निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती, छान वाटतय पुस्तक. माझ्या बॅगेत पुस्तकांचे फार ओझे होते. यावेळी ५६ किलो सामान नेले होते आणि येताना ४८ किलो आणले... जास्त भरणा पुस्तकांचाच.

श्वेता, छान फोटो.

हा सगळा एकच ग्रुप ना ! बाभळीत पांढरी जात पण असते तशी दुरंगीहि. साध्या बाभळीची अशीच पण छोटी असतात. दुरंगीची मात्र लांबट असतात.

लाजाळूची फुलं पण अशीच दिसतात, पण त्या कळ्यांमधे जांभळी छटा दिसते.
इथे पुण्यात दुरंगी बाभळीचा एकमेव वृक्ष मोदी गणपतीपाशी आहे.पण तो पावसाळ्यात फुलतो. आणि फुलल्यावर मात्र डोळ्यांचं पारणं फेडतो. तो पिवळा आणि गुलाबी रंग काय दिसतो म्हणून सांगू! अगदी सॉफ्टी आईस्क्रीमसारखे! एरवी मात्र हे झाड जरा खंतावल्यासारखं वाटतं.

शांकली, तसेही ते दुरंगी बाभळीचे झाड मोठे होत नाही. गोव्यातही शोभेसाठीच लावतात. त्या फुलाचा गुलाबी भाग, दुसर्‍या दिवशी पांढरा होतो.
मी रामकाठी बाभळीची मोठी झाडे, नगरला बघितली होती. आमच्याकडची बाभळीची झाडे तर प्रचंड वाढलेली असतात.

न्यू झीलंडला ८ फूट वाढलेला तेरडा बघितला.

८ फूट? बाप्रे.... एवढा मोठ्ठा तेरडा! या दुनियेत खूप विलक्षण गोष्टी आहेत हेच खरं! आणि दिनेशदा तुमचा हेवा वाटतो कारण अशा काही गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष बघितल्या आहेत! त्या पोहोतुकावाचा एखादा फोटो मिळाला का?

शांकली, त्या तेरड्याचे फोटो टाकतो रविवारी.
पोहोतुकावाचे पण. खरे तर या झाडाचा बहर आता ओसरला होता. हि फुले तिथे डिसेंबरमधेच फुलतात, आणि स्थानिक लोक त्याला क्रिस्मस फ्लॉवर म्हणतात.
या झाडांच्या बियांवर, ऑस्ट्रेलियात बंदी आहे.

काल रस्त्याने चालता चालता पायाखाली काहीतरी आले. निट पाहिल्यावर कळले कि बारकुसा फणस आहे तो. मग झाडाकडे लक्ष गेले, पाहिले तर झाडाचे पुर्ण खोड छोट्या फणसानी लगडलेले!! मस्त वाटले पाहुन!!

ब्रिटिशांच्या काळात स्वा.सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली; तिथे आता स्मारक उभे केले आहे. या स्मारकापाशीच पुण्यातील दुर्मिळ आणि फक्त एकमेव असलेला वाळुंज हा वृक्ष उभा आहे. या स्मारकाकडे पाठ केली की पुलावर समोर जरा झाडांची दाटी दिसते; त्यातच अगदी डाव्या हाताचे झाड म्हणजे हा वाळुंज! Salix tetrasperma
आणि इंग्लीश भाषेतला weeping willow!
याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी कोवळ्या फांद्या आणि पानं यांवर चंदेरी लव असते आणि ही पानं फार मुलायम असतात. आणखी एक गंमत म्हणजे हिंदीत याला 'मजनू' असं म्हणतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की याच्या लाकडापासून क्रिकेटच्या बॅट्स बनवतात. अशा या वृक्षाचे फोटो..

IMG_8631.jpgIMG_8633.jpg

शांकली, रात्रीचा वेळी आपण हाच बघितला होता ना ?
मला झाड बघितले कि त्यांच्या पानाला स्पर्श करुन बघावासा वाटतो. झाडाचे रुपडेच नाही तर स्पर्श आणि गंध पण मनात राहतो.
त्यादृष्टीने साग, चंदन, कण्हेर, घाणेरी, तगर, वड, पिंपळ, फणस, कदंब, जांभूळ असे कितीतरी स्पर्श मला आठवतात. प्रत्येक स्पर्श वेगळा.

बर्रोब्बर दिनेशदा, आपण हाच बघितला होता.
सध्या पुण्यात गुलाबी तबेबुया खूप भरभरून फुलले आहेत आणि तितक्याच संख्येने फुलं पण भुरू भुरू गाळताहेत. बालगंधर्व रंगमंदिर, सारसबाग या ठिकाणी तर रस्त्यांवर गुलाबी फुलांचा सडा पडलेला असतो. आणि काही ठिकाणी गुलाबी बहावापण फुलू लागलाय. पौडरोडवर एक गुलाबी बहावा मस्त फुललाय.

.

गेल्या आठवड्यात जवाहर तालुक्यातील कळमविहीरा गावाजवळील देवराई पाहून आलो. आईन,खैर,कहांडळ या जातीची सुमारे ऐंशी ते शंभर वर्षांची झाडे पाहिली.
या देवराया जतन करण्याचे काम सध्या सुरू आहे.

जागू, अशी गायब का होतेस अधून मधून ?
बहाव्यात एक टोकेरी पाकळ्यांची जात असते (नेहमीच्या पाकळ्या गोल असतात ) ती फुले मस्तच दिसतात.

मला, न्यू झीलंडमधल्या केंब्रिज या गावात, मिलिटरी युनिफॉर्म घातलेले झाड दिसले होते. आज रात्री फोटो टाकतो.

दिनेशदा शनिवार रविवार सुट्टी होती. त्यात घरचा पिसी बंद आहे. काल जरा तब्बेत नरम होती म्हणून सुट्टी घेतली. आजपासून आहे.

दिनेशदा तुम्ही मागे सांगितल्या प्रमाणे, झाडांनाही भावना असतात, कदाचित त्यांना आपला मायेचा स्पर्श कळतो. Happy

फुलल्यावर मात्र डोळ्यांचं पारणं फेडतो. तो पिवळा आणि गुलाबी रंग काय दिसतो म्हणून सांगू! अगदी सॉफ्टी आईस्क्रीमसारखे!>>>>>

तुमने पुकारा और हम चले आए Wink Happy

मी दुरंगी बाभुळ

आणि आम्ही "वाळुंज"

नितीन साधारण अशाच विषयावर मी मायबोलीवर "झाडांना संवेदना असतात का?" (खरंतर या लेखाचे शिर्षक "आपल्या सादाला झाडं प्रतिसाद देतात का?" असं लिहायचं होतं आणि चुकुन वरील शिर्षक लिहिलं गेलं. त्यामुळे थोडं वेगळं वळण या लेखाला मिळाले. Wink :-))

जिप्सी ईज बॅक............
दुरंगी बाभुळ अगदी सॉफ्टी आईस्क्रीमसारखे! >>+१ अगदी Happy
चला लवकर प्रचिही येऊद्या Wink

Pages