तू हे जिवन मैथुन जाण
ते जीवाने मिथ्या जगावे
इच्छा सुटण्याची होता
सद्य शरीर लागते सोडावे
घालमेल होत असे जिवाची
न जाणो ते काय घडावे
स्वर्गा ची ईच्छा असता
नर्कात स्व:कर्माने न्यावे
कोण हिशेब ठेवील याचा
जीवास कसे सर्व ज्ञात रहावे
तो चित्रगुप्त जी देईल शिक्षा
जिवास ते सर्व लागे भोगावे
जेव्हा शरिराचे होते कलेवर
पोहचतो जीव वैतर्णी घाटावर
त्या वैतर्णी चा प्रवाह विक्राळ
उठती ज्वाळा न दिसे तळ
एक ही नाव नोहे घाटावर
जीवास पोहचणे पैलतीर
भले भले थरथरले वीर
पिण्यस इथे न मिळे निर
दुर कुठे नदीकिनारी
मन माझे घेई भरारी
वाळूवरती पैल-तीरी
बागडे धुंद प्रेमलहरी
मनमौजी उनाड मी
तूच सखे,एक सोबती
प्रेमगीत गाण्यास तू
स्वरसुरांची दे संगती
शांत काळोख्या राती
पडले नभी टिपूर चांदणे
झगमगले वाळवंट सारे
हर्षले मनी प्रेम देखणे
े
―₹!हुल/२५.८.१७
पैलतीर
जिवनाच्या पैलतीरी मी आज
एकटाच ऊभा आहे ॥धृ॥
घडल्या घटनांकडे मी आता
तटस्थ पाहतो आहे ॥१॥
काळजीचा भार का अजूनी
खोलवर वाहतो आहे ?
भोगिली सगळी माया तरी
मोहात अजूनही आहे ? ॥२॥
निसटलेले धागे मी आज
का जुळवतो आहे ?
नसूनही हातांत काही का
मनांत जोडतो आहे ? ॥३॥
अंधूक क्षितिजा पल्याड काही
शाश्वत दिसते आहे
शोध घेण्यास गुढ अज्ञेयाचा
अंतरी आसुसलो आहे ॥४॥
जिवनाखेरी मी प्रांजळ काही
कबुली देतो आहे
शेवटल्या श्वासाला अस्फुट हसू
समाधान मागतो आहे ॥५॥
―₹!हुल / २५.८.१७
"एक मिनिट वेळ आहे का?", फोन वर मोना विचारत होती. खरतर मी जरा घाईतच होतो. लवकर काम संपवून मित्रांना भेटायचं होतं.
"Urgent?" मी वैताग लपवायचा प्रयत्न करत विचारलं.
" Yes, it's personal. Please?" मोना जरा गंभीरच वाटत होती. काहीतरी तसच कारण असणार.
"OK. Come "
आता मात्र मला थोडी काळजी वाटायला लागली. मोना घाईतच आत शिरली आणि लगेच दरवाजा बंद करून माझ्या समोर बसली. तिचा चेहरा बघून मला जरा टेंशनच आलं. काय असेल बरं? हीचा काही प्रॉब्लेम? पण मग ही शमा कडे, माझ्या बायकोकडे का नाही बोलली? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतानाच माझी नजर चुकवत मोना बोलायला लागली.
भौतीक सुखासंगे धावलो
भोक्ता मी साधनांचा
पैलतीर दिसे आता
अंतःकाळ जवळी आला
न कुठे बांधिली नाती
न कोणी सखे सोबती
भवती मुंगळे सुखाचे
न कोणी अंती संगती
विषय भजनी लगलो
स्तवलो बोल फुकचे
मुखे हरिनाम घेतले नाही
आता हरिध्यास लागे
पिकले पान वेलीवरचे
देठही न हिरवे आता
उडे अंतराळी आत्मा
उरे फक्त पाचोळा