भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
आजतागायत एवढा निराश झालो
आजतागायत एवढा निराश झालो नव्हतो सामना बघुन..... मी चक्क सर्वीसेस टीम च्या मॅनेजर च्या घरी गेलेल मॅच बघायला, ज्यादावाली चाबी त्याने मला देउन ठेवलेली काही चुकामुक झाली तर "प्रिकॉशन" म्हणे
एक नाईट प्रोजेक्ट चालु असताना अख्खी मॅच पहायच धाडस केल...... साला एवढ डोक खराब केलय ना ह्यांनी
धोनी खरच दादानी बनवलेल्या टीम वर बसुन फुकटच "लोणी" खातोय.......
आणी मला जर एक खुन माफ केला ना तर नेहरा ला !@#॓$व#%#$%@#$^@#$^
नाही माफ केला तरी बहुदा ......
एक सांगायचं राहून
एक सांगायचं राहून गेलं.
द.आ.च्या डावात काल चेंडू खाली रहात होता, शॉट मारणं अवघड होतं व आवश्यक धावसंख्येची सरासरी ८च्या आसपास घुटमळून वर सरकत होती. चेंडू फारसा वळत किंवा स्विंग होत नाही हे हेरून डिव्हिलीयर्सने आल्या आल्या तीन-चार पावलं पुढे सरसावून चेंडूचा टप्पाच गाठून फटके मारायला सुरवात केली, हा मॅचचा "टर्नींग पॉईंट " म्हणायला हरकत नसावी. नंतर आलेल्या फलंदाजानी पण हाच धडा गिरवला व एलबीडब्ल्यूची शक्यताही पुसून टाकली . यात "स्टंपींग" होण्याचा धोकाही त्यानी जाणीवपूर्वक पत्करला . [ गंभीर पुढे येवून टोलवाटोलवी करण्यात माहिर आहे पण काल क्रिझमधे राहून खेळलेले त्याचे अनेक फटके चेंडू खूप खाली रहिल्याने बॅट हवेतच फिरून फुकट गेले होते ]. एक झहीर सोडला तर इतर गोलंदाजांकडे अशा आक्रमक फलंदाजीसाठी कांही प्रभावी डावपेच आहेत असं जाणवलं नाही. पुढच्या बाद फेरीत यावर तोडगा शोधून ठेवणं अनिवार्य आहे.
कांही व्यक्तीगत अडचणींमुळे मला सल्ला देत संघाबरोबर फिरणं शक्य नाही, हेंही पुन्हा नमूद करतो !
>>> बराच वेळ गोलंदाजी न
>>> बराच वेळ गोलंदाजी न केलेल्या नेहराला अचानक शेवटची ओव्हर टाकायला बोलावणं, हरभजनची एक ओव्हर शिल्लक असताना, म्हणजे कमालच !! नेहराला लय सापडायलाच, तीही सांपडलीच तर, तीन चार ओव्हर लागतात !
भाऊराव,
नेहराला शेवटचे षटक देणे फारसं अनपेक्षित नव्हतं. नेहराने पूर्वी २ सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या षटकात ९-१० धावा हव्या असताना चांगली गोलंदाजी करून भारताला विजय मिळवून दिला होता. (त्यातला एक सामना - २००४ मध्ये पाकिस्तानविरुध्द पाकिस्तानमध्ये पहिल्या सामन्यात शेवटच्या षटकात पाकड्यांना विजयासाठी ९ धावा हव्या असताना नेहराने उत्कृष्ट गोलंदाजी करून केवळ ३ च धावा दिल्या होत्या. भारत ५० षटकांत ३४९, पाकडे - ३४४). अजून एका सामन्यात त्याने अशीच कामगिरी केली होती. कदाचित त्या भरवश्यावर धोनीने त्याला शेवटचे षटक दिले असावे. पण २००४ चा नेहरा आणि २०१० चा नेहरा ह्यात खूप फरक आहे. हे धोनीला समजले नाही. त्याने झहीरलाच ५० वे षटक द्यायला पाहिजे होते. अर्थात भज्जीलाही शेवटच्या षटकात बदडलेच असते.
मुनाफ, नेहरा वगैरेंना यॉर्कर प्रकारचे चेंडू टाकायला त्यांच्या प्रशिक्षकांनी शिकविले नसावे. काल मलिंगा असता तर त्याने सर्व ६ चेंडू यॉर्कर टाकून आफ्रिकेचे उरलेले तीनही फलंदाज बाद केले असते. तसेच प्रत्येक षटकात एक बाऊन्सर टाकायला परवानगी असते. पण आपले गोलंदाज क्वचितच बाउन्सर टाकताना दिसतात.
