निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, ते ब्रासिका कूळातले (कोबी, मोहरी, मूळा, फ़्लॉवर ) झाड आहे. यात पांढरा रंग
पण असतो. तसे निव्वळ शोभेचेच आहे पण ते फूल नाही, पाने आहेत.

चिमुरी,

मोहात असे दोन प्रकार असतात. उत्तर मोह आणि दक्षिण मोह. उत्तर मोहाची पानं जरा रुंद, आणि थोडी लांब असतात. आणि दक्षिण मोहाची पानं अगदी चिक्कूच्या पानांची आठवण करून देणारी किंबहुना त्यासारखीच दिसणारी अशी असतात.

पुण्यात दोन्ही प्रकारचे मोह आहेत.
उत्तर मोह आघारकर संस्थेत आहे, आणि आत्ता त्याला पानं गळून कळ्या लागलेल्या आहेत. तर दक्षिण मोहाची दोन झाडं शबरी हॉटेल कडून बालगंधर्व कडे जाताना उजव्याच हाताला शबरीपासून साधारण ३०० मीटर्स वर प्रशांत क्लिनिकच्या समोर फूटपाथवर आहे. पण आता त्याचा बहर बहुधा संपला असावा. Happy

जागू, गुलाब मस्त! तुझ्याकडे खूप व्हरायटी दिस्तिये रोपांची...

वर्षूतै, त्या फुलाचा रंग एकदम मनोवेधक आहे हं! खूपच छन!

ओ !!अच्छा.. धन्स दिनेश दा.. Happy
फुलासारखी दिसणारी पानं.. गंमतच आहे नै??
गुड मॉर्निन्ग आशु. गुलाब पाहून फ्रेश वाटलं !!!

हो केलच म्हणतात. यो रॉक्सने टाकलाय की नावासकट फोटू....

आशुतोष, सक्क्काळीच मला फुल दिल्याबद्दल ठँकु रे......
(एप्रिल फूल्ची तयारी करतोय की काय???????)

शांकली माहितीकरता धन्यवाद..

दक्षिण मोहाची पानं अगदी चिक्कूच्या पानांची आठवण करून देणारी किंबहुना त्यासारखीच दिसणारी अशी असतात. >>>>>> मग मी सांगितलेला पत्ता दक्षिण मोहाचा आहे.. Happy

दिनेशदा मलाही असच वाटत होतं की ती पानं असावीत कोबी सारखी

आशुतोष, मस्त गुलाब

शांकली धंन्यवाद, कधी तिकडे गेलो तर पाहू.

पानं असावीत कोबी सारखी<<< अरे मी एका हातगाडीवर रोपे विकणार्‍याला विचारले तर त्याने कोबी फ्लॉवर असे सांगितले

शांकली, तो दक्षिण मोह मी नाही बघितला.
चिकूच्या कळ्या आणि मोहाच्या कळ्या जवळजवळ सारख्याच दिसतात. पण चिकू हे
मानवाने निर्माण केलेले फळ आहे. त्याची लागवड करताना वेगळ्याच झाडावर कलम करावे लागते. बीपासून रोप होत असेल, असे वाचल्याचे आठवत नाही.

माझ्या लहानपणी चिकूचा आकार छोटा असायचा, आता दरवर्षी तो मोठा होताना
दिसतोय. यावेळी वांद्र्याला बचत गटांच्या प्रदर्शनात, चिकूच्या वाळवलेल्या कापा
मिळाल्या होत्या. मस्त लागल्या चवीला.

माधव.
मला परत एकदा इमेल करणार का ? मी इमेल पत्ता चुकिचा नोंदवला आहे.
फुले पाठवायची आहेत !!

जिप्सी, मस्त झब्बु.. पण वर्षुच्या चित्रातला रंग जास्त फ्रेश आहे Happy (हे तर काहीच नाही टाइप झालय हे वाक्य, पण ठीक आहे)

चिकूच्या वाळवलेल्या कापा मिळाल्या होत्या.>>>>>> मस्तच

जागुच्या फुलाची स्तुती करायला आले आणि तेच राहुन गेलं... मस्त आहे फुल... Happy

@ जिप्सी, धन्स रे सांगितल्याबद्दल. आज नाही जमणार पण उद्या परवा जातोच Happy आणि जलखूण बदलली तुझी काही खास कारण? Wink

@ दिनेश, मेल केली आहे Happy

४/५ दिवसात १२/१५ नारळ पडले. (शहाळीच).
एका शहाळी विकणार्‍याला पकडलंय. अजून दराची बातचीत झालेली नाही. पण जे काही होईल ते!तेवढेच.कारण हे नारळ वाया जाऊ नयेत असं वाटतं!
मध्यंतरी दिनेशदांनी विचारलं होतं. नगरात नारळ उतरवायला माणूस मिळतो का? तर एक मुलगा येतो. नगाला ३ रु. घेतो म्हणाला. आत्तापर्यंत तरी नारळ आपोआपच पडताहेत. पण यंदा दोन्ही झाडांचे मिळून खूपच निघणार आहेत. पाहू काही तरी नीट व्यवस्था करावी लागेल.

मुंबईत शहाळे २२-२५ रुपयांना मिळते. मानुषी, दराची घासाघीस करताना हा रेट लक्षात ठेव.

तसे सावंतवाडीलाही मी २० रुपयांनाच घेतले होते. हल्ली अख्ख्या भारतभर भाव सारखाच असतो. गेल्या वर्षी वाडीला हापुस आंबे शोधत होते. मुंबईच्याच भावाने मिळत होते आणि प्रतही बेक्कार.

आज जवळ जवळ दोन महीन्यांनी माबोवर आले, घरी रांगेत आजारपण चालू होती. आधी लेकीला बर नव्हत तर नंतर नवर्याचा अ‍ॅक्सिडेंट-त्यातून ऑपरेशन. आता सर्व ठिक आहे. बरच मिसल मी. आता वाचून काढेल वेळ मिळेल तसा.नि. ग. चा सहावा भाग सूरू झाला हे बघून खूप आनंद झाला. साधना आणि जिप्सि सॉरी. निसर्ग गटगच्या व्रूत्तांताची जबाबदारी घेऊन पण पूर्ण न केल्याबद्द्ल.
दोन दिवसांआधी मला आमच्या अंबरनाथ मध्ये एका गार्डनमध्ये एक फूललेला पिवळा टॅबूबीया आणि काटेसावर हि झाडे दिसली.काय सुंदर नजारा. आहाहा.......त्या टॅबूबीया वरून तर नजरच हटत नव्हती माझी.
फोटो लवकरच टाकेन.
साधना, तूम्ही फ्लेमिंगो गटग केलेत का?

अग, गुलाबी रंगाची, आणि छत्रिच्या दांड्याच्या आकाराचे छोटे तुरे असतात ना? काय नाव त्याच?????????? Uhoh
वर्षू, अशुतोष, जागू, मस्तच आहेत फ़ोटो. Happy

उजु.. आता सर्व ठीक आहे वाचून बरं वाटलं Happy
थांकु शोभा..कशीयेस?? तू टाकलेले फोटो पण मस्त आहेत .. नाव कुणीतरी सांगेल नक्कीच..

Pages