ही बीबीसी वरची न्यूज वाचली.
महात्मा गांधींना 'वर्णद्वेशी' ठरवत त्यांचा पश्चिम अफ्रिकेतील घाना विद्यापीठाच्या आवारातील पुतळा कायद्याच्या शिक्षक आणि विद्द्यार्थांनी काढून टाकला. गांधीजींवर त्यांच्या दक्षिण अफ्रिकेतील वास्तव्या दरम्यान त्यांनी केलेल्या लिखाणातून कृष्णवर्णीय लोकांना 'काफिर' (अफ्रिकेतील 'निग्रो' अर्थाचा शब्द) म्हणण्याचा आणि भारतीयांना कृष्ण्वर्णीयांपेक्षा वरच्या श्रेणीचे म्हणण्याचा आरोप केला गेला आहे.
सध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.
न्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.
या प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.
देवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त "व्यक्तिचा पुतळा /मूर्ति" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.
आज महाराष्ट्रात लाल महालातील पुतळा हलवाण्याच्यावरून जो वाद चालू आहे तो म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही?यावरून वाद घालण्यापेक्षा आज जे आहे ते टिकवता कसे येईल त्यावर लक्ष्य केंद्रित करावे.३५० वर्षापूर्वीचे महाल,किल्ले,महाराजांच्या काळातील बांधकाम हे सर्व त्याकाळातील स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे.परंतु आज यांची स्थिती चांगली नाही.रायगड,सिंधुदुर्ग,इत्यादी ठिकाणी बांधकाम ठासळत आहे.प्रशासन किंवा पुरातत्व विभाग त्याच्याकडे पुरेसे लक्ष घालत नाही.त्यासारख्या गोष्टींकडे संबंधितांचे कडून काम करून घेणे आणि आपला समृद्ध इतिहास जतन करणे सोडून मतिमंदासा