आपण काल हरलो ते गोलंदाजांमुळे नसून ३९.४ षटकात १ बाद २६७ अशा अत्यंत भक्कम स्थितीतून पुढच्या ५४ चेंडूत फक्त २९ धावा करून उरलेले ९ गडी गमाविले आणि त्यामुळे आपण हरलो. आपण आपल्या फलंदाजीचे ८ चेंडूसुध्दा वाया घालविले. आफ्रिकेच्या जवळपास प्रत्येकाने धावा केल्या. आपले पहिले तिघेजण सोडले तर उरलेल्या ८ जणांनी मिळून फक्त २८ धावा केल्या (त्यात चौघेजण O). आफ्रिकेच्या ९ व्या क्रमांकावर आलेल्या पीटर्सनने शेवटच्या षटकात तडाखेबंद फलंदाजी करून आफ्रिकेला जिंकून दिले. आपले शेवटच्या ३ फलंदाजांनी O धावा केल्या.
असो. आता पुढे काय? माझ्या मते पठाणच्या ऐवजी रैनाला खेळवावे. तसेच नेहराऐवजी स्रिसंथ आणि भज्जीऐवजी अश्विनला खेळवावे. तसेच सर्व मध्यमगती गोलंदाजांना यॉर्कर व बाऊन्सरचा भरपूर सराव करायला सांगावा.
असाम्या, माझीच ईथली पुर्वीची
असाम्या,
माझीच ईथली पुर्वीची पोस्ट कॉपी पेस्ट केलीयेस... (गंभीर नको कोहली आणि रैना ठेवा हे मी फार पूर्वीपासून लिहीतोय. असो.)
धोणी मैदानावर जे निर्णय घेतो ते चूक का बरोबर या तराजूत तोलणे अयोग्य आहे. एक नक्की, धोणी जेव्हा संघ निवडतो आणि क्रंच परिस्थितीत काय निर्णय घेतो वा स्ट्रॅटेजी ठेवतो त्यावरून त्याचा कप्तान म्हणून आलेख या मालिकेत/स्पर्धेत कसा ऊतरतो आहे हे मात्र स्पष्ट आहे:
१. दिल्लीच्या सामन्यात गंभीर च्या जागी रैना ला खेळवून पुढील सामन्यासाठी रैना ला आत्मविश्वास देणे आवश्यक होते.
२. पियूष चावला ला तीन संधी मिळतात अश्विन वर मात्र "तो कधिही येवून गोलंदाजी करायला तय्यार बसला आहे" असे प्रेशर टाकले जाते (बरोबर विरुध्ध फलंदाज या "आश्विन" नामक ब्रम्हास्त्राला घाबरून पळच काढतील जणू!!)
३. कालच्या सामन्यात तर धोणीचे rreading the game and planning the death overs was at it lowest.. when SA bowlers esp Steyn was bowling slower ones/ more focussing on swing and line the Indian wikcets tumbled.. when Bhajji got 3 wickest it was indication that on this picth except Jhahir, DO NOT bet on munaf and nehara- last over should have been definitely bowled by Bhajji, in fact penultimate could have been bowled by Bhajji and last by Jhahir. Munaf "showecased" his death bowling talent against England which cost india win. On that experience itself he was wrong candidate to bowl penultimate over.
४. धोणीच्या स्वताच्या फलंदाजीबद्दल न लिहीलेले बरे. एकीकडे प्रेस कॉ. मध्ये सिनीयर खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणावर आणि ईतरांच्या फलंदाजीकडे बोट दाखवायचे- स्वतः मात्र किपींग सोडल्यास फलंदाजीत अगदीच फुस्स आहे, त्याचे काय?
५. युसुफ पठाण हा "जुगार" आहे.. दर वेळी त्याला पॉ.प्ले. मध्ये मुद्दामून पाठवून त्याच्यावरचे प्रेशर वाढवणे योग्य नव्हे. पठाण आयपिल मधला एक्का असेल, ईथे पॉ.प्ले. मध्ये ठोकाठोक हे तितके सोपे नाही, पहिल्याच चेंडूपासून तर नाहीच.
