सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
साधना, अभिनंदन! खूप आनंद
साधना, अभिनंदन! खूप आनंद वाटला कमळ बघून.
साधना, कसली गोडुली आहे कमळाची
साधना, कसली गोडुली आहे कमळाची कळी. तुझ्या भाग्याचा हेवा वाटतोय खरंच.
घरात कमळं लावायची माझी केव्हापासूनची इच्छा आहे. पण बाल्कनीत कशी काय होणार? असा विचार करून गप्प बसत होते इतके दिवस. आता धीर होईल. पण ते पान कम मूळ कुठुन आणावं बरं? लोक्स, माहित असेल तर सांगा प्लीज.
मामी, तो पनवेलचा पत्ता दिलाय
मामी, तो पनवेलचा पत्ता दिलाय तिथे एक फेरी मारा. पनवेल परिसरात अनेक कमळाची सरोवरे आहेत.
वोके. आता लेकीच्या छोट्या
वोके. आता लेकीच्या छोट्या सुट्टीत एक फेरी टाकली पाहिजे.
पण ते पान कम मूळ कुठुन आणावं
पण ते पान कम मूळ कुठुन आणावं बरं? लोक्स, माहित असेल तर सांगा प्लीज.
वेट करा लोक्को. माझ्या पानांना मुळे फुटली की मी लगेच सुरू करते वाटप.
ही माझ्या कमळाची फॅमिली. माझ्या गोडुल्याला मी इथुन आणले.
मस्त...
मस्त...
इथे ही गुलबक्षीही मिळाली.
इथे ही गुलबक्षीही मिळाली. एकाच झाडाला एक गुलाबी, एक पांढरे आणि एक अर्धे गुलाबी-अर्धे पांढरे फुल आलेय. मी दोन बीया आणलेल्या. दोन्हीही रुजलेल्या पण एक पाणी घालताना लेकीने तोडले. दुसरे वाढतेय. पण अजुन फुल आले नाहीय.
इथे एकाच वेलीवर एक पांढरे आणि एक निळे गोकर्ण आलेय.
गोकर्णातही दोन रंग दिसले -
हा नेहमीचा निळा -
आणि हा वांगी रंग - फोटोत करा वेगळा दिसतोय. मॉव सारखा रंग होता.
कमीतकमी ३-४ तरी पपईची झाडे दिसली ज्यांना भरपुर फांद्या फुटलेल्या आणि त्या फांद्यांना पपयाही लगडलेल्या.
कमळाच्या पानामधुन असे पिल्लु
कमळाच्या पानामधुन असे पिल्लु येते.
आजुबाजुचे पान काढायचे आणि मधला भाग रुजवायचा.
बाप्रे, दोन दिवसांत एकदम
बाप्रे, दोन दिवसांत एकदम एवढ्या पोस्टी!! मस्त! हा धागा परत टवटवीत झाला! आज सुट्टी आहे त्यामुळे निवांत वाचून काढीन.
जागू, तू एका छोट्या हिरव्या फुलाच्या झाडाचे फोटो टाकलेस ना, त्या फुलांचा एखादा क्लोजप काढता येईल का? मला वाटतंय ते झाड 'अळू' असेल. अळू म्हणजे हा एक छोटेखानी वृक्ष असतो. फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री आणि फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री पुस्तकांत कदाचित याची थोडी माहिती असेल. आज दुपारी बघता येईल.
साधना, तुझ्याकडचे गोडुले एकदम
साधना, तुझ्याकडचे गोडुले एकदम मस्त! आणि तू कमळ लावण्याबद्द्ल दिलेली माहिती मला खूप आवडली, या पद्धतीने कमळ नक्की नीट वाढू शकेल. आणि अर्थातच पुढच्या सर्व स्टेजेसचे फोटो तू टाकशीलच.
सेनापती, बर्ड फीडर मस्त! येतील येतील अनेक पक्षी येतील. सब्र का फल मीठा होता है!!
जिप्सी, तू आणि माधव याच (पत गेलेल्या पक्ष्याच्या :डोमा:) फोटोबद्द्ल मागे म्हणत होतात का? (पत गेलेला पक्षी.... हे खूप आवडलं)
आणि खरंच तुझ्या ह्याही फोटो वरून असे वाटतेय की तुला बघून पक्षी फोटोसाठी पोझ देऊन बसतात की काय?
