सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
हे लव फळ. पिकल्यावर नारंगी
हे लव फळ. पिकल्यावर नारंगी रंग येतो. मी मागे ह्याचा धागा टाकला होता. ह्या फळाचे सालही पानाप्रमाणे खरखरीत असते. आहे हे रामफळ-सिताफळाच्याच कुळातले पण पाव फळ खायला १५ मिनिटे लागतात कारण ह्याचे मांस पुर्ण बियांना चिकटलेले असते. आंबट गोड चवीचे हे फळ खायला मजा येते. माझ्या माहेरी हे झाड आहे. ह्या झाडावर ह्या फळांमुळे भरपूर पक्षीही येतात. पुर्वी अभ्यास करताना मी ह्या झाडासमोरच्या जिन्यावर बसायचे आणि पक्षी न्याहाळायचे.
जिप्सी, या बाफवर असले फोटो
जिप्सी, या बाफवर असले फोटो टाकणे हा दंडनीय अपराध आहे. असा गुन्हा पुन्हा घडल्यास एक महिना कॅमेर्याशिवाय रहायची शिक्षा किंवा / आणि मेनलँड चायना / स्पगेटी किचन यातल्या एका ठिकाणी पार्टी (देणे) अशी शिक्षा होइल याची नोंद घ्यावी.
कबुतर जा जा जा .... हुर्र...
कबुतर जा जा जा .... हुर्र... हुर्र.. पांढरे असते तर ठीक होते.. साधना कुठे आहे? तिला भारी आवडतात कबुतरे...
साधना आली तर जिप्स्याचे
साधना आली तर जिप्स्याचे काहीखर नाही
आमच्याकडे पण कबुतरांनी नुसता
आमच्याकडे पण कबुतरांनी नुसता त्रास देऊन ठेवला होता. एका खोलीत आत येऊन लाकडी कपाटावर घर करायचा प्रयत्न करायचे. आमच्याकडे चिमण्या आहेत भरपूर पण कबुतरे खूप कचरा करून ठेवतात म्हणून शेवटी हुसकून लावले..
सेनापतींची कबुतराबरोबर लढाई
सेनापतींची कबुतराबरोबर लढाई
ये क्या है भला ? नर्सरीत होते.
हे बघा काही फोटो आमच्याकडच्या
हे बघा काही फोटो आमच्याकडच्या चिमण्यांसाठी लावलेले फिडर आणि घरे..
आता असे अजून एक फिडर लावलंय. पावसाळ्यात किमान ५० चिमण्या खिडकीवर बसून चिव चिव करतात. आम्ही जवळ असलो तरी घाबरत नाहीत आता. ह्यावेळी फोटो घेणार काही त्यांचे..
ह्यात एका चिमणीने घर केले होते.
हे गच्चीतले फिडर आणि त्यांचे घर.. इथे खायला उड्या पडतात पण अजून राहायला कोणी आलेले नाही...
धन्यवाद शशांक.
धन्यवाद शशांक.
हे गुरुशिखर येथले एक फुल...
हे गुरुशिखर येथले एक फुल... तिथे आख्खी चादर पसरली होती ह्यांची..
हजारावी पोस्ट !!
हजारावी पोस्ट !!
सेनापती तुम्ही ग्रेट आहात.
सेनापती तुम्ही ग्रेट आहात.
सेनापती, चिमण्यांची घरे
सेनापती, चिमण्यांची घरे मस्तच. फिडरमधे बाकीचे पक्षी पण येतील.
जागू त्याला पांढरी फुले येतात. (गाजर, बडीशेप या कूळातले झाड आहे ते.)
ते फळ मात्र मी नाही खाल्ले कधी. पुढच्या वेळी फळाच्या गराचा फोटो हवा.
चिमणीचे घर छान आहे.
चिमणीचे घर छान आहे.
अभिनंदन सगळ्या नि.ग.
अभिनंदन सगळ्या नि.ग. प्रेमिंचे.
