Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी बाजुची पान कापा पण जिथुन
मामी बाजुची पान कापा पण जिथुन मधले पान येते म्हणजे जुन्या पानाच्या देढातुन नविन पान येते ते मधले देढ राहूद्या.
साधना सासुच्या जिभा
नक्किच कुठल्यातरि सुनेने हे नाव दिले असेल.
हो, सासुच्या लांबलचक जीभेचा
हो, सासुच्या लांबलचक जीभेचा फटकारा भोगलेल्या सुनेला सेन्सिवेराचे झुडुप दिसल्याबरोबर सासुच आठवली असणार.
अळूची पाने जुन झाल्यावर आधी पिवळी होतात ना? पांढरी आणि मागे जाळी म्हणजे किडच असणार. हल्ली पांढरे ढेकण (मिलिबग) खुप वाढलेत इथल्या हवेत. सध्या आकाशात ढग खुप येतात, मघ्येच कडक उनही पडते. एकुण वातावरण दमट झालेय, त्यामुळे हे किडे वाढले असावेत. मी गेल्याच आठवड्यात माझी जास्वंद कापली. पुर्ण किडीने भरुन गेलेली. टोमॅटो आणि वांग्यावरही किड पडलीय पांढरी. वांगे १ वर्ष जुने होते म्हणुन एक वांगे बियासाठी जुन करत ठेवलेले. आज ते काढुन घेतले आणि वांगेही कापुन टाकले. आता परत लावेन वांगे. भोपळ्याची ५-६ रोपे उगवलीत.
प्रचि २ ही प्रची ४ ची फुले
प्रचि २ ही प्रची ४ ची फुले आहेत. ही स्क्युलंट्स माझ्याकडे होती.आणि प्रची ६ पण, परंतु आता नाहीयेत.
प्रचि ३ मधे ते मोदकाच्या आकाराचे दिसतेय ते कळी आहे का? आणि प्रचि ८ मधली पाने तर एकदमच वेगळी आहेत-चामट जाड. त्या पानांवर बारीक लव आहे का?
साधना सासूच्या जिभा- नाव मात्र गमतीशीर आहे हं!
ते मोदकाच्या आकाराचे काय आहे
ते मोदकाच्या आकाराचे काय आहे तेच कळत नव्हते. कळीच असणार. फूल मात्र नाही दिसले.
हो त्या लेदरी पानावर बारिक लव होती.
दिनेशदा, फेबुवरचा तो गुलाबी
दिनेशदा, फेबुवरचा तो गुलाबी हादग्याचा (?) फोटो टाकते आहे इथे.
आणि हा सुद्धा. हे कसलं फळ आहे ? ( आधी चर्चा झाली असेल तर मी मिसलेली दिसते .)
तो गुलाबी हादगा तूमच्याकडचा
तो गुलाबी हादगा तूमच्याकडचा का ? मी कधीच प्रत्यक्ष बघितला नव्हता. आपल्याकडे जास्त करुन पांढरा हादगाच दिसतो. त्याची भाजी करतात.
फळ मला केवड्याचे वाटतय. खाद्य आहे ते.
छान उत्तम माहीती आहे दिनेशदा
छान उत्तम माहीती आहे दिनेशदा तर महानच आहेत,
६) हे फूल तर जेमतेम ६ मीमी चे होते त्य झाडाला आम्ही चमचमचे झाड म्हणतो.
केवड्याला फळ येते हेच मला
केवड्याला फळ येते हेच मला माहीत नव्हते.
जागू, आपल्याकडे केवड्याचे
जागू, आपल्याकडे केवड्याचे कणीस आल्याआल्या तोडतात ना म्हणून आपल्याला दिसत नाही. गणपतिपुळ्याला जो प्रदक्षिणेचा डोंगर आहे (तिथली झाडे, फूले तोडायची नाहीत असा दंडक आहे.) तिथे दिसतात.
आफ्रिकेत हे झाड, सुगंधापेक्षा फळांसाठीच ओळखले जाते. फळे खाता येतात. अननसासारखी असली, तरी तितकी गोड नसतात, आणि त्याला ना अननसाचा स्वाद असतो ना केवड्याचा !
२८ एप्रिलला विजय पोकळ यांनी
२८ एप्रिलला विजय पोकळ यांनी कुसराचे फोटो टाकले होते ना त्या फोटोंमधे लाल रंगांची फळे दिसताहेत,परवा सेम तशीच पुण्याजवळ मुळशी धरणाच्या रस्त्यावर कुसराची/रानमोगर्याची फुलं आणि त्यांच्या जवळच ती लाल रंगाची फळं आम्ही बघितली.त्यांचं काही तरी नातं असावं असं वाटतंय! किंवा त्या मैत्रिणी असतील.
मुकुचंदाच्या झाडाचा मला
मुकुचंदाच्या झाडाचा मला पानांसकट फोटो पहायचा आहे आहे का कुणाकडे ?
पांढरी कण्हेर.
पांढरी कण्हेर.
तो गुलाबी हादगा मी इथे मालदीव
तो गुलाबी हादगा मी इथे मालदीव मध्येच पाहिला होता.
