निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
अरेच्चा... जागु! ही कुठली
अरेच्चा... जागु! ही कुठली फुलं?
हे ते 'अक्कलकारा' तर नाही?
अभिनंदन जिप्सि. सर्वांनी
अभिनंदन जिप्सि.
सर्वांनी दिलेले फोटो, माहिती मस्त.
हो बहुतेक अक्कलकाढा
हो बहुतेक अक्कलकाढा /अक्कलकुवा च. लहान पणी विदर्भात परतवाडा इथे असताना चाखलेली जीभ चांगली झणझणेल अशी ती चव मला आठवतेय. ज्या मुलांची जीभ जड असेल, तोतरे, बोबडे असतील त्यांना ही फुले मुद्दाम खायला लावत. माझ्या सारखी आगाउ मुले जीभ जड नसली तरी खात हे अर्थातच वे सा न ल.
अगदी अगदी श्रीकांत!! जीभेवर
अगदी अगदी श्रीकांत!! जीभेवर त्याच्या पाकळ्या ठेवल्या की चरचर होते. आवाज सुधारण्यासाठी किंवा मुले बोबडे बोलत असतील तर ही फुले खायला देतात.
हे जिप्स्या घरी प्रहार आहे
हे जिप्स्या घरी प्रहार आहे तरी मी पाहीला नाही. अभिनंदन. संध्याकाळी जाऊन बघते.
धन्यवाद जिप्स्या घरी प्रहार
धन्यवाद
जिप्स्या घरी प्रहार आहे तरी मी पाहीला नाही>>>जागू, सिंधुदुर्ग पुरवणीत आला आहे.
जिस्प्या मस्तच रे...
जिस्प्या मस्तच रे...
सारे श्रेय मायबोलीकर गिरीश
सारे श्रेय मायबोलीकर गिरीश सावंत यांना.
ओक्के घरी जाऊन बघतेच. हे झाड
ओक्के घरी जाऊन बघतेच.
हे झाड अक्कल काढ्याचेच आहे का ते माहीत नाही मला. खरच तेच आहे का ?
रानफुले ५ वा
रानफुले ५ वा भाग
http://www.maayboli.com/node/33590
जिप्सी, हार्दिक
जिप्सी, हार्दिक अभिनंदन!!
दिनेशदा, गोरखचिंचे बद्द्ल डॉ.डहाणूकरांनी 'हिरवाई' मधे हा उल्लेख केलाय; त्यांनी लिहिलेय की वेरूळच्या लेण्यात इंद्राणी ज्या वृक्षाखाली बसली आहे, तो गोरखचिंच असावा. फळे, त्या वृक्षावर बसलेली माकडे हे सर्व गोरखचिंचे सारखंच दिसतंय. (मी थोड्यवेळाने पुस्तक बघून नक्की लेणे कोणते किंवा त्यांची वाक्यं इथे देईन)
पण त्या उल्लेखावरून हा (गोरखचिंच) आपल्याकडे पुराणकाळापासून असावा असा पुरावा मिळतो.
अभिनंदन जिप्सी.
अभिनंदन जिप्सी.
शशांक, काही पक्षी शत्रुंपासून
शशांक, काही पक्षी शत्रुंपासून बचाव करण्यासाठी आडवे पडल्याचे, लंगडण्याचे नाटक करतात.
हे कदाचित मी टिटवीबद्दलच वाचले असेल.
अक्कलकाराचा छानच फोटो जागू.
दिनेशदा, गोरखचिंच आपल्याकडे
दिनेशदा, गोरखचिंच आपल्याकडे किनारीपट्ट्यालगत जास्त आढळतो. केळवे- माहिम परिसरात फिरतांना तिथे बाओबाबचे मोठे वृक्ष दिसले होते. त्या भागांत त्यांना सुरुमला म्हणतात. नाशिक भागांत दिंडोरीला मला एक गोरखचिंचेचा वृक्ष दिसला आहे.
डॉ.डहणूकरांच्या हिरवाई
डॉ.डहणूकरांच्या हिरवाई पुस्तकातील शणै बाओबाब या लेखात त्या म्हणतात...
'गोरखचिंच म्हणजेच कल्पवृक्ष असंही काही वनस्पतीशास्त्रज्ञांचं मत आहे. का ते कुणास ठाऊक? पण आफ्रिकेतला हा वृक्ष पुरातन काळातच आपल्याकडे आला यात शंका नाही. वेरूळच्या लेण्यातील शिल्पाकृतीत (नं ३२) इंद्राणी ज्या वृक्षाखाली बसली आहे तो गोरखचंचे सारखा दिसतो. फळंही तशीच आणि फळांजवळ माकडंही तशीच! माकडांना गोरखचिंचेची फळं आवडतात, गोरखचिंचेचं प्रचलित इंग्रजी नावच मुळी आहे मंकी ब्रेड ट्री!'
???
???
बरोबर हेम. पण आपल्याकडे तुरळक
बरोबर हेम. पण आपल्याकडे तुरळक सुती झाडे दिसतात. म्हणजे ती बहुतेक मानवी लागवडीतूनच
आलेली असतील. निसर्गत: याचे जंगलच असते. पण त्यातली मोजकीच झाडे मोठी होतात.
