कायदा

नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 23 December, 2015 - 06:05

सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते??

तडका - कायद्यात

Submitted by vishal maske on 21 December, 2015 - 09:55

कायद्यात

आता सर्रास बोलणे
जनतेलाही पटू शकतात
कायद्याच्या आधाराने
गुन्हेगारही सुटू शकतात,.?

मात्र गुन्हेगार सुटल्याची
सल मनी टोचत राहते
कायद्यावरील विश्वासाची
दृढताही खचत जाते,...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सुटला हरामखोर ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 December, 2015 - 17:15

सुटला हरामखोर.. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार.. आता पुन्हा काही मोर्चे निघतील मग कदाचित सारे काही थंड.. बातम्यात तिच्या आईला पाहिले.. बघवत नव्हते.. फाशीपेक्षाही काही जास्तीची शिक्षा असेल तर ती तिला त्या लोकांना द्यावीशी वाटत असेल .. पण प्रत्यक्षात मात्र गुन्हा सिद्ध होऊनही एक जण आज सुटत आहे.. याला जबाबदार कोण.. आपण की कायदा.. आमच्या शेजारच्या बाईने जो संताप व्यक्त केला.. क्षणभर माझा थरकाप उडाला.. सोळा अठरा वर्षांची मुलगी आहे तिला.. म्हणाली इसको बाहर निकलतेही मार देना चाहीये.. कल हमारी बेटी घर के बाहर जाती है, उसको थोडा लेट होता है तो हमको डर लगा रहता है..

विषय: 

तडका - पुरावे

Submitted by vishal maske on 10 December, 2015 - 09:00

पुरावे

कधी पुराव्यां अभावी
सत्यही छळीले जातात
सत्य बाजु वाखाणण्या
पुरावेच पाहिले जातात

पुराव्यांच्या बाबतीत
सदैव असावे कार्यक्षम
जिकडे पुरावे भक्कम
तिकडे न्यायही सक्षम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

ठहरने को बोला है

Submitted by स्वीट टॉकर on 4 December, 2015 - 01:49

साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.

तडका - जेल पार्टी

Submitted by vishal maske on 27 November, 2015 - 09:35

जेल पार्टी

मोबाइल चा वेगळा दर
चार्जिंगचा वेगळा दर
गांज्या आणि पार्टीसाठी
ठरलेला वेगळा दर

वेळो-वेळी लक्षपुर्वक
कैद्यांची उठाठेव होती आहे
कळंबा जेलची अशी
दुर-दुरवर ख्याती आहे

हॉटेल सारखेच जेल देखील
स्टार वाले ठरू लागतील
"जेल-पार्टी" करण्यासाठी
लोक गुन्हेही करू लागतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

* सदरील वात्रटिका ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

जिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता

Submitted by Rajesh Kulkarni on 26 November, 2015 - 06:34

जिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता
.
.
माझे फेबुमित्र लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेऊन कोणी छळवणूक केली. त्यामुळे हताश न होता त्यांच्या पत्नीने स्वत:च कायद्याचा अभ्यास करून वकिलीची सनद प्राप्त केली. त्यावेळी त्यांची मुलगी दहावीत होती. त्यांच्या निश्चयाला सलाम.

स्वत:ला वाईट अनुभव आल्यावर जिद्दीने त्याबाबतीत काही करणारे विरळा असले तर अलीकडे स्वयंप्रेरणेने त्याची तड लावण्याचा निश्चय करताना पाहिले आहेत.

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

वारसा हक्काबाबत माहिती हवी आहे

Submitted by UlhasBhide on 25 November, 2015 - 10:24

मालमत्तेबाबत वारसाहक्काची माहिती माझ्या जवळच्या संबंधितांना हवी असल्याने मी हा धागा उघडला आहे.
या विषयातील जाणकारांनी मदत करावी ही नम्र विनंती.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुटुंब प्रमुख : अबक (खरे नाव जाहीर केलेले नाही) यांच्या मालमत्तेविषयी
जन्म : १८९८ (अंदाजे) मृत्यू : १७ ऑक्टोबर १९५६

प्रथम पत्नी : (हयात नाही) प्रथम पत्नीपासून अपत्ये : २ मुली
प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला.
द्वितीय पत्नी : (हयात नाही) द्वितीय पत्नीपासून अपत्ये : ३ मुलगे, ४ मुली

विषय: 

दिव्याखालचा अंधार

Submitted by अनया on 17 November, 2015 - 18:39

आमची पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात काही शेतजमीन आहे. सुरवातीपासूनच तिथे विजेची सुविधा नव्हती. डिझेलवर चालणारा कृषीपंप आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी सौर्य कंदील अश्या सोयींवर भागत होत. पण लांबचा विचार केला, तर वीज असण फार सोयीच होणार होत. वीज नसण्यामुळे आमच्या राहत्या घरी जेवढी भयानक अडचण झाली असती. तेवढी अडचण शेतावर होत नव्हती. शेताला आणि शेतावर राहणाऱ्या कुटुंबाला वीज नसण्याची सवय होती. गैरसोय होत होती, पण भागवता येत होते.

Pages

Subscribe to RSS - कायदा