सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जागू हा गांधारी Refusbacked
जागू हा गांधारी Refusbacked Shrike
साधनाला पवईची अॅलर्जी आहे का
साधनाला पवईची अॅलर्जी आहे का ?
जिप्सी, अंजनी फुलला / फुलली
जिप्सी, अंजनी फुलला / फुलली आहे का?
तू मला पाठव फोटो. मी टाकतो इथे. मग साधना काय बोलू शकेल?
धन्स ससा.
धन्स ससा.
यंदाचे राणीच्या बागेतले
यंदाचे राणीच्या बागेतले प्रदर्शन कधी आहे कोणाला ठावूक आहे का? की झाले ते?
राम राम मंडळी. ईनमीन तीन मस्त
राम राम मंडळी.
ईनमीन तीन मस्त आहे फुल.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/File:Cypripedium_acaule_-_Sasata_edit1.jpg
जिप्सी, अंजनी फुलला / फुलली
जिप्सी, अंजनी फुलला / फुलली आहे का? >>>>नाही माधव, आत्ताच बघुन आलो. पण पिवळा आणि फिक्कट टॅबेबुया मस्त फुललाय. अगदी बाहेरूनही दिसतोय.
तू मला पाठव फोटो. मी टाकतो इथे. मग साधना काय बोलू शकेल?>>>>हे बेस्स
रोहन, फेब.च्या बहुतेक तिसर्या आठवड्यात भरते ते प्रदर्शन. अजुन जाहिरात नाही आली आहे.
कोणी मोगऱ्यासाठी खत सुचवेल
कोणी मोगऱ्यासाठी खत सुचवेल काय दोन एक वर्ष झालेत वाढत नाहीये ? पालवी आलीकी करपून जाते
केदार, मोगर्याला शेणखत,
केदार, मोगर्याला शेणखत, गांडूळखत अशी खतच वापरायचो मी. मस्त वाढतो मोगरा त्याने. पालवी करपते म्हणजे नक्की काय होतय? पाने कडेनी वळताहेत का? तसे असेल तर ती एक प्रकारची कीड असते. मोगर्याला फुलांच्या हंगामात पाणी थोडे कमी घालायचे (खूप कमी झाले तर झाड जळून जाईल - ऐन उन्हाळा असतो तेंव्हा) मग भरपूर फुले येतात.
काही दिवस आधी इथे सौदी मधे
काही दिवस आधी इथे सौदी मधे नुकतीच उगवलेल्या व काही आठवडेच आयुष्य असलेल्या फुलांचे फोटो टाकले होते त्यात ही भर. ती इवली इवली जांभळी फुल फार सुंदर आहेत मला त्यांच सौंदर्य मोबाईल मधे नीट टिपता आल नाहीये.
From IDC
जिथे ही फुल भरपूर आली आहेत तिथे जांभळी चादर पसरलेली दिसते. जर आधी ची लाल व पिवळी फुलही या बरोबर असली तर खाली जमीनीवर हिरवी पानं, त्यावर पिवळी फुल त्यांच्या थोडवर लाल फुल अन शेवटी वरच्या लेव्हल ला जांभळी फुल अस मस्त दिसत. तसा फोटो टिपण्याच्या प्रयत्नात आहे.
श्रीकांत मस्त नाजूक आहेत
श्रीकांत मस्त नाजूक आहेत फुल.
अंजन मी आंबोलीच्या कामत
अंजन मी आंबोलीच्या कामत रेस्टॉरंटमध्य पाहिला. इतकं देखणं दिसतं झाड की काही विचारूच नका.
अंजन आंबोलीला फुललाय.... इथे
अंजन आंबोलीला फुललाय.... इथे उशीरा फुलतो. गेल्या वेळेला इकडे फुललेला तेव्हा तिकडे बहर ओसरलेला..
रच्याकने, हे माझ्याबद्दल काय चाललेय, मागचे वाचायला वेळ नाहीय आत्त्त.. नंतर बघते आणि मग बघते
श्रीकांत फुले सुंदर आहेत. मी
श्रीकांत फुले सुंदर आहेत.
मी माडीच्या लेखात बदल करून शुद्ध निरा केला आहे.
मोगर्याला शेणखतच छान. तसेच एप्रिल मध्ये मोगर्याची पाने काढून टाकायची मग चांगला जोम धरतो झाडाला.
वाशी रेल्वे स्थानकाजवळ,
वाशी रेल्वे स्थानकाजवळ, इनऑर्बिट मॉलसमोर आज आणि उद्या झाडे, फुलं, फळं, भाजीपाला प्रदर्शन आहे. सकाळी ८:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत. असंच प्रदर्शन पुढल्या आठवड्यात माटुंग्याच्या व्हीजेटीआयमध्येही आहे. - स्वप्ना_राजचे आभार..
