एकट्याच मन माझं... एकट्याच स्वप्न...
भरलेलं आभाळं आणि एकटं चांदण..
एकट्याच आयुष्य माझं.. एकटाच करविता..
एकटेच शब्द माझे..एकट्याच माझ्या कविता..
एकट्या माझ्या भावना..
एकट्या माझ्या वाटा..
भलामोठा हा पसारा..
तिथे मी एकटा...
एकाकी हा प्रवास
श्वासही एकाकी..
पुसट रेषा माझ्या
माझे हातही रिकामी....
गलितगात्र नयनात अश्रू माझे एकटे..
सलत चालले ह्रद्याला हे दुःख माझे एकटे...
एकटाच मी एकट्याला अंतर हे ना उरले....
साथही सोडली शाईने....
शब्दही माझे संपले..
- अजय चव्हाण
एकाकी
दोन पावलावर घर तुझे
आताशी मी फिरकत नाही
दोन घडीचेच आयुष्य
आता ते उरकत नाही
कैक उन्हाळे पावसाळे पाहिले
आता काही सोसवत नाही
उन्हे उतरली तरी फार वेळ
आता सावल्या सरकत नाही
वेळी अवेळी सांजवेळी
आता येते डोळा पाणी
निपटून घेतो थरथरत्या हातांनी
आता मी ते मिरवत नाही
राजेंद्र देवी
सहजच जेव्हा आज गावाकडे आलो,
आठवणीतल्या त्या मळ्याकडे आलो,
ओळखीच्या त्या वाटेवरून चालत,
विसरलेल्या माझ्या घराकडे आलो!
अंगणातल्या त्या मातीमध्ये
विखुरलेली माझी स्वप्ने दिसली,
माझ्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघत
पडकी भिंतही खुदकन हसली!
चालत-चालत जेव्हा माझ्या शाळेजवळ आलो
पाठीवरल्या दप्तराच्या आठवणीत बुडालो
आठवून इथला प्रत्येक क्षण कंठही दाटून आला,
समुद्राला आज जणू त्याचा किनाराच मिळाला!
गावच्या मंदिराजवळ आजही कुणीतरी खेळतंय
खेळता-खेळता मध्येच माझ्याकडे बघून हसतंय
हसण्यातून त्याच्या मला माझीच आठवण आली
स्वप्नांच्या त्या दुनियेत डोळ्यांची कड ओली झाली!
रुक्ष जगाचा आला कंटाळा,
ऒलाव्याविना कसा फ़ुलावा मळा.
वार्यासंगे उडतो पाचोळा,
गरगर फ़िरतो वाटोळा.
कारण जगण्याचे दमलो शोधुन,
कसे कळावे घडते कोठून.
झाडावरचे घरटे आज रिकामे
नाही किलबिल कां सुने ?
काऊची ती सायं-शाळा
अन हिरवळीची गेली छत्री
कसा सोसावा तीव्र उन्हाळा
कंठ दाटला मनीं उमाळा !
पिले होती लहान तोवर
दिवस संपले, न कळे सरसर
पंखांत दिले बळ भरून
गेली सगळी आज उडून
आज विसावे आंस आगळी
पुन्हा अंकुरावी नवी पालवी
घरटी वसावी तीच चिमुकली