सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
तुम्हीच या म्हणजे आमची बाग
तुम्हीच या म्हणजे आमची बाग देखील बघाल.. >>>>>फक्त जागूलाच आमंत्रण?
तुमच्याकडे यायचा योग कधी येईल
तुमच्याकडे यायचा योग कधी येईल माहीत नाही. पण भारद्वाजांना देते तुमचा अॅडरेस ते येतील विचारत विचारत
शोभा, चिमुरी
हे आहे शिंदीचे झाड आणि त्याला
हे आहे शिंदीचे झाड आणि त्याला लागलेली फळे. आमच्याकडे ह्या शिंदीच्या पोयीपासून काढलेल्या द्रव्याला निरा म्हणतात. ह्याच्या पात्यांपासून झाडू बनवतात. पुर्वी मिळायच्या ह्या झाडू. शेणाने सारवलेल्या जमीनीवर त्याने कचरा काढत. अजुन आमच्या बाजारात विकायला येतात. कधीतरी फोटो टाकेन.
लहानप्णी आमच्या वाडीत शिंदीचे झाड होते. आमच्याकडे एक गारूडी यायचा. तो उन्हाळ्यात ह्या शिंदीच्या झावळ्या काढून सुकत लावायचा आणि त्याच्या झाडू बनवून विकायचा.
जागु दिवाळीला ज्याची पुजा
जागु दिवाळीला ज्याची पुजा करतात तोच झाडु का? आमच्याकडे तिला केरसुनी आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी म्हणतात...
जागू, खजूराचे पण असेच असते.
जागू, खजूराचे पण असेच असते. दोन प्रतलातील पानांमूळे ती भरगच्च दिसतात आणि हाताला हमखास टोचतात.
मस्कत - ओमानमधेही याचे झाडू करतात. पाने विणून खेळणी करतात. बाकिची पाने जळण म्हणून वापरतात. खोडाचे तर वासे, बैठका, जळण असे अनेक उपयोग करतात.
याच झाडापासून एक काकवीसारखा पदार्थ मिळतो (पण तो मादक नसतो.)
आणि मस्कती खजूर तर बहारीचा गोड असतो.
खजूराला तिथे तमार म्हणतात. (तमार ए हिंद - टॅमरींड - चिंच )
नाही ग ती केरसुणी आपली
नाही ग ती केरसुणी आपली नेहमीच्या वापरातली. ही आता कुठे वापरत नाहीत. पुर्वी ज्यांची घरे माती, शेणाने सारवलेली असायची तिथे ही झाडू लागायची. साधारण केआच्या सुपासारखा आकार असतो.
हे झाड कसले ओळखता येईल का ? कदाचीत मी आधीही फोटो टाकला असेल.
पुर्वी ज्यांची घरे माती,
पुर्वी ज्यांची घरे माती, शेणाने सारवलेली असायची तिथे ही झाडू लागायची. साधारण केआच्या सुपासारखा आकार असतो. >>>>> हीच म्हणतीय मी... वापरुन जुन्या झालेल्या केरसुण्या शेणाने अंगण सारवायला वापरायचे.. आमच्याकडे अजुनही दिवाळीला हीचीच पुजा करतात आणि नंतर प्लॅस्टिकच्या बॅगमधे वर्षभर जपुन ठेवतात पुढच्या वर्षीकरता
ते फोटोतलं झाड माहीत नाही, पण तश्या डिझाइनचं कानातलं बघितलं आहे
ते फोटोतलं झाड माहीत नाही, पण
ते फोटोतलं झाड माहीत नाही, पण तश्या डिझाइनचं कानातलं बघितलं आहे
चिमुरी आता बाजारात जाऊन ती एक झाडू आणेन किंवा चान्स मिळाला तर तिथेच फोटो काढून इथे टाकेन.
बापरे इथे पोस्टींचे अमाप पिक
बापरे इथे पोस्टींचे अमाप पिक आलेय..
