१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
धन्यवाद वर्षा. साजूक तूप
धन्यवाद वर्षा. साजूक तूप चालेल का?
मृण्मयी. छान्च आलेत फोटो !
मृण्मयी.
छान्च आलेत फोटो !
Hi barfi freeze madhe thevavi
Hi barfi freeze madhe thevavi lagate ka?baher kharab hou shakel ka?
फ्रिजमध्ये/बाहेर ठेवण्याकरता
फ्रिजमध्ये/बाहेर ठेवण्याकरता उरायला हवी ना मुळात?
ह्या प्रमाणात खूप होत नाही. बाहेर ठेवायला हरकत नाही.
धन्यवाद सायो...जास्त प्रमाणात
धन्यवाद सायो...जास्त प्रमाणात करुन ठेवणार आहे म्हणुन विचारले...
आज केली हि बर्फी....मस्त झाली
आज केली हि बर्फी....मस्त झाली आहे..धन्यवाद सायो हि रेसिपी शेअर केल्याबद्द्ल
मृ जहबहरीही
मृ
जहबहरीही
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक म्हन्जे किति ग्रम्/चमचे?
सायो, ह्या रेसिपीबद्द्ल
सायो, ह्या रेसिपीबद्द्ल धन्यवाद. उसगावात नात झाली तेव्हा बारशाला आणि आल्यागेल्याचं तोंड गोड करायला ही मलई बर्फी मदतीला आली!
आवर्जून सांगितल्याबद्दल
आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद अनिताताई. ह्या बर्फीला काही मरण नाही. थोड्या थोड्या दिवसांनी वर येतच असते
निलेश, असं प्रमाण मला माहित नाही. इथे तरी ४ स्टिकचा एक पॅक असं बटर मिळतं. त्यामुळे असं मोजणं होतच नाही.
सायो, नेक्स्ट टाईम पॅक आणशिल
सायो, नेक्स्ट टाईम पॅक आणशिल तेव्हा त्यावर काय वजन लिहीलय ते बघुन इथे टाकशिल का?
युएस मधे वजन oz मधे असतं का? इथे ग्रॅम्स मधे मिळतं. पण कन्व्हर्ट करुन अंदाजाने वापरता येइल.
हो, oz मध्ये. बघेन मेक्स्ट
हो, oz मध्ये. बघेन मेक्स्ट टाईम नक्की. तोवर हे बघ.
८ oz दिसतय - @ 22७
८ oz दिसतय - @ 22७ ग्रॅम्स.
एकात ४ स्टिक्स असतात म्हणजे साधारण ५५-५७ ग्रॅम्स ची एक स्टिक... असं कॅल्क्युलेट कल तर??
काल केली एकदाची ही बर्फी. मी
काल केली एकदाची ही बर्फी.
मी मिल्कमेडचा पूर्ण टीन (४००ग्रॅम) वापरला. पण मिल्क पावडर ( अमुल्याचे डेअरी व्हाइटनर) दोनच कप घातली. घरचे लोणी वापरले. साखर घातली नाही. त्यामुळे की काय बर्फी जरा चिकट झाली. वड्या नीट पडेनात. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यावर सकाळी वड्या पडल्या.
पण घरी सर्वांना खूप आवडली. चक्क चक्क नवर्याने मागून मागून खाल्ली. नाहीतर त्याचा आणि गोडाचा ३६चा आकडा आहे. त्यामुळे, मी धन्य जाहले. वड्या पडल्या नाहीत याचे दु:ख कमी झाले.
आता सांगा, माकाचु? मिल्क पावडर कमी पडली का?
ए तुम्ही एवढ्या सुगरणींने
ए तुम्ही एवढ्या सुगरणींने याचे भारतातील घटक पदार्थांत भाषांतर करायचे मनावर घ्या बघु.
प्रत्येक बॅच मधली एक बर्फी सायोला नैवेद्य दाखवुयात.
अमेरिकेतली अनसॉल्टेड बटरची एक
अमेरिकेतली अनसॉल्टेड बटरची एक स्टिक म्हणजे = ८ टेबलस्पून्स किंवा अर्धा कप किंवा ४ आऊन्सेस किंवा ११३.४ ग्रॅम्स.
लाजो, वरच्या पाकिटात दोन स्टिक्स असणार आत. साधारणतः मिळणार्या पाकिटात ४ स्टिक्स असतात. ते पाकीट 16 oz or 1 pound चे असते.
भारतातल्या मुलींनो, आता येऊद्यात पटापट नैवेद्याची ताटं
प्राची, वरच्या प्रमाणानुसार
प्राची, वरच्या प्रमाणानुसार पाहिलंस ( 8 oz = 113.4 gms ) तर कन्डेन्स्ड मिल्क चौपट झाले म्हणून वड्या पडल्या नसतील
हम्म्म... धन्स अगो.
हम्म्म... धन्स अगो.
आमच्याकडे २५०ग्रॅ चा एक पॅक मिळतो. त्याचा साधारण अर्धा वापरुन करुन बघायला पाहिजे.
त्या पाकिटात छोट्या ८ स्टिक्स
त्या पाकिटात छोट्या ८ स्टिक्स असतात.