६. कोहली चे संघातील स्थान नेमके काय याचे ऊत्तर सापडत नाही- गेले दोन सामने कोहली त्याच identity crisis खाली खेळल्यासारखा भासतो. गंभीर मात्र मी कसा का खेळेना, धोणी मला काढणार नाही- या थाटात खेळतो- कालचा सामना, गंभीर ची स्टेन ला मारामारी करण्याचा मूर्खपणा (पठाण ला पाठवला असताना) आणि ईतर फलंदाजांच्या फाटू (स्टेन पुढे ऊभे रहायची हिम्मत नसल्या सारखे बाद होत होते. अरे हातात बॅट आहे का काठी?) मनोवृत्तीमूळे गमावला.
७. आफ्रिका, विंडीज, ऑसी हे फिरकीपेक्षा मध्यमगती गोलंदाजाना खेळणे अधिक पसंत करतात हे अख्ख्या जगाला माहित आहे. अशा संघांविरुध्ध किमान दोन फिरकी गोलंदाज खेळवणे हे फायद्याचे ठरते. नेमकी ईथेच धोणीची संघनिवड अनाकलनीय ठरते.
८. क्षेत्ररक्षणाबद्दल नकारात्मक अॅटीट्यूड (स्वतः कप्तान जेव्हा असे बोलतो तेव्हा क्षेत्ररक्षणातील सुधारणेसाठी कोण उत्सूक असेल बरे? धोणी ला आजकाल कुठे काय बोलायचे हे कळेनासे झालेय का? दर वेळी त्याची ऊत्तरे "स्वताच्या निर्णयाचा बचाव करणे" या कॅटेगरीतील वाटतात!) आणि गोलंदाजीवर नसलेला विश्वास, अशा वेळी मग पहिली फलंदाजी घेवून काय साध्ध्य होते?
९. आता "किती धावसंख्या पुरेशी असेल" या प्रेशर खाली आपले फलंदाज खेळायची शक्यता जास्त आहे. निश्चीतच धोकादायक बाब. या पेक्षा दुसरी फलंदाजी फायद्याची ठरेल आसे वाटते- मागील दोन सामन्यात जसे युवी/धोणी व ईतर जबाबदारीने खेळले तसेच.. नाहीतर पहिल्या फलंदाजीत "निव्वळ हाणामारीच्या नादात" आपण सामना गमावतो हे स्पष्ट आहे- ईं, आफ्रिका चे सामने.
कालच्या आपल्या बॅटींग पॉ.प्ले. आणि उर्वरीत फलंदाजीचे विश्लेषण एका वाक्यात करता येईल " वेडात मराठे वीर दौडले सात".
------------------------------------------------------------------------------------
तात्पर्यः क्षेत्ररक्षणाबद्दल झक्कींना सारखे टोमणे मारणे बंद करावे आणि संघ निवड, स्ट्रॅटेजी, मैदानवारील निर्णय यावर अधिक लक्ष द्यावे. आपल्या विरुध्ध अपसेट होणे अजून बाकी आहे- विंडीज च्या सामन्यात लॉ ऑफ अॅवरेज नुसार- विरू, साहेब, गंभीर, झहीर, हे फेल होण्याच्या मार्गावर आहेत- तेव्हा "जरा जपून".
सचिन खेळतो तेव्हाही भारत ______ (विशेषतः विश्वचषकातील हा शाप कायमच आहे! आपले लोकच साले दुर्दैवी! २००३, २००७, २०११... काहिही बदललेले नाही!)
साहेबांचं आणि भारताचं
साहेबांचं आणि भारताचं दुर्दैव. साहेबांनी शतक केलेले दोन्ही सामने भारताला जिंकता आले नाहीत. मागे कुणीतरी लिहिलं होतं की साहेबांच्या २००० धावांचा विश्वचषक जिंकायला उपयोग झाला नाही. या स्पर्धेतल्या या २ सामन्यांवरून साहेबांच्या २००० धावा कशा वाया गेल्या ते लक्षात आलं असेलच.
अगदी... ईं. विरुध्धच्या
अगदी... ईं. विरुध्धच्या सामन्यात स्ट्रौस ने आणि काल आपल्या ऊर्वरीत संघाने साहेबांच्या दोन्ही शतकांचा कोळसा केला. साहेबांच्या विक्रमाच्या आकड्यात वाढ होते आहे पण आपल्या संघातील चक्रमादीत्त्यांमूळे फळ मात्र मिळत नाही- नियतीचा निष्ठूरपणा!
