निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण कॅशिया भरारला हा धडा होता. खूप आवडायचा तो धडा.
उजू, खंड्याचं पिल्लू घरात आलं होतं; तुम्ही रहाता तिथे जवळ पडीक विहीर (खरंतर विहीर नाही म्हणता येणार.) पाणथळ जागा वगैरे आहे का? कारण पाणवठ्याच्या जवळ असलेल्या मातीच्या भिंतीत खंड्याची बिळं (घरटी) असतात. आणि उडायला शिकणारी पिल्लं कुणा शिकार्‍यापासून बचाव करण्यासाठी सैरावैरा उडतात. पण खंड्या घरात आला हे मी पहिल्यांदाच बघितलं!
खूप क्यूट दिसतंय ते! ते उडून गेल्यावर लेकीची समजूत घालून तुझी पुरेवाट झाली असेल. कारण लहान मुलांना अशी छोटी पिल्लं आई शिवाय आहेत ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना खाऊ मिळेल ना? परत घर सापडेल ना? आई भेटेल ना? अशी काळजी वाटत रहाते.

हो साधना. आता तो मुलगा नारळ उतरवायला २ रु. वर आला आहे. आणि शहाळ्याचा इथे काय दर आहे जरा पहायला हवं खरंच!

आत्ता सर्व वाचून काढले. (नाहीतरी मी दुसरे काय करते म्हणा:) ) .
मन एकदम शांत होतं, खरोखरच आपण निसर्गाच्या सान्निध्यात फिरतोय असा भास होतो.

कॅशिया सारखा धडा/निबंध आम्हाला नव्हता Sad कोणाकडे असेल तो तर इथे टाका ना.. आवडेल वाचायला..

हेम, अंड्यांचा फोटो मस्त आलाय...

वेळ असल्यास हे वाचा:
Tulips broken by viruses
http://www.virology.ws/2012/03/14/tulips-broken-by-viruses/

सुप्रभात Happy

IMG_0293_skw_0.JPG

पहिल्यांदाच असा गुलाबाच्या फुलांचा गुच्छ बघितलेला, त्यामुळे फोटो काढणं अपरिहार्यच होतं.

जागु कसली मस्त आहेत ती तोरणं... टोकाला मासे लटकल्यासारखे वाटतायेत >>> Rofl

उजु, जागू फोटो मस्त Happy

सुप्रभात.

शांकली द्रौपदीची वेणी नाव छान आहे. ह्यापुढे मी तेच म्हणेन.
हेम अंडी ओळखायला जाणकारच हवेत. घरट बुलबुल सारख वाटतय पण.

मोनाली Happy

DSCN1493.JPGDSCN1494.JPGDSCN1495.JPGDSCN1496.JPG

शरद(बागेत काम करणारा)ला हा वाफा थोडा कट करायला सांगितला तर त्याने पूर्ण सफाचट केला.
पण आता छान फुटलाय. द्रौपदीच्या वेणीचा एकेक पेड दिसायला लागलाय.

आतो, बुके भारीच Happy

जागु एकदम सुंदर प्रचि.. फ्रेश कलर... कॉमन असली तरी फुलांची नाव सांगत जा गं (माझ्यासारख्यांना बरं पडतं, दर वेळी विचारायला नको हे कोणतं, ते कोणतं) Wink

मानुषी, भन्नाट प्रचि Happy
द्रौपदीच्या वेणीचा एकेक पेड दिसायला लागलाय.>>>>>>>> मला तर तो मासा पाण्यात उडी मारायच्या तयारीत आहे असं वाटतयं Uhoh

जागु मस्त कलर आहे हेलिकेनिया.. (या धाग्याच्या कृपेने आत्तापर्यन्त माहीत नसलेली नावं कळत आहेत .. यावरूनच मी किती हिरव्या अंगठ्याची नाही .हे पण.. Uhoh )
चिमुरी +१०० Happy
मानुषी मस्त प्रचि..