मी गेली काही वर्षे वाशीचे मनपाने भरवलेले प्रदर्शन पाहते. खुप मोठे असते आणि चांगले असते. चुकवु नका.
श्रीकांत, फुले छान आहेत. क्लोजपट टाका.
अंजनाची गंमत ही आहे की जेव्हा
अंजनाची गंमत ही आहे की जेव्हा तो फुलतो तेव्हाच तो सुंदर दिसतो. आणि तो फुलोराही मुद्दाम पाहिला तरच दिसतो. फुलोरा गेल्यावर त्या जागी काळपट काजळी धरल्यासारखी दिसते आणि त्यामुळे त्या झाडाकडे बघवत नाही.
जिप्सी, तु फोटो टाक... तुला मी नंतर पाहिन....
साधना मी प्रयत्न करते
साधना मी प्रयत्न करते प्रदर्शनाला जाण्याचा. गेले तर तुला फोनते.
साधना नमुत नाही का ग कुठे अंजनी आणि सोनसावर ?
नमुत नाही पाहिली मी.. आज
नमुत नाही पाहिली मी..
आज जाणार आहेस का? उद्या जरी गेलीस तरी फोन कर.
नाही ग आज नाही उद्या पण
नाही ग आज नाही उद्या पण शक्यता कमी वाटतेय पण बघेन जमतय का ते.
एक रानफुल ह्याच्या कळ्याही
एक रानफुल
ह्याच्या कळ्याही तेवढ्याच सुंदर दिसतात.
कळ्या गोडच दिसतायत एकदम!
कळ्या गोडच दिसतायत एकदम!
माधव : पालवी करपते म्हणजे
माधव : पालवी करपते म्हणजे नक्की काय होतय? पाने कडेनी वळताहेत का? तसे असेल तर ती एक प्रकारची कीड असते. मोगर्याला फुलांच्या हंगामात पाणी थोडे कमी घालायचे (खूप कमी झाले तर झाड जळून जाईल - ऐन उन्हाळा असतो तेंव्हा) मग भरपूर फुले येतात.>>>>>>> हो हो अगदी तसेच आहे, पण किडीवर मला औषधं मारता येत नाहीत कारण आमचा पाण्याचा हौद आहे जवळच तो थोडा झिरपतो त्यामुळे पाणी घालावे लागत नाही आणी होऊदातले पाणी ही फुकट जात नाही. धन्यवाद आता शेणखत टाकून बघीन
जागू: मोगर्याला शेणखतच छान. तसेच एप्रिल मध्ये मोगर्याची पाने काढून टाकायची मग चांगला जोम धरतो झाडाला >>>>>> मी तर पूर्ण छाटून टाकतो पण त्याला काचेच फरक नाही पालवी येते आणी बहुतेक कीड लागते माधव म्हणतोय त्याप्रमाणे धन्यवाद
पाण बाजारातून कोणते खत विकत आणता येईल मोगऱ्या साठी ????????????
बाजारात गांडूळ खत मिळू शकेल
बाजारात गांडूळ खत मिळू शकेल तुम्हाला.
जागू, छान आहे फ़ुल आणि कळ्या
जागू, छान आहे फ़ुल आणि कळ्या पण. तुझे असे फोटो पाहिले ना, की मला कोकणची फ़ार फ़ार आठवण येते मी लहानपणी अशी विविध प्रकारची आणि विविध रंगाची फ़ुले दिसली की, कितीही काट्याकुट्यात असली तरी काढून आणून देवाला वहायची. (मला परत कोकणात जायचय.)
शोभा ही आमची गोंडस खारूताई.
शोभा
ही आमची गोंडस खारूताई.
जागू, खरचं कित्ती गोंडस
जागू, खरचं कित्ती गोंडस पिल्लू आहे ग. आता नाव ठेव त्याचं.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/32442 जागू हे वाच.
खुप दिवसांनी निग वर आले आहे.
खुप दिवसांनी निग वर आले आहे. वेळच नव्ह्ता. आज रात्री सगळा बकलॉग भरुन काढायचा आहे.
जागु, कळ्या, फुले आणि खारुताई तिघेही खरचं खुपच गोड आहेत..
श्रीकांत, फुले पण मस्तच ...
जागू,ते सुंदर पांढरे फूल
जागू,ते सुंदर पांढरे फूल मोतियाचे असावे. पण कळ्यांची पाने वेगळी दिसताहेत गं. आणि ते गोंडस खारुटलं कित्ती गोड आहे! मज्जाय जागूची (जास्त करून श्रावणीची! कारण बुलबुलाची पिल्लं काय, खारुताईची पिल्लं काय! एकदम बॉर्न फ्री!!)
श्रीकांत ह्या छोट्टुकल्या जांभळ्या फुलांचे क्लोजप्स द्या ना!
माधव-जिप्सी............. काय गौडबंगाल चाललंय? साधनाला न कळवता फोटो इथे देणार म्हणजे नक्की काय करणार आहात?
Pages