मामी, सगळे फोटो सुंदर. खरंच तो पांढरा भोपळा खूप गोड दिसतोय. आणि तो विमानाच्या सावलीचा फोटो भारी हं एकदम! त्या गुहेतला फोटो पण मस्त! हा गुलाबी रंग त्या सॉल्टचा त्यावर काही प्रकाश पडला की दिसतो का?
साधना, कमळाची ही गंमत माहित
साधना, कमळाची ही गंमत माहित नव्हती. कमळाच्या वाटपाच्या प्रतिक्षेत.
गुलबक्षी पण मस्त. मध्यंतरी मी बर्याच गोळा केल्या होत्या -पांढरा, पिवळाधम्मक, पिवळ्यावर गुलबक्षी ठिपके आणि मूळ गुलबक्षी. मला त्यांचा वास खूप आवडतो. पण ते एक वेडं रोप आहे. प्रचंड वाढतं. कोणीतरी मला सांगितलं होतं की, दोन रंगाच्या गुलबक्षीच्या बिया एकावर एक लावायच्या की त्यातून एकच रोप येतं आणि त्या फुलांत दोन्ही रंग एकत्र झालेले दिसतात. खखोदेजा.
ही आत्ताच माझ्या बाल्कनीत येऊन बसलेली घार. फोटोत बघून काही वाटत नाही पण प्रत्यक्षात फारच भितीदायक नजर असते आणि मोठी तरी केवढी! आजकाल बरेचदा येऊन बसते आणि तोंडातून तो टिपीकल तुतारीसारखा आवाज काढते. कधीकधी आकाशातून खाली सूर मारत माझ्या बाल्कनीतल्या वेलाची फांदी तोडायला बघते. फोटो लांबूनच काढावा लागतो, जरा जरी जवळ जातोय असा संशय आला की उडून जाते. खरंतर तिचा उड्डाण करतानाचा फोटो घ्यायचाय. पण टायमिंग जमत नाही. तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे! (दिनेशदा, जिप्सी, जागू ऐकताय ना?)
ही काल माझ्या घरी फुललेली त्रिमूर्ती - तीन वेगवेगळ्या झाडांना आलेल्या तीन रंगाच्या जास्वंदी. ही जास्वंदीची फुलं बरोबर दोन दिवस असतात. पहिल्या दिवशी फुलल्यावर संध्याकाळी मिटून जातात आणि पुन्हा दुसर्या दिवशी फुलतात. मग मात्र सुकतात. सगळ्या जास्वंदींचा हाच नेम असेल.
ही माझी कर्दळ :
हा गुलाबी रंग त्या सॉल्टचा
हा गुलाबी रंग त्या सॉल्टचा त्यावर काही प्रकाश पडला की दिसतो का?
>>> शांकली, तिथे त्यांनी एका मस्त ठिकाणी खास छोटीशी व्ह्यूअर्स बाल्कनी टाईप बनवून लाईट शो केला होता. त्यावेळचा फोटो आहे तो. वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत वेगवेगळ्या आकारांवर टाकून इतका सुरेख इफेक्ट येत होता! त्यातल्या त्यात मला आणि लेकीला हा आकार फारच भावला. असा एक कोणत्यातरी 'मिस्टीरीयस लॅन्डमधला कॅसल' (हे मुलीने केलेले वर्णन) असावा असा तो दिसत होता.
मामी... कित्ती ते उंचावर
मामी... कित्ती ते उंचावर घर... फोटो मस्तच.. मी येतो तुमच्याकडे फोटो काढायला...
साधना मस्तच. आता मी पण लावीन
साधना मस्तच. आता मी पण लावीन पण सध्या जागाच नाहीये.
रच्याकने ती लिली आहे कमळ नाही. माझाही आधी खूप गोंधळ व्हायचा मग मला हा हुकमी एक्का मिळाला फरक ओळखायला
लोक्स आठवडाभर नव्हते तर
लोक्स आठवडाभर नव्हते तर एवढ्या पोस्टी?
जागे बये, फळांना गर असतो ग. मांस काय?
दिनेशदा सॅल्युट मारावासा वाटला. मस्त झाड.