केवड्याचं फळ ? पण हे झाड तर खूप उंच आणि मजबूत होतं. झाडाचा फोटो आहे का बघते.
रुणुझुणू, आता झाडाचा फोटो
रुणुझुणू, आता झाडाचा फोटो बघायलाच हवा. तसे केवड्याचे झाड पण खुप उंच वाढते. अगदी २०/२५ फूटापर्यंत वाढलेली झाडे बघितली आहेत मी. तिथे ते फळ खातात का ?
आणि हादग्याच्या फूलाची भजी / भाजी करतात. तिथे करतात का ?
केवड्याच्या बनाचा फोटो मी
केवड्याच्या बनाचा फोटो मी काढून आणेन कधी समुद्रावर गेल्यावर. उंच उंच वाढलेले आहेत तिथे.
दिनेशदा तुम्हाला सुरणाच्या फुलाचे अंतरंग पाहायचे होते ना ? पण पुर्ण नाही पाहता येत. त्यातल्या त्यात फुलाचा वरचा भाग थोडा बाजुला सारुन हे फोटो काढले आहेत.
जागू आभाराचा उपचार पाळत नाही.
जागू आभाराचा उपचार पाळत नाही. पण हा फोटो काढण्यासाठी किती दुर्गंधी सहन केली असेल, त्याची कल्पना आहे.
परत लिहितो, भारतात असतो तर हे फूल बघायला नक्कीच आलो असतो.
आणि हो, फोटो अप्रतिम आलाय.
रुणुझुणु, छान फोटो ! हादग्याच
रुणुझुणु,
छान फोटो !
हादग्याच झाड ऐकल होतं,पांढरा हादगा बहुतेक पाहिलाय, आता नक्की लक्षात ठेऊन पाहीन !
जागु,दिनेशदा,
पांढर्या कण्हेरची फुलं ही त्या पिवळ्या आणि इतर कण्हेर पेक्षा वेगळी दिसतात ना, मधे जे गोलाकार धाग्यासारखा भाग त्यात नसतो ना ?
सुरणाचं फुल पहिल्यांदाच पाहिलं, इतक मोठं फुल !
पण याचा उपयोग कशासाठी केला जातो ?
दिनेशदा अनिल सुरणाच्या
दिनेशदा
अनिल सुरणाच्या फुलाचा तसा काही उपयोग नसतो. आणि ते काधतही नाहीत कारण हे फुल सुकल्यावर त्यातुनच सुरणाचे झाड बाहेर येते. परत आईकडे गेल्यावर प्रचि काढेन.
अनिल तुम्ही पिवळे फुल बिट्टीचेतर म्हणत नाहीत ना ? कारण कण्हेर अशिच असते.
अरे बापरे, ते सुरणाचे फूल
अरे बापरे, ते सुरणाचे फूल किती मोठे आहे ! जागू, धन्यवाद, आम्हाला ही पर्वणि दिल्याबद्द्ल!
जागू धन्यवाद , पहिल्यांदाच
जागू धन्यवाद , पहिल्यांदाच पाहिलेय सुरणाचे फुल
दिनेशजी मी कण्हेरीची शेंग पाहिली आमच्या ऑफिस मधल्या झाडाला आली आहे. त्या बी पासून रोप वाढते का ? तसेच तामण च्या झाडाला असंख्य फळे आली आहेत त्याच्या बिया ट्रेक च्या वेळेस नेता येतील ना ??
अनिल तुम्ही पिवळे फुल
अनिल तुम्ही पिवळे फुल बिट्टीचेतर म्हणत नाहीत ना ? कारण कण्हेर अशिच असते.
दिनेशदा,
धन्स !
बहुतेक ते बिट्टीचे असेल, कारण त्याची पिवळसर तांबडी फुले थोडी लांब असायची,(जुन्या स्पीकर्/कर्ण्यासारखे) ,त्याला फळेही लागायची,पुर्ण अंगणात फुलांचा रोज सडा पडलेला असायचा.
यापुढे मी फोटो देण्याचा
यापुढे मी फोटो देण्याचा प्रयत्न केला पाहिजेच ...
सचिन, कण्हेरीच्या बिया
सचिन, कण्हेरीच्या बिया रुजतील. आणि तशाही मेगा हायवेवर आता बर्याच कण्हेरी लावल्यात. ताम्हणीच्या फळाचे तूरे झाडावर वर्षभर असतात. म्हणजे गेल्या वर्षीचे तूरे आणि या वर्षीची फूले एकदमच असतात. त्या फळातल्या बिया मिळाल्या तरी चालतील.
वडाच्या झाडाची, झाडाखाली पडलेली फळे गोळा करुन, कावळे जास्त असतात अशा ठिकाणी टाकली (उदा. बस स्टँन्ड ) तर कावळे, पुढचे काम करतील. पाऊस पडल्यानंतर जर एखादा ट्रेक केला तर एखाद्या वाहत्या ओहोळात बिया टाकल्या तर त्या वहात जाऊन ठिकठिकाणी रुजतील.
