एकाकी

Submitted by bnlele on 20 May, 2011 - 23:03

रुक्ष जगाचा आला कंटाळा,

ऒलाव्याविना कसा फ़ुलावा मळा.

वार्‍यासंगे उडतो पाचोळा,

गरगर फ़िरतो वाटोळा.

कारण जगण्याचे दमलो शोधुन,

कसे कळावे घडते कोठून.

झाडावरचे घरटे आज रिकामे

नाही किलबिल कां सुने ?

काऊची ती सायं-शाळा

अन हिरवळीची गेली छत्री

कसा सोसावा तीव्र उन्हाळा

कंठ दाटला मनीं उमाळा !

पिले होती लहान तोवर

दिवस संपले, न कळे सरसर

पंखांत दिले बळ भरून

गेली सगळी आज उडून

आज विसावे आंस आगळी

पुन्हा अंकुरावी नवी पालवी

घरटी वसावी तीच चिमुकली

शाळा काऊची भरावी संध्याकाळी

गुलमोहर: 
शब्दखुणा: