मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, ह्या रेसिपीबद्द्ल धन्यवाद. उसगावात नात झाली तेव्हा बारशाला आणि आल्यागेल्याचं तोंड गोड करायला ही मलई बर्फी मदतीला आली!

आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद अनिताताई. ह्या बर्फीला काही मरण नाही. थोड्या थोड्या दिवसांनी वर येतच असते Proud

निलेश, असं प्रमाण मला माहित नाही. इथे तरी ४ स्टिकचा एक पॅक असं बटर मिळतं. त्यामुळे असं मोजणं होतच नाही.

सायो, नेक्स्ट टाईम पॅक आणशिल तेव्हा त्यावर काय वजन लिहीलय ते बघुन इथे टाकशिल का?
युएस मधे वजन oz मधे असतं का? इथे ग्रॅम्स मधे मिळतं. पण कन्व्हर्ट करुन अंदाजाने वापरता येइल.

८ oz दिसतय - @ 22७ ग्रॅम्स.
एकात ४ स्टिक्स असतात म्हणजे साधारण ५५-५७ ग्रॅम्स ची एक स्टिक... असं कॅल्क्युलेट कल तर??

काल केली एकदाची ही बर्फी.
मी मिल्कमेडचा पूर्ण टीन (४००ग्रॅम) वापरला. पण मिल्क पावडर ( अमुल्याचे डेअरी व्हाइटनर) दोनच कप घातली. घरचे लोणी वापरले. साखर घातली नाही. त्यामुळे की काय बर्फी जरा चिकट झाली. वड्या नीट पडेनात. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यावर सकाळी वड्या पडल्या.
पण घरी सर्वांना खूप आवडली. चक्क चक्क नवर्‍याने मागून मागून खाल्ली. नाहीतर त्याचा आणि गोडाचा ३६चा आकडा आहे. त्यामुळे, मी धन्य जाहले. Proud वड्या पडल्या नाहीत याचे दु:ख कमी झाले. Happy
आता सांगा, माकाचु? मिल्क पावडर कमी पडली का?

ए तुम्ही एवढ्या सुगरणींने याचे भारतातील घटक पदार्थांत भाषांतर करायचे मनावर घ्या बघु.

प्रत्येक बॅच मधली एक बर्फी सायोला नैवेद्य दाखवुयात.

अमेरिकेतली अनसॉल्टेड बटरची एक स्टिक म्हणजे = ८ टेबलस्पून्स किंवा अर्धा कप किंवा ४ आऊन्सेस किंवा ११३.४ ग्रॅम्स.
लाजो, वरच्या पाकिटात दोन स्टिक्स असणार आत. साधारणतः मिळणार्‍या पाकिटात ४ स्टिक्स असतात. ते पाकीट 16 oz or 1 pound चे असते.
भारतातल्या मुलींनो, आता येऊद्यात पटापट नैवेद्याची ताटं Wink

हम्म्म... धन्स अगो.

आमच्याकडे २५०ग्रॅ चा एक पॅक मिळतो. त्याचा साधारण अर्धा वापरुन करुन बघायला पाहिजे.

अवांतर माहिती-

इथे बटर कन्व्हर्जन कॅलक्युलेटर आहे पहा-
http://www.traditionaloven.com/conversions_of_measures/butter_converter....

बटर स्टिकचं जे रॅपर असतं त्यावर मापं लिहिलेली असतात.
http://www.cooksinfo.com/butter-stick

हो ग अगो. मला जरा शंका होतीच. पण मागच्या पानांवर सिंडरेल आणि सायोने १४ oz दूध वापरल्याचे लिहीले आहे. तिथे मिल्कपावडरचे प्रमाण वाढवल्याचे लिहीले नव्हते. त्यामुळे, मीही शहाण्या बाळासारखे फक्त दूधाचे प्रमाण वाढवले. Proud
नक्की काय ते सिंडरेला/सायोच सांगू शकतील. Happy

प्राची, इथे १४ Oz चा कॅन येतो कन्डेन्स्ड मिल्कचा. पहिल्यांदा त्यातले ८ oz वापरले आणि दुसर्‍यांदा पूर्ण १४ चा कॅन घातला. दोन्ही वेळेला मिल्क पावडरचं प्रमाण तेच राहिलं, न वाढवता. मला वाटतं मी तुपाचं प्रमाण कमी केलं.

इकडे साधना एकदम पटाईत झाली आहे ही बर्फी करण्यात.. मागच्या पानांवर तिच्या पोस्टी असतीलही कदाचित. नाहीतर तिला लिहायला सांगते.

मी फक्त कन्डेन्स्ड मिल्कचं प्रमाण वाढवलं. बाकी सगळं तेच. साखरेची गरज पडत नाही अजिबात कन्डेन्स्ड मिल्क जास्त घातल्याने.

केली मलई बर्फी.

8 fl oz. = 1 cup हे प्रमाण नेटवर सापडलं. 1 बटर स्टिक = 8 टे. स्पू हे अगोने मागच्या कुठल्यातरी पानावर लिहिलंय. पाव प्रमाणात प्रयोग करूया म्हणून अर्धा कप नेस्ले डेअरी व्हाईटनर घेऊन त्यात पाव कप अमूल मिठाईमेट घालून ढवळलं तर त्याचं संपृक्त द्रावण तयार झालं. शिवाय मिट्ट गोड. मग त्यात पाव कप दूध घालून व्यवस्थित ढवळलं. गुठळ्या मोडल्या. पाव कप दूध अपुरं वाटलं म्हणून अजून पाव कप घालून ढवळलं. मग गोडी कमी झाली पण मिश्रण पातळ वाटलं. मावेत आटेल असं वाटून हाय पॉवरवर 2 मिनिटं + 2 मिनिटं ठेवलं पण ते आळेल असं वाटेना म्हणून अजून अर्धा कप डेअरी व्हाईटनर घातलं. मग हाय पॉवरवर 1 मि + 1 मि + केशर सिरप घालून ढवळून 1 मि ठेवलं आणि मग एकदम झकास खवा तयार झाला. मग किंचीत गार झाल्यावर तूप + बदामाचे काप लावलेल्या थाळीत थापलं आणि बर्फ्या कापल्या.
झ क्का स! निव्वळ अप्रतिम Happy

हा फोटो :

Image0555.jpg

भारतातल्यांनी पुढील प्रमाण निश्चित करायला हरकत नाही -
एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप
ह्या प्रमाणात फोटोतल्यासारख्या साधारण २ सेंमी x २ सेंमी आकाराच्या २०-२२ बर्फ्या झाल्या.
मायक्रोवेवच्या आपापल्या हाय सेटींगप्रमाणे किती वेळ ठेवायचं वगैरे ठरवा. किंवा सरळ सगळं मिश्रण एकजीव करून गॅसवर आटवा. गोळा फिरायला लागला की थापा.

सायो/ सिंडी/ मृण - तिकडच्या कन्डेन्स्ड मिल्कची कन्सिस्टन्सी कशी असते ते सांगा प्लिज.

>>>तिकडच्या कन्डेन्स्ड मिल्कची कन्सिस्टन्सी कशी असते ते सांगा प्लिज.>>> एकदम घट्ट. डबा उलटा केल्यावर अगदी सावकाश पडेल इतपत.

Pages