सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
त्या फोटोंच्या वेळी मी डोळे
त्या फोटोंच्या वेळी मी डोळे मिटुन घेणार...
मी चुकून -- डोळे मिटून बघणार
मी चुकून -- डोळे मिटून बघणार असं वाचलं!
कसले फोटो? मला काय बी कळ्ळं नाई .. (काय गौडबंगाल आहे काय माहित!!)
हे घ्या क्लोज अप !! आणखी झूम
हे घ्या क्लोज अप !! आणखी झूम केले तर धूसर होतायत. मोबाईल कॅमेराने घाईघाईत फोटो काढल्याचे परिणाम
From IDC
प्राजक्त फुलला
प्राजक्त फुलला दारी
http://www.maayboli.com/node/32489
मी काही दिवसांपुर्वी
मी काही दिवसांपुर्वी चाफ्याच्या शेंगा आणि पानफुटीच्या फुलांचा उल्लेख केला होता. आणि पान फुटी ५,६ फुट उंच होती त्याचे फोटो.
ही पान फुटी, ही फुलं आहेत का फळं माहित नाही
जो_एस, चाफ्याच्या शेंगा
जो_एस, चाफ्याच्या शेंगा प्रथमच बघितल्या. खूप खूप धन्यवाद.
पानफुटीच्या त्या कळ्या आहेत. सुंदर फोटो.
'प्राजक्ताने' टाकलेले 'प्राजक्ताचे' फोटो सुंदरच आहेत; पण मला वाटतंय की लेख एवढ्यात लिहिलाय का जागू?
श्रीकांत, काही हरकत नाही, पुढच्यावेळी मोठे क्लोजप्स काढा
शांकली, हे माहितच असेल ना,
शांकली,
हे माहितच असेल ना, आपल्याकडे पुर्वी चाफ्याला शेंगा लागत नसत. त्याबाबतच्या आजीबाईंच्या गप्पा अश्या. या शेंगा म्हणे नागाच्या विषावर, रामबाण औषध असतात. पण ते नागोबाला पण माहीत असतं. त्यामूळे रात्री नागोबा स्वतः येतो आणि या शेंगा खुडून टाकतो !!!!
न्यू झीलंडला घराच्या मागे चहा पित बसलो असताना हा खंड्या दिसला, फोटोत खंड्या नीट दिसत नाही, पण आणखी एक निसर्गाची गंमत आहे, कोण शोधतय बघू या !
शांकली धंन्यवाद फोटोत खंड्या
शांकली धंन्यवाद
फोटोत खंड्या नीट दिसत नाही, पण आणखी एक निसर्गाची गंमत आहे, कोण शोधतय बघू या !
दिनेश, खंड्या दिसला पण अजून काय ते कळलं नाही ....
तो खंड्या बसलाय - त्या
तो खंड्या बसलाय - त्या फांदीच्या खालच्या फांदीवर अजून एक छोटा पक्षी बसलाय का ?
झाडाच्या सर्व फांद्या एकच
झाडाच्या सर्व फांद्या एकच बाजूला आहेत... डावीकडून जोराचे वारे वाहतात का नेहमी? खालच्या फांदीवर तो पक्षी आहे बारकुसा की काय ते कळत नाही आहे.
हे माहितच असेल ना, आपल्याकडे
हे माहितच असेल ना, आपल्याकडे पुर्वी चाफ्याला शेंगा लागत नसत. त्याबाबतच्या आजीबाईंच्या गप्पा अश्या. या शेंगा म्हणे नागाच्या विषावर, रामबाण औषध असतात.>>>>>>> कोणत्याही सर्पविषावर पूर्वी माहित असलेली अशी झाडपाल्याची औषधे (बचनाग, इ.) काळाच्या ओघात किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कुठे नाहीशी झाली कळत नाही.
सध्या तरी सर्पदंशावर - अँटी स्नेक व्हेनम सिरम (A S V S )खूप प्रचलित आहे. भारतात साधारणपणे सापडणार्या ४ विषारी सापांवरील (नाग, मण्यार, फुरसे व घोणस) हे पॉलीव्हॅलंट अँटीसिरम लाईफ सेव्हिंग औषध आहे.
हे तयार करण्याची साधारण पद्धत अशी - ही व्हेनम्स खेचर अथवा घोडा यांना खूप कमी मात्रेत टोचतात - जेणेकरुन ते जनावर मरणार तर नाही पण त्याच्या शरीरात अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) मात्र भरपूर प्रमाणात तयार होतील.
या जनावरांचे रक्त काढून त्यातील आर. बी. सी. व डब्लू. बी. सी. वेगळ्या करुन पुन्हा त्या जनावरांना दिल्या जातात (ज्याचा आपल्याला उपयोग नसतो).
सर्व द्रव भाग बाजूला काढला जातो. या द्रव भागात असलेल्या अँटीबॉडीज वेगळ्या काढल्या जातात व याच आपल्याला अँटी स्नेक व्हेनम सिरम या स्वरुपात उपलब्ध होतात.
