Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38
मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी नया नाम मुबारक. ५)
जिप्सी नया नाम मुबारक.
५) माझ्या नवर्यानं सोडलीया दारू बाई देव पावलाय गं.
रोशन(रुक्मिणी) सातारकर अगदीच विस्मरणातल्या नाहीत.
तिसर्या लावणीतल्या 'पतुर आलं रायाचं लिवलंय मोठं गमतीचं लाज मला वाटती सांगायला' या ओळी खासच.
तिसर्या लावणीतल्या 'पतुर आलं
तिसर्या लावणीतल्या 'पतुर आलं रायाचं लिवलंय मोठं गमतीचं लाज मला वाटती सांगायला' या ओळी खासच>>>>अगदी, अगदी
एक पाव्हणा कुठुनतरी आला भुलला
एक पाव्हणा कुठुनतरी आला
भुलला माझ्या गोर्या रंगाला
मी म्हटंल करू नकोस थाट
अशी लावली मी कैकांची वाट
मोठयामोठ्यांची केली मी दैना दैना दैना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
हि लावणी पण रोशन सातारकर यांनीच गायली आहे ना?
हो जिप्सी
हो जिप्सी
या आठवड्यात, पुलं एक संगीतकार
या आठवड्यात, पुलं एक संगीतकार असा कार्यक्रम ईप्रसारण वर चालू आहे. रामदास कामत यांनी गायलेली नाट्यगीते पण ऐकता येतील.
८) अहो राया माझी, अहो सख्या
८) अहो राया माझी, अहो सख्या माझी हौस करावी पुरी
९) पैठणचा शालु आज मला आणा गडे पतिराज.
माहितीबद्दल धन्स दिनेशदा
माहितीबद्दल धन्स दिनेशदा
भरत, हि दोन्ही गाणी कधी ऐकली नाही रे :(. धन्यवाद सांगितल्याबद्दल
पैठणचा शालु आज मला आणा गडे
पैठणचा शालु आज मला आणा गडे पतिराज.
हे गाणे मी ऐकलेय.. मस्त आहे एकदम.. (मी गुणगुणते कधीकधी, पण अजुन पैठणचा शालु काही मिळाला नाही )
पण अजुन पैठणचा शालु काही
पण अजुन पैठणचा शालु काही मिळाला नाही >>>>साधना, मिळेल हो, पतीराजांसमोर एकदा मोठ्याने गा.
मी मोठ्याने गायल्यावर काय
मी मोठ्याने गायल्यावर काय कोकलतेय ते ऐकायला पतिराज जागेवर राहायला पाहिजेत आधी
थोडं सुरात कोकल
थोडं सुरात कोकल
लताने गायलेलं "भय इथले संपत
लताने गायलेलं "भय इथले संपत नाही". कवी ग्रेस, सं. पं ह्रुदयनाथ मंगेशकर.
काय होतं हे गाणं लावलं की, माहित नाही. पण वेड्यासारखंच होतं. आणि ते वेडेपण हवंसं वाटतं.
गीतरामायणाबद्दल काय बोलावं!!
तरीही, "धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणे आश्रमा..." आणि "लीनते चारुते सीते..." अतिशय आवडतात.
"लीनते..." तर कितीही वेळा ऐकलं तरी तोच त्रास होतो.
"भय इथले..." मधली "सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला" ही ओळ ऐकली की "लीनते..." आठवतं!
रच्याकने, त्याची धून झंकारली रोमारोमांत
उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत
नेटवर असेल तर लिंक मिळेल का मला?
@दिनेशदा, _____/\_____
खूप खूप धन्यवाद इतकी छान माहिती देताय म्हणून..
रच्याकने, त्याची धून झंकारली
रच्याकने, त्याची धून झंकारली रोमारोमांत
उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत
नेटवर असेल तर लिंक मिळेल का मला?
>>>>>प्रज्ञा, मला संपर्कातुन ईमेल आयडी द्या तुमचा मी पाठवतो हे गाणे.
पुष्पा पागधरे यांनी गायिलेली
पुष्पा पागधरे यांनी गायिलेली ही तीन गाणी
१) अहो राया मला पावसात नेऊ नका (वसंत सबनीस? दादांच्या चित्रपटातलं- सोंगाड्या?)
२) आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफित मोकळ्या केसात ग - शांताबाई/ श्रीनिवास खळे
३) ग बाई माझ्या नथीचा तुटला फासा.
