गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आशा भोसलेच्या कॅसेटमधील "रातोंको चोरी चोरी बोले मोरा कंगना " हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही.

वर्षा भोसलेचे गाणे मी प्रत्यक्ष ऐकलेले आहे. तिचा आवाज आशापेक्षा, लतासारखा जास्त आहे. आशाने तिला या क्षेत्रात करियर करु दिले नाही.
शशि कपूरच्या जूनून सिनेमात, सावन कि आयी बहार रे, हे गाणे तिने गायलेय. रेकॉर्ड आशाच्या आवाजात आहे.

कालच, आशाचे गोरी बाहुली कुठून आली, कुशीमधे आईच्या हि कशी शिरली, हे गाणे बर्‍याच वर्षांनी ऐकले.
त्या काळात आशा, शब्द चावून गाणे म्हणायची, पण त्याची पण वेगळीच गंमत होती.

जिप्सी, तुझ्या ३ जाने. च्या पोस्टला हा प्रतिसाद-
>>>"होडी चाले लाटेवरी, कोण चालवे उमगे ना...." या एका गाण्याचा (उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या) मी उल्लेख केला होता. या गाण्याची चाल "माझे राणी माझे मोगा......" या गाण्यासारखीच आ>>>>>>
होडी चाले लाटेवरी, कोण चालवे उमगे ना हे गीत 'जानकी' मधलंच आहे, चित्रपटाची श्रेय नामावली - सुरुवात, याच गाण्यावर आहे.
'माझे राणी माझे मोगा' हे गीत 'महानंदा' चित्रपटातलं!

मी, मागे उल्लेख केला होता.
पुलंनी सादर केलेल्या एका कार्यक्रमाचे रेकॉर्डींग, अलूरकरांनी आणले होते. ४ सिडी होत्या त्यात. (मला ते आरतीने भेट दिले होते)
पुलंचे निवेदन (ते नीट ऐकू येत नाही ) आणि माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर, भीमसेन जोशी यांनी गायलेली नाट्यगीते, असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते.

आज यापैकी कुणीही कलाकार हयात नाही...

गिरीशजी, खुप खुप धन्यवाद या माहितीबद्दल :-). यागाण्याबद्दल आंतरजालावर खुप शोधत होतो पण माहिती मिळत नव्हती. आता पुन्हा एकदा जानकी चित्रपट पहायला पाहिजे. Happy

आशाने तिला या क्षेत्रात करियर करु दिले नाही.>>>> Sad

http://www.raaga.com/channels/marathi/moviedetail.asp?mid=MA000379

इथे छोटा गंधर्व यांनी गायलेल्या, पठ्ठे बापुरावांच्या दोन अप्रतिम रचना आहेत.
पठ्ठे बापूराव, आजचा वग उद्याला नाय, अशा बाण्याचे. अनेक रचना त्यांनी केल्या. या दोन्हीमधली शब्दकळा अवश्य ऐका (आणि जमल्यास लिहून घ्यायचा प्रयत्न करा.)

मल सलील कुलकर्णीच "या मोठ्याना काही काही , काही कळत नाही' या गाण्याचे शब्द हवे आहेत.

आशाने तिला या क्षेत्रात करियर करु दिले नाही

आशाची एक मुलाखत वाचलेली त्यात तिने 'वर्षाला गाण्याची खुप आवड होती, पण तिचा आवाज आणि त्याची मर्यादा ओळखुन तिने वेळीच पाऊल मागे घेतले' असे म्हटलेले. तिने आशाबरोबर जी काय एकदोन गाणी त्या कॅसेटमध्ये म्हटलीत त्यात मला तरी तिचा आवाज काही खास वाटला नाही. अर्थात हे मत व्यक्तीगत आहे आणि तसेही आशा/लताशी तुलना करता कोणाचाही आवाज बरा वाटणार नाही...

राधा मंगेशकरचा आवाजही तसा चांगला आहे, तिच्या आवाजात एक rawness आहे असे मला वाटते, पण दुर्दैवाने तिची तुलना लगेच तिच्या आत्यांशी केली जाते आणि मग सगळ्यावरतीच पाणी पडते.

आज सुमन कल्याणपूर यांचा वाढदिवस.
आपणा सगळ्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

सुमनताईंची काही गाणी ऑनलाईन इथे ऐकायला मिळतील. Happy

काल संध्याकाळी सह्याद्रीवर शंकर वैद्य अँकर होते. आणि अशोक बोरकर की कुणी बोरकरच होते...त्यांच्याशी चर्चा चालू होती.....बा भ. बोरकरांच्या कवितांवर! फारच उच्च दर्जाचा कार्यक्रम होता. हे बोरकर बा.भ. बोरकरांपैकी कुणी होते का? त्यांनी बा.भ. च्या सगळ्या कविता ओरिजिनल चालीत पाठ होत्या. थोडाच ऐकला पण चुटपुट लागली...वाटलं सगळा ऐकायला हवा होता.
त्यांनीही गडद निळे, सरीवर सरी आणि बरीच गाणी(कविता) गायली.

