एकाकी

Submitted by अजय चव्हाण on 27 November, 2019 - 03:19

एकट्याच मन माझं... एकट्याच स्वप्न...
भरलेलं आभाळं आणि एकटं चांदण..
एकट्याच आयुष्य माझं.. एकटाच करविता..
एकटेच शब्द माझे..एकट्याच माझ्या कविता..

एकट्या माझ्या भावना..
एकट्या माझ्या वाटा..
भलामोठा हा पसारा..
तिथे मी एकटा...
एकाकी हा प्रवास
श्वासही एकाकी..
पुसट रेषा माझ्या
माझे हातही रिकामी....

गलितगात्र नयनात अश्रू माझे एकटे..
सलत चालले ह्रद्याला हे दुःख माझे एकटे...
एकटाच मी एकट्याला अंतर हे ना उरले....
साथही सोडली शाईने....
शब्दही माझे संपले..

- अजय चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान!
अजयदा, आवडली कविता..

खरंच एकटेपणाची भावना खुप वेदना देऊन जाते. शेकडोंच्या गर्दीतसुद्धा हा माणुस एकटा असतो. तेव्हा त्याच्या मनाची होणारी तगमग पाण्यातुन काढलेल्या माश्याप्रमाणे असते..

khup chan!

गलितगात्र नयनांत म्हणजे काय ? नयनांची गात्रे म्हणजे बुब्बुळ, नेत्रपटल, पापणी, पापणीचे केस, अश्रूपिंड इत्यादी का?