आणि म्हणे आम्हाला सचिन साठी कप जिंकायचाय... नानाची टांग यांच्या... सचिनने कप मध्ये खेळायला सुरुवात केली तेव्हा काही खेळाडू पाळण्यात होते- वय वाढलं पण यांचे पाय मात्र अजूनही पाळण्यातच. एव्हडे होवून देखिल पुढच्या सामन्यात सचिन ने पुन्हा शतक करावे ही करोडोंची अपेक्षा खांद्यावर घेवून त्याने खेळायचं... बाकीच्यांनी "साहेब तुम आगे बढो" म्हणत टाळ्या कुटायच्या आणि स्वताची वेळ आली की फाटली.....
sachin must think how much is enough? Anyone interested in the job of being india's Sachin Tendulkar?
"है कोई माई का लाल तो सामने आये".
(आपण पुढच्या फेरीत देखिल पोचलो नाही तर फार बरं होईल असं वाटतं... this is what the team deserves... सचिन ला फार दु:ख होणार नाही, एव्हाना त्याला सवय झाली असेल!)
काल धोनीचे दोन निर्णय
काल धोनीचे दोन निर्णय प्रकर्षाने चुकले....
एक म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये सिंगल्स काढुन लोअर ऑर्डरला एक्स्पोज केले.... हाणामारी चालत नसताना सिंगल्स काढून ५० ओव्हर्स खेळण्याचे त्याचे जस्टीफिकेशन दुसर्या साईडला बॅट्समन होते तोपर्यंत ठीक होते.... पण नेहरा वगैरे लोक आल्यावर स्ट्राइक स्वताकडे ठेवुन सेन्सिबली खेळला असता तरी ३१० पर्यंत पोचता आले असते!
आणि दुसरे म्हणजे ५०वी ओव्हर नेहराला दिली..... झहीरला ४९वी ओव्हर देण्याचा त्याचा निर्णय उच्च होता पण नेहरासारख्या बिल्कुल व्हरायटी नसणार्या बॉलरला लास्ट ओव्हर देण्यापेक्षा भज्जी किंआ युवी सुद्धा चालला असता.... लास्ट ओव्हर करायला लागणारा स्ट्रीटस्मार्टनेस नेहरा कडे नक्कीच नाही.... तो रनअप कडे चालला होता तेंव्हा उगाच ओव्हर काँफिडंट वाटत होता.... झहीर त्याला काहीतरी टीप देत होता.... पण नेहरा फारसा सिरीअस वाटला नाही!
पण बोलण्याच्या बाबतीत धोनी खरच स्मार्ट आहे.... त्याने त्याचे चुकीचे निर्णय छान डिफेन्ड केले!
सचिन काल मस्त अॅक्टीव्ह होता फील्डवर.... काहीवेळा तर असे वाटत होते की तोच कॅप्टन आहे
रैना बिचारा झोकुन देउन फिल्डींग करतो दर वेळेस... किती दिवस त्याला बदली क्षेत्ररक्षक ठेवणार.... पुढच्या सामन्यात त्याला कोहलीऐवजी खेळवला पाहिजे... बॉलिंग मध्ये अजुन एक ऑप्शन मिळेल!
काल पठाण फलंदाजीला आला तेंव्हा ड्रेसिंगरुममधील युवी आणि कोहली फार अस्वस्थ दिसत होते.... बहुतेक इतक्या अनुकुल परिस्थितीत धावा कुटण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत असतील.... पण संधी मिळाल्यावर माती खाल्ली दोघांनीही
नेहरा शेवटची ओव्हर टाकत असताना, श्रीशांत सगळी लॉकेटस हातात घेउन प्रार्थना करत होता.... देवाने ऐकली बहुतेक त्याची प्रार्थना
>>देवाने ऐकली बहुतेक त्याची
>>देवाने ऐकली बहुतेक त्याची प्रार्थना. ह. ह. ग. लो.
बाकी काल मुनाफ ला आफ्रिकेचे खेळाडू चक्क रिव्हर्स स्विप मारत होते... मुनाफ म्हणून चवताळला!
(म्हातारी मेल्याचे दु:ख नाही..... )
भारतीय टिमला एक गुन्हा माफ...
भारतीय टिमला एक गुन्हा माफ...
