Submitted by राजेंद्र देवी on 24 September, 2013 - 04:17
एकाकी
दोन पावलावर घर तुझे
आताशी मी फिरकत नाही
दोन घडीचेच आयुष्य
आता ते उरकत नाही
कैक उन्हाळे पावसाळे पाहिले
आता काही सोसवत नाही
उन्हे उतरली तरी फार वेळ
आता सावल्या सरकत नाही
वेळी अवेळी सांजवेळी
आता येते डोळा पाणी
निपटून घेतो थरथरत्या हातांनी
आता मी ते मिरवत नाही
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निपटून घेतो थरथरत्या
निपटून घेतो थरथरत्या हातांनीआता मी ते मिरवत नाही
मस्त....
कविता आवडली.
कविता आवडली.
प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद...
प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद...