Block किती छोटा शब्द आहे. अडीच अक्षरी आणि इंग्रजीत चार अक्षरी पण, या छोट्याशा शब्दाने संवादच संपून जातो. काही काळापुरता नाहीतर कायमचा. किती सोपं झालंय आजकाल आपल्याला नकोसं असणारं कोणी ब्लॉक मध्ये टाकलं जातं नाहीतर आपण कोणाला नकोसे झालो तर आपल्याला ब्लॉक केलं जातं.
खुप प्रसिद्ध झाला आहे शब्द हा. नाही आवडलं कर ब्लॉक नाही पटलं, राग आला, नकोसं झाली कोणी कर ब्लॉक. ते पण एक टच वर. फक्त एक टच आणि झालं समोरचं माणूस ब्लॉक. संवाद तिथंच संपला. त्या व्यक्तीला काय वाटेल मन दुखावलं जाईल याचा विचार पण येत नाही. आपल्याला काय वाटेल आपण ब्लॉक झालोतर हा ही विचार येत नाही.
दृश्य एक
प्रवास ST मधला ..... ST लांब पल्ल्याची .... गर्दी नव्हती .... मधील बाक रिकामी .... मी नेहमी लांब पल्ल्याची गाडी असेल आणि आरक्षण नसेल तर तीस नंतरच्याच बाकावर बसतो . एका थांब्यावर गाडी थांबली .. एक जोडपं गाडीत चढलं आणि गाडी सुटली .... बायको पुढे आणि नवरा मागे ...बायको पुढच्या बाकाच्या इथे थांबली ... नवरा तिच्याकडे लक्ष नं देता मागील बाकाकडे आला आणि झर्रकन खिडकी जवळच्या बाकावर जाऊन बसला आणि एकटाच असल्याप्रमाणे खिडकी बाहेर पाहू लागला ..... बायको शांतपणे त्याच्या शेजारी येऊन बसली .
नातं
शमली सारी वादळं
प्रश्नही निरुत्तर झाले
तुझ्या अशा जाण्याने
जीवनच गोठून गेले
हेव्यादाव्याच्या गर्तेत
जीवन सारं गुंफलं
दूर राहूनच मी
नातं असं जपलं
जुळली नव्हती मनं
तरी नाती होती गुंफली
गुंफलेल्या नात्यातून
दोन फुलं बहरली
फुलांचं दान........
पदरात माझ्या टाकलं
तुझं माझं म्हणून मीही
ते आनंदानं स्विकारलं
का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...
नातं
जिथे होतेय माणुसकीची कदर
तिथे मला विसावायचं आहे.
साय्रा जगाला मायेच्या पंखात
घेण्यासारखं नातं मला जोडायचं आहे.
राबनाय्रा हाताला साथ -
आजारी मातेला हात द्यायचा आहे.
दुख- दलितांच्या मुलांना सत्याच्या शाळेत सोडून
पोरक्या आसवांना ममत्व द्यायचं आहे.
कि जे सुख -दुखात समिलणारं-
कुणीही मायेनं जोपासणारं माणुसकीचं नातं मला जोडायचं आहे …।
पांडुरंग वाघमोडे (जत,जि.सांगली)
आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं
डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके
खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...
आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....
वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!