(हे ललित आणि एक कथा मी २०११ मधे वेगळ्या आयडीने लिहिले होते. सर्व लेखन सध्याच्या आयडीवर असावे म्हणून पुनःप्रकाशित करत आहे. त्यासाठी मला आजचा दिवस छान वाटला. अनेकांनी वाचले आहेच. ज्यांनी वाचले नाही त्यांच्या साठी ८ वर्षापुर्वी जसा लिहिला आहे तसाच येथे देत आहे. पुनरावृत्तीसाठी क्षमस्व!)
आता ‘सातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीर’ असं असलं तरी कॉलेजच्या काळात शुक्रवारी संध्याकाळीच ‘रविवार’ चढायला लागायचा. आणि त्याचा हॅंगओव्हर मंगळवारपर्यंत टिकायचा. (वेगळा अर्थ काढू नका.) यादीच फार मोठी असे. रद्दीची दुकाने पालथी घालणे, पेपरची कात्रणे काढणे, अप्पा बळवंतला जावून ऊगाचंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, मित्राच्या रुमवर तबला-पेटी घेऊन मैफील रंगवणे. (कुणी काही म्हणो, आम्ही तिला मैफीलच म्हणायचो) शंकरच्या स्टुडीओत जावून मातीशी खेळणे असल्या अनेक भानगडी असायच्या. त्यामुळे कॉलेजच्या कामासाठी खऱ्या अर्थाने दोनच दिवस मिळायचे. बुधवार आणि गुरुवार. रविवारी जाग यायची तिच पसाऱ्यात.
साल आठवत नाही. कॉलेजचे दिवस होते ईतकं सांगीतलं तरी पुरेसं होईल. 'ईंजीनिअर’ केलं की पोराचं आयुष्य मार्गी लागतं, आणि बोर्डींगला किंवा होस्टेलला पोरगं ठेवलं की त्याला शिस्त लागते असं आई-बापांना वाटायचा काळ होता तो. आई-बापही भाबडे होते त्या काळी. त्या मुळे आमची रवानगी सहाजीकच ईंजीनिअरींगला आणि बाड-बिस्तरा होस्टेलला जाऊन पडला. गाव, शाळा सुटलेली. शहर, कॉलेजची ओळख नाही. त्या मुळे सुरवातीच्या दिवसात कॉलेजच्या आवारात आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या अनोळखी रस्त्यांवरुन 'मोरोबा’सारखा चेहऱा करुन निरर्थक भटकायचो. मोरोबा म्हणजे आमचा घरगडी. निव्वळ शुंभ.
मी जिंकलो! मी हरलो!!
अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी संसदेने एक दिवसाच्या चर्चेनंतर अण्णांच्या तीन मागण्यांचा समावेश 'यथायोग्य' पद्धतीने जनलोकपाल बिलात करण्यास एक मताने ' तत्वतः' मान्यता दिली. अण्णांचे समर्थक आंदोलक आणि वृत्तवाहिन्यांनी 'अण्णा जिंकले' असा जल्लोष केला असला आणि उपोषण स्माप्त झाले असले तरी प्रत्यक्षात कोणी काय कमावले आणि काय गमावले हे तपासून पहावे लागेल.
तर सरकार,राजकारण आणि अध्यात्मिक गुरु यांच्या नादी लागू नये,असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे म्हणून आम्ही पूर्वीपासूनच या गोष्टी टाळत आलो.कारण हे विषय किचकट असून एकमेकांशी इंटरनेट किंवा इंट्रानेट( शबुद बरुबर हाये का?) ने जोडलेले असतात,असेही बिल गेट्स किंवा बिल क्लिंटन नामक तत्वज्ञ व्यक्तीने म्हटल्याचे आपणास् माहित असेलच.त्याचा प्रत्यय आपल्याला काल आला.नव्हे काल खात्रीच झाली,की अध्यात्म हा राजकारणी लोकांचा विषय आहे.आता सरकार हे एक अत्यंत किचकट आणि चिवट यंत्र असते,हे आपणास माहित आहेच.अनेक लहान लहान किंवा छोट्या मोठ्या असंख्य स्पेअर पार्टस्नी मिळून बनलेले असते.हे पार्टस म्हणजे वेगवेगळ्