अवांतर माहिती- इथे बटर
अवांतर माहिती-
इथे बटर कन्व्हर्जन कॅलक्युलेटर आहे पहा-
http://www.traditionaloven.com/conversions_of_measures/butter_converter....
बटर स्टिकचं जे रॅपर असतं त्यावर मापं लिहिलेली असतात.
http://www.cooksinfo.com/butter-stick
गाय बरी नाही कस्ले भारी फोटो
गाय बरी नाही
कस्ले भारी फोटो आहेत मस्तच ~~
नुस्ते भारी फोटो म्हणू नकोस.
नुस्ते भारी फोटो म्हणू नकोस. कर आणि इथे फोटो चढव.
हो ग अगो. मला जरा शंका होतीच.
हो ग अगो. मला जरा शंका होतीच. पण मागच्या पानांवर सिंडरेल आणि सायोने १४ oz दूध वापरल्याचे लिहीले आहे. तिथे मिल्कपावडरचे प्रमाण वाढवल्याचे लिहीले नव्हते. त्यामुळे, मीही शहाण्या बाळासारखे फक्त दूधाचे प्रमाण वाढवले.
नक्की काय ते सिंडरेला/सायोच सांगू शकतील.
प्राची, इथे १४ Oz चा कॅन येतो
प्राची, इथे १४ Oz चा कॅन येतो कन्डेन्स्ड मिल्कचा. पहिल्यांदा त्यातले ८ oz वापरले आणि दुसर्यांदा पूर्ण १४ चा कॅन घातला. दोन्ही वेळेला मिल्क पावडरचं प्रमाण तेच राहिलं, न वाढवता. मला वाटतं मी तुपाचं प्रमाण कमी केलं.
ओके, म्हणजे माझं काही चुकलं
ओके, म्हणजे माझं काही चुकलं नाही. तरी पुढच्या वेळी थोडं प्रमाण वाढवून आणि लोणी कमी घालून बघेन.
इकडे साधना एकदम पटाईत झाली
इकडे साधना एकदम पटाईत झाली आहे ही बर्फी करण्यात.. मागच्या पानांवर तिच्या पोस्टी असतीलही कदाचित. नाहीतर तिला लिहायला सांगते.
मंजूडी, सांगच नक्की. कारण मला
मंजूडी, सांगच नक्की. कारण मला भारतातल्या सामुग्रीचा अनुभव नाही अजिबातच.
मी फक्त कन्डेन्स्ड मिल्कचं
मी फक्त कन्डेन्स्ड मिल्कचं प्रमाण वाढवलं. बाकी सगळं तेच. साखरेची गरज पडत नाही अजिबात कन्डेन्स्ड मिल्क जास्त घातल्याने.
केली मलई बर्फी. 8 fl oz. = 1
केली मलई बर्फी.
8 fl oz. = 1 cup हे प्रमाण नेटवर सापडलं. 1 बटर स्टिक = 8 टे. स्पू हे अगोने मागच्या कुठल्यातरी पानावर लिहिलंय. पाव प्रमाणात प्रयोग करूया म्हणून अर्धा कप नेस्ले डेअरी व्हाईटनर घेऊन त्यात पाव कप अमूल मिठाईमेट घालून ढवळलं तर त्याचं संपृक्त द्रावण तयार झालं. शिवाय मिट्ट गोड. मग त्यात पाव कप दूध घालून व्यवस्थित ढवळलं. गुठळ्या मोडल्या. पाव कप दूध अपुरं वाटलं म्हणून अजून पाव कप घालून ढवळलं. मग गोडी कमी झाली पण मिश्रण पातळ वाटलं. मावेत आटेल असं वाटून हाय पॉवरवर 2 मिनिटं + 2 मिनिटं ठेवलं पण ते आळेल असं वाटेना म्हणून अजून अर्धा कप डेअरी व्हाईटनर घातलं. मग हाय पॉवरवर 1 मि + 1 मि + केशर सिरप घालून ढवळून 1 मि ठेवलं आणि मग एकदम झकास खवा तयार झाला. मग किंचीत गार झाल्यावर तूप + बदामाचे काप लावलेल्या थाळीत थापलं आणि बर्फ्या कापल्या.
झ क्का स! निव्वळ अप्रतिम
हा फोटो :
भारतातल्यांनी पुढील प्रमाण निश्चित करायला हरकत नाही -
एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप
ह्या प्रमाणात फोटोतल्यासारख्या साधारण २ सेंमी x २ सेंमी आकाराच्या २०-२२ बर्फ्या झाल्या.
मायक्रोवेवच्या आपापल्या हाय सेटींगप्रमाणे किती वेळ ठेवायचं वगैरे ठरवा. किंवा सरळ सगळं मिश्रण एकजीव करून गॅसवर आटवा. गोळा फिरायला लागला की थापा.
सायो/ सिंडी/ मृण - तिकडच्या कन्डेन्स्ड मिल्कची कन्सिस्टन्सी कशी असते ते सांगा प्लिज.
>>>तिकडच्या कन्डेन्स्ड
>>>तिकडच्या कन्डेन्स्ड मिल्कची कन्सिस्टन्सी कशी असते ते सांगा प्लिज.>>> एकदम घट्ट. डबा उलटा केल्यावर अगदी सावकाश पडेल इतपत.
Pages