शांकली, या झाडाचा आकार अगदी एकमेव असतो. त्यामूळे तसेच मानावे लागेल.
हेम पहिली शिकेकाई वाटतेय
हेम पहिली शिकेकाई वाटतेय (खात्री नाही.)
दुसरा मात्र काळा कुडा. नक्की.
हेम, गोरखचिंचेचं अजून एक नाव
हेम, गोरखचिंचेचं अजून एक नाव सुरुमला तुमच्यामुळे कळालं! धन्यवाद.
तुम्ही वर दिलेल्या फोटोत दुसरा फोटो काळ्या कुड्याचा आहे पण पहिला फोटो माहिती नाही कुठल्या शेंगांचा आहे.
दिनेशदा, त्या शेंगा
दिनेशदा, त्या शेंगा शिकेकाईच्या नसाव्यात. शिकेकाईच्या पर्णिका खूप लहान असतात. आणि त्या फोटोत ३/४ वेगवेगळी झाडं असावीत असं वाटतंय.
हो ना, अगदी वडाची साल
हो ना, अगदी वडाची साल पिंपळाला असे आहे ते प्रकरण.
अरे सगळे भारीच गप्पा मारतायत
अरे सगळे भारीच गप्पा मारतायत इथे. जिप्सी, है शाब्बास! अभिनंदन.
दिनेशदा, आपल्या इथे बाजारात कधी कधी 'जब राम बनवास मे था ... ' अशी सुरूवात करून एक गंमतीशीर खोड विकतात माहितेय? ते चांगलंच भलं मोठं आणि ब्राऊन रंगाचं असतं आणि आतून हलकच पिवळसर पांढरं आणि रसदार दिसतं. त्याच्या पातळ कापट्या कापून विकतात. हे बाओबाबचं तर खोड नव्हे? मी कधी चाखलं नाहीये. कोणी खाल्लंय का?
मस्त फोटो सगळ्यांचे आणी
मस्त फोटो सगळ्यांचे आणी माहितीही
ते चांगलंच भलं मोठं आणि ब्राऊन रंगाचं असतं आणि आतून हलकच पिवळसर पांढरं आणि रसदार दिसतं. त्याच्या पातळ कापट्या कापून विकतात. हे बाओबाबचं तर खोड नव्हे? मी कधी चाखलं नाहीये. कोणी खाल्लंय का?>>>>मामे, ते रामाचे कंदमुळ. ते बाओबाब नाही. मी खाल्लयं.
अरे वा, लग्गेच फोटो पण हजर!
अरे वा, लग्गेच फोटो पण हजर! शाब्बास जिप्स्या. कसं लागतं हे? आणि कोणत्या झाडाचं कंदमूळ असतं आणि असं कधीमधीच कसं मिळतं? एकदा मला खायचंच आहे. दिसायला किती क्युट दिसतं ना?
त्याला काही फारशी चव नसते.
त्याला काही फारशी चव नसते. गोडसर पाणचट लागतं एवढच.
बाओबाबच्या बिया साधनाने भरपुर खाल्ल्या आहेत. आता पुढच्या वेळी आणेन.
हे मीपण खाल्ले आहे... सी
हे मीपण खाल्ले आहे... सी एस टी ते डोंबिवली कुठल्याही ठेसनाच्या पुलावर मिळते.... पण ती माणसं मात्र महाचेंगट असतात.. पापडाएवढं पातळ कापून देतात ! म्हणून एकदाच खाल्लं.. एवढं पातळ कापून खाल्लं तर १४ वर्षे वनवासाला एकच खोड पुरेल ! पाणचट रताळ्यागत लागतं ते...
एवढं पातळ कापून खाल्लं तर १४
एवढं पातळ कापून खाल्लं तर १४ वर्षे वनवासाला एकच खोड पुरेल ! >>>>
कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधे
कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधे उगवणारं कॉर्प्स फ्लावर.. भयाण वासाचं एक अजस्त्र फूल...
http://www.ouramazingplanet.com/2607-corpse-flower-bloom-cornell.html
वावा...मस्त विविध माहिती मिळत
वावा...मस्त विविध माहिती मिळत आहे.. सक्काळी येऊन पहिल्यांदा इकडे फुलं पाहते..आपोआपच दिवसाची प्रसन्न सुरुवात !!!
ही बाबोबाब ची झाडं.. इंदौर हून मांडवगड ला जायच्या रस्त्यात शेकड्यांनी दिसलेली. अल्लाउद्दीन खिलजी ने आणून लावलीयेत इकडे असं गाईड ने सांगितलं होतं. यालाच लागतात बहुतेक त्या गोरख चिंचा.. ?या झाडांना पानंही येत नाहीत बहुतेक!!!
वर्षूतै, याला (बाओबाबला)
वर्षूतै, याला (बाओबाबला) पावसाळ्यात पानं येतात. झाडाचे फोटो मस्त आलेत.
Pages