निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, कुठे दिसली हि दुरंगी बाभूळ ? दुर्मिळ आहे. गोव्याला माझ्या आत्याच्या घरी आहे.

धन्स लोक्स Happy

दिनेशदा, हि दुरंगी बाभुळ आत्ताच्या कोकण भटकंतीत कुडाळ येथे पाहिली. Happy

जागू, ईमेलमधुन फोटो Happy पाठवलाय

आई शप्पथ!! कस्ले सह्ही फोटो आलेत दुरंगी बाभूळ आणि वाळुंजचे........
ही कोकणात आत्ता हिवाळ्यातपण फुलली आहे? वा वा मस्तच! मी समजत होते ही फक्त पावसाळ्यातच फुलते.

शोभेसाठी लावलेली दुरंगी बाभूळ तशी लाडाचीच असते. झाड लहानखुरे असते. एरवी बाभूळ पाल्यासाठी, लाकडांसाठी, कुंपणासाठी, शेंगासाठी, डिंकासाठी ओरबाडली जाते, तसे हिच्या बाबतीत होत नाही.

न्यू झीलंडच्या केंब्रिज या गावी आम्हाला एक अनोखे मिलीटरी झाड दिसले.

मी हाँग काँग मधे होतो, तो दिवस चीनी नववर्षाचा होता (२३ जानेवारी) तिथे अनेक ठिकाणी अशी निष्पर्ण झाडे ठेवलेली होती आणि त्यावर भेटकार्डे आणि फुले होती.

आधी मला वाटलं, फुले पण खोटी असतील. तर नाही ते झाडही खर होते आणि फुलेही.

(आता वर्षूला गाठून विचारायला पाहिजे.)

न्यू झीलंडच्या केंब्रिज या गावी आम्हाला एक अनोखे मिलीटरी झाड दिसले.>>>>>> तिथे काही लायकेन (दगडफूलच ना?) दिसत आहे व बाकीचे शेवाळ्यासारखं आहे का ? का एक प्रकारची बुरशी ?
निसर्गात काय काय गंमतीजमती असतील कल्पनाच करता येणार नाही.............
ती हाँगकाँगमधील झाडे व फुले मस्तच - त्या वरच्या प्रचित बघून मलाही वाटलं - खोटीच दिसताहेत..........

नाही शशांक, ती झाडाची सालच आहे. वेगवेगळ्या थरातले पापुद्रे निघालेत.
वर्षूला विपु केलीय, ती लिहिल आणखी या फुलांबद्दल.

न्यू झीलंडच्या केंब्रिज या गावी आम्हाला एक अनोखे मिलीटरी झाड दिसले.>>>>>>

नाही शशांक, ती झाडाची सालच आहे. वेगवेगळ्या थरातले पापुद्रे निघालेत.>>>>>> हा प्रकार Arizona sycamore tree या सारखा आहे का ?

@दिनेश दा.. ही फुलं आणी झाडं 'पीच' ची आहेत.
चीन मधे या नवीन वर्षाच्या सजावटील ही फुलं हवीच.
पीच ची फुलं लगडलेली ही झाडं धनसंपत्ती मधे भर तर टाकतातच याशिवाय आधिकाधिक मित्र ही जोडायला मदत करतात असा समज आहे.

पीच, म्हणजे फळे ना ? त्याची इथली झाडे अशी पाने गाळत नाहीत. आणि फुले पण लहानच असतात. नववर्षाच्या सुमारासच नवीन पालवी फुटावी, हे तर किती छान.

शशांक, असेलही.
खरे तर माझ्यासोबतची चार मूले, नुसता धुडगूस घालत होती. त्यामूळे निवांतपणे कुठेही थांबता यायचे नाही. एक जण एक हात ओढतोय तर दुसरा, दुसरा हात ओढतोय. एक स्केटींग करतोय तर लेक स्टारबक्समधे जाऊ म्हणतेय. असे चालले होते.

साकुरा - Prunus serrulata (Cherry blossom)
पीच - Prunus persica
इति गुगल कृपा.

त्यामुळेच दोन्ही झाडांच्या फुलात एवढे साधर्म्य दिसत आहे.....

जिप्सी - दिवस-रात्र कॅमेरा घेऊन फिरतोस का ?
हा फोटो फार म्हणजे फारच सुंदर.......... ते कबुतर काय शॉवर बाथ घेतंय का ?

शशांक, प्लम्सची फुले पण अशीच असतात.
जिप्स्या, फोटो छानच आहे. तू काय त्या पक्षाची गेलेली पत मिळवून द्यायचे कंत्राट घेतले आहेस का ?

वॉव.. दिनेश दा..ते मिलिटरी झाड तर गमतीदार आहे ..पहिल्यांदाच पाहिलं झाडाने युनिफॉर्म घातलेला Happy
जागु,जिप्सी.. इतकी फुलं आली आहेत म्हटल्यावर आम्हाला स्प्रिन्ग मधे भरपूर पीचेस खायला मिळणारेत तर!!! Happy Happy

ओ बाप्रे.. जिप्सी..कसला फोटो टाकलायेस.. तुला बहुतेक पक्षी ओळखत असणार नै...तू दिसला कि आपोआप सर्व पक्षी सुंदर सुंदर पोझ देऊ लागतात.. Happy

Pages