निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीन, मने सह्हीच फोटो Happy

रच्याकने, परवाच्या गटगचा वृ कुणी लिहंतय का? नाहीतर मीच उद्या फोटो वृतांत टाकतो. मला जास्त वेळ फोटो माझ्याकडे ठेवायला आवडत नाही. Proud

मनिताई, एम्प्रेस गार्डनचा फ्लॉवर शो बघायला जायचचं.... अस ठरवल होत पण... माझ्या चिऊला जरा बर नसल्याने जाता आलं नाही. तुझे फोटो पाहुन 'दुधाची तहान ताकावर....'
अजुन फोटो असतील तर पाठव ना.

प्रयत्न चालु आहे. पण फोटो व्रुत्तांत तर टाकाच.

मी तुम्हा दोघींना स्मस तर करतेच पण इथेही लिहिते. तुम्ही दोघींनीही तुमचे वृ. जिप्सीला पाठवा, त्यात तो योग्य जागी फोटो लिन्क अ‍ॅड करेल आणि मग तुम्हाला परत पाठवेल. मग ते तुम्ही दोघींपैकी कोणा एकीच्या नावाने प्रकाशित करु शकाल. म्हणजे वाचताना फोटो नी सोबत माहिती एकत्रच वाचायला मिळेल (जसे काही फुलांचे फोटो आणि त्याबद्दलचा मजकुर एकत्र).

त्याचा इमेल - Yogesh.jagtap@lionbridge.com

माझ्या लेकीने आमच्या परीसरातील रानफुलांचा तयार केलेला हा गुच्छ.

ranful.JPGranful1.JPG

खरंच गं, प्रज्ञाला अनुमोदन! मस्त केलाय बुके. इतक्या छोट्या मुलीला रंगसंगतीची आणि आकारांची जाण खूपच आहे. मस्त. जागू, तिला एक गोड पापी आणि शुभाशीर्वाद!

काही दिवस पूर्वी मी इथे सौदीत हिवाळा सुरु झाल्यावर इथल्या हिशोबाने बर्‍या पैकी पाऊस पडल्याच लिहिल होत व आता काही रानटी फुलझाडं उगवतील त्याचे फोटो टाकेन अस तुम्हाला आश्वासन दिल होत. ते आज पूर्ण करतोय. खरतर नंतर जवळ जवळ तीन आठवडे थंडी कमी झाली होती त्यामुळे बिया रुजुन झाडं जरी उगवली तरी दव कमी पडल्यामुळे ती फारशी उंच वाढली नाही आता परत थंडी पडते आहे काल सहा डिग्री तापमान होत. त्या मुळे दव पुन्हा पडू लागल्यान झाड उंच नसली तरी लगेच फुलुन आलीत.

ही झाडं जेमतेम एक वीत उंच झालीत.

जिथे ही भरपूर उगवलीत तिथे असा गालिचा बघायला मिळतो.

ही काही सोनकी सारखी फुलही उगवलीत. यांची फुलण्याची जिद्द पहा. सिमेंट मधल्या सांधेजोड असलेल्या जागेत अशी किती वाळू असणार ? पण तिथेही मुळ रोवून ती उगवली व फुलली आहेत

ही सगळी झाड मी जिथे काम करतो तिथे केमिकलप्लाण्ट मधे, कारखान्यात उगवली आहेत. सुरक्षा कारणांसाठी माळी लोकांद्वारा ती काढून टाकली जातील कारण इथे वाळवंटात रॅटल स्नेक ही सापडतो . नोव्हे.२००९ मधे माझ्या कारखान्यात एक नव युनीट उभारल गेल. हाती पाने व हातोडे वागवणार्‍या लोकांमधे ही कलाकार लपलेला असु शकतो याची प्रचिती देणार कुणा अनाम कामगारान प्लाण्ट उभा करतांना मिळालेल्या मोकळ्या वेळात काढलेले हे चित्र पहा ( कलाकारांच्या भाषेत मार्कर पेन ऑन आयर्न बीम Happy ) त्या झाडाची पान बघा हुबेहूब पिवळ्या फुलांच्या झाडासारखी आहेत फुलं मात्र वेगळी आहेत मला ती शोधावी लागतील. एकाफुलाच्या खाली त्याने एक अळी ही काढली आहे.

प्लाण्ट मधला चित्रकार तो.....

बस नी रोज कामावर जातांना रस्त्याच्या कडेला गुढघाभर उंचीची अगदी इवली इवली फिक्या जांभळ्या ( लॅवेण्डर ) रंगाची फुलं आलेली झाड उगवलेली दिसतात माझ्या प्लाण्ट मधे मात्र ती का कुणास ठाउक ती उगवली नाहीत कधी पायी फिरायला गेलो असता दिसली तर मोबाईल ने फोटो काढून इथे टाकेन.

सध्या इथे लाल , पिवळे व जांभळे गालिचे पाहून फार छान वाटतय. नंतर सगळ पुन्हा रखरखीत होईल काही काटेरी झुडुप तेव्हडी उरतील अन बाकी मुद्दाम ठिबक सिंचन करुन जोपासलेली खजूर व इतर मोठी झाड राहतील. या फुलझाडांच्या बिया वाळूत पडतील, जो पुढच्या वर्षी पडेल त्या पावसाची वाट पहात !!

@ श्रीकांत - यांची फुलण्याची जिद्द पहा. सिमेंट मधल्या सांधेजोड असलेल्या जागेत अशी किती वाळू असणार ? पण तिथेही मुळ रोवून ती उगवली व फुलली आहेत >> मस्त.
अशी रस्त्याकडेची फुलझाडे काढून मी कुंडीत लावली होती पण ती काही फुलली नाहित. Sad त्यांना बहुतेक कष्टाचेच जीवन पसंत पड्ते.

आपल्या गृप मधे संगणक तज्ञ कोण आहे रे? जरा मदत करा लवकर. जागूतै ला फोटो दिसत नाहीत म्हणजे काय ? लाहोर व्हाया कुवेत !! लाहोर व्हाया कुवेत !!

श्रीकांत गालिचा छानच. बाकीच्या फ़ोटोंच्या प्रतिक्षेत. Proud
ती पिवळी फुले बघून कोकणाची आठवण जागी झाली Happy

बाकिच्यांना तर फोटो दिसतायत. काल मित्राला त्याच्या लॅपटॉप वर लॉग इन न होता दाखवली होती. म्हणजे माझ्या कडून काही गडबड नाही. आपल्या कानी बोल नाही, दिवाळी ला तेल नाही रे बॉ. Happy

( तरीपण माझ्या कडून पिकासा वेब अल्बम मधे काही सेटिंग बदल करायचे असले तर तज्ञ मंडळीं नी सांगाव ही विनंती )

मला फोटो दिसताहेत. तेंव्हा लाहोरवरून परत जा श्रीकांत Happy
ऑफीसमध्ये बरेचदा पिकासा बंद केलेले असते. तसे असल्यास फोटो दिसणार नाहीत. आगीची भिंत (firewall) नसलेल्या संगणकातून बघा लोकहो.

श्रीकांत, गालीचा सुंदरच!!
त्यांना बहुतेक कष्टाचेच जीवन पसंत पड्ते.>>>> अनुमोदन.

Pages