"अहो, आपण गणपती बघायला जाऊयात ना!" इति सौ. उवाच.
"जाऊ ना, आपल्या एरियात खूप सारे गणपती आहेत. चालत चालत बघितले तरी तासाभरात आटोपतील".
"इथले नाही काही, पुण्यातले! आपल्या सांगवीत असून असून किती गणपती असणारेत?"
"पुण्यातले? शक्य आहे का?"
"का, काय झालं? पुण्यात गणपती नाहीयेत का?"
"आहेत ना, पण मरणाची गर्दी आहे!"
"मग काय झालं? आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी पार्क करु आणि बघू गणपती!"
"थांब मला विचार करु दे!"
जय जय लंबोदरा
जय जय लंबोदरा
आदीदेव तू विद्यासागरा
लवकरी ये संकटहरा
जय जय लंबोदरा ||धृ||
विनंती आमची तुझीया ठायी
करीतो आर्जव नमीतो पायी
सकल कार्य नेई सिद्धीस
आशिर्वाद देण्या त्वरा करा ||१||
रूप अन गुण तुझे कितीक वर्णू
मुढ बालके आम्ही, तू कृपासिंधू
फळ द्यावया कष्टास आमच्या
करीतो आम्ही तुझा पुकारा ||२||
जय जय लंबोदरा
आदीदेव तू विद्यासागरा
लवकरी ये संकटहरा
जय जय लंबोदरा ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०६/२०११
माध्यम : जलरंग
मुळ कलाकार : दाभोळ्कर अरुण
गणपती बाप्पा जेम्वा आले घरी
सारे वातावरण झ्हाले एकदम सही
बाप्पा बसण्या आधीपासूनच होती
मोदक खायची आमची घही
बाप्पांच्या पूजेचा तयारी मध्ये
आई ची धांदल असतेच म्हणा
आरतीच्या प्रसादाची आमची मागणी
"बाबा चितळ्या न कडून बाखरवडी आणा " [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ]
बाप्पांच्या आरतीला दिला प्रत्तेकाने
मस्त टाळ्या न चा सुरेल कोरस
आरतीचे ताम्हण जरी हातात नसले
तरी घंटी वाजवायला होती आमची चुरस
बाप्पांची भक्ती करण्याचा
सार्वजनिक मंडळांचा होता वेगळाच थाट
सकाळीच तेवढी लता बायींची रेकॉर्ड
अन दिवसभर हिमेश ची गाणी भन्नाट
सर्वप्रथम माफ करा, कारण गणेशोत्सव चालु व्हायच्या आधी हि माहिती विचारतोय.
यावर्षी अमेरिकेत घरीच गणपती बसवायचा आहे (ब्लुमिंग्टन, ईलिनॉय), स्टोअरमध्ये चौकशी केल्यावर मातीचिच मुर्ती मिळेल अस समजले. तर अनंत चर्तुर्दशीला तो कुणीकडे विसर्जन करणे योग्य होईल? ईकडे लेक, वगैरे मध्ये विसर्जन करण्याची परवानगी आहे का?
जाणकारांनी क्रूपया मार्गदर्शन करावे.