सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
लिखाण पाठवण्याचा दुवा
लिखाण पाठवण्याचा दुवा http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
हे झाड कुठले?? सध्या कोकणात
हे झाड कुठले?? सध्या कोकणात दर चार झाडांमागे हे पाचवे झाड फुलांचा भार सोसत उभे आहे
माझ्या गावच्या घरी आलेली पांढरी कोरांटी. ही आपल्या सोनटक्क्याएवढी मोठी आहे आणि दिसायलाही तशीच
हा तिचा पुष्पकोश
आणि हे रोपटे
ही आपली नेहमीची कोरांटी
मस्त आहे कोरांटी साधना.
मस्त आहे कोरांटी साधना.
मध्यंतरी लोणावळ्याला गेलो
मध्यंतरी लोणावळ्याला गेलो होतो. तिथे हे सुंदर रंगांच्या सुंदर फुलांचं झाड दिसलं :
ही तिथेच गडबड आणि मोठ्या आवाजात बडबड करत असलेली बदकं :
बागकामाचं पुन्हा मनावर घेतलं
बागकामाचं पुन्हा मनावर घेतलं आहे. वाकोल्याहून २०-२० रूपयांत आणलेली ही रोपं :
शिवाय टोमॅटो, मेथी आणि हरभरे लावले आहेत. पुदिना लावलेला सुकला. आता पुन्हा आणून लावीन.
वरचे पिटुनिया सुकले की
वरचे पिटुनिया सुकले की त्याच्या पुष्पकोशात तुळशीबीसारख्या बारिक बिया तयार व्हायच्या. मी बागेतुन हे पुष्पकोष मिळवुन माझ्या घरी पिटूनीया तयार करायचे. गेले ५-६ वर्षे पाहतेय, नो बी :(......
सगळ्यांचे फोटो सुंदर आहेत.
सगळ्यांचे फोटो सुंदर आहेत.
साधना - कोकणातले ते झाड
साधना - कोकणातले ते झाड "किंजळ".
माझ्या आईकडे ती पांढरी
माझ्या आईकडे ती पांढरी कोरांटी आहे शिवाय फिक्क्या केशरी रंगाचीही आहे. आता तिकडे गेल्यावर फोटो काढेन.
मी पण केशरी कोरांटीच पाहिलीय.
मी पण केशरी कोरांटीच पाहिलीय.
माडीचा
माडीचा लेख.
http://www.maayboli.com/node/32366#new
मस्त गप्पा चालल्यात, जागू
मस्त गप्पा चालल्यात, जागू माडीचा लेख पण वाचला (माडीवरचा, असे तरी कसे लिहू ?)
मी भरपूर भटकलो, भरपूर फोटो काढलेत. न्यू झीलंडमधला बीच, थर्मल गीझर, विंटर गार्डन, असे सगळे घेऊन भेटीला येतोय.
आज, ऑकलंड, उद्या हाँग काँग, परवा मुंबई, तेरवा दुबई आणि मग नैरोबी असा प्रवास आहे !!! लवकरच भेटू.
दिनेशदा भरपुर फोटो जमले असतील
दिनेशदा भरपुर फोटो जमले असतील तुमचे. लवकरच प्रवास संपला की टाका.
साधना, मस्त फोटो. ते झाड आणि
साधना, मस्त फोटो. ते झाड आणि माती बघून कोकण आठवल.
माझ्याकडे , पिवळी, आणि पांढरी कोरांटी आहे.
मामी: फोटो लई भारी.
आज, ऑकलंड, उद्या हाँग काँग, परवा मुंबई, तेरवा दुबई आणि मग नैरोबी असा प्रवास आहे !!! लवकरच भेटू. >>>>व्वा!. दिनेशदा, लवकरच आमचा पण फोटोतून प्रवास होणार तर.
दिनेशदा.. या लवकर.. वाट
दिनेशदा.. या लवकर.. वाट बघतोय.. तुमची पण आणि फोटोची पण..
साधनाताई -कोरांटी छान
साधनाताई -कोरांटी छान आहे
मामी - रंगीत बाग मस्तच,
दिनेशदा - माडीवरचा, असे तरी कसे लिहू >>
आज, ऑकलंड, उद्या हाँग काँग, परवा मुंबई, तेरवा दुबई आणि मग नैरोबी >> वाचता वाचताच दमलो
होय साधना तो किंजळच आहे.