विषारी साप चावल्यावर तो नक्की कोणता हे शोधत बघण्यापेक्षा हे पॉलीव्हॅलंट अँटीसिरम दिल्याने रोग्याचा जीव नक्कीच वाचतो - मात्र ही उपाय योजना सर्पदंशानंतर लगेच चालू करावी लागते. सापाचे विष अतिशय जहरी असल्याने इथे मिनिटे - तास महत्वाची असतात. विषबाधा झालेल्या व्यक्तिने जास्त हालचाल केल्यास रक्ताभिसरण वाढून विष शरीरात लवकर पसरते. त्यामुळे इथे फर्स्ट एडही खूप महत्वाचे.
असो - खूपच लांबण लावली मी.
वा शशांक छान माहिती दिलीस.
वा शशांक छान माहिती दिलीस. लांबण कसली त्यात.
शशांक, ते औषध बनवण्याकरता
शशांक, ते औषध बनवण्याकरता अनेक विषारी सापांची हत्या करण्यात आली आहे. विजयदुर्ग, देवगड या भागात पूर्वी फुरशांचा सुळसुळाट असायचा आज ते नावालाही सापडत नाहीत. हे चांगलं झालं का वाईट हे एक त्या निसर्गालाच माहित.
असो - खूपच लांबण लावली मी.>>>
असो - खूपच लांबण लावली मी.>>> आजाबात न्हाय. अशीच माहिती देत रहा.
फुरशांचा सुळसुळाट असायचा आज ते नावालाही सापडत नाहीत. >> ज्या सापांच्या विषावर उपाय तेच राहिले नाहीत तर त्या औषधाचा उप्योग काय
दिनेशदा, झाडच्या फांद्या एकाच बाजुला वाढल्या आहेत की बाकी ठिकाणाच्या पडल्या / पाडल्या? आणि फांदिवर फक्त टोकालाच पाने आहेत मधे नाहितच.
त्या वरच्या फोटोत, खंड्याच्या
त्या वरच्या फोटोत, खंड्याच्या वरती झाडांचा नैसर्गिकरित्या हंसाचा आकार तयार झाला आहे. एक झाड नाही ते, निदान दोन तरी आहेत.
शशांक, पुर्वी कोकणात फुरसे चावून माणसे मरायच्या घटना फार कानावर यायच्या. कधी कधी तर घातपात करुनही, फुरश्याचे नाव घेतले जायचे.
दिनेश हंसाची जोडी दिसतेय मला
दिनेश हंसाची जोडी दिसतेय मला एक पंख फडफडवतोय तर दुसरा पाणी पितोय
छान गप्पा. शशांक छान माहिती
छान गप्पा.
शशांक छान माहिती .
जोएस मी लकी आहे मग त्या
जोएस मी लकी आहे मग त्या बाबतीत कारण चाफ्याच्या शेंगा आणि पानफुटीचा फुलोरा ह्या दोन्ही गोष्टी मी पाहिल्या आहेत.
मागे मी चाफ्यावर लेखन केले होते त्यात शेंगा आहेत.
http://www.maayboli.com/node/27357
शांकली धन्स.
दिनेशदा भारीच कोडे.
जो, मस्त फ़ोटो. ती पानफ़ुटी तर
जो, मस्त फ़ोटो. ती पानफ़ुटी तर ’झुंबरच ’ वाटतय.
जागू, तुझ नाव आपण आता ’लकी ’ ठेवूया.
त्या वरच्या फोटोत, खंड्याच्या
त्या वरच्या फोटोत, खंड्याच्या वरती झाडांचा नैसर्गिकरित्या हंसाचा आकार तयार झाला आहे. एक झाड नाही ते, निदान दोन तरी आहेत.>>>>मला नाही दिसला.
नको शोभा माझ बारस परत नको
नको शोभा माझ बारस परत नको करूस.
राम राम लकी.
राम राम लकी.
हो माशांनी तिचे नाव पूर्वी
हो माशांनी तिचे नाव पूर्वी लकी असेच ठेवले होते. ती त्यांची खूप लाडकी होती. सारखा लकीलकीलकीलकीलकी असा जप केल्याने तिला कील असे ऐकू यायला लागले. आणि मग तिने मासे मारून ते खायला सुरू केले. तेंव्हापासून ही लकी माशांना मात्र अनलकी वाटत असणार
जागू
माधव
माधव
माधव
माधव
माधव छान आहे गोष्ट
माधव छान आहे गोष्ट
आता गुलाबी चौकटीत दिसतोय का
आता गुलाबी चौकटीत दिसतोय का बघा बरं !
महाराष्ट्रातील पक्ष्यांवर
महाराष्ट्रातील पक्ष्यांवर इंग्रजीतून आलेले नवीन पुस्तक.. http://sahyadribooks.org/books/BirdsofMaharashtra.aspx?bid=690
(No subject)
(No subject)
Pages