मामी फुले नी घार पण मस्त.
साधना मला पण पान हवे. पानं (तोंडाला) पुसु नको :डोमा:, लावायला दे.
सेनापती पक्ष्यांसाठी सुरेख सोय.
ते दुरंगी गुलबक्षी काय प्रकरण आहे बुवा? मला पण बीया देण्यात याव्यात
साधना हार्दिक अभिनंदन आणि आता
साधना हार्दिक अभिनंदन आणि आता मला एक पान हवच लावायला. अग ते गुलबक्षीच असच असत. अशी दोन रंगाची झाडे जवळ असली की कधी कधी दुरंगी फुले फुलतात. माझ्या माहेरी नेहमी फुलायची अशी. नुसतीच गुलबक्षी नाही तर जास्वंदीही फुलायची. माहेरी एकाच झाडाला कायम लाल व पिवळ्या रंगाची फुले यायची.
दिनेशदा तुम्ही म्हणता ती पनवेलचीकमळे तशीच आमच्या येथिल एका गावात एका तळ्यात आहेत. तिथेच मी साधनाला घेउन जाणार आहे. पुर्वी त्या गावात पिवळ्या, निळ्या, पांढर्या कमळांचीही तळी होती. आता त्यावर भराव पडला आणि फक्त गुलाबी कमळे राहीली आहेत.
मामी मस्त फोटो.
शांकली तो अळू नाही. मला अळू माहीत आहे. मागच्याच वर्षी चांगले अळू लगडलेले झाड मी पाहीले.
माधव, मस्त माहिती. पण
माधव, मस्त माहिती. पण साधनाच्या फोटोत फुल वर आलंय मात्र पानं फ्लोट होतायत. पण तुम्ही दिलेल्या लिंकमधल्या गुलाबी कमळाच्या फोटोत फुलाशेजारी जे बियांचं पॉड दिसतय ते मला वाटतं, कमळाच्या झाडांचं व्यवच्छेदक लक्षण असावं. ही पॉडस सुकल्यावरही सुरेख दिसतात. आता दिनेशदा आला की सांगेलच. (तोवर मी माझं अगाध ज्ञान पाजळून घेते.)
साधना, मामी मस्त फोटो माधव
साधना, मामी मस्त फोटो
माधव मस्त माहिती
मामी, फोटो काढण्यात काचेसारखा
मामी, फोटो काढण्यात काचेसारखा दुसरा अडथळा नाही. आपल्या कॅमेराचे सेन्सर त्यावरच थडकून परत येतात आणि कचेपलिकडची वस्तू, धूसर होते.
पण या घारीचे घरटे, जपळपास असण्याची शक्यता आहे.
साधनाने, इतक्या दिवसाची कसर भरुन काढलीय. आता तिच्या घरच्या कमळाच्या फोटोने, नवा भाग सुरु व्हावा.
कुणाचं काय तर कुणाचं काय... मला ते कमळाचे पान वापरुन त्यात शिजवलेल्या भाताची रेसिपी आठवली.. जाऊ द्या.. खोड जूनीच आहे.
हो मामी. ते सुकवलेले पॉड
हो मामी. ते सुकवलेले पॉड वाण्याकडे मिळतात.
दिनेश, अभिमान चित्रपटात दुर्गा खोटे बच्चनकरता 'कमलककडी के बडे' बनवते. ती कमलककडी हीच का?
याच आठवड्यात फोर्टसाईडला गेले
याच आठवड्यात फोर्टसाईडला गेले असताना, वायएमसीए बिल्डिंगबाहेर पिवळ्या रंगाचा अफ्रिकन ट्युलिप ट्री बहरत असलेला पाहिला. आतापर्यंत मी फक्त लाल रंगाचाच पाहिला होता. पुढच्या आठवड्यात जाऊन फोटो काढून आणेन. त्याला आपण काय म्हणतो? काही नाव आहे का?
रच्याकने ती लिली आहे कमळ
रच्याकने ती लिली आहे कमळ नाही
मलाही आधी तेच वाटलेले. पण तिथल्या माळ्याला मी ही वॉटरलिली आहे हे ठणकावल्यावर त्याने मला हे कमळ आहे असे उलटे ठणकावले आणि वर त्याला फळेही येतात ही माहिती दिली.