जिप्सी मस्तय फोटो.
सेनापती, मस्त बनवलेत पक्षांसाठी खाद्यघर. मी इथे असले काय ठेवले तर कबुतरे ५ मिनिटांत फडशा पाडतील. चिमण्या बसतील चोची चोळत..
मी एका पसरट भांड्यात कमळ लावलेय, रोज दुपारी तिथे चिमण्या, कावळे, कबुतरे नी साळुंक्या जमतात पाणी प्यायला.
जागु हाच
जागु हाच का?
http://www.newindiapost.com/moreFeature.asp?Details=3817
साधना ते लाल कमळ मिळाले का
साधना ते लाल कमळ मिळाले का तुला ? नसेल मिळाले तर एकदा माझ्याकडे ये आपण दोघी एका ठिकाणी जाऊन घेउन येउ.
चिमुरी गुगलून त्या झाडूचा फोटो मिळाला
जागु, याच झाडु बद्दल बोलत
जागु, याच झाडु बद्दल बोलत होते गं मी
हो हिच ती ग.
हो हिच ती ग.
लाल कमळ (म्हणजे गुलाबी ना?)
लाल कमळ (म्हणजे गुलाबी ना?) नाही मिळाले. माझेवाले निळे आहे आणि कमळच आहे, वॉटरलिली नाहीय. गुलाबी, पसरट पाकळ्यांचेही मला हवेय. फेरी मारेन एकदा तुझ्याकडे.
कमळ लावायचे झाल्यास त्याचे रोपटे उप्टुन आणावे लागेल असे मला वाटायचे. पण तसे करण्याची काहीच गरज नसते हे मला पळस रिसॉर्टवर गेल्यावर कळले. तिथे कमळाचे लहान तळे होते. त्यांनी ५ लिटर रंगाचा डबा असतो त्यात कमळ लावुन तो डबा तळ्यात ठेवलेला. असे केल्याने कमळे हवी तेव्हा इकडुन तिकडे हलवता येतात. पाने जरा जुन झाली की जिथे त्याला देठ जोडलेला असतो तिथुन मुळे फुटतात. अशी मुळे फुटलेले पान घ्यायचे आणि मधला भाग ठेऊन बाकिचा भाग काढुन टाकायचा. तो मधला भाग मातीत लावला की नविन कमळाचे रोपटे तयार होते. मला तिथल्या माळ्याने असेच रोपटे दिले. पाणी भरलेल्या पिशवीत ठेऊन मी ते घरी आणले आणि अमुल श्रीखंडाच्या डब्यात लावुन तो डबा पाण्यात ठेऊन दिला. आता चांगली बशीएवढी पाने येताहेत त्याला. लवकरच बशीचे ताट होईल आणि मग ताटावर कमळ डोलायला लागेल.
शोभा... तुम्ही देखील या.. मी
शोभा... तुम्ही देखील या.. मी ठाण्यात आहे राहायला..
खरेतर एक छोटे गटग करता येईल माझ्याकडे.. सर्वांना जमत असेल तर...
साधना, काय मस्त वर्णन
साधना, काय मस्त वर्णन केलेय.
पनवेलला कुणी गेलं का एवढ्यात ? कळंबोलीच्या फाट्यावरुन पनवेलला गेल्यावर एक डोळ्यांचे हॉस्पिटल लागते. तिथेच एक स्मृतिवन आहे त्याच्यामागे हे तळे आहे. आता सुकायला लागले असेल. त्यात खुप छान कमळे आहेत.
जागू, कसले झाड आहे ते ? नाही ओळखलं.
ती केरसुणी आहे ना?
ती केरसुणी आहे ना?
साधना मला पण निळे कमळ
साधना मला पण निळे कमळ तुझ्याकडे वाढले की दे.
आज नि.ग. फुल फार्मात आहे.
आज नि.ग. फुल फार्मात आहे.
