निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा त्यात लाज कसली ग! होता हे कभी कभी.
बाय द वे ती फूल चिंचेची आहेत ना?
लहानपणी भरपूर खाल्ली आहेत, तूझ्यामूळे चव आठवली परत.
वर्षू धन्स गं.

शोभा हा कॅशिया आहे. कोल्हापुरात महावीर उद्यानाच्या वाटेवर होता. पण त्याची कत्तल झाली. त्या फुलंच्या तुर्‍याचा क्लोजप मिळाला तर छान. खुप सुंदर रंग
आणि आकार असतो.

मानुषी,
नारळ अगदी पूर्ण तयार होऊन सूकल्याशिवाय झाडावरुन पडणार नाही.
तो रुजण्यासाठी असाच पडावा, अशी निसर्गाची अपेक्षा असते. त्यासाठीच तर त्याला
भरभक्कम कवच असते.
पण तूमच्या झाडाचे नारळ उंदीर तर नाही ना कुरतडत ?
केरळमधे आता ट्रेन केलेली माकडे पण या कामासाठी वापरतात. अर्थान त्यांना नारळ तसा तोडता येणार नाही, पण ते गोल गोल फिरवून तो खाली पाडतात. त्यांना बिचार्‍यांना ना मजूरी ना नारळ.
असाच एक प्रकार मी कलकत्याजवळ मासेमारी करण्यासाठी ओटर्सचा वापर करतानाची फिल्म बघितली होती. त्यांच्या गळ्याभोवती फास असल्याने त्यांना त्यावेळी
मासे खाता येत नाहीत, पण नैसर्गिक कौशल्य असल्याने ते, मासे कोळ्यांच्या जाळ्यात
मात्र पाठवतात. पुरेसे मासे त्यांनी पकडून दिले कि मग त्यांना त्यांचा हिस्सा मिळतो.

uju, बर्‍याच दिवसांनी !
चिंचेची फुले पानात लपूनच असतात. अशी वरुन फारशी दिसत नाहीत.

निगडीच्या दुर्गा टेकडीवर स्वर्गीय नर्तक हा पक्षी आढळला आहे अशी कालच्या पेपरमधे बातमी होती.. पहिल्यांदाच त्या भागात हा पक्षी दिसला आहे.. कोणता पेपर ते आठवत नाहिये, त्यामुळे लिंक देता येत नाहिये...

केरळमधे आता ट्रेन केलेली माकडे पण या कामासाठी वापरतात. >>>>>>> हे ऐकलं होतं...

मासेमारी करण्यासाठी ओटर्सचा वापर>>>>> हे पहिल्यांदाच ऐकलंय...

हो दिनेशदा बर्याच दिवसांनी, वर कारण टाकली आहेत.
मला चिंचच वाटली ती. कॅशिया आपण निसर्ग उद्यानात पण पाहिला होता ना?

उजू, आता सगळे बरे आहेत ना ? पिवळ्या टॅबेबूयाचा झळाळता पिवळा रंग कधी
फोटोत नीट (मला तरी) पकडताच येत नाही.

कुणाला वि.द. घाटे यांचा "कॅशिया भरारला" हा लघुनिबंध आठवतोय का ?
आम्हाला, अभ्यासाला होता तो.

कुणाला वि.द. घाटे यांचा "कॅशिया भरारला" हा लघुनिबंध आठवतोय का ? >> आम्हाला पण होता कॅशियावर एक धडा. नाव आणि लेखक नाही आठवत आता. त्यात त्यांनी खाली गिरक्या घेत पडणार्‍या फुलांना पर्‍यांची उपमा दिली आहे का? मग तोच असेल Happy पण कॅशिया गुलाबी असतो ना? त्या फोटोंत तो केशरी दिसतोय.

माधव, रात्री फोटो पाठवतो.
कॅशियाची पांढरी, गुलाबी आणि वरच्या रंगाची अशी तिन्ही झाडे, राणीच्या बागेत
आहेत (अस्वलाच्या पिंजर्‍याजवळ.)
घाट्यांच्या निबंधात आंब्याचे झाड आणि कॅशिया, यांची एकत्र वाढ. मग कॅशिया त्यातही तग धरतो असे संदर्भ आहेत.

