ही बीबीसी वरची न्यूज वाचली.
महात्मा गांधींना 'वर्णद्वेशी' ठरवत त्यांचा पश्चिम अफ्रिकेतील घाना विद्यापीठाच्या आवारातील पुतळा कायद्याच्या शिक्षक आणि विद्द्यार्थांनी काढून टाकला. गांधीजींवर त्यांच्या दक्षिण अफ्रिकेतील वास्तव्या दरम्यान त्यांनी केलेल्या लिखाणातून कृष्णवर्णीय लोकांना 'काफिर' (अफ्रिकेतील 'निग्रो' अर्थाचा शब्द) म्हणण्याचा आणि भारतीयांना कृष्ण्वर्णीयांपेक्षा वरच्या श्रेणीचे म्हणण्याचा आरोप केला गेला आहे.
The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला
प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे
आमच्या पिढीने गांधी पाहिलेलेच नाहीत. आमच्या पिढीने आणीबाणीही पाहिलेली नाही. इतकंच काय, पण देशाने पहिलावाहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हाही आम्ही एकतर पाळण्यात खेळत होतो, किंवा मग अजून जन्मालाच यायचो होतो. आम्ही फाळणी पाहणं तर सोडाच, त्याचे पडसादही थेट अनुभवलेले नाहीत. "मजबूरी का नाम" असंच ज्यांच्याबद्दल ऐकत आलो ते गांधी आम्हाला कळले असं आम्हाला वाटलं ते दिलीप प्रभावळकरांनी चेहर्याला रंग लावला आणि सोनूने गायलेलं ’बंदे मे था दम’ काळजापर्यंत पोहोचलं तेव्हा! जेव्हा अजयने ’लिजंड...’ मध्ये फासामध्ये मान अडकवत डोळे आमच्यावर रोखले तेव्हा भगतसिंग ही काय चीज होती हेही आम्हाला कळलं!