ही ओळ चार वेळा म्हटलीय. पहिल्या दोन ओळीत, नथीचा फासा तुटला, आता काय होणार/करायचे? अशी चिंतेत पडलेली बाई पुन्हा त्याच दोन ओळी म्हणताना चला या निमित्ताने अख्खा नवा सेट घडवता येईल म्हणून आनंदाने नाचतेय.
यातली यमकाची गंमत
काल दुपारी यमुनातीरी सडी एकटी मला पाहुनी शीळ घालितो कसा
की बाई माझ्या जिवाचा झाला ससा
त्याची धुन.......... कोणी
त्याची धुन.......... कोणी गायलेय?? बरीच वर्षे झाली ऐकुन. हल्ली मराठी गाणी ऐकायला मिळतच नाहीत कुठे... रेन्बो, एफेम गोल्ड वगैरे ठिकाणी ठराविक ३०-४० गाणी आहेत तीच सिडी आलटुन पालटुन लावतात. मी दर दिवशी सकाळी १०.१० ते ११ एफेम गोल्ड ऐकते त्यातले प्रत्येक गाणे आठवड्यातुन कमीतकमी दोनदा तरी रिपिट होतेच होते. विविधभारती फक्त घरातल्या रेडिओवर लागते, मोबाईलवर किंवा गाडीत लागत नाही
अर्थात कोणी म्हणेल सिडीवर
अर्थात कोणी म्हणेल सिडीवर कॉपी करुन ऐका की गाणी... पण मला सिडीपेक्षा रेडिओवर गाणी ऐकायला जास्त आवडते. सिडीवर आपल्याला माहित असते पुढचे गाणे कुठले वाजणार ते. पण रेडिओवर उत्सुकता असते पुढचे गाणे कुठले याची. शिवाय निवेदक गाण्याची माहिती सांगतो, ते सांगत असताना आपल्याला ते गाणे ओळखता येतेय का याचाही खेळ खेळता येतो मनातल्या मनात. आणि मग उत्तर बरोबर निघाल्यास आपल्याला बरीच माहिती आहे या भ्रमाचा आनंद होतो आणि चुकल्यास नवीन माहिती मिळाल्याचाही आनंदच होतो. एकुण सगळा आनंदी आनंदच.... म्हणुन मला रेडिओच जास्त आवडतो.
आला पाऊस मातीच्या वासात
आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफित मोकळ्या केसात ग - शांताबाई/ श्रीनिवास खळे
हे गाणे ऐकुनही बरीच वर्षे लोटली. इथे गाणी वाचताना मी गातगातच वाचते. काल संध्याकाळपासुन पैठणचा शालु गात होते, आता आला पाऊस गाईन..
त्याची धून: मंगला नाथ. साधना,
त्याची धून: मंगला नाथ. साधना, विविधभारतीपेक्षा आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर चांगली व वेगवेगळी मराठी गाणी ऐकायला मिळतात. रोज सकाळी ११:०५ ते १२ आणि रात्री (आठवड्यातून काही वार) १०:०० ला आपली आवड आणि १०:३० ला आठवणीतली गाणी. रात्री १०:३० ला कधी कधी अगदी ठेवणीतली गाणी असतात. पु लं नी गायिलेली किती गाणी आहेत हे मला अगदी अलीकडे या कार्यक्रमामुळे कळले.
तसेच रविवार दुपारी १२:०५ आठवणींच्या गंधकोषी मध्ये महिनाभर एकेका कलाकारासंबंधीच्या आठवणी आणि गाणी त्यांचे परिचित ऐकवतात. या महिन्यात पं अभिषेकींबद्दल विद्याताई , शौनक व मेखला बोलताहेत. पण मी २ रविवार मिस केलेत.
एफेमचे रेन्बोवर सकाळी ५ किंवा ६ पासून जुनी मराठी गाणी असतात. पण त्यांचे निवेदन बोअर आहे, त्यामुळे आमच्याकडे तेव्हा विविधभारती तेरे सुर मेरे गीत (युगुलगीते) व भूल बिसरे गीत.
अस्मिता किती नंबरवर लागते??
अस्मिता किती नंबरवर लागते?? १००.७ वर एफेम गोल्ड आणि १०७ वर रेन्बो लागते ना?? कधीमधी १०५.७ वगैरे कुठेतरी मराठी ऐकायला मिळते. पण ह्या चँनेलचे काही खरे नाही. बाजुला डोंगर जरी आडवा आला तरी ते बंद पडते.
