प्रेमलहरी

Submitted by र।हुल on 25 August, 2017 - 14:56

दुर कुठे नदीकिनारी
मन माझे घेई भरारी
वाळूवरती पैल-तीरी
बागडे धुंद प्रेमलहरी

मनमौजी उनाड मी
तूच सखे,एक सोबती
प्रेमगीत गाण्यास तू
स्वरसुरांची दे संगती

शांत काळोख्या राती
पडले नभी टिपूर चांदणे
झगमगले वाळवंट सारे
हर्षले मनी प्रेम देखणे

―₹!हुल/२५.८.१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनमौजी उनाड मी
तूच सखे,एक सोबती
प्रेमगीत गाण्यास तू
स्वरसुरांची दे संगती>>>>> मस्त्च जमलय हे..

छान जमलिये..
मनमौजी उनाड मी
तूच सखे,एक सोबती
प्रेमगीत गाण्यास तू
स्वरसुरांची दे संगती>> Happy