ह्याला आइसक्रिम क्रिपर म्हणतात असे इथेच ह्या धाग्यावर वाचलेले. मी गोव्यात याच्या वेली पाहिलेल्या.

दिनेशदा धन्यवाद. (कॅशिया बद्दल) Happy
जास्त नाही दोन तिन पाने मागे जा.>>>>जागू, दोन तिन काय चांगली १५ पाने मागे गेली तरी मला काही तो बहावा दिसला नाही ...भ्या.........या................
जागू, तू कित्ती चांगली आहेस. माझी प्रिय मैत्रिण आहेस ना? जरा परत इथे दकवतेस फोटो? किंवा मला मेलवर पाठवतेस? गुणी माझी बाई ती. Wink
सर्वांचेच फोटो मस्त.

<<<<निसर्गात आपली सहानुभूति कुणा एकाला असू शकणार नाही.
खंड्याच्या पिलासाठी वाईट वाटले तर कावळ्याची पिल्ले उपाशी मरतील ना ?
हा झगडा निरंतर चालूच असतो. तो चपळ आणि सक्षम असतो तोच टिकतो.
बिबळा धूर्त, जास्त क्षमतेचा म्हणून टिकला. त्यामानाने वाघ दुर्बळ ठरतोय.
कबुतरं शहराला अ‍ॅडजस्ट झाली, आणि चिमण्या मागे पडल्या..पण हे कायम नसतेच,
एखादी जास्तीची क्षमता निर्माण करुन, मागे पडलेली प्रजाती परत शर्यतीत येऊही शकेल.>>>>>>>
किती टक्के अनुमोदन देऊ? (n no. of अनुमोदन्स!)>>>>+१
शांकली, मी राह्ते तिथे जवळच एक नदि कम नाला आहे- हो आता त्याला नालाच म्हणाव लागत ( म.आय. डि. सी.मधून येताना सगळ्या कारखान्यांचे वेस्टेज वाहाव लागत ना त्याला).फार नाहि , पण १५-१७ वर्षांपूर्वी लोक त्या पाण्याचा वापर जनावरांना पाणी पाजण्यासाठी,कपडे-भांडी धूण्यासाठी गेला बाजार गाड्या धूण्यासाठी करत असत.पण आता जानेवारी नंतर त्या नाल्यातून इतकी दूर्गंधी येते की विचारता सोय नाही.पण तरीहि त्या नाल्याच्या आजूबाजुने अजून पर्यंत भरपूर हिरवाई आहे,त्यामूळे आम्हाला अजूनहि पक्षी दुर्लभ नाही झालेत.
इथे मी सगळ्यांच्याच बोलण्यात बघते ते चिमण्यांचे दूर्लभ झालेले दर्शन पण माझ्या कंपाऊंड मध्ये एक बकूळीचे झाड आहे त्यावर रोज संध्याकाळी बरोबर ६-३५ ते ६-४५ च्या दरम्यान १००-१५० चिमण्या प्रचंड चिवचिवाट करत उतरतात.आणि ७ वाजेपर्यंत सर्व सामसूम होऊन झोपी पण जातात.
मानूषी , छान वाटतायेत चिमणी पाख्रर अशी फूलताना बघायला.
चिमूरे, तूला त्यातही मासेच दिसले :d

शोभा ,
पान नं. ९ वर जागू ने त्या बहाव्याचे फोटू डकवले आहेत बघ.
आता झाले ना मी पण तूझी प्रिय मैत्रीण!!! Wink

उजू ने जी वेळ दिलीय, ती चिमण्यांची दिवसभराचे रिपोर्टींग करायची वेळ असते.
माझ्या ऑफिसच्या बाहेर एक मोठे झाड आहे. त्यावर ५०/६० चा गटाने चिमण्या
संध्याकाळी जमा होतात. असे ७८ गट मी एका दिवशी मोजले. प्रचंड कलकलाट
चाललेला असतो.