<< आपण काल हरलो ते
<< आपण काल हरलो ते गोलंदाजांमुळे नसून ३९.४ षटकात १ बाद २६७ अशा अत्यंत भक्कम स्थितीतून पुढच्या ५४ चेंडूत फक्त २९ धावा करून उरलेले ९ गडी गमाविले आणि त्यामुळे आपण हरलो. >> व << मुनाफ, नेहरा वगैरेंना यॉर्कर प्रकारचे चेंडू टाकायला त्यांच्या प्रशिक्षकांनी शिकविले नसावे. काल मलिंगा असता तर त्याने सर्व ६ चेंडू यॉर्कर टाकून आफ्रिकेचे उरलेले तीनही फलंदाज बाद केले असते. तसेच प्रत्येक षटकात एक बाऊन्सर टाकायला परवानगी असते. पण आपले गोलंदाज क्वचितच बाउन्सर टाकताना दिसतात. >> मास्तुरेजी, या तुमच्या दोन विधानातला विरोधाभासच काय दर्शवतो ? चेंडू खाली रहात असलेल्या, खास स्विंग/स्पीन होत नसलेल्या खेळपट्टीवर २९६ ह्या स्कोअरचा पाठलाग करणं अशक्य नसलं तरी सोपं नव्हतं; आपल्या गोलंदाजीने ते सहज साध्य करून दिलं, असं मला अजूनही वाटतं. द.आफ्रिकेने खेळाचा नूर व खेळपट्टी पाहून योग्य वेळी फलंदाजीचा पवित्रा बदलला व आपल्या गोलंदाजांकडे [ झहीर वगळतां] त्याचं कांहीच उत्तर नव्हतं. आपला डाव उत्तरार्धात कोसळला हें आपल्या गोलंदाजीच्या ढिसाळपणाचं समर्थन व हरल्याचं मुख्य कारण आहे , हें म्हणूनच मला तरी पटत नाही.
आपल्याकडे अगदी खरेखुरे "जलद"गती किंवा झहीरसारखे प्रभावी गोलंदाज नसतील - नाहीतच - तर उपखंडातील या विश्वचषकात फिरकीचा हुषारीने उपयोग करून घेण्याला पर्याय नाही; फलंदाजी कितीही चांगली असली- आहेच- तरी केवळ त्यावर विसंबून सामने जिंकणं - विश्वचषक दूरच - यापुढे अशक्य आहे, हे माझं मत कालच्या सामन्याने अधिकच पक्कं झालंय.
<< त्यावरून त्याचा कप्तान म्हणून आलेख या मालिकेत/स्पर्धेत कसा ऊतरतो आहे हे मात्र स्पष्ट आहे: >> योगजी, धोनीबद्दलच्या आपल्या विश्लेषणाशीं बव्हंशी सहमत.
(No subject)
आई गं! २४ तासांनी इथे आले तर
आई गं! २४ तासांनी इथे आले तर तब्बल २०७ नवीन पोस्टी !!
भाऊ, भारीच कार्टून !!
भाऊ मस्तच...
भाऊ मस्तच...
भाऊ, मस्त. भारतीय संघात
भाऊ,
मस्त.
भारतीय संघात नोकरभरती:
१. पॉवरप्ले स्पेशालिस्ट
२. शेवटचे षटक स्पेशालिस्ट
३. क्षेत्ररक्षण स्पेशालिस्ट (११ जागा रिकाम्या!)
४. बडबड स्पेशालिस्ट (मोरे, जडेजा यांची दुसरी पिढी काय करते?)
५. हूक स्पेशालिस्ट (अमरनाथ फॅक्टरी बंद पडली काय ?)
६. यॉर्कर स्पेशालिस्ट (वसिम भाई आणि मंदीरा चा टाका भिडला तर?)
७. भ आणि म ची बाराखडी तोंडपाठ असे शिवी स्पेशालीस्ट (कोहली कडे क्रॅश कोर्स)
वरीलपै़की कुठल्याही जागांसाठी आवश्यक अनुभव नसेल तर ऊमेदवार कप्तान पदासाठी अर्जास पात्र ठरेल!
या स्पर्धेत धोनीची कर्णधार व
या स्पर्धेत धोनीची कर्णधार व फलंदाज म्हणून कामगिरी सुमार आहे. यष्टीरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी अॅव्हरेज आहे. संघात दुसरा यष्टीरक्षक नसल्याने तसेच कर्णधार बदलता येत नसल्याने त्याला सध्यातरी पर्याय नाही. रॉबिन उथप्पा व पार्थिव पटेल हे पर्यायी यष्टीरक्षक-फलंदाज संघात नाहीत. त्यांचे यष्टीरक्षण त्याच्या तोडीचे आहे, पण त्यांची फलंदाजी त्याच्यापेक्षा कदाचित कांकणभर सरसच ठरेल. तो कर्णधार नसता आणि त्यांच्यापैकी एखादा संघात असता, तर धोनीला बाहेर बसविले असते. कदाचित धोनीने जाणूनबुजूनच त्यांना संघात येऊ दिले नसावे.