कार्यक्रम संपता संपता (सरीवर सरी )बा.भं.ची ओरिजिनल व्हेडिओ क्लिप दाखवली. डोळे आणि कान धन्य झाले.
काल कुणी ऐकलाय का हा कार्यक्रम?

मानुषी किती वाजता? रसग्रहणाच्या/मालिकांच्या धाग्यावर कुणीतरी या कार्यक्रमाबद्दल लिहिले होते. हा कार्यक्रम या आठवड्यात बरेचदा आहे का?

योगेश, मला नक्की आठवतय सुमन कल्याणपूरने काही ठुमर्‍यांचे (गैरफिल्मी) गायन केले होते.

"छायी घटा घनघोर, मोरे बालम" असे एका ठुमरीचे बोल होते. ही मी एकदाच ऐकली आहे, पण अजून आठवतेय.

या आठवड्यात ईप्रसारण इंटरनेट रेडीओवर पं भीमसेन जोशी यांच्यावर कार्यक्रम आहे, त्यात पंडीतजींच्या आवाजात सखी मंद झाल्या तारका (हो, सखी मंद झाल्या तारका ) ऐकता येईल.

याच आठवड्यात जोत्स्ना भोळे यांची गाणी पण ऐकता येतील. हि सर्व गाणी, त्यानी मैफिलीत गायली आहेत.
त्वरा करा, हे दोन्ही कार्यक्रम केवळ, याच आठवड्यात, म्हणजे भारतात रविवारपर्यंतच ऐकता येतील.

http://www.eprasaran.com

धन्यवाद दिनेशदा Happy
रच्याकने, पंडीतजींच्या आवाजातील सखी मंद झाल्या तारका हे गाणे माझ्या संग्रहात आहे. Happy

जिप्स्या धन्यवाद रे.. आज घरी गेल्यावर ऐकते. काल युटुबवर kadhI karishi lagna majhe शोधले पण सापडले नाही Sad तुझी लिन्क पाहिन आता.

फार पूर्वी एका कार्यक्रमात एक लोकगीत ऐकले होते "आंबा बाजला गो....आंबा बाजला ओबड धोबड" असे काहिसे शब्द होते. कुणाला माहित आहे का हे गीत कोणत्या अल्बम मधले आहे. मध्ये कुठेतरी वाचनात आले होते कि "महाराष्ट्राची लोकधारा" या अल्बममधले आहे. माझ्याकडे हा अल्बम आहे पण त्यात हे गाणे नाही. Sad
जर कुणाला माहिती असेल/कुणाकडे गाणे असेल तर प्लीज कळवा Happy
गाण्याचे बोल आणि चाल खुपच सुंदर आहे. Happy

आताच कधी करीशी.... ची फक्त सुरवात पाहायला मिळाली. त्यात सुरवातीलाच

आजकालच्या मुली हो आम्ही हवेतसे करणार,
आम्हाला कोण तुम्ही पुसणार?
आम्ही हवे तसे करणार...

हे गाणे आहे. मी दुरदर्शन्वर चित्रपट पाहिलेला तेव्हा ह्या मला गाण्याने खुपच प्रभावित केले होते. येताजाता घरातल्यांना हे गाणे ऐकवुन त्यांची तोंडे बंद करायचे Happy आता गाणे पहाताना अचानक जुन्या गोष्टी आठवल्या. आईलाही दाखवायला पाहिजे हा चित्रपट. ती खुप वैतागलेली ह्या गाण्यावर.... Happy

उघड दार देवा आता हे गाणे कुठे डाउनलोड करता येतिल.......

मराठी गाणी डाउनलोड करण्या साठी कोणती साइट आहे का.....जशी.........songs.pk

साधना, ते गाणे ४/१० व्या भागात आहे.
हि लिंक .
चित्रपटातही गाण्याचे एकच कडवे आहे Sad

रच्याकने, गाणे ऐकायला खुप छान वाटते. (मी पहिल्यांदाच ऐकले :() Happy या गाण्याचा तु का आग्रह करत होती ते गाणे ऐकल्यावर समजले. Happy

जिप्सी, मनापासून धन्स. तुमच्या या उपक्रमामुळे कित्ती कित्ती जुनी गाणी ऐकायला व वाचायाला मिळाली.
सर्वांचेच आभार ज्यांनी इथे गाणी व लिंक दिली

साधना, पद्मा चव्हाण होती ना त्यात ? भाग्यलक्ष्मी मधली पण गाणी छान होती. जयश्री गडकर आणि रमेश देव. जिवलग असता मज सांगाती, आळविते जयजयवंती, हे मधुबाला चावला यांनी गायलेले गीत तर खासच होते. असणार कुठेतरी नेटवर.

Pages