माझ्या खुर्चीच्या मागे एक पेरुचे झाड आहे. त्यावर पण दिवसातून अधून मधून चिमण्या येतात. पिस न पिस साफ करण्याचा उद्योग चाललेला असतो. अधून मधून
किडे खातात. पण पेरूत त्यांना इंटरेस्ट नसतो. (पेरु खायला बुलबुल येतात.)
आधी चिमण्या, काचेतल्या प्रतिबिंबाने त्रस्त व्हायच्या. आता मात्र दोन चार क्षण प्रतिबिंबाचे निरिक्षण करतात, आणि दुर्लक्ष करतात. हि काच अगदी माझ्या खुर्चीच्या
मागेच असल्याने, अगदी जवळून त्यांचे निरिक्षण करता येते

नेरूळ स्टेशन (पुर्व)समोर स्टेशनच्या आवारातच एक बांबुचे बन होते (आता बरेच विरळ झाले) तिथे १० वर्षांपुर्वी असाचा संध्याकाळचा चिमण्यांचा बाजार भरायचा. हल्ली संध्याकाळी तिथे गेले तर मुद्दाम पाहते, पण चिमण्या गडपल्यात.

दिनेनशदा ईशिकापण(माझी लेक) असेच म्हणते की ममा त्या चिमण्याना एकमेकींना दिवसभरातल्या गप्पा सांगतात.तिच म्हणण आहे की त्यात अर्ध्या कंप्लेंट माणसांच्याच असतील की कस आता हे लोक आपली घर संपवायच्या मागे आहेत ना! तिच्या भाषेत त्यांची घर म्हणजे झाड.
हि बघा माझ्या कडची संध्याकाळ
08062011596.jpg08062011600.jpg08062011602.jpg08062011599.jpg08062011595.jpg

आणि त्यावेळेस दिसणारा चंद्र!

08062011597.jpg

मस्त आहे गं तुझी संध्याकाळ.... Happy

रच्याकने, मला राहावत नाही म्हणुन सांगते, अप्रिल्च्या दुसर्या रविवारी राणीबागेत जायचा प्लॅन शिजतोय Happy

आपल्या चिमण्यांबद्दलच्या भावना आपल्या संस्कारातून आल्यात. चिऊकाऊची गोष्ट काय, चिऊमाऊचा घास काय, आपले बालपण त्यानेच रंगले.

तूम्हाला खरे वाट्णार नाही, पण माझे सहकारी त्यांच्याकडे तूच्छतेने बघतात, कारण काय तर म्हणे मारली तर एकावेळचे पोट पण भरणार नाही म्हणून.

आपल्याला गाय बघून अगदी भक्तीभाव नाही तर करुणा वाटते. नायजेरियन माणूस
गायीला बघून, व्हेरी स्वीट म्हणतो. (त्यांच्या भाषेत स्वीट म्हणजे स्वादीष्ट.)

चालायचंच. आपण नाही मिठाईच्या दुकानाबाहेरुन जाताना डोळे त्या काचांवरच खिळवत चालतो?चिंचानी, कच्च्या कैरींनी लगडलेली झाडे पाहिली की आपल्या तोंडात नकळत पाणी गोळा होते?

ज्या झाडांना खाणेबल फळे लागत नाही त्यांच्याकडे मीही तु.क. टाकते, 'अरेरे वाया गेला यांचा जन्म म्हणत.."

खरेतर निसर्गात काहीच वाया जाण्यासाठी निर्मिलेले नाहीय, बघणा-याच्या नजरीयावर सगळे अवलंबुन...

<<<खरेतर निसर्गात काहीच वाया जाण्यासाठी निर्मिलेले नाहीय, बघणा-याच्या नजरीयावर सगळे अवलंबुन... >>> साधना अगदि खरं आहे. नायजेरियनांचा नजरीया तसा ..........:)

न्यू झीलंड मधे दिसणारे हे अनोखे फूल मला नेहमीच मोहवते.
फ़ोटोपेक्षा या फुलांचा रंग जरा जास्त गडद असतो. (ती नेमकी
छटा कॅमेरात नाही पकडता येत.) सुगंध नसतो, पण झाड,
फूल आणि फूलाचे अंतरंग सगळेच देखणे असते.

Pages