अनिल, कण्हेरीचे अनेक प्रकार आहेत. पांढरा ते गडद राणी रंग, यांच्या अधल्या मधल्या बर्याच छटा पण आहेत.
उत्तरांचल भटकुन आलो, तेथे
उत्तरांचल भटकुन आलो, तेथे वेगवेगळी फुले, झाडे पहायला मिळाली. बुरांशु नावाचे पहाडी फुल बघितले आणि त्याचे औषधी उपयोगही. आपल्य इथे जसे कोकमाचे सरबत मिळते तसे तेथे या फुलाचे सरबत मिळते जे हृदयविकारावर उपयोगी आहे असे सांगितले. जर्दाळू, पीच, सफरचंद, चहाचे मळे, लीची, वेगवेगळी फुले इतकेच काय तर अगदी "*रस" चेही झाड पाहिले. :-).
राणीखेतला चौबटिया गार्डनमध्ये फिरताना गाईडने एक पान दाखवले, त्यावर भरपूर काटे होते त्या पानाचा हाताला स्पर्श झाला तरी भरपूर लाल मुंग्या चावल्यासारख्या वाटंत होतं. याचा उपयोग वेदना शमविण्यासाठी होतो असे गाईडने सांगितले. चुकुन जर याचा स्पर्श झाला तर यावर उपाय म्हणुन अजुन एक झाड दाखवले ज्याला "जंगली पालक" असे नाव होते (याची पाने पालकासारखी दिसत होती). या झाडाचा पाला काटेरी स्पर्श झालेल्या जागी चोळला असता एकदम थंड वाटते व जळजळ थांबते. (दोन्ही प्रयोग स्वत: करून पाहिले :-)).
चौबटिया गार्डनमध्ये फिरताना निसर्गाच्या गप्पावरील माबोकरांची फार आठवण झाली.
फोटो काढले आहेत. वेळ मिळताच नक्की अपलोड करेन.
दिनेशदा, तुम्ही तर परदेशात
दिनेशदा, तुम्ही तर परदेशात राहता आणि भारतातल्या एखाद्या प्रांतात कुठे काय आहे , ह्याचि अगदि अद्ययावत माहिती कशी काय आहे?
राणीखेतला चौबटिया गार्डनमध्ये
राणीखेतला चौबटिया गार्डनमध्ये फिरताना गाईडने एक पान दाखवले, त्यावर भरपूर काटे होते त्या पानाचा हाताला स्पर्श झाला तरी भरपूर लाल मुंग्या चावल्यासारख्या वाटंत होतं. <<
मी घेतलाय हा अनुभव, किती तरी वेळ आग होत रहाते. पाण्याने हात पाय धुतल्यावर जरा बरें वाटते पणं ते तेवड्यापुरतेच.
मी घेतलाय हा अनुभव, किती तरी
मी घेतलाय हा अनुभव, किती तरी वेळ आग होत रहाते.>>>>हो ना. त्यावर उतारा म्हणुन गाईडने जंगली पालकची पाने हाताला चोळली. जळजळ लगेच थांबली आणि थंड वाटले.
जायफळाचा प्रसारः जायफळाची फळे
जायफळाचा प्रसारः
जायफळाची फळे पिकल्यावर तीन भागात उकलतात. या उकललेल्या फळांकडे कोकीळ पक्षी आकर्षीत होतात पण त्यांना ना त्या फळात गम्य असते ना जायफळात. त्यांना आवडते ती जायफळावरचे जाळीदार आवरण - ज्याला आपण जायपत्री म्हणतो. कोकीळ ती जायपत्री खातो आणि जायफळ खाली टाकून देतो. ही टाकलेली जायफळे रुजतात. निसर्ग पण कसा आहे ना - राजेशाही पक्षाला अगदी राजेशाही खाणे देतो
(साभारः दुर्गाबाई भागवत)
जिप्स्या, चला निदान फोटो
जिप्स्या, चला निदान फोटो तरी.
माधव, ओली जायपत्री मस्त लालभडक दिसते. ओल्या फळाला पण छान गंध येतो. त्याचे लोणचे करतात. पण ओले जायफळ, खुप तीव्र स्वादाचे असते. जिभेवर ठेवता येत नाही.
आपल्याकडे काय करतात माहित नाही, पण बाकिच्या देशात जायफळे भट्टीत भाजतात.
प्रज्ञा, माझी पाळेमुळे तिथेच आहेत कि. आणि इथली दोस्तमंडळी माझे डोळे आहेत.
दिनेशदा, तुम्ही तर परदेशात
दिनेशदा, तुम्ही तर परदेशात राहता आणि भारतातल्या एखाद्या प्रांतात कुठे काय आहे , ह्याचि अगदि अद्ययावत माहिती कशी काय आहे?
प्रज्ञा१२३,
अगदी..अगदी !
मी त्यांना एकदा त्यांचा मुळ गाव कोणता विचारणार होतो, पण नंतर लक्षात आलं अख्खा महाराष्ट्र (देश आणि परदेशही) त्यांनी पिंजुन तर काढला आहेच,पण त्यांची निसर्गाबद्दलची सगळीकडची माहिती तर अजबच आहे.
Pages