जिस्या - कबु मस्तय
मामी - असा भोपळा पहिल्यांदाच पाहीला ,मोसंबी , विमानाचे इंद्रवज्र छान आहेत
जागु -शिंदीचे झाड गोरेगाव आरे कॉलनीत पाहील्याचे आठवतेय याच्या झाडु कांदिवलीच्या ठाकुर कॉप्लेक्स साईमंदीर समोर फुट्पाथवर अजुनही मिळतात.
भांड्यात कमळ लावलेय >> अरे वा साधनाताई फोटो डकवा अगोदर
इनमिनतीन लहान असताना माझे
इनमिनतीन लहान असताना माझे सुट्टीतले ४-५ दिवस आरे कॉलनीत जायचे. तेंव्हा तिथल्या ओपी गार्डनमध्येही एखादा दिवस जायचो आम्ही. तिथली फक्त फुललेली कर्दळ आता आठवते. परत जाऊन बघायला हवा तो परीसर. अजुन तो भाग हिरवागार आहे.
दिनेशदा मलाही त्या झाडाचे नाव माहीत नाही. युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये ते आहे. तिथल्या माणसाने ब वरुन काहीतरी नाव सांगितले पण मला निट कळले नाही.
मामे, एकसे एक फोटो. इतके दिवस
मामे, एकसे एक फोटो. इतके दिवस का नाही टाकले ?
>>> दिनेशदा, तुम्हाला कुठुन कळणार हो आम्हा आळशी लोकांच्या व्यथा!
ते लिंबू आहे का? आकार आणि रंगावरून मोसंबी वाटलं. किंवा एखादं दुसरं सिट्रस फ्रुट असेल.
जागू, ते जांबाचं झाड आहे का?
जागू, ते जांबाचं झाड आहे का?
जागू, आरे कॉलनीत पुर्वी अनेक
जागू, आरे कॉलनीत पुर्वी अनेक गाण्यांचे शुटींग व्हायचे. त्यावेळी अहमदाबाद रोड आणि जूना आग्रा रोड, यांच्यापुढे वस्तीच नव्हती. पण अजून तो भाग राखलेला आसे असे वाटते.
मामी, मला युरपला जाऊन बरीच वर्षे झाली. त्याकाळात तर ८/१० फेर्या मारल्या. परत जायला पाहिजे. नलिनी बोलावतेय कधीची. त्यावेळी डिजीटल कॅमेरे नव्हते ना !
खरं तर ओमान काय नि युरप काय, सिंगापूर काय नि न्यू झीलंड काय. निसर्ग म्हणाल तर भारताच्या चारी कोपर्यात भरभरुन आहे. पण एवढा भटकणारा मी, भारत काही बघितला नाही अजून (मार्को पोलो ने दाखवला तेवढाच.)
मी बर्याच दिवसांनी नि.ग.वर
मी बर्याच दिवसांनी नि.ग.वर आले तर बरीच पाने पुढे गेलेत. आत्ता सर्व वाचून काढले. फोटो मस्त आहेत.
मित्रानो, मला बसलेला जबरदस्त
मित्रानो, मला बसलेला जबरदस्त धक्का मी इथे शेअर करतेय. शेअर करावा लागणारच कारण तोपर्यंत चैन पडणार नाही.