>>त्यांचे यष्टीरक्षण त्याच्या
>>त्यांचे यष्टीरक्षण त्याच्या तोडीचे आहे,
नाही हो... ते फारच वाईट्ट आहेत. त्यापेक्षा धोणी यष्टीरक्षक कप्तान म्हणून नक्कीच परवडला.
<< भारतीय संघात नोकरभरती: >>
<< भारतीय संघात नोकरभरती: >> योगजी, यावरून एक किस्सा आठवला;
माझ्या एका क्रिकेटर मित्राला कॉलेजच्या क्रिकेट "नेटस"वर मार्गदर्शनासाठी बोलावलं होतं. त्याला सांगितलं गेलं कीं २००हून अधिक विद्यार्थ्यांची नांवं आली आहेत. माझ्या मित्राने कॉलेजमधेच त्या सगळ्याना भेटून अर्ध्या तासात फक्त २० मुलं नेटसाठी निवडली. प्राचार्य चकीतच झाले; मित्राने त्यांच कुतूहल शमवलं, "मी प्रत्येकाला बॅटींग कीं बोलींग, असं विचारलं; ज्यानी "ऑलराऊंडर" उत्तर दिलं, त्यांच्या नावावर काट मारली ! खरोखरीच त्यातला एखादा चांगला ऑलराऊंडर असेलच, तर तो बोंबलत येणारच ना नेटवर !".
तात्पर्य - ज्यांच सगळंच कच्चं तेही ऑलराऊंडर व जे सगळ्यात वाकबगार तेही ऑलराऊंडर !!
इति स्पेशालीस्ट महात्म्यम ||
भारताचा संघ जिंकता जिंकता
भारताचा संघ जिंकता जिंकता हरला. वाईट वाटले.
पण माझ्या मते 'त्या शेवटच्या दहा' षटकांचा नीट अभ्यास केला पाहिजे. काय चुकले? इतका वेळ आरामात फलंदाजी करणारे लोक एव्हढ्या लवकर कसे बाद झाले? गोलंदाजी कोणत्या प्रकारची होती? ती एकाएकी अगदीच या जगावेगळी झाली का? फलंदाजीला आलेल्यांना संघनायकाने काय सूचना दिल्या होत्या? बाद झालेल्यांचे काय म्हणणे आहे? सगळ्यांनीच कश्या चुका केल्या असतील? निदान ६ बाद झाल्यावर तरी जरा विचार करायला पाहिजे होता, की काय चालले आहे? धोणी तर तिथेच विकेटवर होता, त्याने काय पाहिले? त्याप्रमाणे येणार्या फलंदाजांना काही सूचना दिल्या की नाही?
माझ्या मते या सर्वांचे कारण क्रिकेटमधे मधे दडले नसून काही इतरच साधे असावे, जसे पॅव्हिलियनमधे खायला काही तरी स्पेशल आणले असावे, ते इतर लोक खाऊन टाकतील, त्याच्या आधी लवकर परत गेले पाहिजे, किंवा कुणि सुंदरी थोड्या वेळापुरती भेटायला आली आहे, ती परत जाण्यापूर्वी एकदा तरी तिच्याबरोबर फोटो काढावा, म्हणून.
शेवटी तरुण मुले ती! असे मोह होणारच!!
:),
<< ... काही तरी स्पेशल आणले
<< ... काही तरी स्पेशल आणले असावे, ते इतर लोक खाऊन टाकतील, त्याच्या आधी लवकर परत गेले पाहिजे >>झक्कीजी, कदाचित, " ५० ओव्हर्स संपत आल्या आहेत, त्यापूर्वी जरा मैदानावर जाऊन आले पाहिजे" असंही असेल; शेवटी लाडावलेली तरुण मुलेच तीं, अधूनमधून मैदानावर जावंसं वाटणारच !!!
अरे आजच्या मॅचबद्दल काहीच
अरे आजच्या मॅचबद्दल काहीच चर्चा नाही !!!!! इतका धसका घेतला का सगळ्यांनी..
>> नेहरा शेवटची ओव्हर टाकत
>> नेहरा शेवटची ओव्हर टाकत असताना, श्रीशांत सगळी लॉकेटस हातात घेउन प्रार्थना करत होता.... देवाने ऐकली बहुतेक त्याची प्रार्थना <<
बाकी पत्रकार परिषदेतील धोनी पाहून त्याने आपले भविष्य ओळखले आहे आणि पुढची सोय करत आहे असे पक्के वाटते. राजकारणात त्याला उज्ज्वल भवितव्य आहे. भाकरी फिरवण्यात पटाईत
>> या स्पर्धेत धोनीची कर्णधार
>> या स्पर्धेत धोनीची कर्णधार व फलंदाज म्हणून कामगिरी सुमार आहे.
