी, गटार.... सगळे मिळुन कित्येक वर्षे खोदताहेत, एकमेकांना खो देताहेत. तरी अजुन गुप्तधन सापडले नाही.

मला ११वीत इंग्रजीच्या पुस्तकात एक ललित होते. लेखक इंग्रज होता आणि लंडनमध्ये वर्षभर खोदकाम करत असलेल्या लोकांवर त्याने लिहिलेले. त्याचे निरिक्षण असे होते की गटारे नीट करण्यसाठी खोदकाम करणा-या लोकांनी ततो नीट करुन त्यावर रस्ता टाकत असताना टेलेफोनवाले लोक येऊन बसलेले असतात. जोपर्यंत रस्ता नीट होऊन त्यावरुन रोलर वगैरे फिरवुन लोक दोन दिवस अशा रस्त्यावरुन चालण्याचा आनंद घेत नाहीत तोवर ती दुसरी कंपनी रस्ता खोदायचे काम सुरू करत नाही. दोन दिवस लोक फिरले की तिस-या दिवशी त्यांना सक्काळीच रस्ता परत उकरलेला दिसतो. गटारवाले आणि टेलेफोनवाले (किम्वा बाकीचे उकरणारे) यांची एकमेकांशी जानी दुश्मनी असल्याने एकाने रस्ता उकरला की इतरांनी त्या उकरलेल्या रस्तयावर आपले जे काही काम आहे ते करुन घ्यावे आणि रस्ता लवकरात लवकर नीट करावा हे त्यांना सुचत नाही.

हा धडा मी ११वीत वाचलेला, तो किती वर्षे आधी लिहिला गेला होता हे माहित नाही. पण लंडनमध्ये जी स्थिती होती ती आपल्याकडेही गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

जिप्सी, मी आहे. तु वायुवरणाचा फोटो टाकलास त्याची दोन झाडे माझ्या ऑफिसात होती, रस्ता रुंदीकरणात दोन्ही झाडे गेली Sad

<<<साधना आपल्यावर ब्रिटीशांनी इतकी वर्षे राज्य केले म्हटल्यावर आपण आजुन काय करणा<<<>>> अगदि हेच वाक्य मी ईथे लिहिणार होते. Happy

काल एका तमिळ की तेलगु मूव्ही मधे बदकांचा ग्रूप (थवा म्हणता येइल का?) मेंढपाल मेंढ्या वळतात ना, तसा वळत असलेला दाखवला.. पहिल्यांदा ते पक्षी कोणते तेच कळत नव्हतं... रस्त्यावरुन भल्यामोठ्या ग्रूपमधे चालत असलेले पक्षी आणि त्यांना दिशा दाखवत वळणारी ती बाई बघुन मजा वाटली.. नंतर कळलं की ती बदकं होती ते... हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला..

जिप्सी, चैत्रबहराची झलक मस्तच...

सगळ्या गप्पा वर वर वाचल्या. सगळे फोटो सुंदर आहेत.

राणीच्या बागेत जाऊन सोन सावर पाहण्याची खुप इच्छा आहे. बघु जमत का ते.

डेन्मार्कमधे वसंताच्या आगमनाची चाहुल. Happy काही काही ठिकाणी अशी चिमुकली फुले उमलु लागली आहेत.

शोभा मागच्या पानावर मी पण गुलाबी बहाव्याचा फोटो टाकलाय बघ.>>>उजू, ९ पानावर पिवळा बहावा आहे. मला गुलाबी बहावा बघायचाय.

उजू, जिप्सी, मस्त फोटो.
गिरी, छान आलेत रे फोटो. कॅमेर्‍याचा उपयोग केलास. धन्यवाद.

शोभे मी हा फोटो टाकला तेव्हा तिथे हा बहावा असल्याचे कोणीतरी लिहिल्याचे आठवते. पण बहाव्याची पाने वेगळी असतात. हा कॅशियाच असेल.

Cassia fistula, known as the golden shower tree and other names, is a flowering .... bahava (बहावा) - .......विकिपीडियावरुन.

Pages