कायदा

पुणे कॉर्पोरेशन tax बद्दल

Submitted by राज1 on 6 October, 2016 - 07:37

आमच्या घराच्या टेरेसला (१०० sq.ft.) आम्ही sliding window बसवल्या व त्याचा रूम सारखा वापर करतो त्या साठी Pune Corporation चा वेगळा tax भरावा लागतो का?

विषय: 

तडका - कलंक

Submitted by vishal maske on 4 October, 2016 - 21:06

कलंक

समाजात गुन्हेगारांची
नवी फळी होऊ लागली
रोजच्या वाढत्या गुन्ह्यांची
रोज बातमी येऊ लागली

गुन्हेगारांच्या दुष्कृत्याचे इथे
जाती-धर्मालाही डंख आहेत
मात्र गुन्हेगार जाती धर्माचे नव्हे
तर समाजालाच कलंक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

mypedia बद्दल माहिती

Submitted by मी अमि on 30 September, 2016 - 07:50

mypedia हे अ‍ॅप कोणी वापरते का? काही शाळा या अ‍ॅपचा उपयोग करतात असे कळले. या अ‍ॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का?

अजून किती सहन करायचे ?

Submitted by विश्या on 20 September, 2016 - 07:12

हल्ले हल्ले आणि हल्ले ..........
आता असे किती हल्ले सहन करायचे ? कधी आपण याना यांची औकात दाखवणार ? आपल्या शांत राहण्याच्या किती फायदा उठवणार हे दहशतवादी .............
अमी फक्त मराठा एकत्र झालो तर आज लाखोंचा जनसमुदाय तयार झाला , मग अखंड देशाचा पाठिंबा असताना का अजून या भ्याड हल्ल्याना सहन करायचे , कधी संसद , कधी इस्पितळ , कधी स्थानक तर कधी शाळा , अजून किती ठिकाणी हल्ले होण्याची वाट पाहायची आपण ............
आता फक्त निषेध व्यक्त करून चालणार नाही , कारण त्याचा फरक इतकाच काही दिवसांनी दुसरा हल्ला झालेला दिसेल ..

विषय: 

तडका - कायद्याची जाण

Submitted by vishal maske on 6 September, 2016 - 20:47

कायद्याची जाण

कित्तेकांच्या जीवावर
पंगती बेतल्या आहेत
या वाढत्या दुर्घटना
लक्षात घेतल्या आहेत

म्हणूनच कायद्याची जाण
प्रत्येकाला ठेवावी लागेल
भंडारा व पंगतीसाठी
परवानगीच घ्यावी लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हल्ल्याचे सत्य

Submitted by vishal maske on 3 September, 2016 - 10:32

हल्ल्यांचे सत्य

पोलिसांच्या सुरक्षिततेवर
आता प्रश्नचिन्ह आहेत
घडते अपप्रकार पाहून
आमचे मनं सुन्न आहेत

बारकाईने पाहिल्यास
सत्य स्पष्ट दिसु शकतात
या घडत्या घटनांमागे
षढयंत्रही असु शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गृहनिर्माण धोरण

Submitted by vishal maske on 2 September, 2016 - 12:32

गृहनिर्माण धोरण

संविधान सांगत आहे
प्रत्येकाला मिळावं घर
भारतीय नागरिकांना
स्वघरातुन दिसावी भोर

मात्र हे घर देतानाही
कुठे छुपे कारण असते
वोट बँक पाहूनच
गृहनिर्माण धोरण असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - समाज रक्षक

Submitted by vishal maske on 27 August, 2016 - 10:21

समाज रक्षक

स्वत: घेऊन परिश्रम
सुव्यवस्था राखतात
म्हणूनच तर माणसं
इथे एकीने टिकतात

अशा समाज रक्षकांचा
सदैवच करावा आदर
पोलिसांमुळेच समाज
इथे जगतो आहे बेडर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माणसांची माणसिकता

Submitted by vishal maske on 26 August, 2016 - 10:54

माणसिकता माणसांची

कायद्याने का होईना
समान होऊ लागतील
मंदिरासह दर्ग्यामध्ये
स्रीया जाऊ लागतील

समानतेनं वागण्याची
भुमिका बजवायला हवी
माणसांची मानसिकता
आता बदलायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कायदा पाळा

Submitted by vishal maske on 25 August, 2016 - 12:33

कायदा पाळा

कोर्टाचे नियम
पाळायला हवे
नियमांचे ऊद्देश
कळायला हवे

म्हणून सांगतो
कायद्यात रहा
कायदा पाळून
फायद्यात रहा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - कायदा