माझ्याही मते ज्याच्या पाकळ्या पसरत असुन शेवटी टोकेरी होतात ती कमळे आणि निमुळत्या सुरवातीपासुन शेवटापर्यंत एकच आकार असलेल्या पाकळ्यावाली लिली. माझ्या कॉलनीत वॉटरलिलीज आहेत त्यांना संध्याकाळि परत पाहुन येते.
आता माझ्या घरी जे काय असेल ते असेल, मी तरी सद्ध्या त्याच्या प्रेमात आहे. आज त्याला जरा मोठ्या भांड्यात लावण्याचा उद्योग करत होते. खाली अजुन दोन कळ्या आल्यायेत. पण नंतर तो उद्योग सोडुन परत होते तसेच त्याला ठेवले. मला उगीचच पहिलटकरणीसारखे वाटायला लागलेय. उगीचच काहीतरी चुकीचे करेन आणि पहिलीवहिली कळी गमावेन. नकोच ते...
साधना, अगदी बरोबर! सध्या
साधना, अगदी बरोबर! सध्या अजिबात हात लावू नकोस आणि दृष्ट पण काढून टाक! मला पण असेच वाटते की आपलीच दृष्ट लागेल की काय! (पानामधे माझाही वाटा ठेव गं!)
या दुरंगी गुलबक्षीत पिवळा आणि लाल,पांढरी आणि लाल अशीपण रंगसंगती दिसते.
(थोडं विषयांतर, तू इलेक्षन ड्यूटी करून ५ पर्यंत घरी आलीस म्हणजे तुम्ही मुंबैकर अगदी fastest बरंका.मला पण ही ड्यूटी आली होती आणि काल मी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी आले. तरी बरं ही फक्त कॉर्पोरेशनचीच निवडणूक होती!)
जागू आता ते झाड कोणते याबद्द्ल उत्सुकता लागून राहिली आहे.
मामी, माहिती बद्द्ल धन्स! आणि त्या त्रिमूर्तीचा आणि घारीचा फोटो मस्त! तिच्या नजरेची भितीच वाटते. आणि बाल्कनीत घार येते म्हणजे तुझे घर आहे तरी कितव्या मजल्यावर?
माधव,तुम्ही दिलेली लिंक फारच छान आहे. सर अटेंबरोंची ही क्लिप डिस्कव्हरी किंवा अॅनिमल प्लॅनेटवर सिक्रेट लाईफ ऑफ प्लँट्स मधे दाखवली होती.
हो माधव तिच कमलकाकडी. (म्हणजे
हो माधव तिच कमलकाकडी. (म्हणजे कमळाची मूळे) सिंधी, पंजाबी लोक जास्त खातात. त्यांच्या लोणच्यात असते. वरती खूप चिखल असतो (कधी कधी वजन वाढवण्यासाठी मुद्दाम थापलेला असतो.) आतून भेंडिसारख्या नळ्या असतात. खुप स्वच्छ करुन घ्याव्या लागतत. मग उकडून त्याच्या काचर्या किंवा भाजी करता येते. चवीला साधारण अरवीसारखेच लागते.
दिनेशदा मागच्या वर्षी आमच्या
दिनेशदा मागच्या वर्षी आमच्या काकांनी कमळाचॉ फळे आणली होती. ती आम्ही नुसतीच सोलून खाल्ली.
ह्या धाग्यावर बर्याच पोस्टी झाल्या आहेत. नविन धागा टाकते आता.
आणि त्या कमळाच्या बिया
आणि त्या कमळाच्या बिया सुकवून, फुलवून बाजारात मखाने म्हणून विकायला असतात. या मखान्यांचं युपीवाल्यांना भारी अप्रुप. एखाद्या शुभ प्रसंगी या लाह्या वापरतात. खिरीत घालतात. किंवा कढईत नुसत्याच भाजून जरा गुलबट झाले की सढळ हातानं तूप सोडून (खरं तर हे तुपावर भाजतात. पण बरंच तुप लागतं. सगळं तुप मखाने पिऊन घेतात. म्हणून मी कोरडेच भाजते आणि मग शेवटी घाबरत घाबरत तुप घालते. ), वर मीठ आणि मीरपूड घालून मटकवायचे. भारी लागतात.
Pages