मास्तरा, भारत हरल्याचा राग धोनीवर नको काढूस! जिथे सचिन सकट सगळ्यांनी विकेटी फेकल्या तिथे धोनी बिचारा काय करणार? A captain is as good as his team. माझ्या मते धोनी आपला आत्तापर्यंतचा सगळ्यात चांगला कॅप्टन आहे. बॅट्समनांनी हाच मूर्खपणा इंग्लंडच्या वेळेला पण केलाच होता. तेव्हा बोध घेतला नाही. तेव्हा फिल्डिंग चांगली करायला पाहीजे असा बोध घेतला. त्यामुळे या वेळी कधी नव्हे ते सचिन पण डाईव्ह टाकून चेंडू अडवत होता. हे त्याला इतकी वर्ष क्रिकेट खेळल्या नंतर का समजलं? का तो आपला फिटनेस जास्त बघत होता? असो. पण तो मस्तच खेळला. आणि शेवटची ओव्हर हरभजनला द्यायला पाहीजे होती असं मलाही वाटतं. अर्थात् द. आफ्रिकेला त्याच्याही बॉलिंग वर रिस्क घेण्याशिवाय पर्याय नव्हताच. काय झालं असतं त्याचा विचार करण्यात आता काही पॉइंट नाही.
एका दृष्टीने हरलो हे चांगलच झालं. शेवटच्या १० ओव्हरीत कसं खेळावं हे समजलं असाव असं वाटतय. शिवाय खरे चोकर्स कोण हे ही ठळक झालं!
आता तर मला वे. इंडिज विरुद्ध पण हरू अशी भीती वाटायला लागली आहे. वे. इंडिजची बॅटिंग खात्रीशीर नाही वाटत आहे सध्या म्हणून वाचतील एखादे वेळेस.
सचिन ऑल टाईम ग्रेट आहे....
सचिन ऑल टाईम ग्रेट आहे.... त्याने जे काही केलय संघासाठीच नव्हे तर खेळासाठी सुद्धा... त्याला तोड नाही...
त्याने विकेट "फेकण्या" पुर्वी केलेले १११ रन्स ... त्याचा स्ट्राइक रेट आणी धोनी व त्याच्या पिल्लांना दिलेला बेस विसरता येणार नाही....
सचिनच्या एकट्याच्या बळावर जिंकण्याची अपेक्षा करण्यापेक्षा धोणीने खेळाडु म्हणुन केलेली सुमार कामगीरी आणी कर्णधार(?? हे हे) म्हणुन घेतलेले "शेणखाउ" निर्णय ह्याना शिव्या हासड्ल्याने थोडं तरी बर वाटेल बहुतेक भारतीयांना
बाकी काहीही असो
सध्याचा भारतीय संघ चषक जिंकण्याच्या लायक आहे अस वाटत नाही.......
कांगांरुं कडे लक्ष देतय का जरा कोणी गपचुप निघुन जातील ओवर हॅट्रिक करुन....
सामनामधील द्वारकानाथ संझगिरी
सामनामधील द्वारकानाथ संझगिरी यांचे लेख आपण वाचतच असाल, पण मला तरी हा भाग भारताच्या फ़लंदाजीवर यॊग्य टिपण्णी करणारा वाटतो,
काल मॅच संपल्यावर मला एक एसएमएस आला.
सचिन म्हणाला, ‘‘चहा घ्यावासा वाटतो.’’
गंभीर : तू पाणी ठेव. मी चहाची बुकी (चायपत्ती) घेऊन येतो.
युसूफ : अरे थांब, मी पण येतो.
युवराज : अरे माही, ते सर्व चहा पितायत. चल, तिथे ड्रेसिंग रूममध्ये जाऊया.
धोनी : अरे थांब!
युवराज : नाही. मी चाललोय.
विराट : सॉरी माही, पण चहाची तलफ मलाही आलीए.
भज्जी : अरे, ही मंडळी बिस्किटं पण संपवतील. चल, मी जातो.
धोनी : अरे, असे सर्व गेलात तर आपल्याला जाहिरात नाही मिळणार. मी नॉटआऊट राहणार.
झहीर-नेहरा-मुनाफ : आम्हाला जाहिरातीत पाहिल्यावर लोक टीव्ही बंद करतात. त्यापेक्षा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये जाऊन चहा बिस्किटं खातो.