मायबाप कंपनीने इलेक्शननिमित्त घरी लवकर सोडल्याच्या आनंदात आत्ताच ५ वाजता घरी पोचले. आनंद लुटण्यासाठी लगेच दोन कप भाजणीच्या चकलीसाठी पिठ भिजवले आणि लेकीने केलेल्या चहाचा आनंद लुटत गच्चीत जाऊन जरा झाडांशी प्रेमळ वार्तालाप करत होते. नजर फिरत फिरत कमळाच्या डब्यावर पडली आणि मी इतक्या जोरात किंचाळले की लेकीच्या मते तिची दोन्-तिन हार्टबिट्स मिस झाली. तिला वाटले बहुतेक कबुतरांनी कमळावर अंडी घातली म्हणुन आई किंचाळली. पण खरे कारण काय सांगु महाराजा..... माझ्या ५ किलो रंगाच्या डब्यात डिसेंबरात लावलेले ०.५ इंची कमळाचे रोपटे वाढून त्याला चक्क कळी आलीय....... विश्वास बसत नाही ना?? माझाही बसत नाहीय. लगेच लेकीकडून फोटो काढुन घेतले. ही आनंदाची बातमी तुम्हा सगळ्यांना सांगितल्याशिवाय (आणि तुम्हा सगळ्यांचे कमेंट्स वाचल्याशिवाय) मला चैन कसली पडणार.... हे घ्या फोटो....
हे डब्यातले तळे. खरेतर मी अजुन पसरट भांड्यात लावलेले पण ते भांडे गेल्या आठवड्यात एडेनियम लावण्यासाठी वापरले आणि नविन भांडे मिळेपर्यंत कमळाची रवानगी रंगाच्या डब्ब्यात केली.
शेवटचा फोटो अजुन चांगला येऊ शकला असता. उद्या कॅमे-याने फोटो काढुन डकवते. तोपर्यंत मोबाईलवरचे फोटो झिंदाबाद.
मी बशीचे ताट झाल्यावर फुल येणार म्हणुन आशा करत होते, पण देव आपल्यापेक्षा पुढे आहे. मागायच्या आधीच तो झोळी भरुन टाकतो.
पनवेलला कुणी गेलं का एवढ्यात
पनवेलला कुणी गेलं का एवढ्यात ? कळंबोलीच्या फाट्यावरुन पनवेलला गेल्यावर एक डोळ्यांचे हॉस्पिटल लागते. तिथेच एक स्मृतिवन आहे त्याच्यामागे हे तळे आहे. आता सुकायला लागले असेल. त्यात खुप छान कमळे आहेत.
मी पाहिलेय हे तळे आणि त्यातली कमळे. त्यात मोठ्या पसरट पाकळ्या असलेली गुलाबी कमळे आहेत. कमळ अख्खे उपटावे लागेल आणि तसे करताना कमरेला दोर नसेल तर बुडण्याच्या भितीने मी पंकजला तळ्यात उतरायला दिले नव्हते. तेव्हा मला हे पानांचे सिक्रेट माहित नव्हते. आता तिथे मुद्दाम जाऊन कमळ मिळवतेच. आणि जागु तुझ्यासाठीही आणते.
वा साधना. अभिनंदन. आता
वा साधना. अभिनंदन.
आता उमलण्याची प्रक्रिया बघत बसा दोघी. स्टेप बाय स्टेप फोटो काढा.
आणि ते अजिबात न तोडता त्याला फळ येते का ते बघा.
आज सकाळीच बागेत लागलेले टरबुज
आज सकाळीच बागेत लागलेले टरबुज खाल्ले. बिचारे जास्त वाढले नाही, मोठ्या लिंबाएवढे झाले आणि त्याची वाढ थांबली. आज पाहिले तर पिवळे झालेले. लगेच कापले आणि त्याचे इवलाले चार तुकडे - दोन बाईने आणि दोन मी - खाल्ले. अजुन एक टरबुज वाढतेय. ते मोसंबीएवढे झालेय पण त्याचीही वाढ आता थांबलीय. अजुन ३-४ आलीत आणि वाढताहेत. त्याना उद्या खत घालायचा कार्यक्रम करते म्हणजे आकार मोठा होईल.
तिला वाटले बहुतेक कबुतरांनी
तिला वाटले बहुतेक कबुतरांनी कमळावर अंडी घातली म्हणुन आई किंचाळली...
मस्तच! अभिनंदन साधना. मला पण
मस्तच! अभिनंदन साधना.
मला पण कमळाचे फार आकर्षण आहे. मलाही कमळ लावायचे आहे घरी.
Pages