रेन्बोवर ५-८ मराठी असतो कार्यक्रम. ५-६ भक्तीगीते, ६-७ भावगीते आणि ७-८ चित्रपट्/नाटक इ.इ. बाकीचे सगळे. पण तिथेही दोनच सिड्या ऐकवतात आलटुन पालटुन. 'आज प्रितीला पंख हे लाभले रे' हे तर मी आठवड्यातुन तिनदा तरी ऐकते. अर्थात पुर्ण ७तही दिवस मी ते ऐकेन. गाणे सुंदर आहे. पण इतरांना नको का चान्स??? आणि ह्या चेनेलची गंमत म्हणजे सकाळी ७-८ जी गाणी लावतात त्यातली दोन तरी हमखास परत सखी मध्ये ऐकवतातच.... रेडिओवर काय दुष्काळ पडलाय गाण्यांचा देवास ठावके.
अस्मित वाहिनी मिडियम वेव्ह वर
अस्मित वाहिनी मिडियम वेव्ह वर (जिथे विविधभरती लागते त्याच) विविधभारती ११८८ khz तर अस्मिता ५५८ khz.
रेन्बो आणि गोल्ड वरचे आर्जेज आळशी असतील, किंवा त्यांनी स्वतःच ही जुनी गाणी ऐकली नसतील.
विविधभारतीवरचे मराठी गाण्यांचे कार्यक्रम पण आता नवे नसतात. निवेदनासकट रेकॉर्डेड पुन्हा पुन्हा ऐकवतात.
मला पण सिडीपेक्षा रेडीओवर
मला पण सिडीपेक्षा रेडीओवर गाणी ऐकायला आवडतात. एखादा उत्तम निवेदक असेल तर तो गाण्यांची खुमारी वाढवतो. अनेक देशात आता एफ एम वर हिंदी गाणी ऐकवतात. पण मराठी साठी मला तरी ईप्रसारण शिवाय पर्याय नाही.
सरप्राईज एलिमेंट मिळवण्यासाठी मी शफल ऑप्शन वापरतो. धिंगाणा डॉट कॉम आणि इन डॉट कॉम वर बर्यापैकी गाणी आहेत. इन वर मला, ज्योत्स्ना मोहिले, यांच्या आवाजात, सोहम हर डमरु बाजे, हि मंदारमाला मधली चीज सापडली. किर्ती शिलेदारच्या आवाजातल्या, राधिके तूने कैसे जादू किया, आजा रे मनमोहन शाम, बलमा आये रंगीले या तिन्ही चीजा सापडल्या. इथे मांडला इष्कबाजीचा अन शृंगाराचा हाट, हि भन्नाट लावणी पण सापडली. कल्याणी देशमुखांच्या आवाजातले, लपविला लाल हे संगीत स्वयंवर मधले गाणे पण सापडले.
बिर्हाड बाजलं, या नाटकातले, माझ्याच पावलांची, हे नाट्यगीत मला यू ट्यूब वर सापडले. (आरती नायक यांच्या आवाजात.)
पण.. अशोक सराफच्या जागी अजुन
पण.. अशोक सराफच्या जागी अजुन दुसर कुणीतरी हव होत.<<< तू हि चालला असतास.
क्या बात है, आवडती गाणी अन त्यावर इतकी चर्चा. सहिच रे योग्या.
अशोक सराफ वरुन आठवले. घातली
अशोक सराफ वरुन आठवले.
घातली ओटीत मुलगी विहिणबाई
सांभाळ करावा हिच विनवणी पायी
हे आशा भोसले चे जूने भावगीत आठवत असेलच. त्याचे विडंबन आशाच्याच आवाजात, घातला ओटीत मुलगा विहिणबाई, असे अशोक सराफच्या एका चित्रपटात होते. ते बहुतेक सुलोचनाबाईंच्या तोंडी होते आणि सासूच्या भुमिकेत पद्मा चव्हाण !! (चित्रपण कदाचित सासु वरचढ जावई असेल.)
***
दसरा गेला, दिवाळी आता, येईल उद्या परवा
राया मला जरतारी शालू आणा, पैठणचा हिरवा
अशी पण एक लावणी आठवतेय.