’कप्तान’ धोनीचे निर्णय चुकले असतील/नसतील, पण एक प्रमुख "फ़लंदाज" म्हणून धोनीने तळाच्या फ़लंदाजांना सांभाळून घेतले नाही हि त्याची चूकच झाली, कारण त्यावेळेस "फ़लंदाज" धोनीचीच गरज होती. असे आपले माझे मत.
आता सहज इंग्लड विरुद्ध बांगला
आता सहज इंग्लड विरुद्ध बांगला देश बघत होतो. मला त्यांचा कॉनफिडन्स चांगलाच जबरी वाटतो. टॉप ऑर्डर चांगली आहे आणि शेपटीत सुद्धा दम आहे हे त्यांनी दाखवून दिले. संघ अंडरडॉग असला तरी पुढच्या दोन्ही मॅचेस त्यांच्या घरच्या टर्फ वर आहेत. साऊथ अॅफ्रिकाशी जिंकणे अवघड वाटले तरी अशक्य नाहीये. थोडक्यात पुढच्या दोन्ही मॅचेस ते (बांगला) जिंकले, आपण वेस्ट इंडिज बरोबर हरलो आणि वेस्ट इंडीज जर इंगलंडशी हारला तर आपली चौथ्या पोजिशनला इंगलंड्शी टाय! साऊथ आफ्रिका ८ पॉ (नेदरलँड ला हरवून), वेस्ट इंडिज ८ पॉ (भारताला हरवून, इंगलंड वि. हरुन), बांगला ८ पॉ (अफ्रिका आणि नेदरलँडला हरवून), भारत आणि इंग्ललंड ७ पाँ प्रत्येकी. अवघड आहे!
मला एक कळना कि आपण घरी बसुन
मला एक कळना कि आपण घरी बसुन ईतके तर्क-वितर्क काढतोय, आपल्या टीमला एव्हढं डोकं नसल का तेव्हड समजायला?
गौतम अरे त्यांना ही हे माहीत
गौतम अरे त्यांना ही हे माहीत आहे पण शेवटी मैदानात जे होतं ते होतं. हे मी आपलं सहज लिहीलं. भारत मुद्दाम हरला ( ) असं ही मी ऐकलय (साभारः माझे वडील) म्हणून सहज हे लिहीलं. थोडक्यात उप उपांत्य फेरीत जायचे सुद्धा वांदे होऊ शकतात आणि मुद्दाम हरणे वगैरे सगळं हव्वा आहे. मी आपलं काळजीनी लिहीलं, इथे येणारं पबलीक पुष्कळ जागरुक आहे.
मी आपलं काळजीनी लिहीलं, इथे
मी आपलं काळजीनी लिहीलं, इथे येणारं पबलीक पुष्कळ जागरुक आहे.>>तेच ना आपण लै काळजी करतोय
ते तर होणारच ना आता. आपली
ते तर होणारच ना आता. आपली टीम म्हंटली की काळजी ही आलीच. त्यात चर्चा करायला मजा येते म्हणुन तर इथे येतो.
आपली टीम अजुन प्रेशर खाली नीट खेळायच्या तयारीची नाही झाली. Nerves चा आपल्याला प्राबलेम आहेच. अब देखेंगे ह्या होता है.
जिथे सचिन सकट सगळ्यांनी
जिथे सचिन सकट सगळ्यांनी विकेटी फेकल्या तिथे धोनी बिचारा काय करणार >>
१११ चे काय? विकेट फेकली हे मान्य केले तरी धोनीला व इतरांना विकेट न फेकन्याची संधी होतीच की. आणि हे १११ अक्षरक्षः अफ्रिकेला तुडवून काढले आहेत. सचिन आपला १०० धावा काढतो आणि नंतर घसरगुंडी आणि मॅच हारणे. वर परत बरेच लोकं सचिनने १०० केल्या की आपण हारणार, असे स्टेटमेंट करत फिरत असतात. इंग्लंड सोबत पण शेवटी आणखी २० एक धावा निघाल्या असत्या आणि काल अजुन ८०! पण .... असो. बाकीचे बॅटसमन (खासकरून युवी सोडून नं ४ नंतरचे परफॉर्म कधी करणार?) दोन्ही मोठ्या संघासोबत सचिनने १०० + आणि धोनी???
धोनी इतर मॅच मध्ये का धावा काढत नाही मग? कर्णधार असला (मलाही कर्णधार म्हणून तो आवडतोच) तरी तो एक बॅटसमन आहेच ना? त्यालाही परफॉर्म करावे लागेलच.
Pages