Submitted by गौतम७स्टार on 27 August, 2010 - 00:57
सर्वप्रथम माफ करा, कारण गणेशोत्सव चालु व्हायच्या आधी हि माहिती विचारतोय.
यावर्षी अमेरिकेत घरीच गणपती बसवायचा आहे (ब्लुमिंग्टन, ईलिनॉय), स्टोअरमध्ये चौकशी केल्यावर मातीचिच मुर्ती मिळेल अस समजले. तर अनंत चर्तुर्दशीला तो कुणीकडे विसर्जन करणे योग्य होईल? ईकडे लेक, वगैरे मध्ये विसर्जन करण्याची परवानगी आहे का?
जाणकारांनी क्रूपया मार्गदर्शन करावे.
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मित्रहो, आपल्या प्रतिसादाच्या
मित्रहो, आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे, धन्यवाद!!!
गौतम, तुमच्या इथल्या हिन्दु
गौतम,
तुमच्या इथल्या हिन्दु टेम्पल मधे चौकशी करा.
अम्ही बे एरीयात असताना लिव्हरमुर टेम्पल मधे लोक घरातल्या गणपतीची विसर्जनाची पूजा करून मूर्ति मंदिरात नेऊन द्यायचे, मग एक मोठी बोट करून मंदिरा तर्फे सॅन फ्रान्सिस्को ला न्यायचे मूर्ति विसर्जना साठी.
.
.
दीपांजली आणि मंजिरी,
दीपांजली आणि मंजिरी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
जरुर 'विसर्जन' हा बदल केलाय...
दीपांजली, ईकडे प्युरिया मंदिरात चौकशी केली असता ते नाही म्हणाले ( जर त्यांच्या मंदीरातुनच मुर्ती घेतली तर त्यांच्याकडे परत नेऊन देता येते) आमची ऑलरेडी मागच्या ऊत्सवाची मुर्ती आहे, आणि यावेळी नवीन घ्यायची आहे. जवळपास समुद्रकिनारा नसल्याने बोटचाही ऑप्शन नाही.
नुकतीच कोण्या पेपरमध्ये बातमी होती कि फ्रेमाँट, कॅलीफोर्निया येथे लोकांनी अमेरिकन सरकारची परवानगी घेतली आहे? कोणाला काही आयडिया?
अमेरिकेत गणपती विसर्जन कुठे
अमेरिकेत गणपती विसर्जन कुठे करावे?>>>
माझ्या मते अमेरिका काय किंवा भारत काय गणपती विसर्जन हे पाण्यातच करायला हवे.
गौतम, एक गोष्ट सुचवली तर राग
गौतम, एक गोष्ट सुचवली तर राग नका मानू. भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व. जर मुर्ती मातीची असेल तर घरच्या घरी विसर्जन (टब्/बालदी मधे) करु ते पाणी गार्डनला (जर तुळस असेल तर थोड तुळशीला) घालूनही विसर्जन करता येईल (मातीची मुर्ती पाण्यात पुर्ण बुडू शकेल इतपत मोठा टब हवा मात्र. अशी मातीची मुर्ती बहुतेक तरी एका दिवसात पाण्यात विरघळते) आम्ही आमच्या घरी (डोंबिवलीला) असेच विसर्जन करतो पण आमची मुर्ती धातूची आहे, ती विसर्जन झाल्यावर काही वेळाने काढून पुसुन ठेवतो. आम्ही ते पाणी तुळस आणि इतर झाडांना घालतो.
कविताने लिहिलय तसं विसर्जन पण
कविताने लिहिलय तसं विसर्जन पण बरेच लोक करतात यु.एस मधे.
ह बा प्रश्नाचा रोख कुठे
ह बा

प्रश्नाचा रोख कुठे विसर्जन करायचे असा आहे,कशात असा नाही.
चूभूदेघे
जर मुर्ती मातीची असेल तर
जर मुर्ती मातीची असेल तर घरच्या घरी विसर्जन (टब्/बालदी मधे) करु ते पाणी गार्डनला (जर तुळस असेल तर थोड तुळशीला) घालूनही विसर्जन करता येईल>>>
खूप छान उपाय आहे. अगदी सर्वांनी आवर्जुन अवलंब करावा असा. हा उपाय मी सर्व परिचीतांना मेल करतो आहे.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद
गौतम, एक गोष्ट सुचवली तर राग नका मानू. भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व >> आजिबात नाही दुखावल्या, चांगला उपाय आहे, आम्ही त्यासाठी मुद्दाम्हुन मातीची मुर्ती घेणार होतो, प्लॅस्टर ऑफ पॅरीसची विरघळत नाही म्हणुन...काही दुसरा उपाय नसला तर हा फायनल करतो...:-)