चित्रपण कदाचित सासु वरचढ जावई
चित्रपण कदाचित सासु वरचढ जावई असेल
गाणे आठवत नाही, पण चित्रपट पाहिलाय
भरत धन्यवाद. अस्मिता म्हणजे तीच ना जिथे कामगार विश्व, आपली आवड वगैरे लागायचे? नंबरावरुन तरी वाटतेय तसे. तिथे शास्त्रिय कार्यक्रमही खुप लागतात. माझ्या घरातल्या मंडळींना डोळ्यासमोर टिवीची हलती चित्रे असल्याशिवाय घरात असल्यासारखे वाटत नाही. आणि रेडिओ लावला तर फक्त एफेमवर आतिफास्लमचे रेकणे ऐकायला आवडते. रेडिओ आणि तोही mw मला घरात एकटी असतानाच लावता येईल (सकाळी आमच्याकडे मारामारी असते, माझे १००.७ आणि घरातल्यांचे ९१.१ स्पर्धा )
तुम्ही टाकलेले चार होत्या पक्षिणी त्या .. वाचले. ब-याच वर्षांपुर्वी एकदाच ऐकलेले. पण चाल अजुन लक्षात आहे.
ही ओळ चार वेळा म्हटलीय.
ही ओळ चार वेळा म्हटलीय. पहिल्या दोन ओळीत, नथीचा फासा तुटला, आता काय होणार/करायचे? अशी चिंतेत पडलेली बाई पुन्हा त्याच दोन ओळी म्हणताना चला या निमित्ताने अख्खा नवा सेट घडवता येईल म्हणून आनंदाने नाचतेय.>>>>>>भरत, मस्तच रे
पण मला सिडीपेक्षा रेडिओवर गाणी ऐकायला जास्त आवडते. सिडीवर आपल्याला माहित असते पुढचे गाणे कुठले वाजणार ते. पण रेडिओवर उत्सुकता असते पुढचे गाणे कुठले याची>>>>>साधनाला १००० मोदक
दिनेशदा, मागे एकदा मला आंतरजालावर फिरताना पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातले "सखी मंद झाल्या तारका" हे गाणी सापडले.
अशोक सराफच्या जागी अजुन दुसर कुणीतरी हव होत.<<< तू हि चालला असतास.>>>>>तुला-मला लाख चालेल रे पण कुणी घेतलं पाहिजे ना ;-).
अशोक सराफच्या जागी अजुन दुसर
अशोक सराफच्या जागी अजुन दुसर कुणीतरी हव होत.<<< तू हि चालला असतास.>>>>>तुला-मला लाख चालेल रे पण कुणी घेतलं पाहिजे ना .
कुणी कशाला घ्यायला पाहिजे?? आपल्या खिशात पैसे असले की घेतात सगळेजण.. मराठीत कित्येकजण असेच एकेका चित्रपटाचे हिरो झालेत. उमा भेंडेचा नवरा नाही चमकला चारपाच स्वनिर्मितीत??
साधना
साधना
योग्या.. तूला न चालायला काय
योग्या.. तूला न चालायला काय झालं. ज्ञानेश्वरांनी तर भिंत चालवली होती.
रच्याकने,
रेडीओवर मराठी भावसंगीत कधी असतं. मी फक्त जूनी हिंदी गाणीच ऐकतो रेडीओवर.
हो साधना, अस्मिता म्हणजे तीच
हो साधना, अस्मिता म्हणजे तीच आधीची मुंबई ब. मुंबई अ चे आता संवादिका झालेय.
सखी मंद झाल्या तारका आधी भीमसेनजींच्याच आवाजात रेकॉर्ड झाले होते. पुणे आकाशवाणीवर . एचेमव्हीची रेकॉर्ड सुधीर फडकेंच्या आवाजात. पुणे आकाशवाणीवर परवीन सुलताना यांचे पण एक मराठी गाणे रेकॉर्ड झाले होते (सुधीर मोघेंच्या लोकसत्तातल्या लेखात त्यांनी लिहिलेले).
<<पण मला सिडीपेक्षा रेडिओवर
<<पण मला सिडीपेक्षा रेडिओवर गाणी ऐकायला जास्त आवडते...................एकुण सगळा आनंदी आनंदच.... म्हणुन मला रेडिओच जास्त आवडतो.>>
साधना, सेम्म टू सेम्म !!
सध्या ' सांज ये गोकुळी ' आणि ' झिनी झिनी वाजे बिन ' ने झपाटलंय !!
सांज ये गोकुळी ऐकताना अक्षरशः गोकुळ उभं राहिल्यासारखं वाटतं. वासरांच्या ओढीने धावणार्या गायींमुळे उडणारी धूळ उडतेय असा भाससुद्धा होतो मला :अओ:...... Hallucinations!
शब्दांची ताकद, आशाच्या आवाजाची जादू की संगीताचा परिणाम....माहीत नाही. पण प्रचंड आवडतं हे गाणं !:)
Pages