होय साधना तो किंजळच आहे. आम्ही दिवाळीनंतर कोकणात गेलो होतो तेव्हा पण हा असाच खूप फुललेला होता. अर्जुन, ऐन यांचा भाऊ!
मामी, बागकाम अगदी जोरात चालू आहे! ते लाल अलामांडा आणि बदकांचे फोटो सुरेख.
दिनेशदा, आता फोटोंची
दिनेशदा, आता फोटोंची प्रतिक्षा आहे हं.............
धन्यवाद! कुणी सांगितलं आठवत
धन्यवाद! कुणी सांगितलं आठवत नाही. पण संपूर्ण सुकलेली मधुमालतीची वेल काढून टाकणार होते. पण इथेच कुणी तरी सांगितलं की मधुमालती परत फुटते. काढू नकोस म्हणून.
मधुमालतीचा पुनर्जन्म पाहून इतका आनंद झालाय............!
मस्त कोवळी हिरवी तांबूस पानं आलीयत.
दिनेशदा, एकेका दिवसाला एकेक
दिनेशदा, एकेका दिवसाला एकेक देश ? कसं काय जमवता बुवा एवढं !
साधना, मामी फुलांचे, कुंड्याचे फोटो छान आलेत. अगदि प्रसन्न वाटले.
मस्त आहेत सगळे फोटो. जागू चा
मस्त आहेत सगळे फोटो.
जागू चा माडी चा लेख पण छान आहे.
मामी तुझे फुलांचे फोटो बघून कधी एकदा परत इथे वसंत येतो आणि मी परत ही सगळी रोपं माझ्या बागेत लावते असं झालय बघ ! पेटुनीया किती मस्त रंगात मिळाल्या तुला !
आणि तिथे पुदिन्याचे रोप विकत कशाला आणायला हवं ? घरी आणलेल्या जुडीतली जरा जाड काडी खोच की कुंडीत अर्थात जुडी विकत आणावी लागेल म्हणा !
सुप्रभात.
सुप्रभात.
या किंदळ / किंजळ ( Terminalia
या किंदळ / किंजळ ( Terminalia paniculata )वरुन आठवलं - या जातीतील अजून दोन वृक्ष - Terminalia bellirica - बेहडा व T. chebula हिरडा हे आपल्या सुपरिचित "त्रिफळ्या"मधे वापरले जातात - आवळ्याबरोबर. (Emblica officinalis आवळा) - या सर्वांची फळे वाळवून ती समप्रमाणात "त्रिफळा" या आयुर्वेदीय औषधात वापरली जातात.
त्रिफळा किती गुणकारी आहे हे आपण सर्व जाणताच.
जयु, शांकली धन्यवाद.
जयु, शांकली धन्यवाद.
किंजळचा उप्योग काय असावा?? बहुतेक लाकुड वापरात असेल.
यावेळी गावी गेलेले तेव्हा माझ्या जात्यासाठी खुटा (दांडा ज्याने आपण जाते ओढतो तो) करुन घेतला. चुलत भावाने मस्त गोरापान गुळगुळीत खुटा बनवला. लाकुड कुठले म्हणुन विचारले तर म्हणाला आंजनी. इथल्या अंजनावरच्या लेखांची आठवण झाली
महाबळेश्वरला फुललेला एक
महाबळेश्वरला फुललेला एक
मला ते अंजन च आणि सोनसावरीच
मला ते अंजन च आणि सोनसावरीच झाड पाहण्याची खुप इच्छा आहे. पाहू कधी योग येतोय ते
मला ते अंजन च आणि सोनसावरीच
मला ते अंजन च आणि सोनसावरीच झाड पाहण्याची खुप इच्छा आहे.>>>>सोनसावर राणीबागेत आणि अंजनी पवईला बहरत असणार. बोल कधी येतेस????
जिप्स्या मी पुढे लिहीणारच
जिप्स्या मी पुढे लिहीणारच होते की तू टाकलेल्या फोटोंमुळे
आता कसली मी येतेय ? बघू तरी कधी योग येतोय ते.
ह्याचे नाव काय ? रोज आमच्या
ह्याचे नाव काय ? रोज आमच्या पाठीमागच्या आवारात असतो.
आता कसली मी येतेय ? बघू तरी
आता कसली मी येतेय ? बघू तरी कधी योग येतोय ते.>>>>अरे हो फोटो काढल्यावर मी पोस्ट करेन इथे फोटो. फक्त त्या साधनाला नको दाखवूस. (तीला सांगितलंय कि मी इथे पवईचे फोटो टाकणार नाही )
Pages