चित्रपट आस्वाद
संहिता
कथा कधीच एखाद्या सुंदर महालासारखी बांधून ठेवता येत नाही. कुणीतरी असा महाल बांधावा आणि मग वाचकांनी/प्रेक्षकांनी त्यातून फेरफटका मारून वाह वाह म्हणून निघून जावं, हा कदाचित चांगल्या कथेचा पराजय आहे. कथा जगणारे, अनुभवणारे, भोगणारे, कथेचे साक्षीदार-- लेखक, आणि कथेचे वाचक हे सगळे मिळून ती कथा सतत बांधत असतात. आणि कथेच्या या प्रवासातले सगळे हमसफर त्या कथेत आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या कथा मिसळत असतात. सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर दिग्दर्शित 'संहिता' हा चित्रपट एका गोष्टीच्या या प्रवासाचं अचूक रेखाटन करतो.
देऊळ
नुकताच 'देऊळ' हा चित्रपट बघितला. खरंतर मी खूप दिवसात नाना पाटेकरचा कुठलाच चित्रपट बघितला नव्हता त्यामुळे डीव्हीडी घेताना नानाच्या डाय हार्डच्या भूमिकेतून घेतली. पण चित्रपट बघितल्यावर मला खूप मोठा साक्षात्कार झाला. तो सांगण्यासाठी मला तीन वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगणं जरूरीचं वाटतं.
एक दुर्लक्षित गाव असतं. तिथे एकाला गाय चारायला गेलेला असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. त्यामुळे गावात गाईचं आणि दत्ताचं देऊळ बांधतात आणि त्या गावाची 'जागृत देवस्थान' अशी प्रसिद्धी होते.
द लंचबॉक्स आणि शिप ऑफ थिसस च्या निमित्ताने...
नमस्कार,
नुकताच द लंचबॉक्स, आणि काहि दिवसा पुर्वि येउन गेलेला 'द शिप ऑफ थिसस', या दोन हि चित्रपटांमधला समान धागा म्हणजे प्रयोगशिलता, आणि संबधित निर्देशकाच्या त्या पहिल्याच कलाकृति आहेत.
रितेश बत्रा (द लंचबॉक्स) आणि आनंद गांधि (शिप ऑफ थिसस) हे दोघेहि नव्या पिढिचे नेत्रुत्व करणारे निर्देशक. दोघांच्याहि कलाकृति बाहेरच्या चित्रपट मोहोत्सवात कौतुकास्पद ठरलेल्या, आणि समिक्षकांच्या पसंतीस उतरेल्या, ग्रिक तत्व्वेत्ता प्लुटार्क ह्याच्या फिलोसॉफिकल पॅराडॉक्स वर आधारित 'द शिप ऑफ थिसस' हा तर प्रयोगशिलतेच्या बाबतीत लंचबॉक्स च्या हि पुढचं पाउलंच ठरावं.
अस्वस्थ करणारी : अनुमती
जुन्या तुळशी वृंदावनात ठेवलेली आशेची नवी वात . . . वात विझवायला कोसळणारा पाऊस . . सोसाट्याचा वारा . . निसर्गापुढे वाकलेली तुळस . . विजांचा खेळ पहात झुलणारा एक झोका . . आशेतून निराशेत अन निराशेतून आशेत झोक्यासह हेलकावणारे मन . . दिव्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व हुडकणारे दोन डोळे . . . पावसासोबतच बरसणारे . . वाऱ्यासह भिरभिरणारे . . विजांसह कडाडणारे . . अस्तित्वाच्या संघर्षात वातीची साथ देणारे . . अनंत भावना आपल्यात सामाऊन समाजाला प्रश्न विचारणारे . . अन सिनेमा संपल्यावरही माझी साथसोडायची 'अनुमती ' न देणारे . . . !
शुद्ध देसी रोमांस : चित्रपटपरीक्षण
(नेटवरून साभार)
लिव्ह-ईन रिलेशनशिप्स, प्रेमाचे त्रिकोण, वि.पू.सं. आणि वि.बा.सं. या गोष्टी यशराज बॅनरसाठी नव्या नाहीत. 'दाग', 'सिलसिला', 'चांदनी', 'सलाम नमस्ते' ते अगदी अलीकडच्या 'बँड बाजा बारात' पर्यंत या विषयांना यश चोप्रांनी दिग्दर्शक म्हणून आणि नंतर निर्माता म्हणून समर्थपणे सादर केले आहे. 'शुद्ध देसी रोमांस' हा चित्रपटही अशाच एका प्रेमाच्या त्रिकोणाची हल्लीच्या जाणिवांचा तडका मारलेली 'हटके' कहाणी आहे.
सिनेमा सिनेमा- आम्रपाली
