गंगामाई..
गेल्या वर्षी व्हॅलीचा ट्रेक केला. व्हॅली, हेमकुंड, हिमाचलात काढलेले दहा दिवस कधी आयुष्यात विसरेन असे वाटत नाही. काही काही योग आयुष्यात असावे लागतात, आणि जेह्वा अचानक असे ते पदरात पडतात, तेह्वा ती अनुभूती शब्दांत मांडणे खरे तर अशक्य. हिमालयाचे कडे, पहाड सामोरे येण्याआधीही इथे हरिद्वारला सामोरी आली ती गंगामाई. आतापरेंत गंगामाईबद्दल बरेच काही ऐकले, वाचले होते, पण जेह्वा तिला पाहिले, तेह्वा ऐकणे, वाचणे किती फोल होते, ते अगदी जाणवले. गंगामाईने खरेच वेड लावले, आणि आता ते कधी कमी होईल असे वाटत नाही. होऊही नये, ही प्रार्थना. हे सारे मी अतिशय भारावून जाऊन लिहिले आहे, हे मलाही जाणवते.