आम्हाला वि.द. घाट्यांचा कॅशियावरचा धडा होता. कॅशिया कसा असतो ह्याचे मला खुप औत्सुक्य वाटलेले तेव्हा. काजुसारखा असावा अशी मी कल्पना केलेली Happy

साधना मला वाटले की तूम्ही तरी गेला असाल.
न्येक्श्ट टायमाला आपण जमवूयात फ्लेमिंगो गटग.
दिनेशदा पिवळ्या टॅबेबूयाच्या रंगा बद्द्ल अगदि अचूक वर्णन केलेत हो-- झळाळता पिवळा रंग .डोळे दिपून जातात नाहि का असा फूललेला टॅबेबूया बघताना.
हा बघा खंड्या पक्ष्याच्या पिल्लाचा फोटो.
07062011590.jpg07062011588.jpg07062011588_0.jpg
परवा आईकडे गॅलरीत आला होता चूकून, बहूदा कावळे मागे लागले असावेत.
खूप भेदरलेला होता. कापसाच्या बोळ्याने पाणी पाजले आणि टर्टल फूड होते आईकडे ते खाऊ घातले. थोड्या वेळाने उडून गेले साहेब.
लेकीचा जीव अजून खालीवर होतोय की ममा नीट पोहोचला असेल ना ग तो त्याच्या ममाकडे अस म्हणत.
फोटो मोबाईल मधून काढले असल्याने क्लॅरीटिच्या नावाने बोंब आहे.

उजू ते फोटो अगदी लिंग निरपेक्ष आहेत. म्हणजे स्त्रीया तर म्हणतीलच पण पुरुषांना पण so cute असा प्रतिसाद देण्याशिवय गत्यंतर नाही Happy

खुपदा मला वाटते, निसर्गात आपली सहानुभूति कुणा एकाला असू शकणार नाही.
खंड्याच्या पिलासाठी वाईट वाटले तर कावळ्याची पिल्ले उपाशी मरतील ना ?
हा झगडा निरंतर चालूच असतो. तो चपळ आणि सक्षम असतो तोच टिकतो.
बिबळा धूर्त, जास्त क्षमतेचा म्हणून टिकला. त्यामानाने वाघ दुर्बळ ठरतोय.
कबुतरं शहराला अ‍ॅडजस्ट झाली, आणि चिमण्या मागे पडल्या..पण हे कायम नसतेच,
एखादी जास्तीची क्षमता निर्माण करुन, मागे पडलेली प्रजाती परत शर्यतीत येऊही शकेल.

जागू, आपल्याकडे ति झाडे अपघाताने आली. त्या फुलांची रचना बघता, हमिंग बर्ड
सोडला, तर आणखी कुणालाच त्यातला मधुरस पिता येणार नाही. कदाचित खुप झाडे
असतील, तर हमिंग बर्ड येतही असेल.

निसर्गात आपली सहानुभूति कुणा एकाला असू शकणार नाही.
खंड्याच्या पिलासाठी वाईट वाटले तर कावळ्याची पिल्ले उपाशी मरतील ना ?
हा झगडा निरंतर चालूच असतो. तो चपळ आणि सक्षम असतो तोच टिकतो.
बिबळा धूर्त, जास्त क्षमतेचा म्हणून टिकला. त्यामानाने वाघ दुर्बळ ठरतोय.
कबुतरं शहराला अ‍ॅडजस्ट झाली, आणि चिमण्या मागे पडल्या..पण हे कायम नसतेच,
एखादी जास्तीची क्षमता निर्माण करुन, मागे पडलेली प्रजाती परत शर्यतीत येऊही शकेल.>>>>>>>
किती टक्के अनुमोदन देऊ? (n no. of अनुमोदन्स!)

सगळ्यांचे फोटो सुंदर!

जागू, हेलिकोनियाला मी अजून एक गमतीशीर नाव ऐकलं. खरंतर हे नाव बहुधा त्या वहिनींनी स्वत:च ठेवलं असावं.. त्या ह्या फुलांना द्रौपदीची वेणी म्हणतात. (मी मनात म्हटलं की सीतेची वेणी नावाचे ऑर्कीड आहेच मग ओघानेच दुसरे एखादे फूल द्रौपदीची वेणी नावाने आलं.)

Pages