जागू.. चिमण्या इतक्या
जागू.. चिमण्या इतक्या सरावल्यात ना की कधी खायला टाकायला विसरलो तर चिवचिव करून आठवण करून देतात. आम्ही बाहेरच्या किंवा आतल्या खोलीत दिसलो नाही की बरोबर किचनमध्ये खिडकीवर येऊन चिव-चिव करून बोलावतात. हे असे अनेकदा होते. मग त्यांच्याशी बोलून त्यांना बाजरी दिली की काय खुश्श ..
फिडरमधे बाकीचे पक्षी पण
फिडरमधे बाकीचे पक्षी पण येतील.
>> अहो दा.. शमीका सांगत होती की हल्ली एक खार येऊन बसते. फिडर मध्ये बसून मस्त बाजरी खाते. तिच्यासाठी आता बाजूला नट्स ठेवलेत शमिकाने.
सेनापती ह्या सगळ्याचे फोटो
सेनापती ह्या सगळ्याचे फोटो टाका. आमच्याकडे चिमण्या हल्ली दिसेनाशाच झाल्या आहेत. जास्त साळूंख्या, कावळे, पाणकोंबड्या, पोपट, हळदे, सुर्यपक्षी, भारद्वाज दिसतात.
दिनेशदा त्या फळाच्या गराचा
दिनेशदा त्या फळाच्या गराचा फोटो देईन नक्की.
सेनापती आमच्याकडेही खार भरपुर आहेत. ह्या झाडावरून त्या झाडावर माकडांप्रमाणे उड्या मारत असतात. छोटी फुले, फळे खातात.
मी एकदा आमच्या बाल्कनीसमोर
मी एकदा आमच्या बाल्कनीसमोर नवल बघितले होते. कोळ्याने जाळे विणले होते आणि चांगला गलेलठ्ठ झाला होता. एक शिंपी पक्षी त्याचे निरीक्षण करुन गेला. मग एक चिमणी आली तिने तो कोळी खाल्ला. मग शिंपी आला आणि त्याने ते जाळेच ओढून नेले. त्यातल्या धाग्याच्या मदतीने त्याने, जंगली बदामाचे पान शिवले, आणि घरटे केले.
म्हणजे त्या शिंप्याने, चिमणीला सांगितले असेल का, कि तो कोळी खा, म्हणजे मला धागा मिळेल ?
इथे केनयात एक पक्षी असतो. तो इथल्या लोकांना मधाच्या पोळ्याकडे घेऊन जातो. त्याला स्वतःला मध हवा असतो, पण झाडाच्या ढोलीत तो शिरत नाही. ते काम तो माणसांकडून करुन घेतो. पोळे दाखवल्याबद्दल त्याचा वाटा त्याला द्यावाच लागतो. नाही दिला तर तो पुढच्यावेळी मुद्दाम दिशाभूल करुन, अलगद एका जंगली श्वापदाकडे नेतो. (ही दुसरी शक्यता केवळ समज असावा, सहसा त्याचा वाटा त्याला दिला जातोच.)
जागू.. गेल्या ६-८ महिन्यात
जागू.. गेल्या ६-८ महिन्यात पोपट आणि साळूंख्याची संख्या लक्षणीय वाढली आहे आमच्यायेथे. काही भारद्वाज पाठव इथे.. मी हवंतर चिमण्या पाठवतो..
वा जिप्सी, मस्त
वा जिप्सी, मस्त फोटो.
दिनेशदा, ही मिलटरी झाडं फ्रान्समध्ये कान ला जाताना चिक्कार दिसली. लारानं त्यांना जिगसॉ पझल ट्री असं नाव दिलं. अपना अपना नजरिया!
हे फ्रान्समधलं झाड :
ही एका घरावर चढलेली आयव्ही :
ही मुसंबी लगडलेयत. अक्षरशः ढिगानी होती. कोणी ढुंकून बघत तरी होतं का त्यांच्याकडे देव जाणे.
