आयुष्याच्या एका वळणावर
ति अशी भेटली।
वळण मी घेतलं की दिलं देवानी
पण जीवनाची दिशा पालटली।
जे नको होतं आयुष्यात
तेच आवडायला लागलं।
मनाचे बंध तुटले
तिच्या आठवणीत मन रमलं।
प्रेम कसं असतं
ते आज उमगलं
मनावरचं ब्रीद वाक्य
आज पुसलं गेलं।
प्रेम समजलं तर
जीवनाचं सार असतं।
नाही समजलं तर
वासनेचा भार असतं।
ज्यांना दोन्ही तिल अंतर समजलं
त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं।
वळण
गाडी घाटदार वळण घेत होती. असं वळतांना एकदम मस्त वाटत होतं. प्रत्येक वळणावर हेलकावे घेणाऱ्या शरीरासोबत मनानेही एक वेगळीच सुखाची सुंदर लय पकडली होती. क्षणभर घाटातला प्रवास धोक्याचा म्हणणं बालीश वाटलं; इतकं मन सुखावलं होतं. म्हणूनच जागोजागी लावलेले सावधगीरीचे इशारे आणि अनेक जाणत्या लोकांचे सल्ले, सहज नजरेआड झाले होते. हा रस्ता, हे सुख कधी संपुच नये असं वाटू लागलं होतं....
मृणालने घड्याळात पाहिलं. पावणेसहा वाजत आले होते. खरं तर शार्लोट लेकजवळच्या त्या बेंचवरून उठायची तिची अजिबात इच्छा नव्हती. जवळपास गेला एक तास ती इथे बसली होती. विकडे असल्याने पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती आणि असली असती तरी तिला फारसा फरक पडला नसता. ती आपल्याच जगात होती. मनातला सगळा गोंधळ निपटून काढायचा म्हणून तर ती माथेरानला आली होती ना. नेटवर रिसॉर्टची माहिती चेक करतानाच तो शार्लोट लेकच्या जवळ असल्याचं तिला कळलं होतं. दुपारचा चहा झाल्यावर रिसॉर्टच्या मागचा रस्ता धरून ती निघाली होती.

नकळत जीवनात
मोड असा लागला
गेले सारे कसे कुठे
राहिलो मी एकला...
गरजेस्तव जो तो
संगती ने चालला..
मखरात स्थापुनी मला
कुठे चालता जाहला...
शिखरावर भोगतो मी
एकान्ती असली सजा
मीच इथे माझा राजा
मीच असे माझी प्रजा...