चालणे
भटकन्ती करण्यासाठी ठिकाणे
मला ट्रेकिंग चे खूप आकर्षण आहे लहानपणापासून. पूर्वी पुण्याच्या आसपासच्या किल्ल्यांवर जाउनही झाले आहे. जसे कि तोरणा , राजगड , पुरन्दर , सिंहगड , लोहोगड , विसापूर .
छोटे ट्रेकही केले होते. उदा कात्रज - सिंहगड , कावळ्या किल्ला - शिवथर - हिरडोशी
परत सुरूवात करायची आहे. काही मित्र भक्कम ट्रेकर आहेत पण त्यंच्याबरोबर एकदम जाणे झेपणार नाही . त्यासाठी तयारी म्हणून छोटे १५-२० कि.मी. चालण्याचे एक-दोन दिवसाचे ट्रेक सुचवा. शक्यतोवर सपाट चालणे हवे. किंवा थोडे फार चढणे - उतरणे चालेल.
खालील ठिकाणांबद्दल कुणाला माहिती आहे का ?
आज रेसकोर्स वर
गुढगे वाईट्ट्ट्ट्ट् दुखत होते, वाईट वाटत होते की आज आपल्याला धावता येणार नाही.
थोडेसेच अंतर धावलो रेसकोर्सवर. आज रेसकोर्सवर जास्तकरून फक्त चाललो.
धुक्याच्या दाट पट्ट्यातून चाललो....धुके हाताला लागतंय का ते पाह्यलं, ओलसर दमट हवेचे संथ खोल श्वास घेतले, सिगारेटच्या धुरासारख्या तोंडातून वाफा काढल्या.
गारठल्यामुळे जाडजूड झालेल्या साळुंक्या एकमेकांना चिकटून बसलेल्या पहिल्या, जोडीने उडणारे धनेश पाहिले. घोड्यांच्या टापांबरोबरच त्यांच्या श्वासाचेही आवाज ऐकले.
एक असा वेगळा चालण्याचा उपक्रम
नमस्कार मित्रहो ;
माझ्या एका मित्रवर्याने ; टाटा मोटर्स या आपल्या कार्यालया पासून घरी चालत येण्याचा आगळा उपक्रम केला. त्याच्या वतीने मी हे लिहीत आहे.
--------------------------------------------
WALKING is my passion.
It was a great pleasure and wonderful experience on accomplishment of my venture “WALK FOR HEALTH” on Thursday, 22nd March 2012.
It took almost four and half hours of actual walk time to cover distance of about 26 kms. in reaching from Tata Motors to my residence near Padmavati, Pune.
Attached are some photos taken en route.