हे तिथल्या बाजारातले विविध आकाराचे भोपळे. तो पांढरा भोपळा तर इतका गोड दिसत होता ना. त्याला बघून 'बेलुगा' चीच (पांढरा देवमासा) आठवण येत होती.
फ्रान्समधल्या माँटपालिये नावाच्या गावाजवळ जमिनीखालच्या गुहातून नैसर्गिक आकार निर्माण झाले आहेत. फोटो खूप छान आले नाहीत कारण फारच काळोखी होतं. आणि प्रत्यक्ष पाहताना जो अनुभव येतो तो कॅमेरात काही केल्या पकडता आला नाही. पण उदाहरणादाखल हे बघा.
आणि हा एक निसर्गाचा चमत्कार. परतीच्या प्रवासात आमच्याच विमानाची सावली अशी पडली होती. (आधी टाकलाय का हा फोटो?)
मामी.. फोटो मस्त.. शेवटचा
मामी.. फोटो मस्त.. शेवटचा फोटो सही.. मी बघितली आहे अशी सावली १-२ वेळा.. पण फोटो नाही काढला कधी..
सेनापती भारद्वाजना द्यायला
सेनापती भारद्वाजना द्यायला अॅडरेस द्या.
मामी मस्त फोटो.
इथे पहिल्यांदाच आलेय...
इथे पहिल्यांदाच आलेय... एव्हड्या पोस्टी बघुन यायचा धीरच व्हायचा... आत्ताही सगळ्या पोस्टी नाही बघितलेल्या, पण साधारण २००-२५० बघितल्या असाव्यात...
मस्त आहे ही जागा आवडली...
चिमुरी तुझे स्वागत आहे नि.ग.
चिमुरी तुझे स्वागत आहे नि.ग. वर.
सर्व निग. प्रेमींचे
सर्व निग. प्रेमींचे अभिनंदन!
जिप्सी, सेनपती, मामी, मस्त फोटो.
जागू, अबोलीची फुलं काय सुंदर दिसतायत ग. मस्त.
चिमुरी, सुस्वागतम्!
चिमुरी, सुस्वागतम्!
धन्यवाद जागु, शोभा... निग-१
धन्यवाद जागु, शोभा...
निग-१ वाचायला सुरुवात केली आहे... इथे नियमीत लिहिणार्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
मामे, एकसे एक फोटो. इतके दिवस
मामे, एकसे एक फोटो. इतके दिवस का नाही टाकले ?
त्या गुहांमधे सहसा फोटोग्राफी नाही करु देत. आणि ते स्तंभ तसे नाजूकही असतात. आपल्या श्वासानेही त्यांचे नुकसान होऊ शकते. (निव्वळ फोटो काढू देत नाहीत, या कारणासाठी माझे वायटामो ग्लो वर्म गुहेत जाणे झाले नाही.)
आणि ते विमानाचे इंद्रवज्रच की. मला पण दिसले होते, पण फोटो काढायचा राहिला. पॅसिफिक वर भयानक टर्ब्यूलन्स होता.
त्या मोसंबी का लिंबू ? नायजेरियात पण भरपूर दिसतात. तिथे मिळतात तशा गोड रसाळ मोसंबी मी कुठेच खाल्ल्या नाहीत. पाणी पिण्यापेक्षा मोसंबी खात असू आम्ही. तिथे मोसंब्याचे वरचे पिवळे साल तासून, वरची चकती कापून, चोखून खाल्ली जाते. मस्त लागते तशी.
आणि ते भोपळे गोडच कि. (दोन्ही अर्थाने) आपल्याकडेच खप कमी झालाय. त्यांच्याकडे बेक करुन, उकडून, पाय करुन अनेक प्रकारे खातात.
आणखी असतील तर अवश्य टाक, फोटो.
सेनापती भारद्वाजना द्यायला
सेनापती भारद्वाजना द्यायला अॅडरेस द्या.
>>>>संपर्कातून कळवतो... त्यांना उडत पाठवणार की आपण घेऊन येणार? तुम्हीच या म्हणजे आमची बाग देखील बघाल..
Pages